• New

    सीबीआयच्या संचालकपदी अनिलकुमार सिन्हा




    -केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी विशेष संचालक म्हणून काम करत असलेल्या अनिलकुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
    -सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा निवृत्त झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. 
    निवड समिती
     अध्यक्ष- नरेंद्र मोदी 
     सदस्य- 1)सरन्यायाधीश एच. एल. दत्तू 
                  2) लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे   
     
    -सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा दोन वर्षांनंतर मंगळवारी निवृत्त झाले. त्यांची कारकीर्द बरीच वादग्रस्त ठरली होती. 
    -नव्या संचालकांची निवड करण्यासाठी 40 अधिकाऱ्यांच्या नावाची यादी मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागाने केली होती. 
    -यातील तीन नावांची शिफारस पंतप्रधान कार्यालयाकडे अखेरीस करण्यात आली होती. 
    -या पदासाठी राजस्थानचे पोलिस महासंचालक ओमेंद्र भारद्वाज, केंद्रीय गृह मंत्रालयातील विशेष सचिव प्रकाश मिश्रा आणि केरळचे पोलिस प्रमुख के. एस. बालसुब्रमण्यम यांची नावे आघाडीवर आहेत. 
    -राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे (एनआयए) प्रमुख शरद कुमार आणि सीबीआयचे विशेष संचालक अनिलकुमार सिन्हा यांची नावेही चर्चेत होती. अखेर यातील अनिल सिन्हा या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

    -सिन्हा हे 1979 सालच्या बिहार कॅडर बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 
    -ते सध्या सीबीआयच्या विशेष संचालकपदाची धुरा सांभाळत होते. 
    -यापूर्वी त्यांनी अतिरिक्त सचिव- मुख्य दक्षता आयुक्त म्हणून काम पाहिले आहे

    सौजन्य- बालाजी सुरणे

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad