पोलिस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी बाबतीत..
शारीरिक चाचणीमध्ये खालील बाबींचा समावेश असेल :-
(1) धावणे - यासाठी उमेदवारास ८०० मीटर ( अर्धा मैल ) धावावे लागेल व त्यास खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील :- 
| संपूर्ण 800 मीटरचे अंतर धावण्यास लागणारा कालावधी (मिनिटांमध्ये ) | गुण | 
| २.३० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी .......................................................................... | 50 | 
| २.३० मिनिटांपेक्षा जास्त परंतु २.४०मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी .................................. | 44 | 
| २.४० मिनिटांपेक्षा जास्त परंतु २.५० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी ................................. | 3७.५ | 
| २.५० मिनिटांपेक्षा जास्त परंतु ३.०० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी ................................. | 31 | 
| ३.०० मिनिटांपेक्षा जास्त परंतु ३.१० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी ................................. | 25 | 
| ३.१० मिनिटांपेक्षा जास्त परंतु ३.२० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी ................................. | 19 | 
| ३.२० मिनिटांपेक्षा जास्त परंतु ३.३० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी ................................. | 12.5 | 
| ३.३० मिनिटांपेक्षा जास्त................................. ................................. .................. | ०० | 
     उमेदवार ८०० मीटरचे अंतर धावू न शकल्यास त्यास शून्य गुण देण्यात येतील.
(2) पुलअप्स - क्षितिज समांतर खांबावर उमेदवारास आठ पुलअप्स काढावे लागतील. यासाठी एकूण २० गुण देण्यात येतील म्हणजेच एका पुलअपसाठी २.५ गुण राहतील. उमेदवाराची छाती सहजपणे आडव्या खांबाला टेकल्यानंतर त्याने एक पुलअप् पूर्ण केला असे समजण्यात येईल असे करताना उमेदवाराने न झगडता आणी/अथवा आपले पाय न झाडता किंवा न वाकवता एक पुलअप् पूर्ण केल्यास त्यास पूर्ण 2.5 गुण देण्यात येतील. पुलअप् काढताना उमेदवारास झगडावे लागले आणि अथवा त्याने आपले पाय झाडले किंवा वाकवले तर एका गुणांपर्यंत गुण कमी होतील. जर उमेदवारास पुलअप् काढता आला नाही म्हणजेच त्याला त्याची छाती आडव्या खांबाला टेकवता आली नाही तर त्या पुलअपसाठी त्याला एकही गुण मिळणार नाही.
(3) गोळा फेक-उमेदवारास 7.260किलोग्रॅम वजनाचा गोळा फेकावा लागेल. गोळाफेकीसाठी खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील:-
| गोळाफेकीचे अंतर | गुण | 
| ७.५० मीटर किंवा जास्त ....................... ....................... | 15 | 
| ७.०० मीटर किंवा जास्त परंतु ७.५० मीटरपेक्षा कमी ............ ......... | 12.5 | 
| ६.५० मीटर किंवा जास्त परंतु ७.०० मीटरपेक्षा कमी............ ........... | 10 | 
| ६.०० मीटर किंवा जास्त परंतु ६.५० मीटरपेक्षा कमी ........... ............ | 7.5 | 
| ५.५० मीटर किंवा जास्त परंतु ६.०० मीटरपेक्षा कमी ........... ...... | 5 | 
| ५.०० मीटर किंवा जास्त परंतु ५.५० मीटरपेक्षा कमी ........... .... | 2.5 | 
| ५.०० मीटरपेक्षा कमी | ०० | 
(अ)गोळा फेकताना एक चूक क्षम्य असेल व त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाहीत.
(ब) गोळाफेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. उदा. जर गोळाफेकीचे अंतर 6 मीटर असेल तर उमेदवाराला 7.5 गुण देण्यात येतील.
(४) लांब उडी - यासाठी उमेदवाराला धावत येऊन लांब उडी मारावी लागेल. लांब उडीसाठी खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील:-
| उडीचे अंतर | गुण | 
| ४.५० मीटर किंवा जास्त ....................... ....................... .............. | 15 | 
| ४.३५ मीटर किंवा जास्त परंतु ४.५० मीटरपेक्षा कमी ............ .................... | 14 | 
| ४.२० मीटर किंवा जास्त परंतु ४.३५ मीटरपेक्षा कमी............ ........... | 12 | 
| ३.९० मीटर किंवा जास्त परंतु ४.२० मीटरपेक्षा कमी ........... ................ | 10 | 
| ३.६० मीटर किंवा जास्त परंतु ३.९० मीटरपेक्षा कमी ........... ............... | 08 | 
| ३.३० मीटर किंवा जास्त परंतु ३.६० मीटरपेक्षा कमी ........... ............. | 06 | 
| ३.०० मीटर किंवा जास्त परंतु ३.३० मीटरपेक्षा कमी........... .......... | 04 | 
| २.५० मीटर किंवा जास्त परंतु ३.०० मीटरपेक्षा कमी ......... ........... | 02 | 
| २.५० मीटरपेक्षा कमी........ ........ | ०० | 
उमेदवारास फक्त एकच उडी मारण्याची परवानगी राहील. उडी मारताना अपघात झाल्यास किंवा चूक, म्हणजे उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषेपलिकडे पहिले पाऊल टाकल्यास उमेदवारास एक जादा संधी देण्यात येईल व त्यासाठी गुण कमी केले जाणार नाहीत. जादा संधीचा फायदा घेताना पुन्हा चूक केल्यास वा अपघात घडल्यास उमेदवारास शून्य गुण देण्यात येतील. 
टीप-(1) वरील चाचणी प्रकारच्या सरावासाठी उमेदवारांना राज्यातील पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करता येईल. तसेच त्यांना पोलीस निदेशकाची मदत देण्यात येईल. परंतु यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपुर येथील पोलीस उप आयुक्त, पोलीस मुख्यालय आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा.
(2) शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण (म्हणजे 50 गुण) मिळणे आवश्यक आहे.
(3) सर्व चाचणीत एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास गुण Round Up करण्यासाठी त्यापुढील गुणाने पूर्णांकात करण्यात येऊन, शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल. 
                                                                                                        ******
                                                                                    परिशिष्ट - ब
                                                                             महिला उमेदवारांकरिता
                                                               पोलीस उप-निरीक्षक ) (मुख्य) परीक्षा- 2016
                                                        शारीरिक चाचणीमध्ये खालील बाबींचा समावेश असेल :-
(1) धावणे - यासाठी उमेदवारास 200 मीटर धावावे लागेल व त्यास खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील :-
| संपूर्ण 200 मीटरचे अंतर धावण्यास लागणारा कालावधी (सेकंदांमध्ये) | गुण | 
| ३५ सेकंद व त्यापेक्षा कमी.............................................................. | 40 | 
| ३५ सेकंदांपेक्षा जास्त - ३६ सेकंदपर्यंत ........................................... | 36 | 
| ३६ सेकंदांपेक्षा जास्त - ३७ सेकंदपर्यंत........................................ | 32 | 
| ३७ सेकंदांपेक्षा जास्त - ३८ सेकंदपर्यंत.................................. | 28 | 
| ३८ सेकंदांपेक्षा जास्त - ३९ सेकंदपर्यंत....................................... | 24 | 
| ३९ सेकंदांपेक्षा जास्त - ४० सेकंदपर्यंत........................................... | 20 | 
| ४० सेकंदांपेक्षा जास्त - ४१ सेकंदपर्यंत......................................... | 15 | 
| ४१ सेकंदांपेक्षा जास्त - ४२ सेकंदपर्यंत...................................... | 10 | 
| ४२ सेकंदांपेक्षा जास्त - ४३ सेकंदपर्यंत...................................... | 05 | 
| ४३ सेकंदांपेक्षा जास्त - ............................................ ..................... | ०० | 
 (2) चालणे - यासाठी उमेदवारास ३ किलोमीटर्सचे अंतर चालावे लागेल व त्यासाठी खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील :-
| ३ किलोमीटर्स चालण्यास लागणारा कालावधी (मिनिटांमध्ये) | गुण | 
| २३ मिनिटे व त्यापेक्षा कमी............................................ .................... | 40 | 
| २३ मिनिटांपेक्षा जास्त – २४ मिनिटांपर्यंत............................................ .... | 35 | 
| २४ मिनिटांपेक्षा जास्त – २५ मिनिटांपर्यंत............................................ .. | 30 | 
| २५ मिनिटांपेक्षा जास्त – २६ मिनिटांपर्यंत............................................ ...... | 22.5 | 
| २६ मिनिटांपेक्षा जास्त – २७ मिनिटांपर्यंत............................................ ... | 15 | 
| २७ मिनिटांपेक्षा जास्त - २८ मिनिटांपर्यंत............................................ .... | 7.5 | 
| २८ मिनिटांपेक्षा जास्त............................................ ......... .................... | ०० | 
चालणे :- उमेदवाराने चालताना धावण्याचा प्रयत्न केला तर तिला चालण्याच्या Event मधून बाहेर काढण्याचा किंवा तिचे सदर Event चे गुण कमी करण्याचा अधिकार समितीस राहिल. 
(3) गोळा फेक - उमेदवारास 4 किलो वजनाचा गोळा फेकावा लागेल. गोळाफेकीसाठी खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील :--
| गोळाफेकीचे अंतर (मीटरमध्ये) | गुण | 
| ६.०० मीटर व त्यापेक्षा जास्त............................. ......... ....................... | 20 | 
| ५.५० मीटर व त्यापेक्षा जास्त – ६.०० मीटरपेक्षा कमी......... ....................... | 17.5 | 
| ५.०० मीटर व त्यापेक्षा जास्त – ५.५० मीटरपेक्षा कमी......... ..................... | 15 | 
| ४.५० मीटर व त्यापेक्षा जास्त – ५.०० मीटरपेक्षा कमी......... ...................... | 12.5 | 
| ४.०० मीटर व त्यापेक्षा जास्त – ४.५० मीटरपेक्षा कमी......... ...................... | 7.5 | 
| ४.०० मीटरपेक्षा कमी ......... ......................... ......... ....................... | ०० | 
(अ) गोळा फेकताना एक चूक क्षम्य असेल व त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाहीत.
(ब)गोळाफेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. उदा. जर गोळाफेकीचे अंतर 5 मीटर असेल तर उमेदवाराला 15 गुण देण्यात येतील.
टीप:-(1) वरील चाचणी प्रकारच्या सरावासाठी उमेदवारांना राज्यातील पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करता येईल. तसेच त्यांना पोलीस निदेशकाची मदत देण्यात येईल. परंतु यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपुर येथील पोलीस उप आयुक्त, पोलीस मुख्यालय आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा.
(2) शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण (म्हणजे 50 गुण) मिळणे आवश्यक आहे. 
(3) सर्व चाचणीत एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास गुण Round Up करण्यासाठी त्यापुढील गुणाने पूर्णांकात करण्यात येऊन, शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल.
Source: www.mpsc.gov.in
 
 
 
 

कोणत्याही टिप्पण्या नाहीत