महत्त्वाच्या वन लायनर घडामोडी : जानेवारी ते डिसेंबर 2017
VDMA India चे व्यवस्थापकीय संचालक राजेश नाथ यांना जर्मनीचा ‘क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेरीट’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाला आहे.
आय डू व्हॉट आय डू – रघुराम राजन यांचे पुस्तक (4 सप्टेंबर 2017 रोजी प्रकाशित)
‘बियॉन्ड द ड्रीम गर्ल’- हेमा मालिनी यांचे आत्मचरित्र. दीपिका पादूकोणच्या हस्ते प्रकाशन.
शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि समाजवादी विचारसारणीचे प्रगतिशील शेतकरी भास्करराव शंकर बोरावके यांचे वयाच्या 86 व्या वर्षी 17 ऑक्टोबर 2017 रोजी निधन झाले. ‘संघटनेची आई’ असे त्यांना संबोधले जाई.
#IamThatWomen: केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने स्त्रियांविरोधात स्त्रियांची लैंगिक पूर्वाभिमुखता (bias) समाप्त करण्यासाठी #IamThatWomen हे ऑनलाइन अभियान सुरू केले आहे.
17 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन (International Day for the Eradication of Poverty)
2017 ची थिम : Answering the Call of October 17 to end poverty: A path toward peaceful and inclusive societies
हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी Myntra या ई-कॉमर्स कंपनीने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाशी करार केला आहे.
सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१७पासून आता ३१ मार्च २०१८पर्यंत वाढवण्यात आली आहे.
रेल्वेकडून लवकरच रेल्वे तिकिटासाठीच्या आरक्षण अर्जावर तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्यायदिला जाणार आहे. सध्या आरक्षण अर्ज भरताना त्यावर पुरुष आणि महिला यांच्यासाठी अनुक्रमे ‘एम’ आणि ‘एफ’ असे दोन पर्याय देण्यात येतात. मात्र आता त्यामध्ये तृतीयपंथीयांसाठी ‘टी’ हा पर्याय द्यावा, अशी सूचना रेल्वेकडून देण्यात आली आहे. ‘टी’ म्हणजे ट्रान्सजेंडर अर्थात तृतीयपंथी.
केंद्रीय कॅबिनेटने रेल्वे क्षेतात तंत्रज्ञान सहकार्यासाठी स्वित्झर्लंड सोबतच्या सामंजस्य कराराला ऑक्टोबर २०१७ मध्ये मान्यता दिली आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये हा करार करण्यात आला होता.
10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान 'बेटी बचाओ बेटी पढाओ आठवडा' साजरा करण्यात येणार आहे. संकल्पना - द डॉटर्स ऑफ न्यू इंडिया.
पासेक्स (पॅसेज एक्झरसाइज) नौदल सराव:- जपानमध्ये ऑक्टोबर २०१७ मध्ये पार पडला. भारताच्या आयएनएस सातपुडा आणि कडमत्त या जहाजांनी सहभाग घेतला होता.
#IamThatWomen अभियान :-
केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने हे ऑनलाइन अभियान सुरू केले.
उद्देश :- स्त्रियांविरोधातील स्त्रियांचा लैंगिक हस्तक्षेप समाप्त करणे.
मेनका गांधी (महिला व बालकल्याण मंत्री) यांनी हे अभियान सुरू केले.
गीतांजली राव :- डिस्कव्हरी एज्युकेशन 3एम यंग सायंटिस्ट चॅलेंज २०१७ ची विजेती भारतीय-अमेरिकन ११ वर्षाची मुलगी.
देशातील पहिले प्रधानमंत्री कौशल केंद्र – नवी दिल्ली
REPAIR :- जनुकीय आजारांशी लढा देण्यासाठी अमेरिकेतील द बोर्ड इंस्टीट्यूट आणि एमआयटीने REPAIR नावाचे आरएनए एडिटिंग साधन विकसित केले आहे. RNA Editing for Programmable A to I Replacement (REPAIR)
हांबनटोटा बंदर :- श्रीलंकेने भारतसोबत हांबनटोटा बंदर शहरामध्ये १२०० घरे बांधण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
केरळ सरकारने एससी/एसटी आयोगाच्या शिफारशीचा हवाला देत ‘दलित’ आणि ‘हरिजन’ या शब्दांच्या वापरावर बंदी आणली आहे.
मोहन धारियांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नागपूरच्या वनराई फौंडेशन तर्फे दिला जाणारा राष्ट्रनिर्माण पुरस्कार डॉ. मनमोहनसिंग यांना प्रदान करण्यात आला.
प्रणव मुखर्जी यांचे आत्मचरित्र : द कोएलिशन इयर्स १९९६-२०१२
गायींच्या आरोग्याची नोंद ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘पशुधन संजीवनी’ योजनेंतर्गत झारखंडमध्ये १५ लाखांहून अधिक गायींचे लवकरच हेल्थ कार्ड बनवले जाणार आहे. केंद्राच्या पशुधन योजनेंतर्गत प्रत्येक गायी आणि म्हशींची प्रजनन क्षमतेची नोंद ठेवली जाणार आहे. ही योजना राबणारे झारखंड हे देशातील पहिले राज्य असेल.
भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांची चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गौतम बंबवाले यांची २०१५मध्ये पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी २००७मध्ये चीनमधील गुआँगझोहुमध्ये भारताचे पहिले काऊन्सील ऑफ जनरल बनण्याचा मान गौतम बंबवाले यांना मिळाला होता.
चीनबरोबरचा ७३ दिवसांचा डोकलाम वाद व रोहिंग्या शरणार्थीचा प्रश्न या दोन्ही मुद्दय़ांचा अभ्यास परराष्ट्र खात्याअंतर्गत नेमण्यात आलेली संसदीय समिती करणार आहे. या समितीचे नेतृत्व काँग्रेसचे खासदार शशी थरूर करीत आहेत.
ट्रान्सजेंडरर्सच्या (तृतीयपंथी) हक्कांसाठी लढणाऱ्या दिल्लीच्या जोइता मंडल या तृतीयपंथीची पश्चिम बंगालमधील इस्लामपूरच्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या न्यायाधीशपदी निवड करण्यात आली आहे.
मार्च २०१८मध्ये बंगळुरूतल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातली पहिली आधार प्रवेश व बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टीम अस्तित्वात येणार आहे. बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टीमने तयार झालेले बंगळुरूतील केआयए विमानतळ हे देशातील पहिले आधार बेसद्वारे प्रवेश देणारे विमानतळ असणार आहे.
भारतीय वंशाच्या अमेरिकी दंतवैद्य आणि वैज्ञानिक डॉ. निशा डिसिल्वा यांना अमेरिकेत ‘सस्टेनिंग आऊटस्टॅण्डिंग अचिव्हमेंटअंतर्गत ५२.७३ कोटी रुपयांचा अनुदान स्वरूपातील पुरस्कार प्राप्त झाला आहे. मान व डोक्याच्या कर्करोगाने मरण पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्या संशोधन करीत आहेत, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) बॅंकांच्या विलीनीकरणाबाबत विचार करण्याकरिता आणि त्यासाठी विषयाकडे बघण्याकरिता वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
अमेरिकेमधील ‘बटरफ्लाय नेटवर्क’ या स्टार्ट-अपच्या संशोधकांनी घरच्या-घरीच कर्करोग शोधण्यासाठी 'बटरफ्लाय आयक्यू’हे नवे स्मार्टफोन आधारित सहज हाताळण्याजोगे अल्ट्रासाउंड यंत्र विकसित केले आहे.
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या (BCCI) नव्या सहकारी सदस्याच्या रूपात पुद्दूचेरीची निवड करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या मंत्रिमंडळाच्या समितीने 62 वर्षीय केन जस्टर यांची भारतामध्ये अमेरिकेचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यास त्यांची मंजूरी दिली आहे. रिचर्ड वर्मा यांच्या राजीनाम्यानंतर भारतामधील अमेरिकेचे राजदूत पद 20 जानेवारी 2017 पासून रिक्त आहे.
कर्नाटक मंत्रिमंडळाने ‘तृतीयपंथीयांसाठी राज्य धोरण-२०१७’ मंजूर केले. तृतीयपंथी समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचे शोषण रोखणे हे या धोरणाचे लक्ष्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून हे धोरण आखण्यात आले आहे.
देशात प्रथमच ओडिशा राज्य शासनाने गाव आणि शहरांमधील झोपडपट्टीचे सर्वेक्षण करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रोन स्कॅनरच्या माध्यमातून राज्यात सर्वप्रथम पुरी जिल्ह्याच्या कोनार्क शहरामधील झोपडपट्टीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
अमेरिकेला मागे सारत भारत आता स्मार्टफोनसाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ बनली आहे. अजूनही चीन याबाबतीत अव्वल आहे. कॅनालिस अॅनालिस्ट या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, देशातील बदलत्या वातावरणामुळे हँडसेट आणि 4G मुळे मोबाइल बाजारात वृद्धी झालेली आहे. तसेच या वर्षाच्या तिसर्या तिमाहीत 4 कोटी हँडसेटचा व्यवहार झाला.
सन २०१८ मध्ये केल्या जाणार्या औपचारिक मतदानानंतर, २०१९ मध्ये ‘किलोग्रॅम’ ला पुन्हा परिभाषित करून त्याचे मोजमाप प्लॅंक कॉन्स्टन्टच्या हिशोबाने करण्यास जग तयार झाले आहे. प्लॅंक कॉन्स्टन्ट :– फोटॉनमधून निघणार्या विद्युत-चुम्बकीय विकिरण आणि त्याची वारंवारिता यांचे गुणोत्तर आणि इलेक्ट्रॉनचा प्रभार म्हणजे प्लॅंक कॉन्स्टन्ट.
रशियन राज्यक्रांती :- ७ नोव्हेंबर २०१७ रोजी शताब्दी संपन्न. रशियात १९१७ साली राज्यक्रांती झाली होती.
जम्मूतील वैष्णोदेवी दर्शनास एका दिवशी ५०,००० भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने जारी केला आहे.
स्थलांतरितांच्या संख्येत पुणे शहराचा आशिया खंडात प्रहिला क्रमांक असल्याचे वास्तव ‘वर्ल्ड इकनॉमिक फोरम’च्या अहवलातून समोर आले आहे.
लहान मुलांच्या आकर्षणाचे स्थळ असणार्या मुंबईतील ‘म्हातारीच्या बुटाचे’ रचनाकार सोली आरसीवाला यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी १२ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.
महेश एल्कुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकरठी’ आणि ‘युगांत’ या नाट्यत्रयींच्या निर्मितीची कथा असलेल्या ‘दायाद’ या पुस्तकाचे प्रकाशन गिरीश कर्नाड यांच्या हस्ते झाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशांच्या यादीत पुन्हा एकदा टाकल्याची घोषणा केली आहे. २००८मध्ये उत्तर कोरियाचे नाव या यादीत टाकण्यात आले होते. परंतु जॉर्ज डब्लू बुश यांच्या शिष्टाईमुळे ते हटवण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य सरकारने पर्यावरण रक्षणासाठी राज्यात सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. राज्यात सध्या ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आहे. मात्र आता सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकेतील होबोकेन शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाचे रवी भल्ला यांची निवड झाली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत सहा उमेदवार होते. मात्र सर्वांना मागे टाकत भल्ला यांनी बाजी मारली आहे.
जगातील सगळ्यात मोठे विमानतळ ‘बीजिंग न्यू एअरपोर्ट’ चीनमध्ये २०१९मध्ये वापरात येणार आहे. या विमानतळाच्या बांधकामासाठी ८० अब्ज युआन (९.१ अब्ज पौंड) खर्च आला आहे. ५२ हजार टन पोलाद आणि सुमारे १.६ दशलक्ष क्युबिक मीटर्स काँक्रिट त्यासाठी वापरण्यात आले आहे.
कृषीविषयक आणि वनस्पती निगा संबंधित मुद्द्यांवर सहकार्य करण्यासाठी भारत आणि इटली यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला केंद्रीय मंत्री मंडळाने मान्यता दिली आहे. याआधीच्या करारावर जानेवारी 2008 मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या होत्या आणि त्याची मुदत जानेवारी 2018 मध्ये संपुष्टात येत असून त्या जागी हा नवा करार येईल.
दुसरी नोबेल पुरस्कार श्रंखला :-
फेब्रुवारी २०१८ मध्ये गोवा येथे पार पडणार
जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, गोवा सरकार आणि नोबेल मीडिया, स्वीडन यांच्यात त्रीपक्षीय करार.
मुसा परमजीतीयाना :- अंदमान व निकोबारमध्ये सापडलेली जंगली केळीची नवीन जात. बीएसआयचे संचालक परमजीत सिंग यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले.
उर्दू भाषेला तेलंगणाची दुसरी अधिकृत भाषा म्हणून दर्जा देण्यात आला आहे.
हेपटायटीस-सी रूग्णांना मौखिक औषधांचा उपचार करणारे हरयाणा देशातील पहिले राज्य ठरले आहे.
सागर कवच :- ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील संयक्त सुरक्षा सराव
कॉर्नेलिया सोराबजी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गूगलने डूडलद्वारे सन्मान केला. सोराबजी या भारतातील पहिल्या महिला अधिवक्ता (अॅडव्होकेट) होत्या.
चीनने जगातील पहिले संपूर्ण विद्युत कार्गो जहाजाचे अनावरण केले आहे. हे जहाज लिथियम आयन बॅटरीवर चालते.
ग्लिडोविया कोन्याकियानोरम :- नागालँड मध्ये सापडलेले परजीवी वनस्पती. नागालँड मधील कोण्याक जमातीचा सन्मान करण्यासाठी हे नाव देण्यात आले.
भारताने २०१८ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष’ म्हणून साजरे करावे यासाठी संयुक्तराष्ट्राकडे प्रस्ताव पाठवला आहे.
३६ वी आंतरराष्ट्रीय जिओलॉजिकल काँग्रेस २०२० मध्ये नवी दिल्ली येथे होणार आहे.
इंडोनेशियाच्या बालीमध्ये ‘माउंट आगुंग’ या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. इंडोनेशियाच्या बाली बेटावरील ज्वालामुखीचा या आठवड्यातला हा दुसरा उद्रेक आहे. इंडोनेशियामध्ये सध्या १०० हून अधिक जिवंत ज्वालामुखी आहेत.
पनवेल तालुक्याच्या वेशीवरील रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल कंपनी (एचओसी) डबघाईस आल्याने या कंपनीचा काही भाग भारत पेट्रोलियम कंपनी व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) देण्याचे केंद्र सरकारने ठरविल्यामुळे इस्रोमधून होणाऱ्या संशोधनानंतर अवकाशोड्डाणात जमिनीवरून सुटणाऱ्या उपग्रहात रसायनी येथून उत्पादन केलेले इंधन भरले जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाने नुकताच समलिंगी विवाह कायदा पारित केला आहे.
गेल्या अनेक दशकांपासून चालत आलेल्या अमेरिकेच्या आणि आंतरराष्ट्रीय धोरणाच्या विरुद्ध जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली आहे.
अझर ए. एच. खान :- तुर्कमेणिस्तानमधील भारताचे नवे दूत
भारतातील पहिली ट्रान्सजेंडर शाळा ‘सहज इंटरनॅशनल’ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? - केरळमधील थ्रिककारा (Thrikkakara) येथे
कोणत्या राज्याने न्यायिक सेवेमध्ये ईबीसी, ओबीसी, एससी आणि एसटी विद्यार्थ्यांना 50% आरक्षण दिले आहे? - बिहार
‘The Secrete Chord’ हे पुस्तक कोणाचे आहे? - Geraldine brooks
‘Scattered Souls’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? - शाहनाज बशीर
रोकडविरहित व्यवहारांना प्रोत्साहन दिल्याबद्दल भारत सरकारकडून कोणाला ‘Scroll of honor’ हा सन्मान दिला आहे?- गौरव गोयल. अजमेरचे जिल्हाधिकारी. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नीती आयोग यांच्याकडून संयुक्तपणे हा पुरस्कार दिला जातो.
104 वी भारतीय विज्ञान कोंग्रेस (Indian Science Congress) आंध्र प्रदेश मधील तिरुपती येथे पार पडली. यावर्षीची थिम काय होती? - ‘राष्ट्रीय विकाससाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही यावर्षीची संकल्पना होती.
भारतातील पहिले लेसर तंत्रज्ञान आधारित अत्याधुनिक स्वयंचलित AVMS (Automatic Vechime Monitoring System) आरटीओ चेक पोस्ट गुजरातमधील आरवली जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे.
अर्चना निगम : अर्चना निगम यांची नुकतीच कंट्रोलर जनरल ऑफ अक्कौंट्सपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी एम.जे. जोसेफ यांची जागा घेतली. त्या 1981 च्या बॅचच्या नागरी लेखा सेवेच्या अधिकारी आहेत.
जॉन बर्जर : ब्रिटिश लेखक जॉन बर्जर यांच पॅरिस येथे निधन झाले. ‘Ways of Seeing’ या बीबीसी वरील श्रंखलेसाठी ते परिचित होते. त्यांना ‘G’ या कादंबरीसाठी मॅन बूकर पुरस्कार मिळाला होता. मॅन बूकर पुरस्कारातील अर्धी रक्कम त्यांनी आफ्रिकन-अमेरिकन चळवळ ‘द ब्लॅक पॅंथर’ला दिली होती.
‘जस्ट अनदर जिहादी जाने’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? - तबिश खैर
फिनलंड या देशाने आपल्या नागरिकांना एक आधारभूत उत्पन्न देण्याचा निर्णय घेतला आहे. असा करणारा हा जगातील पहिला देश आहे.
आपल्या वापरकर्त्यांना फेसबूक मॅसेंजरद्वारे पेमेंट करण्याची सुविधा देणार्या ‘ऑनचाट’ (OnChat) या चाटबॉट सेवेची सुरुवात कोणत्या बँकेने केली? - एचडीएफसी
नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘डेथ अन्डर द देवदार : द अड्व्हेंचर्स ऑफ मिस रिपले-बिन’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? - रस्कीन बॉन्ड
भारतातील पहिली बायोगॅसवर धावणारी बस कोणत्या शहरात सुरू झाली? - कोलकत्ता
ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपट्टू आर्थर मॉरिस यांचा मरणोत्तर ‘आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश करण्यात आला आहे. आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारे ते 82 वे खेळाडू आहेत.
‘चितवान हत्ती महोत्सव’ नुकताच नेपाळमध्ये पार पडला. यावर्षी या मोहत्सवाची 13वी आवृत्ती होती.
भारतातील लघु आणि माध्यम उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘डिजिटल अनलॉकड’ हा उपक्रम गूगल या कंपनीने सुरू केला आहे.
अब्दुल हालीम जाफर खान यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणते वाद्य वाजवत? - सीतार
संयुक्त राष्ट्र संघाने 2017 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटन विकास वर्ष’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.
नवी दिल्ली येथे ‘मधुमेहासाठी योगा’ ही आंतराष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली.
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव (उत्तरायण) कोणत्या राज्यात पार पडला? गजरात
घानाच्या नवीन अध्यक्षपदाची शपथ नुकतीच कोणी घेतली? नाना आकूफ-अडडो.
‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अँड पॅराडॉक्स’ या पुस्तकाचे लेखक कोना आहेत? उल्लकेश एनपी
एफएम रेडियोवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? नॉर्वे
जयपुर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? रमेश प्रसाद
‘बोस: द इंडियन समुराय-नेताजी अँड द आयएनएस मिलिटरी असेसमेंट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जी. डी. बक्षी
टीबीच्या जागृतीसाठी कोणत्या भारतीय व्यक्तिला अमेरिकन अंबेसीने सन्मानित केले आहे? अमिताभ बच्चन
भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज ‘इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज’ कोणत्या शहरात सुरू झाला? गांधीनगर. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्फत सुरू करण्यात आला आहे.
2017 ची 20 वी राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स परिषद कोठे पार पडली? - विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) संकल्पना : ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज अँड इ-गव्हर्नन्स’.
2017 ची ‘जल मंथन-3’ ही राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात पार पडली? - नवी दिल्ली. उमा भारती यांच्या हस्ते उद्घाटन
अकबर हाशेमी राफ्सांजणी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते? - इराण. इरणीयन चळवळीचे संस्थापक. 189-97 दरम्यान अध्यक्षपदी.
मारिओ सोरेस यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी अध्यक्ष होते? - पोर्तुगाल. भारत-पोर्तुगालची 1974 मध्ये राजनैतिक संबंधाची पुरणारस्थापणा करण्यात मध्यवतरी भूमिका, पोर्तुगलमध्ये लोकशाहीचे जनक.
भारताची सर्वांत मोठी सार्वजनिक वायफाय सेवा कोणत्या राज्याच्या सरकारने सुरू केली आहे? - महाराष्ट्र. ‘मुंबई वायफाय’ या नावाने मुंबई मध्ये. सुरूवातीला शहरातील 500 विविध ठिकाणी सुरू.
‘Magpie Murders’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अँथनी होरोवित्झ
2017 चा 21 वा राष्ट्रीय युवा मोहोत्सव कोणत्या राज्यात पार पडला? - हरियाणा. (रोहताक येथे). यावर्षीची थीम ‘डिजिटल इंडियासाठी युवक’ अशी होती.
‘My Odyssey : Memoirs of the man behind the Mangalyan Mission’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? - के. राधाकृष्णन (इस्रोचे माजी अध्यक्ष)
आपल्या स्थानिक भाषेत रोकडविरहित व्यवहारासाठी कोणत्या राज्याने ‘Tokapoisa.in’ हे इ-वॉलेट सुरू केले आहे? आसाम
जागतिक आर्थिक मंचाची 2017 ची वार्षिक बैठक कोठे पार पडली? - दाव्होस (स्वित्झर्लंड)
कोणता भारतीय हॉकी खेळाडू आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अॅथलेट्स समितीचा सदस्य बनला आहे? - ¬पीआर श्रीजेश (भारतीय हॉकी संघाचा कप्तान)
निकारागुआच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली आहे? डॅनियल ऑरटेगा
जानेवारी 2017 मध्ये कोणत्या देशाने ‘फेस्टिवल ऑफ इंडिया’चे आयोजन केले होते? घाना
रोमन हरझोग यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते? जर्मनी
कोणत्या देशाने पार्कोरला (Parkour) खेळाचा दर्जा दिला आहे? यूनायटेड किंगडम
‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ टॉकिंग बुक्स’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? - मॅथिव रुबरी
‘आदित्य’ भारतातील पहिली सौर ऊर्जा आधारित बोट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? - केरळ.
जगातील पहिले लिंग साहित्य फेस्टिवल (Gender literature fest) कोणत्या देशात पार पडले आहे? - भारत. पाटणा (बिहार) येथे एप्रिल 2017 मध्ये पार पडले.
प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट निर्माते विलियम पीटर ब्लॅटी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे होते? - अमेरिका. ते त्यांच्या ‘The Exorcist’ या कादंबरीसाठी प्रसिद्ध होते. त्यांची इतर पुस्तके Elsewhere, Dimiter आणि Crazy.
‘अ अनसुटेबल बॉय’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? करण जोहर
कोणत्या समितीने सामाजिक-आर्थिक आणि जात गणनेशी (SECC) संबंधित आपला अहवाल केंद्र सरकारला सुफुर्द केला आहे? - सुमित बोस समिती. SECC आकडेवारीचा वापर करून विविध राज्यांना दिला जाणारा संसाधंनातील वाट्याचे सूत्र ठरविणे आणि विविध कार्यक्रमांतर्गत लाभधारकाचा प्राधान्यक्रम ठरविणे यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती.
रोकडविरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने ‘डिजिटल डाकिया’ योजना सुरू केली आहे? - इंदोर जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेश सरकारने
2016-17 ची 83 वी रणजी ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे? - गुजरात. मुंबईला हरवून पहिल्यांदाच जिंकली आहे.
खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धा कोणत्या शहरात पार पडल्या ? दिल्ली
पहिलेच एशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन इंटरनॅशनल डांस फेस्टिवल कोणत्या शहरात पार पडले? - हैद्राबाद
मुलींना आयआयटी मध्ये विशिष्ट कोटा द्यावा अशी शिफारस नुकत्तीच कोणत्या समितीने केली आहे? - तीमोथी गोंजाल्वीस समिती (Timothy Gonsalves)
सुरजीत सिंग बर्नाला यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? - पंजाब. उत्तराखंडचे पहिले राज्यपाल. याशिवाय आंध्रप्रदेश, ओडिशा, तामिळनाडू या राज्यांचे राज्यपालपद त्यांनी भूषविले.
कोणत्या संघाने 2017 ची वडाफोन प्रीमियर बॅडमिंटन लीग जिंकली आहे? - चेन्नई श्मशर्स
‘The Karachi Deception’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? शत्रूजित नाथ
आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या ‘वर्ल्ड इकनॉमिक आउटलूक’ अहवालनुसार 2017 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी वृद्धीदर किती असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे? - 6.6% (2017-18 मध्ये 7.2% तर 2018-19 मध्ये 7.7% असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे?
संयुक्त राष्ट्राच्या ‘वर्ल्ड इकनॉमिक सिचुएशन अँड प्रॉस्पेक्ट 2017’ या अहवालात भारताचा 2017 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वृद्धीदर किती वर्तविण्यात आला आहे? - 7.7% (2017-18 साठी 7.6%)
जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडीयम कोणत्या राज्यात होणार आहे? - गुजरात. (अहमदाबाद)
पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने ‘ पिनाकीन’ (Pinakin) हे मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले आहे? - तमिळनाडू
‘द बूक थिफ’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत? - मारकुज झुसक (Markuz Zusak)
‘हॉल ऑफ फेम’ मध्ये नुकताच कोणत्या भारतीय क्रिकेटपट्टूचा समावेश करण्यात आला आहे? - कपिल देव
यूरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी नुकतीच अँटोनिओ तजनी यांची नियुक्ती झाली आहे. ते कोणत्या देशाचे आहेत? - इटली. त्यांनी जर्मनीच्या मार्टिन श्चुल्झ यांची जागा घेतली.
कोणाला ‘द हिंदू प्राइज 2016’ मिळाला आहे? - किरण दोषी (जिन्हा ऑफन केम टू अवर हाऊस’ या कादंबरीसाठी.
‘कलकत्ता’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कुणाल बसू
मॉलिनॉन्ग (Mawlynnong) हे गाव आशियातील सर्वांत स्वच्छ गाव ठरले आहे. ते कोणत्या राज्यातील गाव आहे? - मेघालय (डिस्कव्हर इंडिया मासिकातर्फे 2003 मध्येच या गावाला आशियातील सर्वांत स्वच्छ गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे.)
यूरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च (CERN) या संस्थेचा नुकताच सहायक सदस्य बनलेला देश कोणता? - भारत
करंग (Karang), देशातील पहिले कॅशलेश बेट कोणत्या राज्यातील आहे? - मणीपुर. लोकटक सरोवराच्या मधोमध वसलेले बेट.
गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी ‘अंनंदम प्रोग्राम’ सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? - मध्य प्रदेश.
ऊर्जेची बचत करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने ‘मिशन 41के’ हा उपक्रम सुरू केला आहे? - रेल्वे मंत्रालयाने
सर्व शिक्षण अभियानासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरु केले आहे? - शगून
सीबीआयचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? - आलोक कुमार वर्मा
गॅंबियाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणी शपथ घेतली आहे? - अदमा बर्रोव
‘स्टोरी ऑफ अॅन एस्केप’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? - सुरजीत सिंग बर्नाला
एटीएम सुविधा बसवलेली भारतातील पहिली युद्धनौका कोणती? - आयएनएस विक्रमादित्य
कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड 2017-21 या कलावधीसाठी फिफाच्या वित्तीय समितीमध्ये सदस्य म्हणून करण्यात आली आहे? - प्रफुल पटेल (ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष)
पर्यटनामध्ये नाविन्यतेसाठी दिला जाणारा संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना पुरस्कार भारतातील कोणत्या गावाला देण्यात आला आहे?- गोवर्धन एकोव्हीलेज (याप्रकरचा पुरस्कार पहिल्यांदाच भारताला मिळाला)
2017 च्या 65व्या मिस युनिव्हर्स कार्यक्रमात कोणती भारतीय व्यक्ती परीक्षकाचे स्थान भूषविणार आहे? - सुश्मिता सेन. (पहिली भारतीय मिस युनिव्हर्स)
‘60 इंडियन पोएट्स’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जीत ठाईल (thayil)
मॉरिशसच्या पंतप्रधानपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? प्रविन्द जुग्नौठ
जशवंत राय शर्मा यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या भाषेतील प्रसिद्ध कवि होते? उर्दू (ते नक्ष ल्यल्लपुरी या नावानेही परिचित होते)
कोणत्या स्टेडियमच्या स्टँडला नुकतेच सैनीकाचे नाव देण्यात आले आहे. जे भारतात पहिल्यांदाच एखाद्या स्टेडियमच्या स्टँडला सैनीकाचे नाव देण्यात आले आहे? - इडन गार्डन स्टेडीयम कलकत्ता
‘बार्बेरियन डेज : ए सर्फिंग लाईफ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? - विलियम फिंनेगन
येणार्या निवडणुकांमध्ये टपाल मतपत्रिकांचे इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते? - गोवा
जागतिक बँकेच्या साह्याने ‘इ-हेल्थ प्रोजेक्ट’ सुरू करणारे राज्य कोणते? - केरळ
वित्तीय जबाबदारी आणि आर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्याशी (FRBM) संबंधित कोणत्या समितीने नुकताच आपला अहवाल केंद्र सरकारला दिला आहे? - एन के सिंग समिती.
वरिष्ठ पेन्शन योजना 2017 ची अमलबजावणी कोणती इन्शुरन्स कंपनी करणार आहे? - एलआयसी
‘यू गॉट मॅजिक’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? - नील माधव
डिजिटल पेमेंट पद्धत सुचविण्यास्थी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीने नुकताच केंद्र सरकारला अहवाल सादर केला आहे. ही समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती? - चंद्राबाबू नायडू
नेस्ट या संस्थेने (Nurturing Excellence in Sports Trust) या संस्थेने महिला फुटबॉल संबंधित कोणता उपक्रम सुरू केला आहे?- खेलेगी तो खिलेगी
हवाई श्रेणी अंतर्गत वाहतूक क्षेत्रात कोणत्या विमानतळाने कॉर्पोरेट सामाजिक बांधीलकीसाठी (सीएसआर) 2016 चा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे? - दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ
जगातील सर्वांत मोठे सोलार पार्क कोणत्या देशाने बांधले आहे? चीन (क्षमता 850 MW)
‘द फ्युचर ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? - विमल जालान (आरबीआयचे माजी गव्हर्नर)
व्हेनेझुएलाचा पहिला शांतता आणि सार्वभौमतेसाठी हुगो चावेझ (Hugo Chavez) पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? - व्लादमिर पुतीन (रशियाचे अध्यक्ष)
अलेक्झांडर कदाकीन यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या देशाचे भारतातील राजदूत होते? - रशिया(2009 पासून 2017 पर्यन्त. रशियाचे भारतातील सर्वाधिक कलावधीसाठी असणारे राजदूत).
‘जीवन रेखा’ हा इ-आरोग्य कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? केरळ
डिजिटल पेमेंटचा अवलंब करणार्या जिल्ह्याचा सन्मान करण्यासाठी कोणत्या राज्याने ‘मुख्यमंत्रांचा पुरस्कार’ या नावाने पुरस्कार सुरू केला आहे? - आसाम
‘द आयलंड ऑफ लॉस्ट गर्ल्स’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मंजुला पद्मनाभन
‘लक्झरी ट्रॅवल टाइम’ हे सामाजिक लक्झरी ट्रॅवल मासिक कोणत्या ऑनलाइन ट्रॅवल पोर्टलने सुरू केले आहे?- मेक माय ट्रीप
गस्त घालणार्या पोलिसांचे वास्तविक ठिकाण ट्रेस करण्यासाठी ‘Beat Marshal Monitoring Mobile App’ हे अॅप्लिकेशन कोणत्या शहर पोलिसांनी सुरू केले आहे? - पुणे शहर पोलिस
टी 20 अंधाळ्यांचा क्रिकेट वर्ल्डकप (दुसरे) : जानेवारी 2017 मध्ये भारतात पार पडले. राहुल द्रविड सदिच्छा दूत होता. भारताने हा वर्ल्डकप पाकिस्तानला हरवून जिंकला. पहिला टी20 अंधाळ्यांचा क्रिकेट वर्ल्डकप 2012 मध्ये खेळला गेला तेंव्हाही भारताने पाकिस्तानला हरवून वर्ल्डकप जिंकला होता.
भारतातील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे? - म्हैसूर (म्हैसूर आणि दाहोद (गुजरात) येथे प्रयोगिक तत्त्वार)
मे 2017 पासून पॉलीथिन बॅगवर संपूर्णपणे बंदी घालणारे राज्य कोणते? - मध्य प्रदेश
2016 च्या राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? - डॉ. केशव कृष्ण
जगातील पहिला डिजिटल सदिच्छादूत कोणत्या देशाने सुरू केला आहे? - डेन्मार्क
2016 ची नवीन मिस युन्हिवर्स ठरलेली ‘Iris Mittenaere’ ही कोणत्या देशाची आहे? - फ्रान्स . (फ्रान्सची दुसरी मिस युनिव्हर्स. यापूर्वी 1953 मध्ये ख्रिस्टिन मार्टेल)
‘मदर तेरेसा : द फायनल वेर्दीक्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? - आरूप चटर्जी
कोणत्या अभिनेत्रीची नुकतीच स्वच्छ भारत मोहिमेची सदिच्छादूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे? अनुष्का शर्मा (अमिताभ बच्चनही या मोहिमेचे सदिच्छादूत आहेत)
केंद्रीय अर्थसंकल्पात किती रुपयाचा ‘डेअरी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकास निधी’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? 800 कोटी रुपये (हा निधी नाबार्डमध्ये उभारण्यात येणार आहे)
केंद्रीय अर्थसंकल्पात सहा सदस्यीय ‘देयके नियामक मंडळ’ (Payments Regulatory Board) स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असणार आहेत? आरबीआयचे गव्हर्नर (हे मंडळ सध्याच्या ‘देयक नियामक आणि पर्यवेक्षक आणि समझोता व्यवस्थापन’ मंडळाची जागा घेईल.
भारतीय कोस्ट गार्ड अमि यूएई यांच्यामध्ये नुकताच संयुक्त सराव दुबई येथे पार पडला. यामध्ये भारतीय कोस्ट गार्डचे कोणते जहाज सहभागी झाले होते? समुद्र पावक (अर्थ समुद्र शुद्ध करणारा)
आंदमान व निकोबार बेटावर पहिला रेल्वे प्रकल्प सुरू करण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. हा प्रकल्प कोणत्या दोन स्थांनाकांना जोडणार आहे? फोर्टब्लेयर-डिगलिपुर (240 किमी)
BIMSTEC देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक कोणत्या देशात होणार आहे? भारत (पहिल्यांदाच भारतात)
अल्पसंख्यांक समुदायातील कारागिर आणि कलाकारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘हुनर हाथ’ हा उपक्रम कोणत्या शहरात पार पडला? दिल्ली (दुसरी आवृत्ती. संकल्पना : ‘हस्तकला और पाककृती का संगम’)
संजय किशन कौल, शांतनगौदार मोहन मल्लिकार्जुन गौडा, नवीन सिन्हा, दीपक गुप्ता आणि एस. अब्दुल नझिर यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने सौर ऊर्जा क्षमता 20,000 मेगावॅट वरुन वाढवून किती करण्याचा निर्णय घेतला आहे? 40,000 मेगावॅट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी 112 फूट उंच ‘शिव’ मूर्तिचे कोणत्या ठिकाणी अनावरण केले आहे? कोइंब्तुर (तमिळनाडू)
‘आदियोगा: द सोर्स ऑफ योगा’ या योग विज्ञानवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते झाले? नरेंद्र मोदी
भारत कोणत्या देशबरोबर राजनैतिक संबंधाचे 25 वे वर्ष साजरे करत आहे? इस्राइल (1992 मध्ये हे संबंध प्रस्थापित झाले होते)
अलंकृता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेल्या कोणत्या चित्रपटाला ग्लासगोव फिल्म फेस्टिवल मध्ये पेक्षक अवॉर्ड मिळाला आहे? लिपस्टिक अन्डर माय बुरखा
केंद्र सरकारने प्रत्येक गावापर्यंत हाय स्पीड ब्रौडबॅंड सुविधा कोणत्या सालापर्यंत पुरविण्याचे लक्ष जाहीर केले आहे? 2018
जीवाश्म इंधनात संपूर्णपणे गुंतवणूक थांबविण्याचा निर्णय घेणारा जगातील पहिला देश कोणता? आयरलॅंड
कोणत्या शेजारील देशमध्ये नुकताच महितीचा अधिकार अधिनियमाची नुकतीच अमलबजावणी सुरू झाली? श्रीलंका
चीन 2016 मध्ये 77.42 GW सौर ऊर्जा निर्माण करून जगातील सर्वांत मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे. चीनने कोणत्या देशाला मागे टाकले आहे? जर्मनी (भारताने 2016 मध्ये 9 GW सौर ऊर्जा उत्पादित केली आहे)
देशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या विवाहाचे नियमन करण्यासतही कोणत्या देशाने विधेयक पारित केले आहे? पाकिस्तान
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयातून (ICC) बाहेर पडण्याच्या कोणत्या देशाच्या निर्णयाला आयसीसीने अवैध ठरविले आहे? दक्षिण आफ्रिका
दहशतवादाचे निर्मूलन कर्णयसाठी कोणत्या देशाने ‘रद्द-उल-फसाद’ हे लष्करी ऑपरेशन आपल्या देशात राबवत आहे? पाकिस्तान
थकबाकी न भरल्याने संयुक्त राष्ट्र साधारण परिषदेत 2016-17 च्या बैठकींमध्ये कोणत्या देशांचा मतदान करण्याचा हक्क रद्द करण्यात आला आहे? व्हेनेजुएला आणि लिबिया
भारतीय रेल्वेची पहिली ‘अंत्योदय एक्सप्रेस’ कोणत्या दोन स्थांनाकांदरम्यान धावली? एर्णाकुलम(केरळ) ते हवडा (प.बंगाल) (वैशिष्ट्ये : दीर्घ पल्ला, संपूर्ण अनारक्षित, सुपर फास्ट ट्रेन सेवा)
‘सामाजिक परिवर्तन (Innovation) केंद्र’ सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तेलंगणा (निझामबाद मध्ये)
अन्नधान्याच्या वाटपासाठी रोकडविरहित व्यवस्था स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? गुजरात
‘इ-जेल’ प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे? जम्मू व कश्मीर
कलिमपोंग (Kalimpong) हा नवीन जिल्हा नुकताच कोणत्या राज्याने घोषित केला आहे? पश्चिम बंगाल (राज्याचा 21 वा जिल्हा, दार्जिलिंगपासून वेगळा केला आहे)
‘मिल बांचे’ (Let read together) हा कार्यक्रम प्राथमिक आणि माध्यमिक शासकीय शाळांमध्ये कोणत्या राज्याने सुरू केला आहे? मध्य प्रदेश
2017 हे वर्ष ‘सफरचंद वर्ष’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? जम्मू-काश्मीर (देशातील सर्वाधिक सफरचंद उत्पादक राज्य. देशाच्या 71% उत्पादन या राज्यात होते.)
गुटखा, तंबाखू, पानमसाला आणि नोकोटीनयुक्त अन्य पदार्थांवर एका वर्षाची बंदी नुकतीच कोणत्या राज्याने घातली आहे? पंजाब
लैंगिक गुन्हेगार रेजिस्ट्री स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? केरळ
मनरेगा योजनेअंतर्गत सध्याचा 100 दिवसांच्या रोजगार दिवसांमध्ये वाढ करून 150 दिवस करण्यासाठी कोणत्या राज्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे? तामिळनाडू
कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या थंड हवेच्या ठिकाणी सायकल मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे? दार्जिलिंग
जगातील पहिल्या दहा पुळणीमध्ये राधानगर पुळणीचा समावेश करण्यात आला आहे. ही पुळण कोणत्या ठिकाणी आहे? आंदमानमधील हॅवलॉक बेटावर (ट्रीपअॅडव्हायजरने ही यादी जाहीर केली. ब्राझिलमधील पुळण पहिल्या क्रमांकावर)
भारतातील पहिली कॅशलेश टाऊनशिप कोणती? गुजरात नर्मदा व्हॅली फर्टीलायझर्स लि.
इंटेक डीएमएलएसने भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे जेट इंजिन विकसित केले आहे. स्वदेशी बनावटीचे जेट इंजिन विकसित करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे? अमेरिका, युरोप आणि इस्राइल नंतर जगातील चौथा आणि आशियातील पहिला. इंटेक डीएमएलएसने ‘Poeir Jets’ या ब्रॅंडखाली हे इंजिन विकसित केले आहे.
असोचेमच्या अध्यक्षपदी कोणाची नियुती करण्यात आली आहे? संदीप जजोडिया
भारतातील पहिले ऑनलाइन डेबिट कार्ड कोणी सुरू केले आहे? एयरटेल पेमेंट बँक आणि मास्टरकार्ड
न्यू वर्ल्ड वेल्थनुसार भारतातील सर्वांत श्रीमंत शहर कोणते? मुंबई (मुंबई>दिल्ली>बंगळुरु>कोलकत्ता)
आफ्रिकन युनियन च्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली आहे? चाडचे परराष्ट्र मंत्री मुस्सा फाकी महमत. (AU : सदस्य 54, स्थापना 2001, मुख्यालय : Addis Ababa, इथियोपिया)
राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळच्या महासंचालक पदी कोणाची नेमणूक झाली आहे? आनंद कुमार
राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंच (एनएसई)च्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? विक्रम लिमये
48.8 फूट उंच वाळूचा किल्ला बनवून कोण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविले आहे? सुदर्शन पटनाईक
भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) पहिल्या महिला संचालक बनण्याचा मान कोणी पटकावला आहे? डॉ. निलू रोहमेत्रा
कोणत्या भारतीय तबला वादकाने ग्रामी पुरस्कार मिळवाल आहे? संदीप दास
संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सचिन तेंडुलकरने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे? डोंजा (जिल्हा उस्मानाबाद) (त्याने पहिल्यांदा आंध्र पदेशमधील पट्टमराजू कंद्रिका हे गाव दत्तक घेतले होते)
कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? विकास स्वरूप
जांबूवंतराव धोटे यांचे निधन : वेगळ्या विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते. ‘विदर्भाचे सिंह’ अशी ओळख. 1971 मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्य. 2002 मध्ये विदर्भ जनता पार्टी या पासकाची स्थापना. 5 वेळा महाराष्ट्र विधानसभा सदस्य.
लिजेंडरी अवॉर्ड 2017 कोणाला प्राप्त झाला आहे? लता मंगेशकर (2012 मध्ये शाह रुख खानला)
माजी सरन्यायाधीश अल्तमाश कबीर यांचे निधन झाले. ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? 39 वे (अल्पपरिचय: 39 वे सरन्यायाधीश. सप्टेंबर 2012 ते जुलै 2013 असे 9 महीने कार्यकाल. 19 जुलै 1948 रोजी कलकत्ता येथे जन्म. कलकत्ता विद्यापीठातूनच एलएलबी आणि एमए पूर्ण. 1973 मध्ये अॅडव्होकेट म्हणून कारकिर्दीला सुरुवात. 1990 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश. 2005 मध्ये झारखंडचे मुख्य न्यायाधीश. 2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयात बढती.)
कावेरी जलविवाद लवादाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? अभय मनोहर सप्रे
पी शिवशंकर यांचे निधन : (अल्पपरिचय : सिक्किम आणि केरळचे गव्हर्नरपद. कायदा मंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री, मानव संसाधन विकास मंत्री ही पदे त्यांनी भूषविली. 1979 मध्ये सिकिंदराबाद मतदार संघातून लोकसभेत. 1985-93 गुजरात मधून लोकसभेवर)
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? सुमित मल्लीक
भारतातील पहिले अपंग व्यक्तींचे केंद्र कोठे सुरू होत आहे? गांधीनगर
भारतात पार पाडलेल्या फिफा अन्डर-17 वर्ल्डकपचे शुभंकर ‘खेलिओ’ हा कोणता प्राणी होता? बिबट्या
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद 250 बळी घेणारा खेळाडू कोण? रविचंद्रन अश्विन (बांग्लादेश विरुद्ध खेळताना 41 व्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या डेनीस लीली याचा रेकॉर्ड त्याने मोडला. कसोटीमध्ये 250 बळी घेणारा सहावा भारतीय)
मार्च 2017 मध्ये पहिला ग्रामीण खेल मोहत्सव कोठे पार पडला? दिल्ली
शूटिंग वर्ल्डकप : जितू राय (सुवर्ण पदक), हीना सिद्धू (सुवर्ण पदक), अंकुर मित्तल (सिल्वर)
बीसीसीआयचा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण ? शांथा रंगास्वामी (माजी भारतीय महिला क्रिकेटपट्टू. पहिली महिला कप्तान. महिला क्रिकेटमध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला. पहिली कसोटी विजेती कप्तान. अर्जुन पुरस्कार प्राप्त पहिली महिला क्रिकेटपट्टू. )
पहिली राष्ट्रीय महिला संसद कोठे पार पडली? अमरावती (आंध्रप्रदेश) (थिम: महिला सशक्तीकरण – लोकशाही बाळकटीकरण )
भारतीय बियाणे काँग्रेस 2017 कोठे पार पडली? कोलकत्ता (थिम : सीड ऑफ जॉय)
यूनेस्कोने नेचर फेस्ट कोठे आयोजित केले होते? हिमालयीन नॅशनल पार्क (हिमाचल प्रदेश)
वार्षिक कोब्रा गोल्ड संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशात पार पडला? थायलंड आणि अमेरिका (29 देशांचा सहभाग)
दक्षिण आशिया सभापती समिट (Speakers Summit) नुकतीच कोठे पार पडली? इंदोर (मध्य प्रदेश)
कोणत्या दोन भारतीय चित्रपटांना बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात पुरस्कार मिळाला आहे? न्यूटन आणि आबा
कोणत्या देशाने टीबी प्रतिबंधक जीवंत गाय विकसित केली आहे? चीन
केंद्रीय अर्थसंकल्प 2017-18 मध्ये किती विशेष पर्यटन क्षेत्र निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे? पाच
जागतिक पाणथळ क्षेत्र दिन कधी साजरा केला जातो? 2 फेब्रुवारी (थिम : आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी पाणथळ प्रदेश.
जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? 4 फेब्रुवारी (थिम : वी कॅन, आय कॅन)
हज धोरण आणि अनुदान समस्येचा विचार करण्यासाठी सरकारने सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे संयोजक कोण आहेत? अफझल अमानूल्लाह
चौथी बिमस्टेक (BIMSTEC) परिषद 2017 कोणत्या देशात होणार आहे? नेपाळ
जगातील सर्वांत मोठा डिजिटल साक्षरता कार्यक्रम कोणता? प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान (PMGDISHA)
‘निलांबूर साग’ या वनस्पतीला भौगोलिक निर्देशांक मिळाला आहे. ही वनस्पती कोणत्या राज्यातील आहे? केरळ.
केंद्रीय एचआरडी मंत्रालयाने मुलींच्या शिक्षणातिल समस्येसाठी सीबीएसईची एक उपसमिती स्थापन केली आहे. या समितीचे प्रमुख कोण आहेत? कडियम श्रीहरी (तेलंगणाचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री)
आंध व्यक्तींसाठी जगातील पहिला ब्रेल अॅटलस कोठे प्रकाशित करण्यात आला? दिल्ली (डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते प्रकाशन. NATMO ने बनविला. जगातील पहिलाच ब्रेल अॅटलस. सिल्क-स्क्रीन पेंटिंग तंत्रज्ञानाचा वापर)
केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ‘स्थानक पुनर्विकास कार्यक्रमाचा’ पहिला टप्पा जारी केला. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या स्थांनाकांचा समावेश आहे? पुणे, मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस, बोरीवली, लोकमान्य टिळक टर्मिनस
आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकमध्ये 45 देशांच्या यादीत भारताला कितवा क्रमांक मिळाला आहे? 43 वा (पहिला: अमेरिका)
सेबीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? अजय त्यागी 9त्यांनी यूके सिन्हा यांची जागा घेतली. त्यांना 5/65 वर्षे कार्यकाल लाभणार आहे. 1984 च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी.)
राष्ट्रीय उत्पादकता दिन कधी साजरा केला जातो? 12 फेब्रुवारी (थिम : फ्रॉम वेस्ट टु प्रॉफिट-थ्रो रिडूस, रिसायकल अँड रियुज)
सौर ऊर्जा प्रणाली अस्तीत्वात असलेली भारताचे पहिले हरित जहाज कोणते? आयएनएस सर्वेक्षक
जागतिक रेडियो दिन कधी साजरा केला जातो? 13 फेब्रुवारी (थिम : रेडियो इज यू)
भारतातील पहिल्या तरंगत्या प्राथमिक शाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? लोकटक सरोवर, मणीपुर
कंबाला आणि बैलगाडी शर्यत विध्येयक कोणत्या राज्याने पारित केले आहे? कर्नाटक (कांबाला-म्हशींची शर्यत)
भारतीय हवाई दलाने औपचारिकरित्या पहिली स्वदेशी बनावटीची चेतावणी आणि नियंत्रण प्रणाली दाखल केली आहे तिचे नाव काय? नेत्र
2016 चा व्यास सन्मान कोणाला मिळाला आहे? सुरेन्द्र वर्मा. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या ‘कटना शमी का वृक्ष : पद्म पंखुडी की धारसे’ (2010 मध्ये प्रकाशित) साठी देण्यात आला आहे. हा सन्मान के के बिराला फाउंडेशनतर्फे 1991 पासून दिला जातो.
आर्थिक स्वतंत्रत निर्देशांकमध्ये भारताला कितवा क्रमांक मिळाला आहे? 186 देशांमध्ये 143 वा क्रमांक. हॉंगकॉंग पहिल्या स्थानी.
2017 मध्ये महाराष्ट्र सरकारने क्लाऊड सिडिंग प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे? सोलापूर
भारतीय नौदलाने कोणती नौकाविहार बोट नुकतीच समाविष्ट केली आहे? आयएनएसव्ही तारिणी
भारतीय कॉस्ट गार्डचे कोणते नवीन जहाज फेब्रुवारी 2017 मध्ये दाखल झाले आहे? आयसीजीएस आयुष
जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? 20 फेब्रुवारी (2017 ची थिम : Preventing conflict and sustaining peace through decent work)
भारताचा एकमेव जीवंत ज्वालामुखी इतक्यात सक्रिय झाला आहे त्याचे नाव काय? बॅरन
शास्त्रज्ञांनी झीलँडिया हा हरवलेला खंड सापडल्याचा दावा केला आहे. हा खंड कोणत्या महासागरातील पाण्याखाली आहे? पॅसिफिक महासागर
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? 21 फेब्रुवारी (2017 ची थिम : बहुभाषिक शिक्षणाद्वारे शाश्वत भविष्यकडे)
राष्ट्रीय जैवविविधता काँग्रेस 2017 कोणत्या राज्यात पार पडली? केरळ. थिम : शाश्वत विकाससाठी जैवविविधतेला मुख्य प्रवाहात आणणे.
केंद्र सरकारने साबर स्वच्छता केंद्र कोठे सुरू केले आहे? दिल्ली
जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापार सुलभीकरण कराराची अमलबजावणी सुरू झाली आहे. हा करार कधी स्वीकारण्यात आला होता? 2014
राहत हा वैद्यकीय प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केल आहे? राजस्थान
बांगलादेशमधील कोणत्या शहराचा विकास करण्यासाठी भारत आणि बांग्लादेशमध्ये सामंजस्य करार झाला ? सीलहेट
राष्ट्रीय अनुसूचीत जमतीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? नंदकुमार साई
भारतातील पहिल्या एकात्मिक हेलीपोर्टचे उद्घाटन कोठे झाले? रोहिणी, नवी दिल्ली
राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी (थिम : विशिष्ट विकलांग व्यक्तींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान)
केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने स्वच्छ शक्ति सप्ताह हे अभियान कधी राबविले? 1-8 मार्च 2017
सर्वोत्तम विद्यापीठ 2017 हा पुरस्कार कोणत्या विद्यापीठाने पटकावला आहे? जेएनयू
भारतातिल सर्वांत उंच राष्ट्रध्वज पंजाब मधील अटारी सीमेजवळ फडकविण्यात आला त्याची ऊंची किती आहे? 360 फूट. रांची येथील ध्वजाचे 293 उंचीचे रेकॉर्ड मोडले.
योगदा सत्संग मठास 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष पोस्टाचे तिकीट काढण्यात आले. या मठाचे संस्थापक कोण होते? परमहंस योगानंद (1917 मध्ये स्थापना)
भारतातील सर्वांत लांब केबल ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? गुजरात (भरूच येथे नर्मदा नदीवर. लांबी : 1.4 किमी. लार्सन अँड टर्बो (L&T) या कंपनीने बांधला.)
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने राष्ट्रीय सुरक्षा आठवडा कधी साजरा केला? 4 ते 10 मार्च 2017. (थिम : किप ईच अदर सेफ)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील सर्वांत मोठ्या पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केले? दहेज, गुजरात
मध्य रेल्वेने भारतातील पहिल्या वातानुकूलित रेल अँबुलंसचे नुकतेच अनावरण केले आहे. ही अँबुलंस कोणत्या स्थानकावर थांबणार आहे? कल्याण
क्राइम अँड क्रीमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम्सशी (CCTNS) जोडण्यात आलेले भारतातील पहिले पोलिस स्टेशन कोणते? संजौली पोलिस स्टेशन, शिमला (हिमाचल प्रदेश)
लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? मल्लिकार्जुन खरगे (के व्ही थॉमस यांची जागा त्यांनी घेतली आहे.
पर्यावरणावरील तिसरी जागतिक परिषद नुकतीच कोणत्या शहरात पार पडली? नवी दिल्ली
आठवीपर्यंत राज्य मंडळाच्या शाळांमध्ये संस्कृत शिक्षण अनिवार्य करणारे राज्य कोणते? आसाम
विमानतळ गुणवत्ता सेवा सर्वेक्षणामध्ये जगामध्ये पहिला क्रमांक कोणत्या भारतीय विमानतळाने प्राप्त केला आहे? हैद्राबाद
भारतातील पहिल्या स्मार्ट आदिवासी गावाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? जम्मू-काश्मीर (राजौरी जिल्ह्यात हुब्बी हे गाव)
नौकारीच्या शोधत असणार्यांसाठी ‘मेरा हुनर’ हे मोबाइल अॅप्लिकेशन कोणत्या राज्याने सुरू केले आहे? हिमाचल प्रदेश
सरकारने नुकतेच कोणत्या ठिकाणी केळी संशोधन केंद्र स्थापन केले आहे? गोरौल, जिल्हा वैशाली (बिहार), तिरूचेरपल्ली (तमिळनाडू) नंतर दुसरे संशोधन केंद्र.
पाटणा उच्च न्यायालयच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणी शपथ घेतली आहे? न्या. राजेंद्र मेनन
भारतातील पहिले अनुलंब (Vertical) गार्डन कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? बंगळुरु
युरोझोनला मागे टाकत कोणत्या देशाची बँकिंग प्रणाली ही जगातील सर्वांत मोठी बँकिंग प्रणाली ठरली आहे? चीन
कोणत्या देशातील संसदेने ‘व्हांगानुई’ नदीला नुकताच ‘कायदेशीर मनुष्याचा’ दर्जा दिला आहे जो जगातील अशा प्रकारचा पहिलाच निर्णय समाजाला जातो? न्यूझीलँड
चक्रीवादळ ‘डेबी’ (Debbie) नुकतेच कोणत्या देशाच्या किनारी भगत थैमान घातले आहे? ऑस्ट्रेलिया
भारताचा कोणता शेजारील देश तब्बल 19 वर्षानी जनगणना घेत आहे? पाकिस्तान
39 वा आंतरराष्ट्रीय योगा फेस्टिवल कोठे पार पडला? ऋषिकेश (उत्तराखंड)
जल क्रांती अभियानावरील राष्ट्रीय परिषद कोठे पार पडली? नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? 8 मार्च (थिम : विमेन इन द चेंजिंग वर्ल्ड ऑफ वर्क : प्लॅनेट 50-50 बाय 2030) अभियानाची थिम : #BeBoldForChange
जागतिक किडनी दिन कधी साजरा जातो? 9 मार्च (2017 ची थिम : किडनी डिसीज अँड ऑबेसिटी : हेल्दी लाईफस्टाइल फॉर हेल्दी किडनी)
जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो? 20 मार्च (2010 मध्ये पहिल्यांदा साजरा)
पाचवा राष्ट्रीय संस्कृत महोत्सव कोठे पार पडला ? अरुणाचल प्रदेश
3-7 जानेवारी 2018 रोजी होणारी 105 वी भारतीय विज्ञान कोंग्रेस कोठे होणार आहे? हैदराबाद
जागतिक व्यापार संघटनेत भारताचे सदिच्छादूत म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? जे एस दीपक
माजी कोलसभा अध्यक्ष रबी राय यांचे निधन झाले. त्यांचा लोकसभा अध्यक्ष म्हणून कार्यकाल कोणता होता? नवव्या लोकसभेत 1989-91.
आर. गांधी यांच्या जागी कोणाची आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली आहे? बी पी कनुंगो
नोबेल पुरस्कार विजेते जॉर्ज ओलाह यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता? 1994 साली रसायनशास्त्राचा नोबेल. अस्थिर कार्बन रेणु कार्बोकॅटायन (Carbocations) साठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.
डोनाल्ड टस्क यांची यूरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी पुनर्नेमणूक झाली. ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत? पोलंड. त्यांची युरोपिय कौन्सिलवर पुन्हा 2.5 वर्षासाठी नेमणूक झाली असून नोव्हेंबर 2019 पर्यन्त ते या पदावर असतील. त्यांची युरोपिय समिटच्या अध्यक्षपदीही पुनरनेमणूक झाली. डिसेंबर 2014 मध्ये त्यांची यूरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
रोनाल्ड ड्रिवर यांचे निधन झाले. ते स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ आणि गुरुत्व लहरीचे प्रणेते होते. लायगो प्रयोगशाळेचे ते सह संस्थापक होते.
प्रसिद्ध फोटोजर्नलिस्ट रघु राय यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? न्या. नवनिती प्रसाद सिंग
बीएसएफची पहिली महिला फील्ड ऑफिसर कोण ठरली आहे? राजस्थानची तनुश्री पारीक
महिला क्रिकेट वर्ल्डकप 2017 च्या सदिच्छादूतपदी आयसीसीने कोणाची नेमणूक केली आहे? सचिन तेंडुलकर
एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स किताब कोणी जिंकला आहे? रॉजर फेडरर. स्टेन वावरिंकाला हरवून. हे त्याचे पाचवे इंडियन वेल्स किताब आहे त्याने नोवक जोकोविचची बरोबरी केली आहे.
जानेवारी 2018 मध्ये पाकिस्तान आणि यूएई मध्ये होणार्या ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कपच्या सदिच्छादूतपदी कोणाची नेमणूक केली आहे? शाहीद आफ्रिदी
सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी पुरस्कार कोणत्या भारतीय क्रिकेटपट्टूला देण्यात आला आहे? रविचंद्रन अश्विन. राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरनंतर हा पुरस्कार जिंकणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. हा पुरस्कार आयसीसी कडून प्लेयर ऑफ द इयर हा किताब पटकावणार्याला दिला जातो. 2004 मध्ये पहिला पुरस्कार राहुल द्रविडला देण्यात आला.
जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो? 3 मार्च (2017 ची थिम : लिसन टु द यंग व्हायसेस)
जगातील सर्वांत जुने जीवाश्म नुकतेच कोणत्या देशात सापडले आहे? कॅनडा
2016 चा सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आला आहे? कोकणी लेखक महाबळेश्वर सेल. त्यांच्या ‘Hawthan’ या कादंबरीसाठी. 1991 पासून हा सन्मान के के बिराला फाउंडेशनतर्फे देण्यात येतो.
पहिल्यांदाच हत्ती गणनेसाठी चार राज्य एकत्र आली आहेत. टी राज्य कोणती? ओडिशा, पश्चिम बंगाल, छतीसगड आणि झारखंड
केंद्रीय जल आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नेमणूक झाली आहे? नरेंद्र कुमार
एनटीपीसीने भारतातील सर्वांत मोठे तरंगते सौर फोटोव्होल्टिक प्रकल्प कोठे स्थापन केले आहे? कायमकुलम, केरळ
मानवी संसाधन सल्लागार संस्था मर्सर च्या अहवालनुसार भारतातील गुणवत्तापूर्ण राहण्यायोग्य शहारच्या यादीत पहिले स्थान कोणत्या शहराने पटकावले आहे? हैद्राबाद
सीमा संरक्षण संबंधित कोणत्या समितीने नुकताच आपला अहवाल केंद्राला सुपूर्द केल आहे? मधुकर गुप्ता समिती.
जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? 15 मार्च (2017 ची थिम: बिल्डिंग ए डिजिटल वर्ल्ड कंजूमर्स कॅन ट्रस्ट)
चेनेनी-नशेरी : भारतातील सर्वांत लांब महामार्ग बोगदा नुकताच कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? जम्मू-काश्मीर
उत्तराखंड उच्च न्यायालयाने कोणत्या नद्यांना जीवित घटकाचा दर्जा दिला आहे? गंगा आणि यमुना
जागतिक आनंदी अहवालात भारताला कितवा क्रमांक मिळाला आहे? 155 देशांच्या यादीत 122 वा क्रमांक. सर्वांत आनंदी देश : नॉर्वे (1), डेन्मार्क (2). सर्वांत दुःखी देश : मध्य आफ्रिकन रिपब्लिक.
2017 ची विजय हजारे क्रिकेट ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकला आहे? बंगालला हरवून तमिळनाडूने पाचव्यांदा जिकली. अंतिम सामन्यात बंगालवर तमिळनाडूचा तिसरा विजय.
जगातील जल दिन कधी साजरा केला जातो? 22 मार्च. 2017 ची थिम : ‘व्हाय वेस्ट वाटर’. 1993 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
मानव विकास निर्देशांक 2016 मध्ये भारताला किटवे स्थान प्राप्त झाले आहे? 131 वे
भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता? माजुली (आसाम)
जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? 23 मार्च. 2017 ची थिम ‘अन्डरस्टँडिंग क्लाउड्स’
जागतिक क्षयरोगदिन कधी साजरा केला जातो? 24 मार्च. 2017 ची थिम ‘युनाइट टु एंड टीबी’
मार्च 2017 मध्ये भारतीय नौदलाने बराक क्षेपणास्त्र कोणत्या नौकेवरून यशस्वीरीत्या सोडले आहे? आयएनएस विक्रमादित्य.
अकरावा ‘अर्थ आवर’ कोणत्या दिवशी पळण्यात आला ? 25 मार्च 2017 . पहिला अर्थ आवर 31 मार्च 2007 रोजी सिडनी ऑस्ट्रेलिया येथे पळण्यात आला.
2017 ची 71 वी संतोष ट्रॉफी (फुटबॉल) कोणत्या संघाने जिंकली आहे? पश्चिम बंगाल. गोव्याला हरवून. पश्चिम बंगालचा विक्रमी 32 वा विजय.
एसएचजी (सेल्फ हेल्प ग्रुप) आधारित वित्तीय समावेशन मॉडेल स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? ओडिशा
उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्यातील खाणकामावर पुर्णपणे बंदीचा आदेश दिला आहे.
धातू खाणींवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता ? एल साल्वाडोर
भारतातील सर्वांत मोठा नदी महोत्सव ‘नाममी ब्रम्हपुत्रा’ कोणत्या राज्यात पार पडला? आसाम
न्यू डेवलपमेंट बँकेची दुसरी वार्षिक बैठक कोणत्या देशात होत आहे? भारत
कोणत्या क्रिकेट संघाने 2017 ची देवधर ट्रॉफी जिंकली आहे? तमिळनाडू.
‘सरहूल’ हा आदिवशी महोत्सव कोणत्या राज्यात पार पडला? झारखंड
ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्व प्राप्त करणारी पहिली इ-कॉमर्स कंपनी कोणती? पेटीएम
अटलांटिक परिषदेच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीयची नेमणूक झाली आहे? अनिल अंबानी
नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनिझेशनचा सदस्य होण्याच्या मार्गावर असलेला देश कोणता? माँटेनिग्रो
माहिती व प्रसारण मंत्रालयाने कोणती ऑनलाइन चित्रपट प्रमाणन प्रणाली सुरू केली आहे? इ-सिनेप्रमाण
कोणत्या क्रिकेट संघाने 2017 ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे? ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने जिंकली. रविंद्र जाडेजा मॅन ऑफ द सिरिज
यूएन वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या कार्यकारी संचालक पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? डेविड बेसली
‘द लीडरशिप कॉन्फरन्स ऑन सिविल अँड ह्युमन राईट्स’ ची प्रमुख बनणारी पहिली महिला कोण? वनिता गुप्ता
कोणत्या अभिनेत्याला कला रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? अनुपम खेर
आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीने नवीन युरिया धोरणामध्ये बदल करण्याला मंजूरी दिली आहे. हे धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते? - 2015
* यामध्ये पुनर्मुल्यांकीत क्षेमतेपेक्षा जास्त उत्पादन आणि युरिया एककाद्वारे पुनर्मुल्यांकीत क्षेमतेपेक्षा जास्त उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी पॅरा 8 चा समावेश करण्यासंबंधी सुधारणा करण्यात येणार आहे.
नवीन युरिया धोरण
- मे 2015 मध्ये जाहीर करण्यात आले.
- उद्देश : स्वदेशी युरिया उत्पादन वाढविणे, युरिया यूनिट्समध्ये ऊर्जा क्षमतेला प्रोत्साहन देणे, शासनावरील अनुदानाच्या ओझ्याचे सुसूत्रीकरण करणे.
- सर्व स्वदेशी उत्पादकांना याअंतर्गत 100% युरिया निम कोटेड करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
नुकतेच कोणते दोन नवीन ग्रीन कॉरिडॉर घोषित करण्यात आले आहेत? - बरमेर-मुनवाब आणि पिपाड रोड-बिलारा (दोन्ही राजस्थान)
यासोबतच ग्रीन कॉरिडॉरची संख्या आता पाच झाली आहे.
1) Manamadurai–Rameswaram (पहिला)
2) Okha-Kanalus
3) Porbandar-Wasjaliya
4) Barmer-Munawab
5) Pipad Road-Bilara
यामध्ये स्वच्छ भारत मोहिमेयांतर्गत रेल्वेमध्ये बायोटॉयलेट्स बसविण्यात येतात.
कोणत्या संघाने देवधर ट्रॉफी जिंकली आहे? - तमिळनाडू . भारतीय क्रिकेटचे ग्रँड ओल्ड मॅन म्हणून ओळखल्या जाणार्या प्रो. डी. बी. देवधर यांच्या नावे खेळली जाणारी ही क्रिकेट ट्रॉफी आहे. 50 षटकांची ही नॉकआऊट स्पर्धा दरवर्षी पाच क्षेत्रीय संघांमध्ये होते.
कोणत्या सार्वजनिक संस्थेने स्वतःचे वेगळे अमलबजावणी संचालनालय (ED) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने नुकतेच 50 गिगावॅट ऊर्जा निर्मिती क्षमतेचा मैलाचा दगड पार केला आहे? - NTPC
उत्तरप्रदेश मध्ये उंचहार येथे 500 मेगावॅट चा प्रकल्प सुरू करून एनटीपीसीने ही किमया साधली. एनटीपीसीची आता एकूण स्थापित क्षमता 50,498 गिगावॅट एवढी झाली आहे. एनटीपीसी- नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन. भारतातील सर्वांत मोठी ऊर्जा निर्मिती करणारे महामंडळ. 1975 मध्ये स्थापना. 70% इक्विटि शासनाकडे.
अमेरिका-भारत व्यवसाय परिषद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? - एन चंद्राबाबू नायडू. एन चंद्राबाबू नायडू - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री. अमेरिका भारत व्यवसाय परिषदेचा हा ‘ट्रान्सफॉर्मेटिव्ह मुख्यमंत्री’ पुरस्कार. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव अरुणा सुंदरराजन यांचीही ट्रान्सफॉर्मेटिव्ह लीडरशिप पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
कोणता देश नुकताच इंटरनॅशनल एनर्जी असोसिएशनचा सहाय्यक सदस्य बनला आहे?
- भारत
भारत जगातील तिसरा सर्वांत मोठा ऊर्जा उपभोक्ता देश. भारताच्या सहभागानंतर इंटरनॅशनल एनर्जी असोसिएशन (आयईए) आता जगातील 70% ऊर्जा उपभोक्ते सदस्यांची संघटना बनली.
आयईए: ओईसीडीच्या फ्रेमवर्कनुसार स्थापना 1974 मध्ये. 29 सदस्य देश. भारत एकमेव सहयोगी सदस्य. मुख्यालय: पॅरिस. प्रकाशन : ‘वर्ल्ड एनर्जि आऊटलुक’ अहवाल.
गुरांच्या व म्हशींच्या खुरे आणि तोंडाच्या अजारासाठी भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? - अरगुल (भुवनेश्वर), ओडिशा. संयुक्त राष्ट्राची अन्न आणि कृषी संघटना (FAO) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAT) यांनी संयुक्तपने हे केंद्र सुरू केले आहे. भारतात दरवर्षी 23000 गुरे आणि म्हशी खुरे आणि तोंडाच्या आजारमुळे मरण पावतात.
कुडानकुलम आणूऊर्जा प्रकल्पाच्या दुसर्या यूनिटमध्ये नुकतेच ऊर्जा निर्मितीला सुरुवात झाली. कुडानकुलम आणूऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? – तमिळनाडू. या यूनिटची ऊर्जा निर्मिती क्षमता 1000 मेगावॅट. रशियाच्या मदतीने बांधण्यात आले.
यूनेस्को जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे? - डेवीट इसाक (Dawit Isaak) (स्वीडीश जर्नलिस्ट). पुरस्करची स्थापना 1997 मध्ये. कोलंबियाचे पत्रकार ‘Guillermo Cano Isaza’ यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप: 25000 डॉलर्स.
केंद्र सरकार आणि CIRDAP यांच्यामध्ये कोणत्या ठिकाणी एशिया आणि पॅसिफिकसाठी एकात्मिक ग्रामीण विकास केंद्र (CIRDAP) स्थापन करण्याबाबत कराराला मंजूरी देण्यात आली आहे? - हैदराबाद
हैदराबाद मध्ये राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्थेमध्ये हे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
CIRDAP: एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देश आणि संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचा हा उपक्रम. जुलै 1979 मध्ये स्थापना. मुख्यालय : ढाका (बांग्लादेश). सदस्य : 16. अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, इंडोनेशिया, इराण, लाओ पीडीआर, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, फिलीपींस, श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम आणि फिजी.
पाच स्टेट बँकांसह भारतीय महिला बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विलीनीकरण झाले. त्या पाच स्टेट बँका कोणत्या? - स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटीयाला आणि स्टेट बँक ऑफ त्रावणकोर. (शॉर्ट कट: HMT BJP)
आशियन डेवलपमेंट बँकेच्या ‘दक्षिण आशिया उप-विभागीय आर्थिक सहकार्य’ (SASEC) कार्यक्रमाचा सातवा सदस्य कोणता देश बनला आहे? – म्यानमार. नवी दिल्ली येथे अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली SASEC च्या वित्त मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय. 2013 पासून म्यानमार निरीक्षक देश. SASEC ची स्थापना 2001 मध्ये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्वांत मोठ्या महामार्ग बोगद्याचे उद्घाटन नुकतेच केले. हा बोगदा कोणत्या राज्यात आहे? - जम्मू-काश्मीर
चेनानी-नाशेरी बोगदा. काश्मीर दरीला जम्मूशी जोडतो. लांबी- 9 किलोमीटर. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर. जम्मू आणि श्रीनगरमधील सध्याच्या 350 किमी आंतर कमी होऊन 250 किमी. समुद्रासापतीवरून 1200 मीटर उंचीवर. आशियातील सर्वांत लांब द्वि-दिशात्मक हायवे बोगदा. 2,500 कोटी रुपये खर्च. एकात्मिक ट्राफिक नियंत्रण प्रणाली बसविलेला भारतातील पहिला बोगदा. तीन ते चार घंटे प्रवासाच्या वेळेत घट. अन्य वैशिष्ठ्ये - Video Surveillance System, FM Rebroadcast System, Entrance Detection Control System, Active Firefighting System.
2016 मध्ये घोषित झालेला नोबेल पुरस्कार बॉब डिलनने नुकताच स्वीकारला आहे. त्यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल मिळाला? – साहित्य. बॉब डिलन- अमेरिकन गायक आणि गीतकार. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकणारे पहिले गीतकार. टोनी मॉरिसन (1993) यांच्या नंतर साहित्याचा नोबेल जिंकणारे पहिले अमेरिकन व्यक्ती.
इंडिया सुपर सिरिज टूर्नामेंट कोणी जिंकला आहे? - पीव्ही सिंधु
राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ नुकतीच कोणी घेतली आहे? - न्या. प्रदीप नंदराजोग
नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी (Vice-Chancellor) नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? - सुनैना सिंग. यापूर्वी त्या इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज यूनिव्हर्सिटी, हैदराबादच्या कुलगुरू होत्या. डॉ. विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी (Chancellor) निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळ (CBEC) च्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? - वनजा सरना. नजीब शाह यांची जागा त्यांनी घेतली. 1980 च्या भारतीय महसूल सेवेच्या अधिकारी.
1 Gbps वायर्ड ब्रौडबॅंड इंटरनेट सेवा देणारे देशातील पाहले शहर कोणते? - हैद्राबाद
एलजीबीटीचे प्रतीक असलेल्या इंद्रधनुषी ध्वजाच्या निर्मात्याचे नुकतेच निधन झाले. त्यांचे नाव काय? - गिलबर्ट बेकर
केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ कोठे सुरू केली? - नेल्लोर जिल्हा (आंध्र प्रदेश). दरिद्रीरेषेखालील वरिष्ठ नागरिकांना भौतिक उपकरणे मदत म्हणून देणे हा उद्देश. 100% केंद्र पुरस्कृत योजना.
हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका किशोरी आमोनकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत? - पद्मभूषण (1987), पद्मविभूषण (2002), संगीत नाटक अकादमी (2010). आदराने त्यांना ‘गानसरस्वती’ असे संबोधले जात असे. पुरस्कार: संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार(१९८७), संगीत सम्राज्ञी पुरस्कार (१९९७), पद्मविभूषण पुरस्कार(२००२), संगीत संशोधन अकादमी पुरस्कार (२००२).
19 वी राष्ट्रकुल वनीकरण परिषद (forestry conference) कोठे पार पडली? – उत्तराखंड. डेहराडून (उत्तराखंड) येथे पार पडली. भारतात दुसर्यांदा (यापूर्वी 1968 मध्ये).
आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर आर गांधी यांची जागा नुकतीच कोणी घेतली आहे? - बी.पी. कनुंगो
यूपीएससीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणी शपथ घेतली आहे? - प्रो. डेव्हिड आर. सिमलीह. जून 2012 मध्ये यूपीएससीमध्ये सदस्य म्हणून रुजू. राजीव गांधी विद्यापीठ, इटानगरचे माजी कुलगुरू. 22 जानेवारी 1953 रोजी आसाममध्ये जन्म.
भारतीय रिझर्व बँकेने किती रुपयाची नवीन नोट बाजारात आणण्याच्या प्रस्तावला मान्यता दिली आहे? 200 रुपये
सायबर कमांड यूनिट सुरू करणारा नाटोचा पहिला सदस्य देश कोणता? जर्मनी
जागतिक अँटी डोपिंग एजन्सीच्या अहवालामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तिसरा (रशिया आणि इटली नंतर तिसरा क्रमांक)
विविध सेवा ऑनलाइन देण्यासाठी ‘ई-नगरपालिका’ हे मोबाइल अॅप्लिकेशन कोणत्या राज्याने सुरू केले आहे? - मध्य प्रदेश
भारतातील पहिली ट्रान्सजेंडर पोलिस अधिकारी बनणारी व्यक्ती कोण? - के पृथिका याशिनी. तमिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षक हे पद तिने स्वीकारले आहे.
बिटकॉईनला चलनाचा दर्जा देणारा देश कोणता? – जपान. बिटकॉईन हे एक आभासी चलन असून त्यावर कोणत्याही मध्यवर्ती बँकेचे किंवा सरकारचे नियंत्रण नसते. Cryptocurrency या नावानेही हे चलन ओळखले जाते.
संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताचे सदिच्छादूत आणि कायमस्वरूपी प्रतींनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? - राजीव चंदर. अजित कुमार यांची जागा त्यांनी घेतली. 1983 च्या बॅचचे ते भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत.
वृक्ष निवासी खेकड्याची प्रजात नुकतीच कोणत्या राज्यात सापडली आहे? - केरळ . केरळमधील पश्चिम घाटात. नाव – कानी (Kani) या आदिवशी जमातीवरून ‘कानी मरनंजंडू’ हे नाव देण्यात आले आहे.
50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथिन पिशव्याच्या उत्पादनावर कोणत्या राज्याने बंदी घातली आहे? - जम्मू-काश्मीर
केंद्रीय कॅबिनेटने स्वतंत्र रेल्वे नियामक ‘रेल्वे विकास प्राधिकरण’ स्थापण्यास मंजूरी दिली आहे. या प्राधिकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली होती? - विवेक देवरॉय समिती (2015), डॉ. राकेश मोहन कार्यगट (2001). प्राधिकरणाची रचना : एक अध्यक्ष + 3 सदस्य. सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षे. कॅबिनेट सचिवच्या अध्यक्षतेखालील शोध समितीद्वारे निवड.
केंद्र सरकारने कोणती योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? - महात्मा गांधी प्रवासी सुरक्षा योजना . 2012 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती.
नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय विद्युत गतीशीलता मंडळाच्या (National Board of Electric Mobility) अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? - गिरीश शंकर. इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांचे घटक यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे मंडळ स्थापन करण्यात आले.
प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट निर्माते अजय झणकार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कोणत्या कादंबरीवर ‘Singularity’ हा हॉलीवुड चित्रपट आला होता? – द्रोहपर्व. अन्य पुस्तके : सरकरनामा, द्रोहपर्व
एनटीआर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? - एस पी बाला सुब्रमण्यम. त्यांना 2012 चा पुरस्कार तर 2013 चा पुरस्कार हेमा मालिनी यांना जाहीर झाला आहे.
विस्डेनचा 2016 चा जगातील प्रमुख क्रिकेटपट्टू (Leading Cricketer) पुरस्कार कोणाला मिळाला आहे? - विराट कोहली. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या ‘Ellyse Perry’ हिला विस्डेनचा जगातील प्रमुख महिला क्रिकेटपट्टूचा पुरस्कार मिळाला आहे.
2017 च्या राष्ट्रीय सागरी दिनाची संकल्पना (थिम) काय होती? - Connecting India through Shipping. 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सागरी दिन 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
रॉलॅंड बँडचे संस्थापक आणि डिजिटल संगीताचे प्रणेते इकुटारो काकेहशी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी कोणते डिजिटल संगीत मानक विकसित केले आहे? MIDI standard (Musical Instrument Digital Interface).
जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना काय होती? Depression: Let’s talk
राष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव कोठे पार पडला? विशाखापट्टणम
लैंगिक वेतनामधील फरक नष्ट करून स्त्री व पुरूषांना समान वेतन देणारा जगातील पहिला देश कोणता? - आइसलॅंड
राज्यातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी कोणत्या राज्याने ‘गुणोत्सव कार्यक्रम’ सुरू केला आहे?- आसाम
NASSCOM च्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? - रमन रॉय
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते कोणाला नुकताच मरणोत्तर कीर्ती चक्र सन्मान मिळाला आहे? - प्रेम बहादुर रेसमी मगर. ते गोरखा रायफल्सचे जवान होते. त्यांनी जून 2016 मध्ये एका ऑपरेशन दरम्यान चार दहशतवाद्यांना कंठस्नान दिले होते.
केंद्र सरकारने कोणत्या राज्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे? - केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, आंध्रा प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश
पहिली वन्यजीव डीएनए बँक कोठे स्थापन करण्यात आली आहे? - बरेली (उत्तर प्रदेश)
हिंदू पूरोहित निर्माण करण्यासाठी कोणत्या राज्याने एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स सुरू केला आहे? - मध्य प्रदेश
संयुक्त राष्ट्राची सर्वांत कमी वयाची शांती दूत कोण बनली आहे? - मलाला युसुफझाई
भारतातील पहिली बास्केटबॉल शाळा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे? – मुंबई. अमेरिकास्थित नॅशनल बास्केटबॉल असोशिएशनने ही शाळा सुरू केली.
विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? - 6 एप्रिल. या दिनी #WePlayTogether हा डिजिटल उपक्रम राबविला गेला.
दीनदयाल अंत्योदय रसोई योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? - मध्य प्रदेश. स्वस्तात जेवण देणारी योजना सुरू करणारे मध्यप्रदेश तिसरे राज्य आहे. पहिले – तमिळनाडू (अम्मा कॅंटीन), दुसरे- राजस्थान.
व्यवसायामधील भ्रष्टाचारामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? – नववा. पहिले पाच देश- युक्रेन, सायप्रस, ग्रीस, स्लोवाकिया, क्रोशिया. 41 देशांचे EMEIA सर्वेक्षण. 2015 मध्ये भारत पाचवा.
शहीद लष्करी जवानांच्या कुटुंबाला नागरिकांचा मदतीच्या स्वरुपात सहारा लाभवा यासाठी शासनाने कोणते वेब पोर्टल सुरू केले आहे? _ भारत के वीर . पोर्टल वर शहीद लष्कर कुटुंबियांच्या बँकेचा तपसील असेल त्यामध्ये थेट मदत म्हणून नागरिक पैसे पाठवू शकतील. खात्यात 15 लाख रुपये जमले की ते खाते पोर्टल वरुन काढून टाकण्यात येईल अशी ही योजना आहे.
‘नॉमडीक एलिफंट’ हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला? - भारत- मांगोलीया. 12 वी आवृत्ती. मिझोराममध्ये वैरेंगते येथे पार पडला. दरवर्षी घेतला जातो. पहिला-2004 मध्ये.
महात्मा गांधींनी केलेल्या कोणत्या सत्याग्रहाचे यंदा 100 वे वर्ष साजरे केले जात आहे? - चंपरण्य सत्याग्रह. नरेंद्र मोदी यांनी चंपरण्य सत्याग्रहाचे 100 वे साजरे करण्यासाठी नवी दिल्ली येथे ‘स्वच्छाग्रह – बापू को कार्याजली- एक अभियान, एक प्रदर्शनी’ हे प्रदर्शन भरवले होते..
युनिटेड किंगडम ते चीन रेल्वे सेवा नुकतीच सुरू झाली. ती केती देशातून गेली आहे? – सात. 17 दिवसांत फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, पोलंड, रशिया, कझाकस्तान, चीन.
123 वे घटनादुरूस्ती विध्येयक 2017 नुकतेच लोकसभेने पारित केले. ते कशासंबंधित आहे? - राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधी. 360 विरुद्ध 2 अशा बहुमताने हे विध्येयक लोकसभेत पारित झाले. 338B व 342A हे नवीन कलम टाकण्यात येणार. 338B- राष्ट्रीय मागासवर्ग आयोग. 342A- सामाजिक व शैक्षणिक वर्गाची यादी जाहीर करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. IMP: एससी व एसटी आयोगाची स्थापना 1987. 65 व्या घटनादुरुस्तीने एससी व एसटी आयोगाला घटनात्मक दर्जा. 89 वी घटनादुरूस्तीने एससी व एसटी आयोग वेगळा करण्यात आला. 338- एससी आयोग, 338A- एसटी आयोग. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग: इंद्रा सोनी खटल्याला अनुसरून स्थापना. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग कायदा 1993.
‘अन्डरग्राऊंड रेलरोड’ या कादंबरीसाठी कोणाला 2017 चा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे? - कोल्सन व्हाइटहेड
भारतीयांना मोफत नकाशे उपलब्ध करून देण्यासाठी कोणते वेबपोर्टल सुरू केले आहे? - नक्षे
केंद्र सरकारने केंद्र पुरस्कृत योजनांची संख्या 66 वरून कमी करून किती केली आहे? – 28. वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले आहे: सहा योजना गाभ्यातील गाभा योजना (100% केंद्र सरकारचा खर्च) , 20 गाभा योजना (खर्च - 60:40. पूर्वोत्तर व हिमालयीन राज्ये- 90:10) , 2 पर्यायी योजना (50:50. पूर्वोत्तर आणि हिमालयीन राज्ये- 80:20).
नागरिकांना विजपुरवठयाची माहिती वास्तविक वेळी देण्यासाठी कोणते अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे? - ऊर्जा मित्र
केंद्र सरकारने अन्न प्रक्रियेसाठी कोणती योजना सुरू केली आहे? – संपदा. Scheme for Agro-Marine Produce Processing and Development of Agro-Processing Clusters (SAMPADA)
‘इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी’ कोणत्या शहरात स्थापन करण्याला केंद्रीय कॅबिनेटने मंजूरी दिली आहे? - विशाखापट्टणम
वंचित मुलांसाठी कोणत्या राज्य पोलिसांनी ‘तारे जमीन पार’ कार्यक्रम सुरू केला आहे? - झारखंड
महिला सुरक्षेसाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? - हरयाणा
गिरीश चंद्र सक्सेना यांचं नुकताच निधन झाल.ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते? - जम्मू-काश्मीर. दोन वेळा राज्यपाल. रॉचे माजी प्रमुख. पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लागार.
सागरमाथा फ्रेंडशिप 2017 हा युद्धसराव कोणत्या देशांत पार पडला? - नेपाळ आणि चीन
फलक आणि फाउंडेशन स्टोन्सवर व्हीआयपीचे नाव लिहिण्यास कोणत्या राज्याने बंदी घातली आहे? - पंजाब
2017 चे पहिले विषुववृत्तीय चक्रीवादळ ‘मारुथ’ नुकतेच कोणत्या महासागरात आले होते? - बंगालचा उपसागर
जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ति ठरलेल्या एम्मा मोरानो यांच निधन झाल. त्या किती वर्षाच्या होत्या.? - 117. 1899 मध्ये इटलीत जन्म.
बोस्टन मॅरेथॉन पूर्ण करणारी भारताची पहिला दृष्टिहीन खेळाडू कोण? - सागर बाहेती. बेंगळुरूचा खेळाडू. 42.16 किमीचे अंतर चार तासात पूर्ण
पहिले ‘मेड इन इंडिया’ औद्योगिक रोबोट कोणते? - BRABO (टाटा मोटर्सने विकसित केले.)
काचेचे छत असलेली भारतातील पहिली रेल्वे कोणती जिचे नुकतेच सुरेश प्रभू यांनी उद्घाटन केले आहे? - विशाखापट्टणम-किरनदुल पॅसेंजर ट्रेन
2015-16 साठी कोणत्या राज्यांना कृषि कर्मन पुरस्कार मिळाला आहे? - तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा. तमिळनाडू – दीर्घ श्रेणीसाठी निवड (10 दशलक्ष टनपेक्षा अधिक उत्पन्न). हिमाचल प्रदेश – माध्यम श्रेणीसाठी (1 ते 10 दशलक्ष टन उत्पन्न). त्रिपुरा – लघु श्रेणी (1 दशलक्ष टनपेक्षा कमी)
कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेने कार्बन न्यूट्रल दर्जा दिला आहे? - राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, शमशाबाद
भारत जगातील दुसर्या क्रमांकाचा एलपीजी आयतदार देश बनला आहे. भारताने कोणत्या देशाला मागे टाकले? - जपान
लष्करावर खर्च करणारा भारत जगातील पाचवा सर्वांत मोठा देश बनला आहे. पहिले चार देश कोणते? - अमेरिका, चीन, रशिया आणि सौदी अरेबिया.
होंगकाँग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाट सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा जूरी पुरस्कार कोणत्या भारतीय चित्रपटाला मिळाला आहे? - न्यूटन (हिन्दी चित्रपट. दिग्दर्शक – अमित मसुरकर)
2016 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला आहे? - के विश्वनाथ . 1992 मध्ये पद्मश्री, 5 राष्ट्रीय पुरस्कार, 20 आंध्र प्रदेश सरकारचा नंदी पुरस्कार, 10 फिल्मफेयर..
भारतातिल पहिला समुद्री रोपवे कोठे सुरू करण्यात येत आहे? - मुंबई ते एलिफंटा . भारताचा सर्वांत लांब रोपवे. 8 किलोमीटर.
पीयर लि’एंफंट अवॉर्ड (Pierre L’enfant Awards-2017) जिंकणारे देशातील पहिले शहर कोणते? - भुवनेश्वर
देशातील पहिली इलेक्ट्रिक टॅक्सी कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे? - नागपुर . महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी अजून 200 ई-टॅक्सी सुरू करणार.
देशातील पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू मीटिंग कोठे पार पडली? - थिरुवानंतपुरम (केरळ)
देशातील पहिले पुस्तकाचे गाव कोठे स्थापन क्करण्यात आले आहे? - भिलार (सातारा). ब्रिटनच्या ‘Hay-on- Wye’ च्या धर्तीवर. स्ट्रॉबेरीचे गाव म्हणूनही ओळख. 15000 पुस्तके. # Hay-on- Wye : जगातील सर्वांत मोठे सेकंडहँड बूक केंद्र.
गंगा स्वच्छता संकल्प दिवस कधी साजरा केला गेला? - 2 मे 2017
गायींच्या संरक्षांसाठी कोणत्या राज्याने स्टॅम्प ड्युटीवर 10% ‘गौ सेस’ हा अधिभार लावला आहे? - राजस्थान
मारीजौना (marijuana) च्या कायदेशीर उत्पादन, विक्री आणि सेवन करण्यास मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता? – उरूग्वे. मारीजौना: अंबाडीसारख्या वनस्पतीची वाळवलेली पाने व फुलेजी मादक द्रव्ये म्हणून सिगरेटमध्ये भरुन ओढतात.
‘एशियन बिझनेस विमेन ऑफ ईयर’ हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? - अशा खेमका
महिला सुरक्षेसाठी कोणत्या शहर पोलिसने ‘पिंक होयस्लास’ ही पोलिस पॅट्रोल वाहने सुरू केली आहेत? - बेंगळुरू
लाखो संगणक यंत्रणा निकामी करणारा विषाणू सध्या जगभरमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्या विषाणूचे नाव काय? रँन्समवे
गडचिरोलीत स्थापन करण्यात येणार्या कोणत्या प्रकल्पाला गडचिरोलीतील एटापली आणि भामरागड या दोन तालुक्यातील आदिवसी विरोध करीत आहेत? लोयड मेटल्सचा स्पोंज आयर्न प्रकल्प
दरवर्षी मान्सून कोणत्या तारखेला केरळ मध्ये दाखल होतो? एक जून
कोणत्या महिन्यामध्ये राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो? सप्टेंबर
शुभमंगल योजना कोणत्या विभागामार्फत राबविली जाते व तिचे लाभ कोणते? (जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविली जाते. मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपये अनुदानाचा वधूच्या वडिलांच्या किंवा आईच्या नावाने धनादेश दिला जातो.)
जागतिक आरोग्य संघटनेने 7 एप्रिल 2017 रोजी आरोग्य दिन साजरा केला. यावर्षीचा या दिनाचे घोषवाक्य (theme) काय होते? ‘निराशा वाटते आहे? चला गप्पा मारू’
सीपीईसी काय आहे? चीन व पाकिस्तान दरम्यानची आर्थिक मार्गिका जी पाक व्याप्त कश्मीर मधीन जाणार आहे
ओबोर काय आहे? चीनमध्ये पार पडलेली ‘वन बेल्ट वन रोड’ परिषद
शहरी वाहतूक क्षेत्रात भारताला ब्रिटनचे सहाय्य मिळणार असून भारताने ब्रिटनच्या कोणत्या संस्थेबरोबर करार केला आहे? ट्रान्सपोर्ट फॉर लंडन अथॉरिटी
राज्यातील पहिला टोलनाका ठरलेला खरेगाव टोलनाका नुकताच राज्य शासनाने बंद केला आहे. तो कोणत्या मार्गावर अस्तीत्वात होता? मुंबई-नाशिक
भारताच्या झुलन गोस्वामी या मीहिला क्रिकेटपट्टूने 181 बळी घेत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये जगत सर्वाधिक बळी मिळविण्याचा विक्रम केला आहे. तिने 181 वा बळी कोणाचा घेतला? आफ्रिकेच्या रायसीबी नितोझाके
पुरुष नसबंदीमध्ये देशात प्रथम क्रमांकावर असलेले राज्य कोणते? महाराष्ट्र
‘सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजने’अंतर्गत लाभर्थ्यांना कोणते लाभ मिळतात? (एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणार्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यास दोन हजार रुपये रोख, तसेच एक मुलगी असल्यास मुलीच्या नावे आठ हजार रुपये किंमतीचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले जाते. तर दोन मुली असल्यास दोन्ही मुलींच्या नावे चार हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाण पत्र दिले जाते.)
महाराष्ट्र शासन, विज्ञान भारती, डेक्कन एड्युकेशन सोसायटी यांचातर्फे कितवे भारतीय विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आले हते? पाचवे
स्नेहल प्रकाशनातर्फे ‘भारतीय ज्ञांनाचा खजिना’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक कोणाचे आहे? प्रशांत पोळ
‘महानयक’ या कादंबीरीच्या इंग्रजी आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन झाले. या कादंबरीचे लेखक कोण आहेत? विश्वास पाटील
ऑगस्ट 1942 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संघटनेचे या वर्षी अमृत मोहोत्सवी वर्ष (75) आहे? आझाद हिंद सेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या दौर्यादारम्यान कोणत्या दोन शहरांमध्ये विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे? कोलंबो ते वाराणसी
फ्रान्समधील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नुकतीच नेमणूक झाली? विनय मोहन क्वात्रा
प्राप्तीकर कायद्यात जेष्ठ नागरिक हे दोन प्रकारांत विभागले जातात. 60-80 वर्षे वय असलेले जेष्ठ तर 80 पेक्षा जास्त वय असलेले अतिजेष्ठ. तर प्राप्तीकर कायद्यानुसार त्यांना आयकरमुक्त मर्यादा किती उत्पन्नपर्यंत आहे? 60-80 > 3 लाख आणि 80 पेक्षा जास्त 5 लक्ष.
दक्षिण कोरियाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ? मून जे इन
नुकत्याच पार पाडलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला किती पदके मिळाली आहेत? सुवर्ण? रौप्य? कांस्य? एकूण 10 . 1 सुवर्ण, 5 रौप्य, 4 कांस्य.
कुपोषण व बालमृत्यूची समस्या सोडविण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली? आरोग्य मंत्री दीपक सावंत
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि लोकसत्ता यांच्या विद्यमानाने कोणती स्पर्धा घेण्यात येणार आहे? ग्रीन सोसायटी अभिनव संकर्ल्प स्पर्धा 2017
देशातील किती रेल्वे स्थानकांवर जेणेरीक औषधे उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना आहे? 1000
राज्यात पहिले निवासी कौशल्य विद्यापीठ कोणते? व कोठे स्थापन झाले? सिम्बोयोसिस स्किल्स अँड ओपन यूनिवर्सिटी, पुणे
नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यात कोठे उभारण्यात येणार आहे? पुरंदर
जीएसटी लागू झाल्यानंतर किती वर्षे केंद्राकडून राज्यांना आर्थिक नुकसान भरपाई दिली जाणार आहे? पाच वर्षे
जेविएर वाल्डेझ या पत्रकाराची 15 मे 2017 रोजी ड्रग गुंडांनी हत्या केली. त्यांनी कोणती पुस्तके लिहिली आहेत? ‘मिस नार्को’, ‘लोस मोरोस डेल नार्को’
ओबोर प्रकल्पविषयी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद 14 व 15 मे रोजी चीनमधील कोणत्या शहरात पार पडली? बीजिंग
सध्या भारताच्या दौर्यावर असलेले मोहम्मद अब्बास कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत? पॅलेस्टाईन
करचुकावेगिरी विरोधातील मोहिमेसाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने कोणते संकेतस्थळ तयार केले आहे? ऑपरेशन क्लीन मनी
पायाभूत क्षेत्राला अर्थपुरवठ्यासाठी कोणत्या वर्षीच्या अर्थसंकल्पात इनफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट ट्रस्ट (इनव्हीट) स्थापण्यास परवानगी देण्यात आली? 2015
सार्वजनिक वितरण प्रणालीत येणार्या स्वस्त धन्य दुकानांमध्ये आधारसमर्थित भरणा विनिमय शक्य करण्यासाठी व्यापार प्रतींनिधी (बँक मित्र) म्हणून राज्य सरकारने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, अकोला, नागपूर, जळगाव आणि नाशिक या दहा जिल्हयांसाठी कोणत्या बँकेची निवड केली आहे? सारस्वत बँक
राज्याचे अर्थ, नियोजन आणि वन मंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्या मंत्रालयीन कार्यालयाला आयएसओ मानांकन प्रदान करण्यात आले आहे. आयएसओ मांनाकान प्राप्त हे देशातील पहिले मंत्रालयीन कार्यालय ठरले आहे.
नागरी व ग्रामीण भागातील स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी किती टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय 16 मे 2017 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला? नागरी भागासाठी 5% तर ग्रामीण भागासाठी 4%
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नितिन करमळकर यांची निवड झाली असून ते विद्यापीठाचे कितवे कुलगुरू आहेत? पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? 20 वे , जयकर
अणूर्जेच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने दहा आणूभट्ट्यांच्या स्थापनेला मंजूरी दिली आहे. या भाट्ट्यांच्या माध्यमातून किती आणू ऊर्जेची निर्मिती होणार आहे? 7000 मेगावॅट
तिहेरी तलाकची सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असून कोणाच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनात्मक खंडपीठ स्थापन करण्यात आले? जे एस खेहर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शाळेय शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. आत्तापर्यंत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी ही परीक्षा यंदापासून कोणत्या वर्गासाठी घेण्यास सुरुवात झाली? पाचवी आणि आठवी
रेल्वे स्थांनाकाच्या स्वच्छतेच्या बाबतीत रेल्वे मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात पुणे रेल्वे स्थांनाकाने देशात नववा क्रमांक पटकाविला आहे. या यादीत मध्य रेल्वे विभागातून किती स्थांनाकांची निवड झाली आहे? एकाच
रेल्वे स्थांनाकाच्या स्वच्छतेच्या बाबतीत देशमध्ये ए वर्ग आणि ए वन वर्ग यामध्ये कोणत्या स्थानकांनी पहिला क्रमांक पटकाविला आहे? ए वन : विशाखापट्टणम , ए: बियास
भारतातील गहू क्रांतिचे जनक आणि हरित क्रांतीचा पाया रचणारे कृषि वैज्ञानिक डॉ. दीलबाग सिंग यांचे नुकतेच अमेरिकेत निधन झाले. त्यांनी गव्हाची व बाजरीची कोणती जात तयार केली आहे? बाजरीची : बाजरा-1 आणि गव्हाची : सोना, कल्याणसोना
पहिल्या आपत्त्याच्या जन्मसाठी पाच हजार रुपये देण्याची कोणती योजना 1 जानेवारी 2017 पासून लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळणे घेतला आहे? मातृत्व योजना
राजकीय नेत्यांची शास्त्रशुद्ध फळी तयार करण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनिने इंडियन इंस्टीट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लिडेरशिप या उपक्रमाचा प्रारंभ 17 मे 2017 रोजी कोठे केला? दिल्ली
पेटीएम ही पेमेंट बँक 23 मे पासून सुरू होणार असून कोणत्या राज्यात बँकेची पहिली शाखा सुरू होणार आहे? उत्तर प्रदेश
आरबीआयने 11 बँकांना पेमेंट बँकांचा परवाना दिला होता त्यापैकी कोणी यातून माघार घेतली आहे? टेक महिंद्रा आणि आयडीएफसी बँक
वाढते आयुष्यमान व नौकरी, व्यवसायातील अनिश्चितता हेरून एलआयसीने वयाच्या 100 व्या वर्षापर्यंतच्या व्यक्तींना विमा छत्र देणारी कोणती नवीन आयुर्विमा योजना सादर केली आहे? जीवन उमंग
नुकताच दोन भारतीय कार्यकर्त्यांना ग्रीन ऑस्कर पुरस्कार मिळाला असून त्यांची नावे काय आहेत? संजय गुब्बी आणि पूर्णिमा बर्मन
संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस कोण आहेत? अॅंटोनिओ गुट्टेरस
ओमप्रकाश चौटाला यांनी दिल्लीच्या तीहार तुरुंगात 10 वर्षाचा कारावास भोगताना वयाच्या 82 व्या वर्षी बारावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत? हरयाणा
पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूच्या नियुक्तीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली निवड समिति स्थापन करण्यात आली होती? डॉ. अनिल काकोडकर
कोणत्या देशामध्ये ऑक्टोबर 2017 मध्ये फिफा 17 वर्षाखालील फूटबॉल विश्वचषक स्पर्धा होणर आहे? भारत
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 18 मे 2017 रोजी स्थगिती दिली आहे. या न्यायालयाद भारताची बाजू समर्थपणे मांडणारे विधिज्ञ कोण? हरिष साळवे
विविध वस्तु कुठल्या टप्प्यात बसवायच्या हे ठरविण्यासाठी वस्तु व सेवा कर परिषदेची दोन दिवासीय बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
देशातील पहिलीच गर्भाशय प्रत्यारोपन शस्त्रक्रिया नुकतीच कोठे यशस्वी झाली? गॅलक्सि केअर रुग्णालय पुणे
फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धि महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे? मुंबई-नागपूर
झोमॅटो या संकेतस्थळ आणि अॅपच्या एक कोटी 70 लाख वापरकर्त्यांचा तपशील चोरीला गेल्याचा खळबळजनक प्रकार 18 मे 2017 रोजी उघडकीस आला. झोमॅटो संकेतस्थळ आणि अॅप कशाशी निगडीत आहे? आपल्या परिसरातील चांगल्या हॉटेलांचा पर्याय सुचविणारे संकेतस्थळ व अॅप. हॅकरहेड.कॉम च्या महितीनुसार नॅक्ले नावाच्या हॅकरने माहिती चोरल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती कोण असतात?
शिवाजी आणि सुराज्य हे पुस्तक कोणाचे आहे? अनिल दवे. अनिल दवे यांचे नुकतेच निधन झाले. ते वने व पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र भार) होते. वने व पर्यावरण मंतरलायचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सोपविला आहे. राष्ट्रीय स्वायनसेवक संघाचे असलेले दवे हे अविवाहित होते.
पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल भारत असतानाच ग्राहकांना आता एलईडी बल्ब, पंखा आणि ट्यूबलाइट्स कमी दरात खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना या ठिकाणी किती रूपायामध्ये बल्ब, पंखा आणि ट्यूबलाइट्स मिळणार आहेत?
शरीरातील एखादी पेशी नष्ट अथवा खराब झाली असेल तर ती नव्याने तयार करण्याचे काम कोणती पेशी करते?
पाच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील प्लॅस्टिक गोळाकरून त्याचा वापर रस्त्याच्या कामात करण्यासाठी प्रोसतहान देण्याचा निर्णय नुकताच कोणत्या राज्याने घेतला आहे? महाराष्ट्र
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर किती मीटरच्या आत मद्याविक्रि करण्यास बंदी घातली आहे? पाचशे मीटर
अशरमॅन्स सिण्ड्रोम हा आजार शरीरातील कोणत्या अवयवशी संबंधित आहे?
पदार्थाचा लहनात लहान कण म्हणजे आणू होय. आणूमुळेच पदार्थाचे रसायनिक आणि भौतिक गुणधर्म ठरतात. या आणूचा आकार कोणत्या एकाकत मोजतात?
निष्क्रिय वायु कोणते?
एक ग्राम पदर्थत किती आणू किंवा रेणु असतील याचे उत्तर शोधण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो?
राज्यातील शिंधुदुर्ग, रत्नागिरी, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गोंदिया, नांदेड, आणि सोलापूर या नऊ विमानतळांवर विमानाच्या इंधंनावर पुढील दहा वर्षे फक्त एक टक्का वॅट अकरण्यात येईल असा आदेश महाराष्ट्र सरकारने काढला आहे. राज्यात अन्य शहरांमध्ये विमानाच्या इंधंनावर किती टक्के वॅट आकाराला जातो? 25%
जीएसटी कर रचनेतून असे किती घटक वगळण्यात आले आहेत ज्यावर कर अकरण्याचा अधिकार राज्यांना असणार आहे? 41
जागतिक पतमानांकन संस्थांनी भारताचं पतमानांकन 2007 मधल्या शेवटच्या सुधारणेनंतर बदलले नाही. भारताचे पत मानांकन आजही किती आहे? बीबीबी-
देश पतमानांकन कर्ज जीडीपीचे प्रमाण
भारत बीबीबी- 70%
स्पेन बीबीबी+ 99%
अमेरिका एए+ 107%
वित्तीय शिस्तीचा नवा कायदा बनविण्यासाठी एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिति नेमली होती. त्या समितीने सरकारी कर्जाची पातळी 2022-23 पर्यन्त जीडीपीच्या किती टक्के पर्यन्त खाली आणण्याची शिफारस केली आहे? 60%
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाच वर्षांत किती गावे टंचाईमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती? 5000
सरन्यायाधीश जे एस खेहर याच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने सहा दिवस तिहेरी तलाकबाबत सुनावणी घेतली. या पाच सदस्य पीठामधील अन्य चार सदस्य कोण होते? कुरियन जोसेफ, आर.एफ. नरीमन, यू.यू. लळीत आणि अब्दुल नझिर.
रॉजर एलिस या पत्राकरचे नुकतेच वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या न्यूज चॅनलशी संबंधित होते? फॉक्स न्यूज चॅनल
वजनाने अतिशय हलक्या असलेल्या दोन होवित्झर तोफा अमेरिकेहून नुकत्याच भारतात येऊन पोहचल्या. 145 एम-777 तोफा परीक्षणासाठी राजस्थानमधील पोखरण फायरिंग रेंज मध्ये नेण्यात आल्या. या तोफाच्या उत्पादक कंपनीचे नाव काय आहे? बीएई सिस्टिम्स
होवित्झर तोफाची कमाल मारक क्षमता किती आहे? 30 किमी
जर्मनी येथे होणार्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत आणि इंग्लंड येथे होणार्या जागतिक लीग उपांत्य स्पर्धेत कोणाच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे? मनप्रीत शिंग
जीएसटीमुळे महापालिका आणि नगरपालिका आर्थिकदृष्ट्या कमकुवत होऊ नयेत यासाठी राज्य शासनाकडून सर्व पालिकांना दरवर्षी किती टक्के चक्रवाढीनुसार कायमस्वरूपी मदत दिली जाणार आहे? आठ टक्के
जीएसटीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने 2015-16 या आधार वर्षाच्या आधारे राज्यांना मदत देण्याची तरतूद केली आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र ________ ही तारीख आधार मानून त्या तुलनेत महानगरपालिकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे? 31 मार्च 2017
इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणाचा विजय झाला आहे? हसन रूहानी
‘आजचा सुधारक’ नियतकालिकाचे प्रकाशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियतकालिकाची स्थापना कोणी केली व केंव्हा केली? दि. य. देशपांडे यांनी एप्रिल 1990 मध्ये हे मासिक सुरू केले.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या बाबतच्या खटल्यात पाकिस्तानने बाजू मांडण्यासाठी कोणाची नेमणूक केली आहे? महाधीवक्ता अशतर औसाफ
पुण्यामध्ये पीक वान संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण मध्यवर्ती शाखेचे केंद्रीय कृषी, सहकार व शेतकरी कल्याण मंत्रालयचे सचिव डॉ. एस. के. पटनायक यांनी उद्घाटन केले आहे. कोणत्या कायद्यानुसार या प्राधिकरणाची स्थापना झाली ? 2001 साली शेतकरी हक्क कायदा
भारतात सायबर सुरक्षेचे मानांकन ठरविण्यासाठी तसेच कंपन्यांच्या व सरकारी यंत्रणांना वेळोवेळी सायबर हल्ल्याची माहिती पुरविण्यासाठी सरकारने कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे? CERT-IN
भारताची आपली स्वतःची ऑपरेटिंग सिस्टिम कोणती? भारत ऑपरेटिंग प्रणाली (बॉस).
भारताचे पातधोरण कोण ठरविते? पातधोरण निश्चिती समिती
फेब्रुवारी 2017 मधील पतधोरण आधाव्यात महागाई दराचे लक्ष्य किती ठेवण्यात आले होते? 4 ते 5%
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? नसीम झैदी
पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील सुजलाम केमिकल्स कंपनीवर मुंबई पोलीसाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 24 मे 2017 रोजी छापा टाकला. या कंपनीत कोणत्या अमली पदार्थाची निर्मिती केली जात होती? मेफेड्रोन (एमडी)
प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने किती वर्षापेक्षा जास्त काळ वापरत असलेले कोळशावर आधारित विद्युत निर्मिती संच बंद करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे? 25 वर्षे
भारतीय संविधांनाला देशाचा धर्म असे कोणी संबोधले आहे? नरेंद्र मोदी
राष्ट्रचिंतन हे पुस्तक कोणाचे आहे? दिन दयाळ उपाध्याय
रॉजर मुर यांनी किती चित्रपटांमध्ये जेम्स बॉन्डची भूमिका केली आहे? सात
रॉजर मुर व्यतिरिक्त जेम्स बॉन्डची भूमिका करणारे कोण? शॉन कॉनरी, पिअर्स ब्रॉस्नन आणि डॅनीयल क्रेग
12 मे 2017 रोजी पंजाबच्या मुख्यमंत्री पदी कोणाची नेमणूक झाली? कॅप्टन अमरिंदर सिंग
यंदाचा सिडने शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? मानवी हक्कासाठी संघर्ष करणार्या ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या चळवळीला
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी नऊ महिन्यांच्या अल्प कारकिर्दीनंतर 24 मे 2017 रोजी राजीनामा दिला. ते नेपाळचे कितवे पंतप्रधान होते? 39 वे
नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 24 मे 2017 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विदेशी गुंतवणूकी संबंधित कोणते मंडळ बरखास्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे? एफआयपीबी
राष्ट्रीय जलमार्ग विकासाकरीता किती रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय 24 मे 2017 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला? 2000 कोटी
आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मुडीजने चीनच्या पतमानांकनात कपातीचा निर्णय 24 मे 2017 रोजी घेतला आहे. मुडीज ने चीनचे पतमानांकन कमी करून ‘एए 3’ वरुन किती केले आहे? ए1
भारताच्या कोणत्या खेळाडूने 2017 वर्षासाठीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपट्टूचा सीएट क्रिकेट मांनाकान पुरस्कार पटकावला आहे? ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन
सचिनच्या आयुष्यावरील जीवनपट ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ 26 मे 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचे दिग्दर्शक कोण आहेत? जेम्स इर्सस्कीन
मन की बात या कार्यक्रमाला कधी पासून सुरुवात झाली? 2 ऑक्टोबर 2014
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अवघड प्रश्नांसाठी अतिरिक्त गुण देण्याचे धोरण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) रद्द केल्यानंतर कोणत्या उच्च न्यायालयाने स्थगिती दिली? दिल्ली उच्च न्यायालय
पाचव्या राज्यस्तरीय एकदिवसीय अहिराणी साहित्य संमेलमनचे उद्घाटन पुण्यामध्ये विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. या संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? वि. दा. पिंगळे
अहिराणी ही मराठीची बोलीभाषा महाराष्ट्रात प्रामुख्याने कोठे बोलली जाते?
भारतात कोणत्या महिन्यांदरम्यान मान्सूनचा पाऊस पडतो?
एकूण पावसाचा अंदाज व्यक्त करताना भारतीय हवामान खाते कोणती संकल्पना वापरते?
सरकारने 1960 च्या प्रीवेंशन ऑफ कृएलटी टु अॅनिमल्स या कायद्यात सुधारणा केली असून कोणत्या प्राण्यांच्या खाटीकखाण्यास खरेदी विक्रीला बंदी घातली आहे? गाई, म्हैस, वासरू, रेडकू आणि उंट
अव्वल मानांकीत स्टान वॉवरिंकाने जिनेव्हा टेनिस स्पर्धेचे जेतेपद राखताना कोणावर विजय मिळविला आहे? जर्मनीच्या मिशच्या झाव्हरेव्ह
भारताच्या सी. ए. भवानीदेवीने आईसलंड येथे सुरू असलेल्या टूर्नोई सॅटलाइट तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सॅब्रे प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भवानी ही कितवी भारतीय महिला खेळाडू आहे? पहिली
कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेचे जेतेपदक अॅलाव्हेस क्लबला हरवून कोणी पटकावले आहे? बार्शिलोना फुटबॉल क्लब
फडणवीस सरकारचा प्रस्तावित महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धि महामार्ग किती जिल्ह्यांतून जाणार आहे? दहा
मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात नुकतेच निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे नाव काय? मोरा
राज्यातील पोलिस दल अधिक सक्षम करण्यासाठी व तपास प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी पोलिस दलात श्वान पथके निर्माण करण्याचा निर्णय राज्याच्या गृह खात्याने घेतला आहे. या ताफ्यामध्ये कोणत्या जातीचे श्वान दाखल होणार आहेत? जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर, बेल्जियन मेलेन्वा
प्रसूती राजेचा कालावधी 12 आठवड्यांवरून किती आठवडे केला गेला आहे? 26 आठवडे
मुद्रा योजनेद्वारे दिल्या गेलेल्या 7.5 कोटी कर्जामध्ये किती टक्के कर्जे महिलांना दिली गेली? 70%
राज्याच्या 2016-17 च्या आर्थिक पाहणीनुसार राज्यात 487 आयटी पार्कना परवानगी दिली गेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक संख्या कोणत्या शहराची आहे? पुणे (172)
‘ऑलमन ब्रदर्स बॅंड’ या संगीत समूहाचे प्रणेते ग्रेग ऑलमन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? माय क्रॉस टु बेअर (2012)
लेफ्टनंट जनरल विश्वंबर सिंह यांची नुकतीच महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्याच्या जनरल ऑफिसर कमांडिंग पदासाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी कोणाकडून पदभार स्वीकारला? एनिज मथुर
2017-18 या चालू वित्तीय वर्षात भारताचा विकास दर 7.2% दराने वाढेल व 2019-20 पर्यन्त ____% दराने वाढेल असे जागतिक बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात व्यक्त केले आहे? 7.7%
एक रुपये चालनाची नवी नोट लवकरच जारी केली जाणार असल्याची घोषणा नुकतीच आरबीआयने केली आहे. एक रूपयाच्या नोटची छपाई कोण करते? वित्त मंत्रालय
जनावरांच्या कत्तलीबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या अध्यादेशला कोणत्या न्यायालयाने चार आठवड्यांची स्थगिती दिली आहे? मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला असून या मंडळाचे अध्यक्ष कोण असणार आहेत? शिक्षण आयुक्त
देशातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? नागपूर
एफटीटीएचचे पूर्ण रूप काय आहे?
जगातील 35 प्रमुख कंटेनर बंदरांपैकी एक असलेले भारतातील अग्रगण्य बंदर कोणते?
उद्योग करणे जगात कोठे सोपे आहे याविषयी जागतिक बँकेने तयार केलेल्या अहवालात भारताचा 2017 मध्ये कितवा क्रमांक आहे? 26 वा
1988 साली कोणाच्या नेतृत्वाखाली विकसित केलेली ‘पॉवर रिग्रेशन’ आधारित गणिती प्रतिकृती भारतीय हवामान खात्याने वापरण्यास सुरुवात केली?
एकूण मान्सून मधील एक तृतीयांश (33%) पाऊस कोणत्या महिन्यात पडतो?
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ट्रोपिकल मिटीअरॉलॉजी कोणत्या शहरात आहे?
कृषी विज्ञान केंद्रांना बळकटी देण्यासाठी, त्यांत शास्त्रज्ञ-शेतकर्यांची भारती वाढविण्यासाठी ‘आर्य’ ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे विस्तारीत नाव काय आहे? अट्रॅक्टिंग अँड रिटेनिंग युथ इन अॅग्रिकल्चर
यंदाच्या कान महोत्सवात सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून कोणाचा गौरव झाला? महम्मद रसूलोफ (मॅन ऑफ इंटिग्रीटी या चित्रपटासाठी)
शेतकर्यांना माफक दरात वीज पुरविण्यासाठी ‘सौर कृषी योजना’ प्रयोगिक तत्वावर कोठे राबविण्यात येणार आहे? राळेगन सिद्धि (अहमदनगर) आणि कोळंबी (यवतमाळ)
भारत-जर्मनी यांच्यात विविध क्षेत्रातील सहकार्यासाठी आठ करारांवर स्वाक्षर्या जर्मनीच्या चान्सलर आणि नरेंद्र मोदी यांनी केल्या. जर्मनीच्या चान्सलर कोण आहेत? अंजेला मर्केल
युरोपिय समुदायात भारताचा सर्वांत मोठा व्यापार भागीदार असलेला देश कोणता?
आयसीसीने नॉक आऊट स्पर्धेचे आयोजन 1998 साली केले त्यावेळी दर दोन वर्षानी होणारी ही स्पर्धा आता दर चार वर्षानी होते. कोणत्या वर्षी नॉक आऊट स्पर्धेचे नाव बदलून आयसीसी चॅम्पियन्स करंडक असे ठेवण्यात आले? 2002
आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत जास्तीत जास्त किती संघांचा सहभाग असतो? आठ
आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा भारताने किती वेळा जिंकली? 2 वेळा
आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे 2021 सालचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? भारत
रेहकुरी काळवीट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
संपूर्ण भारतात सहा प्रकारचे कुरंगवर्गीय (अंटीलोप) प्राणी आढळतात. त्यापैकि महाराष्ट्रात चार प्रजातींचा वावर आहे त्या प्रजाती कोणत्या?
नुकतेच बंगालच्या उपसागरात उत्पन्न झालेल्या मोरा या चक्रीवादळाला मोरा हे नाव थायलंडने दिले आहे. त्याचा अर्थ काय आहे? समुद्राचा तारा
सुप्त एचआयव्ही विषणूचा शोध घेण्याइतकी संवेदनशील चाचणी वैज्ञानिकांनी विकसित केली असून एचआयव्ही विषाणूची पुनरावृत्ती होण्याची शक्यता या चाचणीत समजते. या प्रक्रियेला काय म्हणतात? क्वॉंटिटेटिव व्हायरल आऊटग्रोथ अॅसे
केवळ हवामानाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र उपग्रह सोडण्याच्या मालिकेची सुरुवात भारताने ‘मेटसॅट’ हा उपग्रह 12 सप्टेंबर 2002 रोजी अवकाशात सोडून केली. नंतर या उपग्रहाचे नामकरण काय करण्यात आले? कल्पना-1
हवामानासंबंधित इन्सॅट-3डीआर हा उपग्रह कधी रोजी अवकाशात सोडण्यात आला? 9 सप्टेंबर 2016
भारत-चीन मधील 1962 च्या युद्धानंतर लष्कराने कोणत्या राज्यातील संपादित केलेल्या हजारो एकर जमिनीची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेताला आहे. ? अरुणाचल प्रदेश
2011-12 हे वर्ष प्रमाण मानून तयार करण्यात आलेल्या नव्या पद्धतीनुसार 2015-16 या आर्थिक वर्षात जीडीपी 8 टक्के होता. जुन्या पद्धतीनुसार मोजल्यास तो किती टक्के इतका होता? 7.9%
दूरदर्शनच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली ‘बालचित्रवाणी’ ही संस्था आर्थिक हलाखीमुळे बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बालचित्रवाणीची स्थापना केंव्हा झाली? 27 जानेवारी 1984
कोणत्या जिल्ह्यात यूनिसेफच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापनाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे? उस्मानाबाद
आपत्ती धोके कमी करण्याच्या कार्यक्रमांतर्गत दोन कोटी रुपये खर्चून कोणत्या संस्थेमार्फत राज्यातील सुमारे सहा हजार अधिकार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्याबाबतच्या करारास मान्यता देण्यात आली? टाटा सामाजिक विज्ञान संस्थान
कोणत्या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणसाठी स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करण्यात येणार आहे? गुजरात
गाईला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा द्या अशी शिफारस कोणत्या उच्च न्यायालयाने केली आहे? राजस्थान उच्च न्यायालय
कोणत्या देशाच्या नव्या घटनेमध्ये गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आला आहे? नेपाळ
कोणत्या यजनेंतर्गत राज्यात महिला बचत गटांद्वारे सॅनेटरी नॅपकिन सवलतीच्या दरात देण्यात येणार आहे? अस्मिता योजना
ग्रामीण घरकुल योजनेतील पत्र परंतु घरकुल बांधकामासाठी स्वतःची जागा नसल्यामुळे घरकुलच्या लाभापासून वाचीत असलेल्या कुटुंबांना 500 चौ. फुट जागा खरेदीसाठी 50 हजारांपर्यंत अर्थसाहाय्य देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? पंडित दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजना
ईशान्येमध्ये उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? ईशान उदय योजना
2020 मध्ये होणार्या ऑलिंपिक खेळांसाठी युवक-युवतींना प्रोत्साहन आणि मदत देणारी योजना कोणती? टॉप (TOP) योजना
2017-18 करिता रिझर्व्ह बँकेने किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित महागाई दराचे लक्ष्य किती ठेवले आहे? 4%
2017-18 करिता रिझर्व्ह बँकेने किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित महागाई दराचे लक्ष्य 4% ठेवले आहे. चालू वित्त वर्षासाठी महागाईचा दर 4.2% तर 2018-19 या वर्षासाठी महागाईचा दर 4.5% असेल असे यूबीएस या आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरच्या गिफ्ट सिटीतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय एक्सचेंज ‘India INX’ चे उद्घाटन केले आहे. ‘India INX’ ही मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
विमान प्रवासी कंपनी स्पईसजेटने बोइंग कंपांनीकडून 205 विमाने खरेदी करणार असून, दीड लाख कोटी रुपयाचा हा व्यवहार भारतातील हवाई क्षेत्रातील आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा व्यवहार ठरला आहे. नवीन विमाने 20% इंधन बचत करणारी. ‘बी 737’ ही विमाने खरेदी करणार
गांधीनगर (गुजरात) येथे ‘स्वच्छ शक्ती – 2017’ हा महिला सरपंचाची परिषद पार पडली. स्वच्छ भारत चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सरपंचांचा सन्मान करण्यासाठीचा हा कार्यक्रम होता.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या तुलनेत एप्रिल ते जून या तिमाहीतील सर्व नऊ लहान बचत योजनांवर 0.1 टक्क्यांची व्याजदर कपात केली आहे. या योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी खाते, वरिष्ठ नागरिक बचत योजना यांचा समावेश आहे. यात पोस्ट ऑफिस बचत खाते समाविष्ट नाही.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) 2 लाख रुपयापेक्षा जास्त रोख व्यवहारवरील बंदी ही बँक किंवा पोस्ट बचत खात्यांसाठी लागू नाही असे स्पष्ट केले आहे. वित्तीय कायदा 2017 नुसार केंद्र सरकारने 2 लाख रुपयापेक्षा जास्त किंमतीचे व्यवहार रोखीने करण्यास बंदी घातली आहे.
जगप्रसिद्ध ई-टेलर कंपनी ‘अमेझॉन’ने आपल्या कॅनडातील वेबसाइटवर भारताच्या राष्ट्रध्वजाशी साधर्म्य असलेल्या पायपुसण्याच्या (डोअरमॅट) विक्रीची जाहिरात केली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेझॉनने अशा उत्पादनाची विक्री तातडीने थांबवावी; अन्यथा त्यांच्या अधिकाऱ्यांना व्हिसा देणार नाही, तसेच ज्या अधिकाऱ्यांना व्हिसा दिला असेल तो मागे घेऊ, असा दम दिल्याने अमेझॉनने पायपुसण्यांची विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला.
लंडनच्या नव्या मेट्रोपोलिटिन कमिशनर म्हणून क्रेडिसा डिक यांची नियुक्ती केली गेली असून लंडन पेालिसांचे नेतृत्त्व करणारी त्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी ठरल्या आहेत. सर बनॉर्ड होगन यांच्या जागेवर आता डिक काम करणार आहेत.
बांगलादेशमधील सिलहेट (Sylhet) या मेट्रो शहारच्या शाश्वत विकाससाठी भारत आणि बांगलादेशने वित्तीय मदत पुरविण्यासंबंधी सामंजस्य करार केला आहे. सिलहेट हे एक प्राचीन आणि ऐतिहासिक शहर असून स्वातंत्र्यापूर्वी आसाम प्रांताचा भाग होते.
कझाकस्तानने चेन्नई मध्ये आपल्या मानद दूतावासाची स्थापना केली आहे. या दूतावासात तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ राज्यांचा समावेश असेल. सुरज शांतकुमार यांच्या नेतृत्वाखालील हे दूतावास कार्यरत असेल. भारत आणि कझाकिस्तानमधील राजकिय संबंधाच्या स्थापनेच्या 25 व्या वर्धापनाचे हे वर्ष आहे.
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र प्रति-दहशतवाद केंद्राच्या (UNCCT) प्रमुखपदी रशियन राजनैतिक अधिकारी व्लादिमिर वोरोनकोव्ह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तुर्की राष्ट्रपती रिसेप तय्यीप एर्दोगन यांचा जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी देऊन गौरव केला आहे.
तुर्की राष्ट्रपतीने भारताच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वाला आपला पाठिंबा असल्याची घोषणा केली.
नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश सुशीला कार्की याच्यावर संसदेत महाभियोग ठराव मांडण्यात आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
उत्तर कोरियाने नुकतेच हॉसॉन्ग 12 या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला 4500 किमी असून ते उत्तर कोरियचे सर्वांत दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र असल्याचे बोलले जात आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या बाबतच्या खटल्यात पाकिस्तानने बाजू मांडण्यासाठी महाधीवक्ता अशतर औसाफ यांची नेमणूक केली आहे. आधीच्या सुनावणीत पाकिस्तानची बाजू ब्रिटन येथील वकील खावर कुरेशी यांनी मंडळी होती.
रशियाने ‘Aviation Thermobaric Bomb of Increased Power’ ज्याचे टोपण नाव ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ असे होते त्याची 2007 मध्ये चाचणी घेतली. तो एमओएबीपेक्षा 4 पट शक्तीशाली होता.
संयुक्त राष्ट्र आम सभेने 2017 हे वर्ष अंतरराष्ट्रीय विकाससाठी शाश्वत पर्यटन वर्ष घोषित केले आहे.
हंबंटोटा बंदर: श्रीलंकेतील बंदर. श्रीलंका-चीनमध्ये १.१ दशलक्ष अमेरिकन डोललेर्सचा हंबंटोटा बंदर करार. या करारानुसार चीनला या बंदराची ७०% भागविक्री करण्यात आली
ख्रिस्तोफर वे: अमेरिकेतील फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (एफबीआय) या गुप्तचर संस्थेच्या संचालकपदी निवड . आधीचे संचालक जेम्स कोमी यांना ट्रंप यांनी पदावरून दूर केले होते.
स्टेट बँक ऑफ इंडियाने नेपाळमध्ये ‘डिजिटल व्हीलेज’ उपक्रमांतर्गत जारीसिंगपौवा या गावचा कायापालट केला असून गावातील सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यास सुरुवात झाली आहे. काठमांडूपासून पूर्वेला २५ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांनी २ ऑगस्ट २०१७ रोजी रशियावर निर्बंध लादणार्या विध्येयकावर स्वाक्षरी केली आहे.
इस्राइलने पर्यावरण संशोधन उपग्रह व्हीनस नुकताच अवकाशात सोडला.
काही प्रमाणात गैर-नागरिकांना स्थायी निवास उपलब्ध करून देण्याच्या कायदा मसुदयाला कतार कॅबिनेटने मंजूरी दिली असून यासह गैर-नागरिकांना स्थायी निवास उपलब्ध करून देणारा कतार पहिला अरब देश ठरला आहे.
हार्वे या चक्रीवादळाने अमेरिकेच्या टेक्सस प्रांतात नुकतेच थैमान घातले आहे.
जर्मनीत देशातील समलिंगी जोडप्यांच्या विवाह करण्याच्या हक्काला घटनात्मक मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे जर्मनीच्या चान्सेलर अँजला मॉर्केल यांनी या सुधारणेच्या विरोधात मत दिले होते.
मुंबईवरील हल्याचा सुत्रधार दहशतवादी हफिज सईद याच्या तेहरीक-ए-आझादी-जम्मू काश्मीर या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानने अखेर बंदी घातली आहे.
बोलीवियाचे अध्यक्ष इवा मोरेलेस यांनी आपला देश आयएमएफ आणि जागतिक बँकेपसून संपूर्णतः स्वतंत्र असल्याची घोषणा केली आहे.
व्हांगन्यू नदी हिला मानवास जे कायदेशीर अधिकार असतात ते मिळाले असून जगातील ती पहिली नदी ठरली आहे.
राज्यातील औद्योगीक आस्थापणांसाठी हवेच्या गुणवत्तेच्या आधारे ‘स्टार रेटिंग’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून भारतात पहिल्यांदाच ही प्रणाली कार्यान्वयित करण्यात आली आहे.
बस थांब्यावर कोणती बस केंव्हा येणार, महिला प्रवाशांसाठी सुरक्षेसाठी सतर्क सुविधा, बस सेवेतील त्रुटिबाबत छायाचित्रे, व्हिडिओच्या माध्यमातून तक्रार करण्याची सोय आणि प्रवासीकेंद्रित पर्यायांचा समावेश असणारे अॅप पुणे महानगर पालिकेने विकसित केले आहे. त्या अॅपचे नाव ‘पीएमपी-ई-कनेक्ट’ असे आहे.
राज्यातील सर्व पोलिसांनी आठवड्यातून एकदा तरी खाडीचा गणवेश परिधान करावा असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य पोलिस दलाने जारी केले आहे.
महाराष्ट्रात कृषी विभागाच्या मदतीने 2065 ठिकाणी स्वयंचलित वेधशाळा स्थापन करण्यात येणार आहेत.
दहशतवाद्यांकडून भारतीय हद्दीत होणार्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पाकिस्तान आणि बांग्लादेश या 647 की.मी. च्या सीमेवर प्रखर प्रकाशझोत टाकणारे दिवे बसविले आहेत.
रुग्णवाहिकेमध्ये दाखल केलेल्या रुग्णांच्या स्थितीची दूरस्थ देखरेख (रिमोट मॉनिटरिंग) ठेवण्यासाठी आयआयटी खरगपुरने ‘AmbuSense’ हे वायरलेस तंत्रज्ञान विकसित केले आहे.
भारतातील तिसर्या क्रमांकाची सर्वांत मोठी खासगी बँक असलेल्या अॅक्सीस बँकेने जैव विघटन होणारे (बायो-डिग्रडेबल) कार्ड जारी केले आहे.
मनरेगा राष्ट्रीय पुरस्कार 2015-16 आंध्र प्रदेशमधील जिल्हा विजियानगरमला मिळाला आहे.
यूनिसेफच्या ‘सुपर डॅड’ अभियानात नुकताच सचिन तेंडुलकर सहभागी झाला आहे. सुपर डॅड हे अभियान वडिलांचे आपल्या पाल्याच्या जीवनातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी आहे.
पुणे व रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणार्या खंडाळ्यातील ऐतिहासिक अमृतांजन पूलामुळे या भागात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा वेग मांदावून कोंडी निर्माण होत असल्याने एक उपाय म्हणून हा पूल पडण्याचा महाराष्ट्र राज्य रास्ते विकास महामंडळाने निर्णय घेतला आहे. इंग्रजांच्या काळात 1830 मध्ये हा पूल उभारण्यात आला होता. या पुलावर अमृतांजन बामची जाहिरात झाल्याने त्याला अमृतांजन हे नाव पडले.
बिहाराने नालंदा जिल्ह्यात राबवलेल्या ‘प्रोजेक्ट जल संचय’ या जल संवर्धन मोडेलला ग्रामीण विकास मंत्रालयाचा राष्ट्रीय मनरेगा उत्कृष्टता पुरस्कार जाहीर झाला आहे.
वस्त्रोद्योग मंत्रालय 1 ते 15 मे 2017 दरम्यान स्वच्छता पंधरवडा पाळत आहे. स्वच्छतेला आपल्या जीवनाचा भाग बनवण्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा स्वच्छता पंधरवडा पाळण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये खास गायींसाठी रूग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. ‘गोवंश चिकित्सा मोबाइल व्हॅन’ नावाच्या या सेवेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी 1 मे 2017 रोजी केले. आजारी, जखमी असलेल्या गायींना या रूग्णवाहिकेतून गोशाळा किंवा पशु चिकित्सालयात नेण्यात येईल
भारतामध्ये 2030 पर्यंत सर्व इलेक्ट्रिक वाहनेच रस्त्यांवर उतरतील, असे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. इंधन आयातीमध्ये होणारा खर्च वाचविण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवासाचाही खर्च वाचविण्यासाठी हा प्रयत्न आहे.
अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने पाठविलेल्या कॅसिनी या अंतराळयानाने शनी ग्रहाच्या पहिल्या विवरात यशस्वीपणे प्रवेश केला असून, 27 एप्रिल रोजी तेथून शनीची सर्वांत जवळून टिपलेली छायाचित्रे पाठविण्यात आली आहेत.
रविंद्रनाथ टागोर यांच्या 156 व्या जयंती निमित्त भारत इजिप्तमध्ये संस्कृतिक महोत्सव 8 ते 12 मे 2017 दरम्यान साजरा करणार आहे. या महोत्सवाचे आयोजन मौलाना आझाद सेंटर फॉर इंडियन कल्चर मार्फत केले जाणार आहे.
कोची मेट्रो प्रकल्पाने 23 कामगार ट्रान्सजेंडर समुदायातील ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी पहिले भारत सरकारच्या मालकीचे प्राधिकरण ठरले आहे.
देशी बनावटीच्या हलक्या वजनाचे लढाऊ विमान तेजसद्वारे हवेतून हवेत मारा करणार्या व दृष्टीक्षेपापलीकडील लक्ष्य भेडणार्या डर्बी क्षेपणास्त्राची ओडिशात चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे. डर्बी (अल्टो) क्षेपणास्त्र हे दृष्टीक्षेपापलीकडील लक्ष्य भेदणणारे, मध्यम पल्ल्याचे (कमाल 50 कि.मी.) अॅक्टिव रडार होमिंग क्षेपणास्त्र आहे.
आंध्र प्रदेश पुनर्गठन कायदा 2014 अंतर्गत, विजयवाडा विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
तामिळनाडूतील व्ही.ओ. चिदंबरनार बंदरातील दोन कोळसा जेट्टींची क्षमता चौपट वाढविण्यात येणार आहे. यासंबंधी तामिळनाडू जनरेशन ॲण्ड डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि बंदर प्राधिकरण यांच्यामध्ये 15 मे 2017 रोजी नवी दिल्ली येथे सामंजस्य करार करण्यात आला.
तामिळनाडूमध्ये कामराजार बंदरानजीकच्या पोन्नेरी औद्योगिक वसाहतीमध्ये ‘मल्टिमॉडल लॉजिस्टिक पार्क’ विकसित करण्यासंबंधी 15 मे 2017 रोजी करार करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळ यांच्या दरम्यान हा सामंजस्य करार झाला.
सातवीच्या नवीन पुस्तकामध्ये ‘अहिराणी’ आणि ‘कुपारी बोली’(कोकणी) या बोली भाषांची ओळख करून देण्यात आली आहे.
तब्बल 73 स्थांनानी पुढे येत भारताने जागतिक बँकेच्या विद्युत सुलभता यादीत 26 वे स्थान पटकाविले आहे. 2014 मध्ये भारत याच यादीमध्ये 99 व्या स्थानी होता.
पुण्यामध्ये पीक वान संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण मध्यवर्ती शाखेचे केंद्रीय कृषी, सहकार व शेतकरी कल्याण मंत्रालयचे सचिव डॉ. एस. के. पटनायक यांनी उद्घाटन केले आहे.
2001 साली शेतकरी हक्क कायदा तयार करण्यात आला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी पीक संरक्षण व शेतकरी प्राधिकरणाची निर्मिती झाली आहे.
तोंडी तलाक प्रथेचा अवलंब करणार्यांवर सामाजिक बहिष्कार टाकला जाईल असे अखिल भारतीय मुस्लिम वयक्तिक कायदा मंडळाने (एआयएमपीएलबी) 22 मे 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयात घोषित केले. पाकिस्तान, श्रीलंका, इजिप्त, बांग्लादेश, तुर्की, ट्यूशीनीया या देशांत तिहेरी तलाकला बंदी आहे.
आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत कृष्णजी केशव दामले यांच्या स्मरणार्थ त्यांच्या तुतारी या कवितेवरून कोकणात धावणार्या दादर-सावंतवाडी एक्सप्रेसचे नाव बदलून ‘तुतारी एक्स्प्रेस’ असे करण्यात आले आहे.
वाहतूक नियमांचा भंग करणार्या वाहनचालकांकडून दंड वसुलीसाठी सध्या मुंबई आणि पुण्यात ‘एम-पॉज’ ही यंत्रणा प्रयोगिक तत्त्वार वापरली जाते.
देशातील दत्तक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार्या कारा (CARA) या प्राधिकरणाने दत्तक शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव अर्थखात्याकडे मांडला आहे. सध्याचे 40 हजार रुपयांचे दत्तक शुल्क 55 हजार रुपये नेण्यात यावे असा हा प्रस्ताव आहे.
रेमंड या भारतातील अग्रेसर नाममुद्रेने प्रथमच खादी वस्त्रोद्योग प्रवेश करत असल्याचे जाहीर केले असून त्यांनी ‘खादी बाय रेमंड’ या नावाने उत्पादन सादर केले आहे.
फिक्स्ड लाइन ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवा पुरविणार्या देशातील आघाडीच्या हॅथवे ब्रॉडबॅंडने राष्ट्रीय सदिच्छा दूत म्हणून आर माधवणची नेमणूक केली आहे.
तंत्रज्ञान आधारित शासन आणि प्रशासनाची सुरुवात करणार्या एनएसडीएल ई-गव्हर्नन्सने विद्यासारथी उपक्रम टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सहकार्याने आणखी प्रबळ बनविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यासारथी उपक्रमाला सेंटर फॉर डिजिटल फायनान्सेसचेही सहकार्य आहे.
पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील सुजलाम केमिकल्स कंपनीवर मुंबई पोलीसाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 24 मे 2017 रोजी छापा टाकला. या कंपनीत मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची निर्मिती केली जात होती. मेफेड्रोन या अमली पदार्थाला ‘म्यावम्याव’ असे तस्करांकडून सांकेतिक नाव देण्यात आले होते. सुजलाम केमिकल्स या कंपनीचे मालक : हरिश्चंद्र दोरगे
सचिनच्या आयुष्यावरील जीवनपट ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ 26 मे 2017 रोजी प्रदर्शित झाला. लेखन-दिग्दर्शन : जेम्स इर्सस्कीन. निर्मिती : रवी भागचंदका . 2014 मध्ये सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र ‘सचिन तेंडुलकर : प्लेईंग इट माय वे’ प्रकाशित झाले.
भारत-चीन मधील 1962 च्या युद्धानंतर लष्कराने अरुणाचल प्रदेशमधील संपादित केलेल्या हजारो एकर जमिनीची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेताला आहे. तब्बल तीन हजार कोटी रुपयांची जमीन मालकांना दिली जाणार आहे.
प्रथमच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने राज्यातील अंध विद्यार्थ्यांकरिता जंगल ट्रेनिंग कॅम्प यांच्या सहकार्याने ब्रेल लिपीमध्ये पर्यावरनविषयक माहिती देणार्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अधिवेशन शिरूर येथे 20 आणि 21 मे रोजी आयोजित करण्यात आले होते.
मूळचे भारतीय पण लंडन मध्ये राहणारे ओवैसी सरमद यांची नेमणूक यूनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कनव्हेनशन ऑफ क्लायमेट चेंज (यूएनएफसीसीसी) च्या उपकार्यकारी सचिव पदावर झाली. 1960 मध्ये जन्म. मूळचे हैदराबादचे. 1990 मध्ये आयएमओमध्ये रुजू.
केपीएस गिल यांचे निधन : पंजाबचे माजी पोलिस महासंचालक, सुपर कॉप म्हणून प्रसिद्ध, आसाम-मेघालय केडरचे अधिकारी. आसामचेही पोलिस महासंचालक. पंजाबमधील खलीस्तानी चळवळ आणि दहशतवाद त्यांनी नियंत्रित केला.
कृषी-सागरी प्रक्रिया आणि कृषी प्रक्रिया उद्योग विकास (संपदा) – शेतमालाला अधिक उठाव मिळवा तसेच कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
कॅग रीपोर्ट ऑफ इंडिया 2016-17 मध्ये देशातील महसूल वृद्धी दराच्या अव्वल स्थानी तेलंगणा राज्य आहे.
‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ सोसायटिज ऑफ अॅनास्थॉलॉजिस्ट’ या संघटनेनी नुकताच जगभरातील भूलतज्ज्ञांच्या आकडेवारीचा अभ्यास केला. त्यामध्ये एक लाख जणांमागे भारतात 2 हून कमी भूलतज्ज्ञ उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. तर जगभरात हे प्रमाण एक लाखामागे 5 इतके असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर लोकांना त्या मार्गावर धावणार्या रेलची स्थिती तपासून चेतावणी देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने उपग्रहावर आधारित चिप प्रणाली विकसित केली आहे. प्रायोगिक तत्वावर मुंबई आणि गुवाहाटी राजधानी ट्रेनमध्ये ही प्रणाली बसविण्यात आली आहे. सध्या चेतावणी देण्यासाठी चीप बसविलेल्या रेलच्या मार्गांवर 20 मानव रहित रेल्वे फाटकांवर हुटर लावण्यात येईल.
54 व्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2017 चा खिताब हरियाणाच्या मनुषी छिल्लर हिने जिंकला आहे. जम्मू-कश्मीरची सना दुआ हिने स्पर्धेचे फर्स्ट रनर-अप आणि बिहारची प्रियंका कुमारी हिने सेकंड रनर-अप खिताब जिंकला.
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीला बर्डफ्ल्यू (एच 5 एन 8 एव्हीयन इन्फ्लूएन्झा) मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे.
विदर्भ मिरर : श्रीहरी आणे यांनी विदर्भ मिरर हे साप्ताहिक सुरू केले आहे.
माजी क्रिकेटपट्टू व माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सिद्धू हे राज्यसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन भाजपामधून बाहेर पडले होते. सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनीही 20 नोव्हेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीय चित्रपट श्रुष्टीतील भरीव योगदानाबद्दल जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना 16 जानेवारी 2017 रोजी यूएसके फौंडेशनने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला आहे.
मुद्रित माध्यमांमध्ये (वृत्तपत्रे व नियतकालिके) सध्या असलेली 26% थेट परकीय गुंतवणूक मर्यादा वाढवून ती 49% करण्याचा विचार सरकार करत आहे.
आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये एफडीआय मध्ये 29% झाली असून ती 40 अब्ज अमेरिकन डॉलर्स वर पोहोचली आहे. मागील वर्षाच्या आर्थिक वर्षात ही गुंतवणूक 30.93 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.
‘1283’ हे फुटबॉलपट्टू पेले यांचे चरित्र आहे.
यूनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे आहे.
1995 या वर्षी मद्रासचे नाव अधिकृतरित्या चेन्नई असे करण्यात आले आहे.
अल्पभूधारक शेतकरी म्हणजे ज्यांच्या शेताचे आकारमान दोन हेक्टर पेक्षा कमी आहे असा शेतकरी. सुमारे 14 कोटी शेतकर्यांच्या कुटुंबातील सीमान्त व अल्पभूधारक शेतकर्यांचे प्रमाण 85% आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील पाच वर्षांत आशियातील ई-वेस्टचे प्रमाण 65% ने वाढल्याचे यूनायटेड नेशन युनिव्हार्सिटीने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
गर्भातील बाळांत व्यंग असेल तर गर्भपात करता येऊ शकतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी, १९७१ च्या कायद्यानुसार २० आठवडय़ानंतर गर्भपात करता येत नाही.
सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात भारत जागतिक पातळीवर ४ थ्या स्थानावर आहे.
दरडोई उत्पन्नाच्या संदर्भात भारत जागतिक पातळीवरील १८३ देशांत १३९ व्या स्थानावर आहे.अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि भारत या देशांतील लोकांचे दरडोई सरासरी राष्ट्रीय उत्पन्न अनुक्रमे ५५,८०५, ४३,७७१, ४०,९९७, ३७,६७५ आणि १,६१७ डॉलर्स एवढे आहे. परचेसिंग पॉवर पॅरिटी लक्षात घेता ते अनुक्रमे ५५,८०५, ४१,१५९, ४६,८९३, ४१,१८१ आणि ६,१६२ एवढे ठरते.
देशातील १४ कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी ८५ टक्के कुटुंबे ही सीमांत व अल्पभूधारक शेतकऱ्यांची आहेत.
माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांच्या सन्मानार्थ ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानातील एका स्टँडला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या जागतिक आर्थिक स्थिती 2017 अहवालामध्ये भारताचा वृद्धीदर 2017 मध्ये 7.7% तर 2018 मध्ये 7.6% असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या (सीआयए) संचालकपदाची शपथ माईक पॉंपेओ यांनी घेतली. पॉंपेओ हे "कॉंग्रेस'चे माजी सदस्य आहेत.
केंद्रीय ऊर्जा क्षेत्रातील सार्वजनिक कंपनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (पॉवरग्रिड) ने 25 जानेवारी 2017 रोजी अबुधाभी वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी सोबत सामंजस्य करार केला आहे.
मेघालय राज्यातील राज भवनमधील कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे अडचणीत आलेले राज्यपाल व्ही शण्मुगनाथन यांनी 26 जानेवारी 2017 रोजी पदाचा राजीनामा दिला आहे.
रशियाचे भारतामधील राजदूत ऍलेक्झांडर कदाकिन यांचे 26 जानेवारी 2017 रोजी वयाच्या 68 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कदाकिन हे 2009 पासून रशियाचे भारतामधील राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने ओळखलेल्या गैर सहकारी देश व प्रांतात स्थित एकाकांमध्ये थेट परकीय गुंतवणूक करण्यास आरबीआयने भारतीय संस्थांना बंदी घातली आहे.
जपानने यशस्वीरीत्या पहिल्या लष्करी संदेशवन उपग्रह Kirameki-2 (kee-RAH-meh-kee 2) चे प्रक्षेपण केले आहे.
तब्बल 130 वेळा विवाह केलेल्या आणि 203 अपत्यांचे पितृत्व असलेले नायजेरियन मुस्लिम धर्मगुरू महंमद बेलो अबुबाकर (वय 93) यांचे नुकतेच अज्ञात आजाराने निधन झाले.
संशोधकांनी प्राचीन ज्ञात मानवी पूर्वज असलेल्या सूक्ष्म समुद्री प्राण्याचा शोध लावला असून त्याला Saccorhytus असे नाव देण्यात एल आहे.
महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमातील आगमनास 2017 मध्ये 100 वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त सरकार विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. महात्मा गांधी यांनी मे 1917 मध्ये पालदी येथील कोचराव आश्रमातून साबरमती आश्रमात आपला मुक्काम हलविला होता.
शिट्टी हे चिन्ह मिळावे यासाठी इरोम शर्मिला यांच्या पीपल्स रिसर्जन्स अँड जस्टीस अलायन्स (प्रजा) या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.
देशातील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र म्हैसूर येथे सुरू झाले आहे.
देशातील सर्वाधिक सागरी किनारा लाभलेले राज्य : गुजरात
जागतिक कॅन्सर दिन : 4 फेब्रुवारी
खादी ग्रामोद्योग आयोगाचे नवीन सीईओ : अंशू शिन्हा
राजकीय पक्षांना दरवर्षी डिसेंबर अखेरपर्यन्त प्राप्तीकर विवरणपत्र (आयटीआर) भरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. अन्यथा संबंधित पक्षाला करसवलत मिळणार नाही. राजकीय पक्षांवर एका व्यक्तीकडून रोखीने जास्तीत जास्त दोन हजार रुपये देणगी स्वीकारण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
ऍडव्हेंचर फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा 'मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार अस्थिरोग तज्ज्ञ व पक्षिरोग तज्ज्ञ डॉ. सत्यशील नाईक याना देण्यात आला आहे. डॉ. नाईक यांनी ११,००० रुपयाची पुरस्काराची रक्कम संस्थेलाच प्रदान केली.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने 23 व्या दीक्षांत सोहळ्याचे औचित्य साधून जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांना डी.लिटने सन्मानित करण्यात आले आहे.
2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार 69% जनता ग्रामीण भागात वास्तव्य करते. महाराष्ट्रात ग्रामीण भागात 55% तर शहरी भागात 45% जनता वास्तव्य करते. दिल्ली, तमिळनाडू, केरळ या राज्यांनंतर महाराष्ट्रात नागरी लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील नागरी भागातील लोकसंख्या वाढीचा दर मात्र 23% होता तर ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढीचा दर 11% होता. राज्यातील 50% पेक्षा अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.
ग्रॉस फिक्स्ड कॅपिटल फॉर्मेशन (GFCF) हे गुंतवणुकीचे मोजमाप असते. जीएफसीएफची वाढ 2014-15 मध्ये 4.9%, 2015-16 मध्ये 3.9%, 2016-17 मध्ये -0.2% होती. एनडीए सरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले असताना 2015-16 या वर्षात रोजगार निर्मिती दीड लाख एवढीच झाली आहे.
अंदमान निकोबारमध्ये 240 किमीचा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग उभारण्यास रेल्वेने मान्यता दिली आहे. या प्रकल्पात दीगलिपुर आणि फोर्टब्लेयर यांना फुलणे जोडले जाणार असून हा द्विपसमूह पहिल्यांदाच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.
सहारा चिटफंड गैरव्यवहाराची सुनावणी करताना लोणावळातिल 39,000 कोटी रूपयांचा अँबी व्हॅली टाऊनशिप प्रकल्प जप्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अँबी व्हॅली हा सहारा समुहाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लोणावळ्यापासून 23 किमी अंतरावर असून 10 हजार 600 एकर क्षेत्र व्यापले आहे. यामध्ये तीन मानव निर्मित तलाव मिळून एक धरणही बांधण्यात आले आहे.
ठेवींच्या पडताळणीची स्पष्टता करून देताना अडीच लाखांपर्यंतच्या ठेवीसाठी प्राप्तीकर विभागाकडून विचारणा केली जाणार नाही असे प्राप्तीकर विभागणे स्पष्ट केले आहे. प्राप्तीकार विभागणे विविध प्रकारची बँक खात्यांचे वर्गीकरण केले आहे. 1 कोटींवर रक्कम असणार्या आणि विवरणपत्र न जुळणार्या खात्यांवर
गुजरात विधानसभेने नुकतेच गुजरात आधार विध्येयक, 2017 पारित केले आहे. केंद्रीय आधार विध्येयकाच्या धर्तीवर हे विध्येयक बनविण्यात आले असून केंद्राच्या विध्येयकानुसार राज्यांना असा कायदा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि सामाजिक न्याय आणि साक्षमीकरण मंत्रालयाने अनुसूचीत जातीच्या कारागिरांच्या आर्थिक विकास आणि कल्याणसाठी सामंजस्य करार केला आहे.
17 मार्च 2017 रोजी दुबई मध्ये बॉलीवुड अभिनेता सोनू सूद याच्या उपस्थितीत क्षमाशीलतेचा संदेश देणार्या होळीच्या संकल्पनेवर "भिगे चुनरिया" उत्सव साजरा केला जाणार आहे. रड फ्लाय इवेंट या कार्यक्रम व्यवस्थापन कंपनीकडून या कार्यक्रमाचे युएई मध्ये आयोजन करण्यात येणार आहे.
चीनने भूमी आणि पाणी या दोन्ही पृष्ठभागावर कार्य करणारे (उभयचर) जगातील सर्वात मोठे विमान तयार केले असून ‘AG600’ असे नाव या विमानाला दिले आहे.
भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) आपल्या ‘sbi.co.in’ या वेबसाइटच्या नावात बदल केला असून ‘bank.sbi’ असे केले आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे ला नॅककडून ‘A+’चा दर्जा मिळाला असून नॅककडून जाहीर करण्यात आलेल्या मानांकांनात सावित्रीबाई फुले विद्यापीठ अव्वल ठरले आहे. विद्यापीठाला 4 पैकी 3.60 गुण मिळाले आहेत.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालनुसार देशातील 94 प्रदूषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील सर्वाधिक 17 शहरांचा समावेश आहे.
तेलंगणा राज्यातील अवघ्या 13 वर्षाच्या पूर्णाने जगातील सर्वोच्च शिखर एवरेस्ट सर केले होते. आता तिच्या जीवनावर राहुल बोस यांनी पूर्णा नावाचा चित्रपट काढला आहे.
जन्मानं ब्राह्मण असलेल्या, मात्र कालांतरानं अनुसूचित जातीतील (एससी) कुटुंबानं दत्तक घेतलेल्या व्यक्तीला आरक्षण मिळण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयानं दिला आहे. अशा व्यक्तीला सरकारी नोकरीतील आरक्षण नाकारता येणार नाही, असं खंडपीठानं स्पष्ट केलं आहे.
केंद्र सरकारच्या उदय म्हणजेच उज्वल डिस्कोम असुरन्स योजनेत सिक्किम नुकतेच सहभागी झाले असून या योजनेत सहभागी होणारे सिक्किम 22 वे राज्य ठरले आहे.
लग्नसोहळ्यातील खर्चाला सरकारी पातळीवर आवर घालणारे काश्मीर हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा व इतर महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी इच्छुक असून पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक प्रत्यक्ष यावी यासाठी राज्य शासन व ऑथॉरिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संयुक्त कार्य समिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आले.
आंदोलने आणि वादांमुळे गेल्या वर्षापासून चर्चेत असलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाला (JNU) सर्वाधिक उत्तम विद्यापीठांच्या विभागात यंदाचा ‘व्हिजिटर्स अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. ६ मार्चला राष्ट्रपती भवनात प्रणव मुखर्जींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
वैज्ञानिकांनी पृथ्वीवरील सर्वात जुन्या जीवाश्मांचा शोध लावला असून कॅनडात शोधलेले सूक्ष्मजीवांचे हे अवशेष ३.८ ते ४.३ अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या अवशेषात सूक्ष्म तंतू आणि ट्यूब्स आहेत. कॅनडातील क्विबेक शहरात एका चमकणाऱ्या दगडात हे अवशेष आढळून आले आहेत. हे सूक्ष्म जीव लोखंडावर राहत होते. असे जीव ३७७० दशलक्ष वर्षांपूर्वी आढळत होते, असे संशोधकांनी सांगितले. समुद्राच्या हायड्रोथर्मल सिस्टीममध्ये हे जीव राहत होते.
राज्यात मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास करण्यासह प्रभावी व्यवस्थापनाद्वारे मत्स्योत्पादनात दुपटीने वाढ करण्यासाठी केंद्र शासनाने निलक्रांती धोरण निश्चित केले आहे. या धोरणांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या 50 टक्के अर्थसहाय्याच्या 21 योजना राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मार्च 2017 रोजी मान्यता देण्यात आली. या योजनांसाठी यंदाच्या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने 29 कोटी 42 लाखाचा निधी मंजूर केला असून त्यापैकी निम्मा निधी राज्यास प्राप्त झाला आहे.
निलक्रांती धोरणानुसार राज्यातील भूजलाशये, सागरी व निमखारे क्षेत्रातील जलाशये यांच्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करुन शाश्वत पद्धतीने जैविक सुरक्षितता व पर्यावरणाचा समतोल राखून मत्स्योत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल सरकारने द्रविडियन कुटुंबाशी संबंधित लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या ‘कुरुख’ या आदिवसी भाषेला कार्यालयीन भाषेचा दर्जा दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये ही भाषा द्वार क्षेत्रात राहणार्या ‘ओराण’ या आदिवासी जमातीकडून बोलली जाते.
वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने (Wildlife Crime Control Bureau) भारतातील वन्यजी प्राण्यांची शिकार थांबविण्यासाठी 30 जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2017 दरम्यान ‘ऑपरेशन थंडर बर्ड’ यशस्वीरीत्या समन्वयित केले. यासोबतच ब्युरोने 15 डिसेंबर 2016 ते 30 जानेवारी 2017 दरम्यान कसावावर विशिष्ट प्रजाती ऑपरेशन ‘ऑपरेशन सेव्ह कुरमा’ आयोजित केले होते.
जर्मनीची कार निर्मिती कंपनी मर्सिडीजने जगभरातील १० लाख कार परत मागवल्या आहेत. कारमध्ये आग आणि ओव्हरहीट यामुळे होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक डॉ.ई.वायुनंदन यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी डॉ.वायुनंदन यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ.वायुनंदन यांची नियुक्ती पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.
नुकतेच अरुणाचल प्रदेशमधील पहिले नागरी हवाई विमानतळ ‘तेजू’चे बांधकाम पूर्ण झाले आहे.
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारत आणि पोर्तुगाल यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मंजुरी दिली आहे. या वर्षीच्या 6 जानेवारीला या सामंजस्य करारावर नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. या करारामुळे उभय देशातील सहकार्य अधिक मजबूत व्हायला मदत होणार आहे.
सफाई कर्मचारी राष्ट्रीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष मन्हर वाल्जीभाई झाला यांनी आपल्या कार्यालयात कार्यभार स्वीकारला. त्यांच्यासह मंजू दिलेर आणि दलीप कल्लू हाथीबेद या दोन सदस्यांनीही कार्यभार स्वीकारला.
आयआयटी मद्रासला 2017 चा सामाजिक सेवामधील IEEE Spectrum Technology पुरस्कार मिळाला आहे.
एनटीपीसीने केरळातील कायमकुलम येथे भारतातील सर्वांत मोठे तरंगते सौर फोटोव्होल्टिक ऊर्जा प्रकल्प स्थापित केला आहे. 100 kW चा हा प्रकल्प स्वदेशी बनावटीचा असून मेक इन इंडियाचा भाग आहे.
बॉलीवूडमधील संगीतसम्राट गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘मोगल’ हा चित्रपट येत असून यात गुलशन कुमार यांची भूमिका अक्षयकुमार करणार आहे.
रिझर्व्ह बंकेला प्रत्येक पाचशे रूपयाच्या नोटमागे 2.87 ते 3.09 रूपयांचा खर्च येत असून, दोन हजारांच्या नोटसाठी सुमारे 3.54 ते 3.77 रुपयाचा खर्च येते अशी माहिती अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी दिली.
जगातील पहिल्या फ्लूरोसेन्ट बेडकचा शोध लागला असून हे बेडूक अर्जेंटिनामध्ये आढळून आले आहे.
क्रेडा एचपीसीएल बायो फ्युएल लिमिटेड (सीएचबीएल) आणि इंडियन ऑइल छत्तीसगड रिनिव्हेबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी क्रेडा बायोफ्युएल लिमिटेड, आयसीबीएल बंद करण्याला, त्यांचा कारभार आटोपता घ्यायला मंत्रीमंडळाच्या अर्थविषयक समितीने मान्यता दिली आहे.
उत्तराखंड उच्च न्यायालयाने उत्तराखंड राज्यात चार महिन्यासाठी सर्व खाणकामावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.
एसएचजी (सेल्फ हेल्प ग्रुप) वर आधारित आर्थिक समावेशन मॉडेल स्वीकारणारे ओडिशा देशातील पहिले राज्य ठरले आहे.
मोंटेनीग्रोला नाटोचे (नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन) 29 वा सदस्य म्हणून मान्यता देण्यासाठी अमेरिकन सिनेटने नुकतेच मतदान घेतले आहे. यापूर्वी 25 सदस्यांनी मोंटेनीग्रोला मान्यता दिली असून स्पेन आणि नेदरलँड्सने मान्यता देणे अजून बाकी आहे. नाटो ही एक एप्रिल 1949 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या उत्तर अटलांटिक करारावर आधारित अंतरशाशकीय लष्करी युती आहे.
‘सेझ’ धोरणाची अंमलबजावणी करताना अलिकडच्या काळात काही गोष्टींचा प्राधान्याने विचार केला जात आहे. यामध्ये बहु-उत्पादनासाठी ‘सेझ’ लावण्यासाठी किमान भू क्षेत्राच्या आवश्यकता 50 टक्क्यांनी कमी केली आहे.
भारत आणि सर्बिया यांच्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या हवाई सेवा करारामध्ये बदल करून नवा करार करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा करार 31 जानेवारी 2003 रोजी करण्यात आला होता.
अमेरिकन प्लॅनिंग असोसिएशन (एपीए) द्वारे स्थापित पियर एल एफेंट आंतरराष्ट्रीय नियोजन उत्कृष्टता पुरस्कार -2017 मिळविणारे भुवनेश्वर हे पहिले भारतीय शहर ठरले आहे.
भारत आणि जॉर्जिया यांच्यात नव्या आंतरराष्ट्रीय नागरी हवाई सेवा संघटनेच्या मानकांनुसार कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सध्या या दोन्ही देशांदरम्यान कोणतीही हवाई सेवा सुरू नाही. हवाई वाहतूक क्षेत्रातील नव्या घडामोडींना विचारात घेऊन दोन्ही देशांदरम्यान हवाई संपर्क सुधारण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.
रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबत 31 जानेवारी 2017 रोजी इटलीतील फेरोवो डेलो स्टॅटो इटालियन या कंपनीबरोबर झालेल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
भारत आणि बांगलादेश यांच्यात न्यायालयीन क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दोन्ही देशांच्या न्यायव्यवस्थांमध्ये परस्पर सहकार्य विकसित करणे, चालना देणे व त्याला बळकटी देणे हा या कराराचा उद्देश आहे.
राष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे नुकताच पार पडला.
राज्यातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आसाम सरकारने ‘गुणोस्तव’ हा कार्यक्रम राबवत आहे.
केंद्र शासनाने आठ राज्यांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहे. तमिळनाडू, कर्नाटक, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांचा त्यामध्ये समावेश आहे.
बँकॉक येथे पार पाडलेल्या थायलंड अंतरराष्ट्रीय टूर्नामेंट मध्ये भारतीय बॉक्सर के श्याम कुमार यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे. कुमारचे हे दुसरे सुवर्णपदक आहे यापूर्वी त्याने 2015 मध्ये पहिले सुवर्णपदक मिळविले होते.
अमेरिकास्थित नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनने भारतातील पहिली बास्केटबॉल शाळा मुंबई येथे सुरू केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेने बैलगाडा शर्यतीच्या विध्येयकाला मंजूरी दिली आहे. पशुपालन मंत्री महादेव जाणकार यांनी हे विध्येयक विधानसभेत ठेवले होते.
नोबेल परितोषक विजेती मलाला युसुफझाईला कॅनडाचे नागरिकत्व प्रदान करण्यात येणार असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुड्रो यांनी घोषणा केली.
मध्यप्रदेश सरकारने राज्यातील गरीब जनतेला अनुदानित भोजन देण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय रसोई योजना सुरू केली आहे.
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अॅटोनिओ गुट्टेरस यांनी नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईला शांती दूत (Messenger of Peace) म्हणून घोषित केले आहे. यासह मलाला जगातील सर्वांत तरुण शांती दूत ठरली आहे.
राज्यातील जनतेला 24 तास वीजपुरवठा करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने केंद्र सरकरसोबत ‘सर्वांसाठी ऊर्जा’ करार केला आहे. उत्तर प्रदेश हे एकमेव राज्य या योजनेशी जोडले गेले नव्हते ते आता जोडले आहे. सर्वांसाठी योजना हा केंद्र आणि राज्यांचा संयुक्त उपक्रम असून 2019 पर्यन्त सर्वांना परवडणरी वीज पुरविणे या उपक्रमाचा हेतु आहे.
नेपाळ आणि चीन यांनी ‘सागरमाथा फ्रेंडशिप 2017’ हा संयुक्त लष्करी सराव घेतला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने पहिली मलेरिया विरोधी लस चाचणी घेण्यास तयार असल्याचे घोषित केले असून केनिया, घाना आणि मलावी या तीन देशांची यासाठी निवड करण्यात आली आहे. Mosquirix किंवा RTS,S असे या लसीचे नाव आहे.
ईशान्येकडील सहाव्या आणि सर्वांत मोठ्या आयटी हबचे आगरताळा येथे उद्घाटन करण्यात आले आहे.
चीनने नुकतीच आपली पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहु युद्धनौकेचे अनावरण केले आहे. चीनची ही दुसरी विमानवाहु युद्धनौका आहे.
उत्तर प्रदेश सरकारने ज्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या जन्म आणि पुण्यतिथी जयंती दर्शवितात अशा 15 शासकीय सुट्ट्या रद्द केल्या आहेत. राज्यातील 42 शासकीय सुट्ट्यांपैकी 17 सुट्ट्या या जयंतीशी संबंधित आहेत.
भुवनेश्वर : पियर एल एफेंट पुरस्कार 2017 विजेते पहिले शहर
मध्य प्रदेश सरकारकडून चालविल्या जाणार्या महर्षि पतंजली संस्कृत संस्थेमध्ये जुलै 2017 पासून ‘हिंदू पूरोहित’ वरील 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात येणार आहे. हा कोर्स कोणताही धर्म, जात किंवा लिंग लक्षात न घेता सर्वांसाठी खुला असेल. मात्र यासाठी दहावी पास असणे अनिवार्य असेल.
अवजड उद्योग विभागाचे सचिव गिरीश शंकर यांची नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय इलेक्ट्रिक गतीशीलता बोर्डाच्या (National Board of Electric Mobility) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मध्य अमेरिकेतील एक लहानसा देश असलेल्या एल साल्वाडोरने संपूर्ण देशभरामध्ये धातू खाणींवर बंदी घातली आहे. असा निर्णय घेणारा हा जगातील पहिला देश बनला आहे.
सदुर आणि ग्रामीण भागातील जनतेला हृदय विकरच्या झटक्यावेळी वेळेवर उपचार पुरविण्यासाठी राजस्थांनाच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ‘राहत’ या वैद्यकीय प्रकल्पाची सुरुवात केली आहे. हृदय विकारावर आरोग्य कार्यक्रम सुरू करणारे राजस्थान हे तमिळनाडू नंतर दुसरे राज्य ठरले आहे.
लहुजी शक्ति सेना व मानवी हक्क अभियान यांच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य समेलन 5 फेब्रुवारी 2017 रोजी लातूर येथे पार पडले. संमेलनाचे उद्घाटन डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते झाले संमेलनाध्यक्ष लेखिका प्रा. प्रतिमा परदेशी या होत्या.
केंद्र सरकारने अपंग व्यक्तींसाठी संपूर्ण देशात समान नियम बनविणयसाठी आणि अपंग व्यक्तींचे हक्क कायदा 2016 च्या अमलबजावणीसाठी कार्यगटाची स्थापना केली आहे. समितीचे अध्यक्ष अपंग व्यक्ती सबलीकरण विभागाचे सचिव असणार आहेत.
सर्व शिक्षा अभियानाच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने शगून (ShaGun) हे वेबपोर्टल सुरू केले आहे. (http://ssashagun.nic.in). हे पोर्टल जागतिक बँकेने मानवी संसाधन विकास मंत्रालयाच्या सहयोगाने बनविले आहे. शगून हे नाव Shala (शाळा) आणि Gunavatta (गुणवत्ता) यावरून घेतले आहे.
केरळ विद्यापीठातील शास्त्रज्ञांना लांब पाय असलेली झाडावर राहणारी खेकड्याची जात सापडली आहे. केरळमध्ये पश्चिम घाटात आढळणारी कनी (Kani) या आदिवासी जमातीवरून या प्रजातीला कनी मरंजंडू (Kani Maranjandu) असे नाव देण्यात आले आहे.
केंद्र सरकारने अलिकडेच गंगा नदीतील जलचर सजीवांची संख्या आणि स्थिती जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण हाती घेतले असून या सर्वेक्षणात प्रामुख्याने गंगा नदीतील डॉल्फिन माशांच्या स्थितीचा अभ्यास केला जाणार आहे. देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेला या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने देशातील व्याघ्रप्रकल्पांमध्ये चित्रीकरण करण्यास बीबीसीला पाच वर्षांची बंदी घातली आहे. बीबीसीचे प्रतिनिधी जस्टिन रॉलेट यांनी काझीरंगा अभयारण्यातील एकशिंगी गेंड्यांच्या संरक्षणासाठी सरकारने लागू केलेल्या आक्रमक धोरणाच्या मुद्द्यावर तयार केलेली डॉक्युमेंटरी नियमानुसार प्रदर्शनापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना दाखवण्यात आली नाही, असे कारण त्यासाठी दिले आहेत.
महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील डवलवाडी, बदनापूर येथे 23 जानेवारी 2017 रोजी डेंग्यू, चिकनगोनीया आणि झिका रोग पसारविणार्या एडिस एजिप्ती डासांची संख्या कमी करण्यासाठी जनुकीय सुधारित (जीएम) नर डासांची चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी ऑक्सिटेककडून घेण्यात आली असून यासाठी Release of Insects carrying Dominant Lethal genes (RIDL) हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
भिश्ती ही जमात इतक्यात चर्चेत होती. भिश्ती जमात ही एक मुस्लिम आदिवासी किंवा बिरादरी जमात असून उत्तर भारत, पाकिस्तान आणि नेपाळच्या तराई भागात आढळते. त्यांना धुंद अब्बासी आणि सक्का या नावानेही ओळखले जाते. महाराष्ट्रमध्ये ही जमात पखळी या नावाने ओळखली जाते. ही एक पारंपारिक पाणी वाहक जमात आहे.
आसाममधील भाजप सरकार राज्यातील मदरशांमधील शिक्षणावर बंदी आणणार आहे. यापुढे मदरशांमधील शिक्षणाची जबाबदारी माध्यमिक शिक्षण मंडळाकडे असेल, असे आसाम सरकारने म्हटले आहे. यासोबतच संस्कृत बोर्ड रद्द करण्याचा निर्णयदेखील आसाम सरकारकडून घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री हिमांता बिस्व सर्मा यांनी राज्य सरकारच्या निर्णयांची माहिती दिली आहे.
सहकारी संघराज्याचा अजेंडा पुढे आणण्यासाठी राज्यांसोबत नीती आयोगाने ‘साथ’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. SATH- Sustainable Action for Transforming Human capital
गेल्या अनेक दशकांपासून चालत आलेल्या अमेरिकेच्या आणि आंतरराष्ट्रीय धोरणाच्या विरुद्ध जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली आहे.
ऑस्ट्रेलियाने नुकताच समलिंगी विवाह कायदा पारित केला आहे.
अझर ए. एच. खान :- तुर्कमेणिस्तानमधील भारताचे नवे दूत
उत्तरप्रदेश राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत ‘उत्तरप्रदेश संगठित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (UPCOCA)’ आणण्यासाठी विधेयकाला मंजूरी देण्यात आली आहे.
'गीता संशोधन संस्था' उत्तर प्रदेशमधील मथुरा या शहरामध्ये स्थापन करण्यात येणार आहे.
मेघालय :- सामाजिक लेखापरीक्षण कायदा (social audit law) लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
आर हेमलता यांची हैद्राबादस्थित राष्ट्रीय पोषण संस्थेच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे
हैदराबाद येथे 'ऑपरेशनल ओशनोग्राफीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र' स्थापन करण्यासाठी केंद्रीय कॅबिनेटने नुकताच यूनेस्को सोबत करार केला आहे.
फ्रान्सने 2040 पर्यंत तेल व नैसर्गिक वायुच्या शोध व उत्पादनावर कायद्याने बंदी घातली आहे.
सवतःचा लोगो प्राप्त करणारे देशातील पहिले शहर :- बंगळुरु
“The Way I See It: A Gauri Lankesh Reader” » चन्दन गौडा यांचे पुस्तक
फोर्ब्स मॅगझीनने जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या १०० भारतीय सेलेब्रिटींच्या यादीत यावर्षी देखील अभिनेता सलमान खान पहिल्या स्थानावर आहे. सलमान खानची वार्षिक कमाई २३२ कोटी आहे. शाहरुख खान १७० कोटी वार्षिक कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे.
२०२२साली होणाऱ्या राष्ट्रकुल खेळाचे यजमानपद भूषवण्याचा मान बर्मिंगहॅम शहराला देण्यात आला आहे. बर्मिंगहॅम आणि डर्बन या शहरांनी यासाठी आपला प्रस्ताव सादर केला होता. नंतर आर्थिक अडचणींचे कारण देत डर्बन शहराने यजमानपद भूषवण्यात नकार दिला.
बडोद्याच्या आधुनिक शिल्पकलेचे पितामह म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ शिल्पकार नागजी पटेल यांचे १६ डिसेंबर रोजी वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले.
गेली अनेक वर्षे भारताला कच्चे तेल पुरवण्यात आघाडीवर असणाऱ्या सौदी अरेबियाची जागा इराकने हिरावून घेतली आहे.
लोकसभेच्या महासचिवपदी स्नेहलता श्रीवास्तव यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
२०२३चा वनडे विश्वचषक आणि २०२१ची चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या मानाच्या स्पर्धांचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आले आहे. तर २०१९चा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवण्यात येणार आहे. भारताने याआधी १९८७, १९९६ आणि २०११मध्ये वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषविले आहे; पण त्यावेळी भारत आशिया खंडातील देशांसह संयुक्त यजमान होता. २०२३मध्ये मात्र विश्वचषक संपूर्णपणे भारतातच होईल.
गेल्या पंचवीस वर्षांपासून रेंगाळलेले दिल्लीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र ७ डिसेंबर रोजी सुरु झाले आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजधानी दिल्लीतील हे पहिलेच स्मारक आहे.
दक्षिण चीन समुद्रात चीनच्या कारवायांना शह देण्यासाठी सिंगापूरने भारतीय नौदलाला चांगी नाविक तळ वापरासाठी खुला केला आहे. यामुळे भारतीय जहाजांना इंधन भरण्याचीही सोय होणार आहे.
योगिनी सुर्वे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हंगर’ या लघू माहितीपटाला हॉलीवूडचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा जागतिक दर्जाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
क्रिकेटच्या मैदानातील योगदानबद्दल युवराज सिंगला ग्वाल्हेर आयटीएम विद्यापीठाच्या वतीने ‘मानद डॉक्टरेट’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
अभिनेत्री दिया मिर्झाची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँचेट, ऐनी हॅथवे, एंजेलिना जोली, कॅटी पेरी आणि एमा वॉटसन ह्या देखील संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण दूत म्हणून काम करत आहेत. भारतातील वाइल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाची देखील दिया ब्रँड अॅबेसिडर आहे. दिया मिर्झाशिवाय बॉलिवूडमधील पाच अभिनेत्रीही संयुक्त राष्ट्रसंघासोबत काम करत आहेत. यामध्ये एश्वर्या राय-बच्चन, प्रिंयका चोप्रा, शबाना आजमी, लारा दत्ता, आणि मनिषा कोइराला यांचा समावेश आहे.
डॉ. ए. सूर्यप्रकाश यांची ८ फेब्रुवारी २०२०पर्यंत प्रसार भारती बोर्डाच्या चेअरमनपदी नियुक्ती. निवड समितीच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी केली नियुक्ती.
झारखंड या राज्यसरकार द्वारा २०१८ हे वर्ष "निरोगी बाल वर्ष " म्हणून घोषित केले.
बहिणाबाई चौधरी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा 'बहिणाबाई चौधरी साहित्यरत्न' पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांना जाहीर झाला आहे.
किमान रोख चलन वापरणारा प्रथम क्रमांकाचा देश :- स्वीडन
e-RaKAM पोर्टल : शेतकर्यांना कृषी उत्पादने विकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ई-राष्ट्रीय किसान अॅग्री मंडी (e-RaKAM) हे पोर्टल सुरू केले आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने ग्रामीण रस्त्यांच्या देखरेखीसाठी कार्यप्रदर्शन आधारित देखभालीसाठी ‘आरंभ’ हे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे.
भारत क्यूआर (Bharat QR) द्वारा पेमेंट स्वीकारणारी देशातील पहिली विद्युत वितरण कंपनी – आंध्र प्रदेश डिस्कोम
केरळ सरकारने इलेक्ट्रॉनिक कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये ‘ई-वेस्ट डिसपोजल’ ही योजना सुरू केली आहे.
कर्नाटक सरकारने बंगळुरु येथे वर्षाधारी हा क्लाऊड सिडिंग प्रकल्प राबविला आहे.
गाईपासून मिळणार्या फायद्यांबद्दल संशोधन करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली 19 सदस्यीय समिति स्थापन केली आहे.
भारतातील पहिली इलेक्ट्रिक बस सेवा हिमाचल प्रदेशातील रोहतंग खिंड या भगत सुरू करण्यात आली आहे.
वूड इज गुड अभियान - केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने ‘लँड युज सायन्स’ (फॉरेस्ट प्लस)च्या मदतीने वूड इज गुड हे अभियान सुरू केले आहे.
जगातील पहिली तरंगती पवन शेती (Wind Farm) स्कॉटलंडच्या किनारी स्थापन करण्यात येत आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने जानेवारी २०१८ पासून चहाच्या पिशव्यांवर स्टेप्लर पिन्स लावण्यास बंदी घातली आहे.
चीनने धातूच्या ट्रॅकशिवाय सेन्सर तंत्रज्ञानवर चालणार्या ट्रेनचे अनावरण केले आहे. आभासी ट्रॅक वरुन चालणारी ती जगातील पहिली ट्रेन ठरली आहे.
________________________________________
महोत्सव व साजरे करणारे राज्य
• हॉर्नबिल महोत्सव – नागालँड
• सोलुंग महोत्सव – अरुणाचल प्रदेश
• साजिबू चिरौबा – मणीपुर
• चपचार कूट महोत्सव – मिझोराम
• खजुराहो महोत्सव – मध्य प्रदेश
• लोसर महोत्सव – लडाख
• वंगला (wangala) महोत्सव- मेघालय
• तिरू ओणम – केरळ
• चितवान हत्ती महोत्सव- नेपाळ
• आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव – गुजरात
• सरहूल- झारखंड
________________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत