निष्णात कायदेपंडित हरपला...
- सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.
-15 नोव्हेंबर 1914 रोजी वैद्यनाथपुरम येथे एका तमिळ ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले वैद्यनाथपुरा रामा कृष्ण अय्यर यांना व्ही. आर. कृष्ण अय्यर म्हणून ओळखले जात होते.
-1952 मध्ये मद्रास विधानसभेवर ते निवडूनही गेले.
-त्यानंतर 1957 मध्ये इएमएस नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखालील डाव्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद सांभाळताना त्यांनी कायदा, गृह, पाटबंधारे, ऊर्जा, समाज कल्याण अशा खात्यांचा पदभार सांभाळला होता.
-1959 मध्ये त्यांनी पुन्हा वकिली सुरू केली आणि 1965 ची विधानसभा निवडणूक हरल्यानंतर तर वकिली व्यवसायात त्यांनी स्वत:ला वाहून घेतले.
-1968 ला केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली.
-नंतर 1973 ते 1980 या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
-निवृत्तीनंतरही ते अनेक मानवाधिकार आणि नागरी हक्क चळवळींत सहभागी झाले होते.
-त्यांना 1989 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
-1999 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
-मेनका गांधी यांचा समावेश असलेल्या एका प्रकरणी त्यांनी मंत्रिमंडळाचे आणि राष्ट्रपतींचे अधिकार स्पष्ट केले.
-त्यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे 21 व्या कलमाबाबतचा नवा अर्थ सर्वांना समजला.
-माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवर झालेली निवड रद्द करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा त्यांचा निर्णयही गाजला होता.
-गुजरात दंगलींची चौकशी करणाऱ्या समितीचेही ते सदस्य होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत