• New

    चालू घडामोडी: 16 ऑक्टोबर

    आयएनएस किल्तान भारतीय नौदलात दाखल 
    पाणबुडीविरोधी ‘आयएनएस किल्तान’ ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. खास पाणबुडी विरोधी तंत्रज्ञान आयएनएस किल्तानचे वैशिष्टय आहे. 
    शिवालिक, कोलकत्ता क्लास वर्गातील युद्धनौकानंतर आयएनएस किल्तान ही भारतातच विकसित करण्यात आलेली स्वदेशी बनावटीची युध्दनौका आहे. 

    • आयएनएस किल्तानची वैशिष्ट्ये: 
    - आयएनएस किल्तान हेवीवेट टॉर्पिडोज, एएसडब्ल्यू रॉकेटस, 76 एमएम कॅलिबर मिडियम रेंज गन, दोन 30 एमएम  मल्टी बॅरल गन्स, फायर कंट्रोल सिस्टम आणि मिसाईल सिस्टमने सुसज्ज आहे तसेच किल्तान युद्धनौकेवर समुद्राच्या पोटात शोध घेणारे अत्याधुनिक सोनार आणि हवाई हालचालींवर लक्ष ठेवणा-या रेवती या दोन रडार यंत्रण बसवण्यात आल्या आहेत.
    - कार्बन फायबरचा वापर करुन बांधण्यात आलेली ही भारतातील पहिली युद्धनौका आहे. कार्बन फायबरमुळे स्टेल्थ क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे शत्रूच्या रडारला चकवा देता येतो. त्यामुळे शत्रूच्या प्रदेशात घुसून हल्ला करणे सोपे होते.
    - लक्षद्विपमध्ये किल्तान नावाचे बेट आहे. त्यावरुन या युध्दनौकेला आयएनएस किल्तान नाव देण्यात आले आहे. दिल्लीपासून हे बेट 1,947 किलोमीटर अंतरावर आहे.
    -  भारतीय नौदलाच्या एका विभागाने आयएनएस किल्तानचे डिझाईन तयार केले. कोलकात्यातील गार्डन रिसर्च शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सने ही युद्धनौका बांधली आहे. 


    16 ऑक्टोबर: जागतिक अन्न दिन
    -          दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो.
    -          या दिवशी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषि संघटनेची स्थापना झाली होती.
    -          यावर्षीची थिम: स्थलांतरणाचे भविष्य बदला. अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासात गुंतवणूक करा. (Change the future of migration. Invest in food security and rural development)
    -          नोव्हेंबर 1979 मध्ये जागतिक अन्न दिनाची स्थापना करण्यात आली.
    -          16 ऑक्टोबर 1981 रोजी हा दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
    अन्न व कृषि संघटना (Food and Agriculture Organisation)
    -          संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था
    -          स्थापना : 16 ऑक्टोबर 1945
    -          यूनेस्कोची पालक संस्था
    -          मुख्यालय : रोम, इटली
    -          मोटो: ‘Let there be bread’
    -          सदस्य: 194 (EU सह)

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad