• New

    महत्त्वाचे दिनविशेष




    जानेवारी २०१७
    दिनांक
    दिनविशेष
    संकल्पना व इतर माहिती
    ४ जानेवारी
    जागतिक ब्रेल दिन
    -          लुईस ब्रेल यांची जयंती (२०१७ - २०७ वी)
    -          त्यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला.
    ९ जानेवारी
    प्रवासी भारतीय दिन
    -          उद्देश:- भारताच्या विकासातील भारताबाहेरील भारतीय समुदायाचे योगदान चिन्हांकित करण्यासाठी.
    -          ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत परत आले होते.
    १० जानेवारी
    जागतिक हिंदी दिन
    -          उद्देश:- १४ सप्टेंबर १९४९ या दिवशी घटना समितीने हिंदी भाषेचा भारतीय संघाची  कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकार केला होता.
    -          जागतिक हिन्दी दिवस पहिल्यांदा १० जानेवारी २००६ रोजी साजरा करण्यात आला होता.
    १२ जानेवारी
    राष्ट्रीय युवा दिन
    -          संकल्पना:- इंडियन युथ फॉर स्किल अँड हार्मोणी
    -          स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस १२ जानेवारी हा देशभरात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो.
    -          यावर्षीचा २१ वा राष्ट्रीय युवक महोत्सव रोहताक (हरियाणा) येथे साजरा करण्यात आला.
    १५ जानेवारी
    भारतीय सेना दिन
    -          २०१७ चा ६९ वा दिन
    -          उद्देश:- १६ जानेवारी १९४९ रोजी लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा यांनी भारताचे पहिले सेनाध्यक्ष  म्हणून पदभार स्वीकारला होता.
    -          त्यांनी ब्रिटिश सेनाध्यक्ष जनरल सर फ्रांसिस बचर यांच्याकडून पदभार स्वीकारला होता.
    १६ जानेवारी
    धार्मिक स्वातंत्र्य दिन
    -          उद्देश:- धार्मिक असहिष्णुतेविरोधी उभे राहणे.
    २३ जानेवारी
    देश प्रेम दिवस
    -          राष्ट्रीय देशभक्ती दिन
    -          नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती
    -          २०१७ – १२० वी जयंती.
    २४ जानेवारी
    राष्ट्रीय बालिका दिन
    -          या दिवसी इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान झाल्या होत्या.
    २५ जानेवारी
    राष्ट्रीय मतदार दिन
    -          संकल्पना:- एमपॉवरिंग यंग अँड फ्युचर इव्हेंट्स
    -          उद्देश :- युवा मतदारांना राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेणे
    २५ जानेवारी
    राष्ट्रीय पर्यटन दिन
    -          उद्देश:- भारतीय अर्थव्यवस्थेतील पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे.
    २६ जानेवारी
    आंतरराष्ट्रीय शिमाशुल्क दिन
    -          संकल्पना:- डिजिटल कस्टम्स : प्रोग्रेसिव्ह एंगेजमेंट
    -          उद्देश:- सीमा सुरक्षेतील शिमाशुल्क अधिकारी आणि संस्थांची भूमिका अधोरेखित करणे.
    -          संघटना:- जागतिक सिमाशुल्क संघटना
    २६ जानेवारी
    भारतीय प्रजासत्ताक दिन
    -          संकल्पना:- स्किल इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ
    -          २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना अमलात आली.
    २९ जानेवारी

    जागतिक कुष्ठरोग दिन
    -          जानेवारीचा शेवटचा रविवार जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो.
    -          उद्देश:- कुष्ठरोग किंवा हंसेन्स डिसीज बद्दल जनतेमध्ये जनजागृती करणे.
    ३० जानेवारी
    शहीद दिन
    -          महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथि
    -          उद्देश:- देशाचे सार्वभौमत्त्व टिकविण्यासाठी ज्यांनी प्राणअर्पण केले आहे त्यांचा सन्मान करणे.



    फेब्रुवारी २०१७
    दिनांक
    दिनविशेष
    संकल्पना व इतर माहिती
    १ फेब्रुवारी
    इंडियन कोस्ट गार्ड दिन
    -          २०१७ – ४० वा दिन
    २ फेब्रुवारी
    जागतिक पाणथळ क्षेत्र दिन
    -          संकल्पना:- Wetlands for disaster risk reduction
    -          २ फेब्रुवारी १९७१ रोजी पाणथळ क्षेत्रासंबंधित रामसार करार स्वीकारण्यात आला होता.
    ४ फेब्रुवारी
    जागतिक कर्करोग दिन
    -          संकल्पना:- वुई कॅन आय कॅन
    -          उद्देश:- कर्करोगासंबंधी जागृती करणे आणि प्रतिबंध आणि उपचारासाठी प्रोत्साहन देणे
    -          संघटन:- जागतिक आरोग्य संघटना
    ११ फेब्रुवारी
    आंतरराष्ट्रीय विज्ञानातील महिला व मुली दिन
    -          संकल्पना:- जेंडर, सायन्स अँड सस्टेनेबल डेवलपमेंट: द इम्प्याक्ट ऑफ मीडिया

    १२ फेब्रुवारी
    राष्ट्रीय उत्पादकता दिन
    -          फ्रॉम वेस्ट टु प्रॉफिट्स थ्रू रिडूस, रीसायकल, रीयुज 
    -          संस्था:- राष्ट्रीय उत्पादकता परिषद
    १३ फेब्रुवारी
    जागतिक रेडियो दिन
    -          संकल्पना:- रेडियो इज यू
    -          संस्था:- यूनेस्को
    -          उद्देश:- आपल्या आयुष्यातील रेडियोच्या योगदानाचे स्मरण करणे
    २० फेब्रुवारी
    जागतिक सामाजिक न्याय दिन
    -          संकल्पना:- प्रीव्हेंटिंग कॉन्फ्लिक्ट अँड सस्टेनिंग पीस थ्रू डिसेंट वर्क
    -          उद्देश:- गरीबी, बहिष्कार आणि बेरोजगारी सारख्या समस्या हाताळण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे.
    -          संस्था:- संयुक्त राष्ट्र संघटना
    २१ फेब्रुवारी
    आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
    -          संकल्पना:- बहुभाषिक शिक्षणाद्वारे शाश्वत भविष्याकडे
    -          उद्देश:- भाषिक आणि संस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेच्या जगरूकतेला प्रोत्साहन देणे.
    -          २०१७ – १७ वा दिन
    -          संस्था:- संयुक्त राष्ट्र, यूनेस्को
    २२ फेब्रुवारी
    जागतिक विचार दिन
    -          World Thinking Day
    -          संकल्पना:- कनेक्ट अॅक्टिविटी पॅक
    -          संस्था:- वर्ल्ड असोसिएशन फॉर गर्ल गाईड्स अँड गर्ल स्काऊट्स
    २४ फेब्रुवारी
    केंद्रीय उत्पादन शुल्क दिन
    -          २०१७ – ७४ वा दिन
    -          संस्था :- भारत सरकार
    २७ फेब्रुवारी
    हौतात्म्य दिन
    -          चन्द्रशेखर आझाद पुण्यतिथि
    -          २०१७ – ८६ वी पुण्यतिथि
    २८ फेब्रुवारी
    राष्ट्रीय विज्ञान दिन
    -          संकल्पना :- विशेष अपंग व्यक्तींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान
    -          सी.व्ही. रमन यांनी १९२८ साली या दिवशी रामण ईफेक्टचा शोध लावला



    मार्च २०१७
    दिनांक
    दिनविशेष
    संकल्पना व इतर माहिती
    १ मार्च
    शून्य भेदभाव दिन
    -          संकल्पना :- मेक सम नॉईज फॉर झीरो डिस्क्रिमिनेशन
    -          संस्था :- UNAIDS
    १ मार्च
    जागतिक नागरी संरक्षण दिन
    -          संकल्पना :- टुगेदर वीथ सिविल डीफेंस अगेन्स्ट डीझास्टर
    -          संस्था :- आयसीडीओ
    ३ मार्च
    जागतिक वन्यजीव दिन
    -          संकल्पना :- लिसन टु द यंग व्हायसेस
    -          उद्देश :- जगातील वनस्पति व प्राण्यांच्या जगरूकतेत वाढ करणे
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्र साधारण परिषद
    -          २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या (UNGA) ६८ अधिवेशनात ३ मार्च हा दिवस संयुक्त राष्ट्र जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
    -          या दिवशी म्हणजेच ३ मार्च १९७३ रोजी वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात असलेल्या प्रजातींचा अंतरराष्ट्रीय व्यापार या वरील करार करण्यात आला होता.  (Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora -CITES).
    -          पहिला जागतिक वन्यजीव दिवस (WWD) २०१४ साली साजरा करण्यात आला.
    ३ मार्च
    राष्ट्रीय संरक्षण दिन
    -          १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने दाखविलेल्या शौर्याचे स्मरण
    ३ मार्च
    जागतिक श्रवणशक्ती दिन
    -          संकल्पना :- अॅक्शन फॉर हियरिंग लॉस: मेक ए साऊंड इन्वेस्टमेंट
    -          संस्था :- जागतिक आरोग्य संघटना
    ४ मार्च
    राष्ट्रीय सुरक्षा दिन
    -          उद्देश :- भारतीय जनतेत शांतता आणि सुरक्षेची महत्त्वपूर्ण भूमिका बाजवणार्‍या विविध सुरक्षा बलांना प्रोत्साहन देणे.
    ४-१० मार्च
    राष्ट्रीय सुरक्षितता आठवडा
    -          संकल्पना :- कीप ईच अदर सेफ
    -          संस्था :- एनएससी
    ८ मार्च
    आंतरराष्ट्रीय महिला दिन
    -          संकल्पना :- विमेन इन द चेंजिंग वर्ल्ड ऑफ वर्क : प्लॅनेट 50-50  बाय 2030
    -           संस्था :- आयडब्ल्यूडी
    ९ मार्च
    जागतिक किडनी दिन
    -          संकल्पना :- किडनी डिसीज अँड ओबेसिटी : हेल्दि लाइफस्टाइल फॉर हेल्दि किडनीज
    -          संस्था :- जागतिक आरोग्य संघटना
    १३ मार्च
    राष्ट्रकुल दिन
    -          संकल्पना :- ए पीस बिल्डिंग कॉमनवेल्थ
    -          संस्था :- राष्ट्रकुल राष्ट्रे
    १५ मार्च
    जागतिक ग्राहक हक्क दिन
    -          संकल्पना :- बिल्डिंग ए डिजिटल वर्ल्ड कंज्युमर्स कॅन ट्रस्ट
    -          संस्था :- डब्ल्यूसीआरडी
    -          १५ मार्च १९८३ मध्ये पहिला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला.
    -          ‘Antibiotics off the menu’ ही २०१६ ची संकल्पना होती.
    # भारतामध्ये 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला (१९८६) राष्ट्रपतींनी मंजूरी दिली होती.
    १६ मार्च
    भारतीय अमेरिकन कौतुक दिवस
    -          भारतीय अभियंता श्रीनिवस कुचीभोटला यांचा सन्मान करणे. अमेरिकेतील घृणास्पद घटनेत ते मारले गेले.
    २० मार्च
    जागतिक चिमणी दिन
    -          संकल्पना :- राइज फॉर द स्पॅरो – एक्सपेरियन्स द पॉवर ऑफ वन
    २० मार्च
    आंतरराष्ट्रीय आनंदी दिन
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्र संघटना
    २१ मार्च
    आंतरराष्ट्रीय वन दिन
    -          संकल्पना :- वने आणि ऊर्जा (Forest and Energy)
    -          उद्देश :- सर्व प्रकारची वने आणि वनाबाहेरील झाडे यांच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करणे.
    -          संस्था :- यूएन, एफएओ
    २१ मार्च
    आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव विरोधी दिन
    -          संकल्पना :- Racial profiling and incitement to hatred, including in the context of migration
    २१ मार्च
    जागतिक डाऊन सिंड्रोम दिन
    -          डाऊन सिंड्रोम – हा एक अंनुवंशिक विकार आहे.
    -          संस्था :- जागतिक आरोग्य संघटना
    -          संकल्पना :- माय व्हॉईस माय कम्यूनिटी
    २१ मार्च
    जागतिक कविता दिन
    -          उद्देश :- जगामध्ये कवितेचे वाचन, लेखन, प्रकाशन, शिक्षण यांना प्रोत्साहन देणे
    -          संस्था :- यूनेस्को
    २२ मार्च
    जागतिक जल दिन
    -          संकल्पना :- व्हाय वेस्ट वॉटर?
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्र
    -          संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण आणि विकास परिषदेच्या १९९२ मध्ये रियो डी जनेरिओ, ब्राझील येथे आयोजित करण्यात आलेल्या अजेंडा २१ मध्ये जागतिक जलदिनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
    -          २२ मार्च १९९३ रोजी पहिलं जागतिक जलदीन साजरा केला गेला.
    २३ मार्च
    जागतिक हवामान दिन
    -          संकल्पना :- अंडरस्टॅंडिंग क्लाउड्स
    -          संस्था :- यूएन, डब्ल्यूएमओ
    -          या दिवशी जागतिक हवामान संघटनेने the ‘International Cloud Atlas’ च्या नवीन आवृत्तीचे अनावरण केले.
    -          २३ मार्च १९५० रोजी जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाली होती.
    २३ मार्च
    शहीद दिन
    -          भगत सिंग, शीवराम हरी राजगुरू, सुखदेव थापर यांची पुण्यतिथि
    -          २०१७ – ८६ वी
    २४ मार्च
    जागतिक क्षयरोग दिन
    -          संकल्पना :- युनाइट टु एंड टीबी
    -          संस्था :- यूएन, डब्ल्यूएचओ
    -          २४ मार्च १८८२ रोजी जर्मन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कोच यांनी मायकोबॅक्टेरीयम ट्युबरक्युलोसीस, बॅसिलस या जिवाणूचा शोध लावला त्याचा स्मरणोत्सव म्हणून हा दिन साजरा केला जातो.
    २५ मार्च
    गुलामगिरी आणि ट्रान्सअटलांटिक गुलामगिरी व्यापारास बळी पडलेल्यांसाठी आठवणीचा आंतरराष्ट्रीय दिन
    -          संयुक्त राष्ट्रांद्वारे साजरा केला जातो
    -          २०१७ ची संकल्पना :- Remember slavery : Recognizing the Legacy and contribution of people of African Descent
    २५ मार्च
    वसुंधरा तास
    -          २०१७ चा वसुंधरा तास (Earth Hour) २५ मार्च रोजी साजरा करण्यात आला.
    -          वेळ :- रात्री ८:३० ते ९:३०
    -          संकल्पना :- हायलाइट क्लायमेट अॅक्शन
    २७ मार्च
    जागतिक रंगभूमी दिन
    -          संस्था :- इंटरनॅशनल थिएटर इंस्टीट्यूट



    एप्रिल २०१७
    दिनांक
    दिनविशेष
    संकल्पना व इतर माहिती
    २ एप्रिल
    जागतिक ऑटिझम जागरूकता दिन
    -          उद्देश :- ऑटिझम हा आजार असलेल्या बालकांबद्दल जगामध्ये जागरूकता पसरविणे
    -          संकल्पना :- टूवर्ड ऑटोनॉमी अँड सेल्फ-डीटरमिनेशन
    ५ एप्रिल
    राष्ट्रीय सागरी दिन
    -          दरवर्षी ५ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो. 
    -          ५ एप्रिल, १९१९ रोजी सिंधिया स्टीम नेविगेशन कंपनीने बनविलेले लॉयल्टी नावाच्या जहाजाने मुंबई ते लंडन असा ७१९७ किलोमीटरचा (४४७२ मैल) परदेश प्रवास यशस्वीरीत्या पार पाडला.
    -          हा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला आहे, त्या दिवसाला राष्ट्रीय सागरी दिनअसे म्हणतात.
    -          १९६४ पासून ५ एप्रिल दिवस सराष्ट्रीय सागरी दिनम्हणून साजरा होऊ लागला.
    -          यावर्षीचा हा ५४ वा दिवस होता.
    -          या दिनाची संकल्पना ‘Connecting India through Shipping’ अशी होती.
    -          # जागतिक सागरी दिन २९ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
    ६ एप्रिल
    आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिन
    -          अभियान :- #WePlayTogether
    -          संस्था :- UNOSDP
    ७ एप्रिल
    जागतिक आरोग्य दिन
    -          संकल्पना :- डिप्रेशन ? लेट्स टॉक
    -          जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी झाली.
    -          १९५० पासून ७ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
    १० एप्रिल
    जागतिक होमिओपॅथी दिन
    -          उद्देश :- होमिओपॅथी उपचार पद्धतीचे जनक डॉ. सॅम्युयल हनेमन्न यांचा सन्मान करणे
    -          संयुक्त राष्ट्र संघटनेकडून साजरा केला जातो.
    ११ एप्रिल
    राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन
    -          उद्देश :- स्तनदा आणि गरोदर स्त्रियांना योग्य आरोग्य व मातृत्व सुविधा पुरविण्यासंबंधी जागरूकता
    १७ एप्रिल
    जागतिक हिमोफिलिया दिन
    -          संकल्पना :- हियर देअर व्हाईसेस
    -          संस्था :- डब्ल्यूएफएच
    -          हिमोफिलिया -  रक्तगोठण गुंधर्माचा अभाव
    १८ एप्रिल
    जागतिक वारसा दिन
    -          संकल्पना :- संस्कृतिक वारसा आणि शाश्वत पर्यटन
    -          यूनेस्कोद्वारे साजरा केला जातो.
    २१ एप्रिल
    नागरी सेवा दिन
    -          संकल्पना :- मेकिंग न्यू इंडिया
    २२ एप्रिल
    जागतिक वसुंधरा दिन
    -          संकल्पना :- पर्यावरणीय आणि वातावरणीय साक्षरता 
    २३ एप्रिल
    जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन
    -          उद्देश :- वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइटला प्रोत्साहन देणे
    -          यूनेस्कोद्वारे साजरा केला जातो 
    २४ एप्रिल
    राष्ट्रीय पंचायतराज दिन
    -          ७३ वी घटनादुरूस्ती कायदा १९९२ ची अमलबजावणी दिन. (२४ एप्रिल १९९३)
    २५ एप्रिल
    जागतिक मलेरिया दिन
    -          संकल्पना :- एंड मलेरिया फॉर गुड
    -          जागतिक आरोग्य संघटनेकडून साजरा केला जातो.
    २६ एप्रिल
    जागतिक बौद्धिक संपदा दिन
    -          संकल्पना :- इनोवेशन – इम्प्रोविंग लाईव्हज
    -          संस्था :- WIPO
    २६ एप्रिल
    आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल आपत्ती स्मरण दिन
    -          उद्देश :- युक्रेनमधील चेर्नोबिल आणू विद्युत प्रकल्पात १९८६ साली झालेल्या दुर्घटनेचे स्मरण
    -          संयुक्त राष्ट्र संघटनेकडून साजरा केला जातो.
    २६ एप्रिल
    जागतिक सुरक्षितता आणि आरोग्य दिन
    -          संकल्पना :- Optimize the Collection and Use of OSH data
    -          आयएलओ कडून साजरा केला जातो.
    २९ एप्रिल
    आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
    -          उद्देश :- नृत्येच्या कलेकडे जनतेचे लक्ष वेधणे
    -          यूनेस्कोकडून साजरा केला जातो.
    २९ एप्रिल
    आंतरराष्ट्रीय रासायनिक युद्धात बळी पडलेल्यांचे स्मरण दिन
    -          संयुक्त राष्ट्राकदुं साजरा केला जातो.



    मे २०१७
    दिनांक
    दिनविशेष
    संकल्पना व इतर माहिती
    १ मे
    आंतरराष्ट्रीय कामगार दिन
    -          संकल्पना :- Celebrating the international labour movement
    २ मे
    जागतिक अस्थमा दिन
    -          संकल्पना :- बेटर एयर बेटर ब्रिदिंग
    -          जागतिक आरोग्य संघटना साजरा करते.
    ३ मे
    जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन
    -          संकल्पना :- Critical Minds for Critical Times: Media’s role in advancing peaceful, just and inclusive society
    -          संस्था :- यूएन, यूनेस्को  
    ५ मे
    आंतरराष्ट्रीय दाई (Midwives) दिन
    -          संकल्पना :- दाई, माता आणि कुटुंब : आयुशातील भागीदार
    -          संस्था :- यूएनएफपीए
    ८ मे
    जागतिक रेड क्रॉस दिन
    -          संकल्पना :- लेस नोन रेड क्रॉस स्टोरीज
    -          उद्देश :- आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीचे संस्थापक हेनरी ड्युनट यांचा जन्मदिन (८ मे १८२८)
    १० मे
    जागतिक स्थलांतरित पक्षी दिन
    -          संकल्पना :- त्यांचे भविष्य हे आपले भविष्य आहे – स्थलांतरित पक्षी आणि लोकांसाठी आरोग्यदायी ग्रह
    -          उद्देश :- स्थलांतरित पक्षी आणि त्यांचा अधिवास संरक्षित करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे
    -          संयुक्त राष्ट्र संघटना साजरा करते.
    ११ मे
    राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
    -          संकल्पना :- समावेशक आणि शाश्वत वृद्धीसाठी तंत्रज्ञान
    -          ११ मे १९९८ रोजी पोखरण, राजस्थान येथे आणू चाचणी घेण्यात आली होती.
    १२ मे
    आंतरराष्ट्रीय परिचारिका (नर्स) दिन
    -          संकल्पना :- नर्सिंग : ए व्हाईस टु लीड – अचिविंग द सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स.
    -          उद्देश :- फ्लोरेंस नाइटिंगेल यांची जयंती  
    -          संस्था :- आयसीएन
    १४ मे
    मदर्स डे

    १५ मे
    आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन
    -          संकल्पना :- कुटुंब, शिक्षण आणि स्वास्थ्य
    -          संयुक्त राष्ट्र साजरा करते
    १७ मे
    जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिन
    -          १७ मे १८६५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय टेलीग्राफ करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.
    -          संकल्पना :- Big data for Big impact
    १७ मे
    जागतिक उच्च रक्तदाब दिन
    -          संकल्पना :- नो युवर नंबर
    -          जागतिक आरोग्य संघटना साजरा करते.
    १८ मे
    जागतिक एड्स लस दिन
    -          जागतिक आरोग्य संघटना साजरा करते
    १८ मे
    आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन
    -          संकल्पना :- Museums and contested histories: Saying the unspeakable in museums.
    -          संस्था :- आयसीओएम, यूएन
    २० मे
    जगातील मेट्रोलॉजी दिन
    -          संकल्पना :- वाहतुकीसाठी मोजमाप
    -          उद्देश :- मोजमापणीचे महत्त्व प्रोस्तहीत करणे
    -          संस्था :- बीआयपीएम आणि ओआयएमएल
    २१ मे
    जागतिक संवाद आणि विकासासाठी संस्कृतिक विविधता दिन
    -          यूनेस्कोद्वारे साजरे केले जाते.
    २१ मे
    आतंकवाद विरोधी दिन
    -          राजीव गांधी पुण्यतिथि
    -          २०१७ – २६ वी
    २२ मे
    आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन
    -          दरवर्षी २२ मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन किंवा जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो.
    -          २२ मे १९९२ रोजी नैरोबी येथे (यूएनईपीचे मुख्यालय) जैवविविधता करार स्वीकारण्यात आला त्यामुळे या दिवसाची निवड केली आहे.
    -          पूर्वी २९ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा केला जात होता. मात्र संयुक्त राष्ट्राने २००० साली एका ठरवद्वारे २२ मे रोजी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
    -          २०१७ ची संकल्पना : जैवविविधता आणि शाश्वत पर्यटन. संयुक्त राष्ट्राने २०१७ हे वर्ष विकाससाठी शाश्वत पर्यटनाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे त्याच्याशी ही संकल्पना सुसंगत आहे. 
    -          संयुक्त राष्ट्राने यापूर्वीच २०११-२० हे जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे.
    २३ मे
    जागतिक कासव दिन
    -           
    २५ मे
    आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांततारक्षक दिन
    -          संकल्पना :- Investing in the peace around the world
    -           
    ३१ मे
    जागतिक तंबाखू विरोधी दिन
    -          संकल्पना :- तंबाखू -  विकासास धोखा
    -          जागतिक आरोग्य संघटना साजरा करते



    जून २०१७
    दिनांक
    दिनविशेष
    संकल्पना व इतर माहिती
    १ जून
    जागतिक पालक दिन

    १ जून
    जागतिक दूध दिन
    -          संकल्पना :-रेज ए ग्लास फॉर मिल्क
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्र, यूएनएफएओ
    ५ जून
    जागतिक पर्यावरण दिन
    -          संकल्पना :- कनेक्टिंग पिपल टु नेचर
    -          पर्यावरण संरक्षणासाठी जगभरात  जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. हा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा (UNEP) उपक्रम आहे.
    -          १९८७ पासून दरवर्षी वेगवेगळ्या देशामध्ये हा दिवस साजरा केला जातो. २०१७ चा यजमान देश होता कॅनडा.
    -          जागतिक पर्यावरण दिन संयुक्त राष्ट्र साधारण परिषदेतर्फे १९७२ मध्ये झालेल्या मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये स्थापन करण्यात आला.
    -          १९७३ साली पहिला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
    ६ जून
    जागतिक कीटक दिन
    -          पहिलाच दिन
    -          उद्देश :- कीटकांद्वारे होणार्‍या आजारांबद्दल जागृती करणे आणि वैज्ञानिक पेस्ट कंट्रोल पद्धतीने सार्वजनिक आरोग्य राखणे
    -          संस्था :- चायनीज पेस्ट कंट्रोल असोसिएशन
    ८ जून
    जागतिक महासागर दिन
    -          संकल्पना :- आपले महासागर, आपले भविष्य
    -          उद्देश :- जगातील महासागरांचा सन्मान, संरक्षण आणि संवर्धन करणे
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्र
    १२ जून
    जागतिक बालकामगर विरोधी दिन
    -          संकल्पना :-  संघर्ष आणि आपत्तीमध्ये, बालकामगारापासून बालकांचे संरक्षण करा
    -          २००२ मध्ये १२ जून हा बालकामगर विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला.
    १३ जून
    आंतरराष्ट्रीय अलबिनिझम जागरूकता दिन
    -          Albinism : त्वचा, केस व डोळे जन्मापासून अंशत: अथवा पूर्णत: रंगहीन असणे
    -          दरवर्षी १३ जून रोजी साजरा केला जातो.
    १४ जून
    जागतिक रक्तदाता दिन
    -          संकल्पना :- तुम्ही काय करू शकता? रक्त द्या. आता द्या. नेहमी द्या.
    -          संस्था :_ जागतिक आरोग्य संघटना
    १५ जून
    अशियान डेंग्यु दिन
    -          संकल्पना :- यूनायटेड फ्लाइट अगेन्स्ट डेंग्यु
    १७ जून
    जागतिक दुष्काळ आणि वाळवंटिकरणविरुद्ध लढा दिन
    -          संकल्पना :- आपली भूमी आपले घर आपले भविष्य
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्र
    -          संयुक्त राष्ट्र साधारण परिषदेने 1994 मध्ये या दिनाची स्थापना केली.
    -          1995 मध्ये पहिल्यांदा हा दिन पाळला गेला.
    २० जून
    जागतिक निर्वासित दिन
    -          संकल्पना :- Waterloo Region Celebrates Refugees
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्र संघटना
    २१ जून
    आंतरराष्ट्रीय योगा दिन
    -          संकल्पना :- आरोग्यासाठी योगा
    -          २०१७ - तिसरा योगा दिन
    २१ जून
    जागतिक संगीत दिन
    -          संकल्पना :- musician gather to perform at public place
    २३ जून
    आंतरराष्ट्रीय विधवा दिन
    -          संकल्पना :- अधिक सिद्धीसाठी महिला सक्षमीकरण
    -          संस्था :- द लुम्बा फाऊंडेशन
    २३ जून
    जागतिक सार्वजनिक सेवा दिन
    -          संकल्पना :- the future is now
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्र संघटना
    २३ जून
    आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन
    -          २३ जून १८९४ रोजी सॉरबोन, पॅरिस येथे आधुनिक ऑलिंपिक खेळांची सुरुवात
    २५-२६ जून
    आणीबाणी विरोधी दिन
    -          १९७५ मधील आणीबाणीची आठवण
    २६ जून
    आंतरराष्ट्रीय सुक्स्म, लघु व माध्यम उद्योग दिन
    -          पहिलाच दिन
    -          संकल्पना :- स्मॉल बिझनेस – बिग इम्पॅक्ट
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्र संघटना आणि जागतिक व्यापार संघटना
    २९ जून
    राष्ट्रीय सांख्यिकी दिन
    -          उद्देश – सामाजिक-आर्थिक जीवनातील नियोजन आणि धोरण निर्मितीतील सांख्यिकीचे महत्त्व अधोरेखित करणे.
    -          भारतीय सांख्यिकीचे जनक पी. सी. महालनोबिस यांचा जन्मदिन
    -          2017 ची संकल्पना – अॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टॅटिस्टिक्स 



    जुलै २०१७
    दिनांक
    दिनविशेष
    संकल्पना व इतर माहिती
    ११ जुलै
    जागतिक लोकसंख्या दिन
    -          संकल्पना :- कुटुंब नियोजन: नागरिकांचे सशक्तीकरण, विकसनशील राष्ट्र
    -          संस्था :- यूएनडीपी
    -          यूनायटेड नेशन्स डेवलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) द्वारा १९८९ मध्ये या दिनाची स्थापना झाली.
    -          पहिला जागतिक लोकसंख्या दिन ११ जुलै १९९० रोजी साजरा केला गेला.
    १२ जुलै
    मलाला दिन
    -          उद्देश :- मुलींच्या शिक्षणाच्या हक्कांसाठी मदत करणे आणि प्रोत्साहन देणे
    १५ जुलै
    जागतिक युवा कौशल्य दिन
    -          संकल्पना :- सर्वांसाठी कौशल्य
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्र, यूनेस्को, आयएलओ
    -          उद्देश :- युवकांचे मूलभूत हक्क अधोरेखित करणे.
    -          २०१४ मध्ये याची स्थापना करण्यात आली.
    १७ जुलै
    आंतरराष्ट्रीय न्याय दिन
    -          १९९८ च्या रोम नियमांचा वर्धापन दिन. या नियमांनुसार आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयची स्थापना झाली.
    १८ जुलै
    आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन
    -          उद्देश:- मंडेला यांच्या कार्याचा गौरव करणे
    १९ जुलै
    सार्वजनिक क्षेत्रातील बँका वाचवा दिन
    -          बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा ४८ वा वर्धापन दिन
    २८ जुलै
    जागतिक हिपॅटायटीस दिन
    -          जागतिक आरोग्य संघटना
    -          संकल्पना :- Eliminate Hepatitis
    २८ जुलै
    जागतिक निसर्ग संवर्धन दिन
    -          उद्देश :- नैसर्गिक संसाधंनांचे संरक्षण करणे आणि जागृती करणे
    २९ जुलै
    आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
    -          यावर्षी हा सातवा वार्षिक व्याघ्र दिन होता.
    -          २०१० मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची स्थापना करण्यात आली.
    -          २०१७ ची संकल्पना  - वाघांच्या संरक्षणासाठी आल्हाददायक पर्यावरण (fresh ecology for tigers' protection)
    -          २०१० च्या व्याघ्र परिषदेत व्याघ्र संवर्धनावरील सेंट पीटर्सबर्ग जाहीरनामा स्वीकारण्यात आला ज्यामध्ये २०२२ पर्यन्त वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष ठेवण्यात आले.
    ३० जुलै
    आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
    -          उद्देश :- पुष्कळ संस्कृतीत शांतता रखण्यासाठी मैत्रीची भूमिका अधोरेखित करणे
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्र
    ३० जुलै
    जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन
    -          उद्देश :- मानवी तस्करी विरोधात जनजागृती करणे
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्र संघटना  



    ऑगस्ट २०१७
    दिनांक
    दिनविशेष
    संकल्पना व इतर माहिती
    १ ऑगस्ट
    असहकार चळवळ दिन
    -          भारत सरकारद्वारे साजरा केला जातो
    १-७ ऑगस्ट
    जागतिक स्तनपान आठवडा
    -          संकल्पना :- Sustaining Breastfeeding Together
    -          उद्देश :- जीवनाच्या पहिल्या सहा महिन्यापर्यंत स्तनपानाचे महत्व अधोरेखित करणे
    -          संस्था :- युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटना
    ७ ऑगस्ट
    राष्ट्रीय हातमाग दिन
    -          उद्देश :- देशात हातमाग वापरस प्रोत्साहन देणे . याच दिवसी १९०५ मध्ये स्वदेशी चळवळीला सुरुवात झाली होती.
    -           
    १० ऑगस्ट
    जागतिक जैवइंधन दिन
    -          उद्देश :- बायो डिझेल, बायो गॅस, एथनॉल सारख्या गैर जीवाश्म इंधंनाला प्रोत्साहन देणे
    १२ ऑगस्ट
    आंतरराष्ट्रीय युवक दिन
    -          संकल्पना :- यूथ बिल्डिंग पीस
    -          यूएनजीए
    -          पहिल्यांदा २००० साली हा दिन साजरा केला गेला.
    १२ ऑगस्ट
    जागतिक हत्ती दिन
    -          हा दिन साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने गजयात्रा हे अभियान सुरू केले.
    १६ ऑगस्ट
    जागतिक मानवतावादी दिन
    -          संकल्पना :- #NotATarget
    -          संस्था :- यूएनजीए
    २० ऑगस्ट
    सद्भावनादिवस
    -          राजीव गांधी जन्म दिन
    २९ ऑगस्ट
    राष्ट्रीय क्रीडा दिन
    -          उद्देश :- मेजर ध्यानचंद यांचा सन्मान
    २९ ऑगस्ट
    आंतरराष्ट्रीय आणू चाचणी विरोधी दिन
    -          उद्देश :- अण्वस्त्र मुक्त आणि अणु चाचणी मुक्त भविष्याची उभारणी
    -          संस्था :- यूएनजीए
    ३० ऑगस्ट
    लघु उद्योग दिन
    -          लघु उद्योगाला प्रोत्साहन देणे.



    सप्टेंबर २०१७
    दिनांक
    दिनविशेष
    संकल्पना व इतर माहिती
    २ सप्टेंबर
    जागतिक नारळ दिन
    -          संकल्पना :- नारळ, संपूर्ण कुटुंबाचा आहार, आरोग्याचा आधार आणि आनंदी समृद्धी
    -          संस्था :- कोकोनट डेवलपमेंट बोर्ड
    १-७ सप्टेंबर
    राष्ट्रीय पोषण आठवडा
    -          संकल्पना :- Optimal Infant & Young Child Feeding Practices: Better child health
    ५ सप्टेंबर
    राष्ट्रीय शिक्षक दिन
    -          डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा सन्मान करण्यासाठी
    ८ सप्टेंबर
    आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
    -          यूनेस्कोद्वारा साजरा केला जातो.
    ९  सप्टेंबर
    हिमालय दिन
    -          संकल्पना :- हिमालयचे योगदान आणि आपली जबाबदारी
    १० सप्टेंबर
    जागतिक आत्महत्त्या प्रतिबंध दिन
    -          संकल्पना :- एक मिनिट घ्या, जीवन बदला (take a minute, change a life)
    -          संस्था :- इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाइड प्रीव्हेंशन आणि जागतिक आरोग्य संघटना
    १५ सप्टेंबर
    आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
    -          संकल्पना :- लोकशाहीच्या बचावात: आयपीयूच्या लोकशाहीवरील सार्वत्रिक घोषणेचे २० वे वर्धापन
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्रांची आंतर-संसदीय युनियन (आयपीयू)
    १५ सप्टेंबर
    अभियंता दिन
    -          इंजिनियर्स डे
    -          संकल्पना :- विकसनशील भारतातील अभियंत्यांची भूमिका
    १६ सप्टेंबर
    जागतिक ओझोन दिन
    -          स्संकल्पना :- केअरिंग फॉर ऑल लाइफ अन्डर सन
    २१ सप्टेंबर
    आंतरराष्ट्रीय शांतता दिन
    -          संकल्पना :- शांततेसाठी एकत्र: सर्वांसाठी आदर, सुरक्षा आणि प्रतिष्ठा
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्र
    २५ सप्टेंबर
    अंत्योदय दिवस
    -          पंडित दिन दयाळ उपाध्याय यांची जयंती
    -          ग्रामीण विकास मंत्रालयाने या दिवशी भारत के कौशलजादे हा कार्यक्रम घेतला.
    २७ सप्टेंबर
    जागतिक पर्यटन दिन
    -          संकल्पना :- शाश्वत पर्यटन – विकासाचे एक साधन
    -          संस्था :- यूएनजीए
    २८ सप्टेंबर
    जागतिक रेबिज दिन
    -          संकल्पना :- रेबिज : झीरो बाय ३०
    २९ सप्टेंबर
    जागतिक हृदय दिन
    -          संकल्पना :- शेअर द पॉवर
    -          संस्था :- वर्ल्ड हार्ट फेडरेशन
    ३० सप्टेंबर
    आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन
    -          संकल्पना – भाषांतर आणि विवधता
    -          संस्था :- संयुक्त राष्ट्र साधारण परिषद



    ऑक्टोबर २०१७
    दिनांक
    दिनविशेष
    संकल्पना व इतर माहिती
    १ ऑक्टोबर
    आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन
    -          संकल्पना :- स्टेपिंग इंटू द फ्युचर : टॅपिंग द टॅलेंट, काँट्रीब्युशन अँड पार्टीसिपेशन ऑफ ओल्डेर पर्सन्स इन सोसायटी 
    १ ऑक्टोबर
    जागतिक शाकाहारी दिन
    -           
    १ ऑक्टोबर
    आंतरराष्ट्रीय कॉफी दिन
    -           
    २ ऑक्टोबर
    जागतिक अधिवास दिन
    -          ऑक्टोबर मधील पहिला सोमवार
    -          संकल्पना :- गृहनिर्माण धोरणे : स्वस्त घरे
    ४ ऑक्टोबर
    जागतिक अंतराळ दिन
    -          संकल्पना :- अंतरळतीन नवीन जगाचा शोध
    ५ ऑक्टोबर
    आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन
    -          संकल्पना :- टीचिंग इन फ्रीडम, एम्पॉवरिंग टीचर
    -          यूनेस्को द्वारे साजरा केला जातो
    १० ऑक्टोबर
    जागतिक देहांताच्या शिक्षेविरोधी दिन
    -          संकल्पना :- देहांताची शिक्षा आणि दारिद्र्य
    १० ऑक्टोबर
    जागतिक मानसिक आरोग्य दिन
    -          संकल्पना :- कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य
    ११ ऑक्टोबर
    आंतरराष्ट्रीय बालिका दिन
    -          संकल्पना :- मुलींचे सक्षमीकरण: संकटापूर्वी, दरम्यान आणि नंतर 
    १३ ऑक्टोबर
    आंतरराष्ट्रीय आपत्ती कपात दिन
    -          संकल्पना :- Home Safe Home: Reducing Exposure, Reducing Displacement
    १४ ऑक्टोबर
    आंतरराष्ट्रीय मानके दिन
    -          संकल्पना :- स्टँडर्ड्स मेक सिटीज स्मार्टर
    १५ ऑक्टोबर
    आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन
    -          संयुक्त राष्ट्र साजरा करते
    १६ ऑक्टोबर
    जागतिक अन्न दिन
    -          संकल्पना :- चेंज द फ्युचर ऑफ मायग्रेशन. इन्व्हेस्ट इन फूड सेक्युरिटी अँड रूरल डेवलपमेंट
    २४ ऑक्टोबर
    जागतिक पोलिओ दिन
    -          जोनस साल्क यांचा जन्मदिन. त्यांनी त्यांनी पहिली पोलिओची लस बनविली होती.
    २४ ऑक्टोबर
    संयुक्त राष्ट्र दिन
    -           
    ३१ ऑक्टोबर
    जागतिक बचत दिन
    -          संकल्पना :- अवर फ्युचर स्टार्ट्स वीथ सेविंग
    ३१ ऑक्टोबर
    राष्ट्रीय एकता दिन
    -           
    ३१ ऑक्टोबर
    जागतिक शहरे दिन
    -          संकल्पना :- नावीन्यपूर्ण प्रशासन, खुली शहरे



    #ImportantDays #MPSC #UPSC #महत्त्वाचेदिनविशेष 

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad