पहिली योजना (१९५१-१९५६)
या योजनेच्या काळात सार्वजनिक क्षेत्रात २,३७८ कोटी रुपये खर्च करण्याचे प्रस्तावित होते, परंतु या योजनेत शेती, ऊर्जा व जलसिंचनाला प्राधान्य देण्यात आलं.
दामोदर खोरे आणि हिराकूड योजना हे बहुउद्देशीय प्रकल्प याच कालावधीत हाती घेतले गेले.
चित्तरंजन येथे रेल्वे इंजिन कारखाना,
पेरंबूर येथे रेल्वे डबे, सेंद्रीय खत कारखाना इत्यादी पायाभूत उद्योग याच काळात उभारले गेले.
याच योजनेच्या काळात देशात १९५२ पासून ‘समुदाय विकास कार्यक्रम’ राबवण्यास सुरुवात झाली.
या योजना काळात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात प्रतिवर्षी २.१ टक्क्यांनी वाढ घडवून आणण्याचे उद्दिष्ट होते, परंतु ही योजना मोठय़ा प्रमाणात यशस्वी होऊन राष्ट्रीय उत्पन्नात प्रतिवर्षी ३.६ टक्के म्हणजे एकूण योजना काळात १८ टक्के इतकी वाढ साध्य झाली.
ही योजना हेरॉल्ड डोमार याच्या प्रतिमानावर आधारित होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत