• New

    स्वाधार व स्टेप योजना

    #CDPO #HRD #GS3

    स्वाधार योजना 
    » स्वाधार योजनेमध्ये निराधार, निराश्रित स्त्रिया, कैदी स्त्रिया नैसर्गिक आपत्तीमुळे निराधार झालेल्या स्त्रिया, अनैतिक व्यापारातून मुक्त केलेल्या, लैंगिक अत्याचार झालेल्या, हुंडाग्रस्त, एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह स्त्रियांना स्वेच्छेने प्रवेश दिला जातो. 
    » अन्न, वस्त्र, निवाऱ्याखेरीज योजनेमध्ये आरोग्य सेवा, हेल्पलाइन, व्यवसाय प्रशिक्षण, मानसोपचार, समुपदेशनासारखे लाभ दिले जातात. 
    » या सर्व सहकार्यातून त्या स्त्रियांचे पुन्हा उत्तमरीत्या पुनर्वसन व्हावे यासाठी प्रयत्न केला जातो. 
    » योजनेत स्वयंसेवी संस्थांची इमारत भाडय़ाची असल्यास पहिल्या वर्षी १०० टक्के आणि दुसऱ्या वर्षांपासून ७५ टक्के अनुदान दिले जाते. 
    » इमारतीचे बांधकाम करायचे असल्यास १०० स्त्रियांच्या निवासस्थानासाठी २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. 
    » राज्यामध्ये अशा ४८ संस्था मंजूर असून त्याची लाभार्थी क्षमता २५०० इतकी आहे. 


    #CDPO #HRD #GS3

    स्टेप : महिलांसाठी प्रशिक्षण व रोजगार कार्यक्रम –  
    ____________________________________
    » आर्थिकदृष्टय़ा  दुर्बल घटकातील स्त्रियांमधील कौशल्ये वाढवून त्यांची व्यावसायिकदृष्टय़ा सक्षमता वाढवणे हा योजनेचा उद्देश आहे. 
    » या योजनेत स्त्रियांना पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसाय, हस्तकला, खादी ग्रामोद्योग, रेशीम किडय़ांचे पालन या प्रकारच्या विषयातील प्रशिक्षण देण्यात येते. 
    » योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येते. 
    » योजनेत केंद्र शासनाकडून एकूण खर्चाच्या ९० टक्के रक्कम अनुदान म्हणून मिळते. 
    » उर्वरित १० टक्क्यांची रक्कम संबंधित स्वयंसेवी संस्थांना उभारायची असते. 
    » योजनेसाठी कमीत कमी ५०० व जास्तीत जास्त १ हजार स्त्रिया असणे आवश्यक आहे. 
    » संस्थेला दोन हप्त्यांत अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत १६ संस्था राज्यात कार्यरत आहेत.

    जॉइन करा » @MpscMantra

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad