'इस्रो'कडून 'जीएसएलव्ही मार्क-3'चे यशस्वी प्रक्षेपण
18 डिसेंबर 2014 - (fb.com/mpsccurrentaffairs)
- श्रीहरीकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटरमधून यानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले.
- या यशस्वी चाचणीमुळे उपग्रहाद्वारे मानवाला अंतराळात पाठविण्याच्या दिशेने इस्रोने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
- इस्रोच्या पीएसएलव्ही या उपग्रह प्रक्षेपकाला मागील दोन दशकांत मोठे यश मिळाले होते. मात्र, 'लो अर्थ ऑर्बिट'मध्ये वजन वाहून नेण्याची पीएसएलव्हीची क्षमता कमी आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत होते.
- त्यामुळे जीओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल (जीएसएलव्ही) या अधिक क्षमता असलेल्या उपग्रह प्रक्षेपकाच्या निर्मितीवर इस्रोने लक्ष केंद्रित केले होते.
- मागील 25 वर्षांच्या प्रयत्नांनंतर 'जीएसएलव्ही मार्क-2'च्या माध्यमातून इस्रोने 50 टक्के यश मिळविले होते.
- त्यानंतर आज 'जीएसएलव्ही मार्क-3'ची चाचणी घेण्यात आली.
- या प्रक्षेपकाची वजन वाहून नेण्याची क्षमता सुमारे चार हजार किलोग्रॅम एवढी आहे. त्यामुळे मानवासह उपग्रह अंतराळात पाठविण्याच्या इस्रोच्या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा म्हणून 'जीएसएलव्ही मार्क-3'च्या चाचणीकडे पाहिले जात होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत