सरितावर एका वर्षांची बंदी
-दक्षिण कोरियात आशियाई स्पर्धेत झालेल्या पक्षपाती निर्णयाच्या निषेधार्थ तिने कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला होता.
- तिच्या या वर्तनाबद्दल आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (एआयबीए) सरिताला एक हजार स्वीस फ्रँक्स (६६ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. तसेच १ ऑक्टोबर २०१४ ते १ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत तिला स्पर्धात्मक बॉक्सिंगमध्ये भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
- सरिताला बेशिस्त वर्तनापासून न रोखल्याबद्दल राष्ट्रीय प्रशिक्षक गुरुबक्षसिंग संधू यांनाही दोषी ठरविण्यात आले होते व त्यांच्यावरही तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. एआयबीएने त्यांना निदरेष ठरवले आहे.
- सरिताला बेशिस्त वर्तनापासून न रोखल्याबद्दल राष्ट्रीय प्रशिक्षक गुरुबक्षसिंग संधू यांनाही दोषी ठरविण्यात आले होते व त्यांच्यावरही तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. एआयबीएने त्यांना निदरेष ठरवले आहे.
- मात्र भारताचे परदेशी प्रशिक्षक ब्लास इग्लिशियास यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. तसेच त्यांना दोन हजार स्वीस फ्रँक्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत