• New

    नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल, यांची प्रतिष्ठेच्या इहसान डोग्रामकी फॅमिली हेल्थ फाऊंडेशनच्या पुरस्कारासाठी निवड

    • नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पाल यांची प्रतिष्ठेच्या इहसान डोग्रामकी फॅमिली  हेल्थ फाऊंडेशनच्या  पुरस्कारासाठी  जागतिक आरोग्य संघटनेकडून निवड झाली आहे.
    • हा जागतिक सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय असून कौटुंबिक आरोग्य क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
    • जागतिक आरोग्य संघटनेच्या 27 जानेवारीला झालेल्‍या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय  घेण्यात आला.
    • मे 2018 मध्ये  स्विर्त्सलंडमध्ये जिनिव्हा येथे होणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यक्रमात डॉ. पॉल यांना हा पुरस्कार औपचारिकरित्या प्रदान केला जाईल.
    • डॉ. पॉल हे कौटुंबिक  आरोग्य क्षेत्रात विशेषत: नवजात शिशू आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित  करणारे आंतरराष्ट्रीय विख्यात संशोधक,  असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मंडळाच्या ठरावात म्हटले आहे.

    Source : pib

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad