सदानंद मोरे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
- - घुमान (पंजाब) येथे एप्रिलमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ संत साहित्याचे गाढ अभ्यासक असणारे डॉ. सदानंद मोरे यांच्या गळ्यात पडली आहे.
-
-यंदाच्या चौरंगी निवडणुकीत डॉ. मोरे पहिल्या फेरीतच सर्वाधिक, ४९८ मतं मिळवत विजयी झाले आहेत.-या निवडणुकीत डॉ. मोरे, ससाणे यांच्यासह डॉ. अशोक कामत, पुरुषोत्तम नागपुरे असे चार उमेदवार रिंगणात होते.यापुर्वीचे अध्यक्ष:
2011 - ठाणे - उत्तम कांबळे2012 - चंद्रपुर - वसंत आबाजी डहाके2013 - चिपळूण - नागनाथ कोतापल्ले2014 - सासवड - एफ एम शिंदे2015 - घुमाण (पंजाब)-सदानंद मोरे
-यंदा पंजाबमध्ये मराठी सारस्वतांचा मेळा भरणार आहे.-88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संत नामदेव महाराजांची कर्मभूमी असलेल्या पंजाब राज्यातील घुमान येथे रंगणार आहे. .
-साहित्य संमेलनाच्या आयोजनाची तयारी दर्शवणारी विक्रमी दहा निमंत्रणे यंदा महामंडळाकडे आली होती.-त्यातून पंजाबमधील अमृतसरजळील 'घुमान' गावात संत नामदेव गुरुद्वारा सभेच्या निमंत्रणाचा स्वीकार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
-जानेवारी 2015 मध्ये होणार्या साहित्य संमेलनासाठी गुजरातमधील बडोद्यातील मराठी वाड्मय परिषदेने निमंत्रण दिले होते. तसेच शाहुपुरी शाखा, मसाप, सातारा, सार्वजनिक वाचनालय - कल्याण, कळवे येथील जवाहर वाचनालय - ठाणे, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान - कणकवली, रात्र पाठशाळा समिती - जालना, उस्मानाबाद मसाप शाखा, कल्याण शिक्षण संस्था तळोशी - चंद्रपूर, आगरी यूथ फोरम - डोंबिवली येथूनही निमंत्रणे आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत