श्याम बेनेगल यांना यंदाचा व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार :-
» मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा व्ही शांताराम पुरस्कार, यंदा ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना जाहीर झाला आहे.
» 10 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप असून, महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्या हस्ते मिफ 2018 च्या सांगता सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येईल.
» राहुल रवैल, किरण शांताराम, प्रसून जोशी, भारती प्रधान आणि विनोद अनुपम यांच्या समितीने एकमुखाने श्याम बेनेगल यांची या पुरस्कारासाठी शिफारस केली.
» भारतात, माहितीपट चळवळीला प्रोत्साहन देण्यात श्याम बेनेगल यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
» श्याम बेनेगल यांनी अंकुर, निशांत, मंडी आणि जुनून यासारखे 28 उत्कृष्ट चित्रपट बनवले असून, त्याशिवाय विविधी विषयांवर 41 माहितीपटही बनवले आहेत.
» त्यांच्या 1982 सालच्या ‘सत्यजित रे’ या माहितीपटाला चरित्रविषयक गटातला राष्ट्रीय पुरस्कार, तर 1985 साली त्यांनी बनवलेल्या नेहरू या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.
» 1988 साली त्यांनी बनवलेली 'भारत एक खोज', ही मालिका आजवरच्या सर्वोत्तम आणि लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. त्याशिवाय त्यांनी 'संविधान- द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया' या उत्तम मालिकेचीही निर्मिती केली आहे.
» 1934 साली हैदराबाद इथे जन्मलेल्या श्याम बेनेगल यांनी उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
» 1963 साली त्यांनी गुजराती भाषेत, 'घर बहती गंगा' हा आपला पहिला माहितीपट बनवला.
» बेनेगल यांनी 1966 ते 1973 दरम्यान जनसंवाद विभागात अध्यापकाचेही काम केले. त्यानंतर भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था, एफटीआयआयचे अध्यक्ष या नात्याने, त्यांनी चित्रपट शिक्षणाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावली.
» त्यांच्या चित्रपटांना नऊ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, त्याशिवाय पद्मश्री, पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले आहे.
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराविषयी :
______________________________
फिल्म्स डिव्हिजन आयोजित करत असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा दरम्यान व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. माहितीपट क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांना मिफ्फमध्ये या पुरस्कारानं गौरवलं जातं. फिल्म्स डिव्हीजनचे मानद चित्रपट निर्माते आणि नामवंत दिग्दर्शक चित्रपती व्ही. शांताराम यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो.
source :- PIB

कोणत्याही टिप्पण्या नाहीत