जर्मनीचे माजी चान्सलर हेल्मुट कोल यांचे निधन
* पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकीकरणात ऐतिहासिक भूमिका बजावणारे जर्मनीचे माजी चान्सलर हेल्मुट कोल यांचे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
अल्पपरिचय
- कोल हे १९८२ ते १९९८ या कालावधीत जर्मनीच चान्सलर होते.
- जर्मनीचे चान्सलरपद सर्वाधिक काळ भूषविण्याचा मान त्यांना मिळाला.
-अमेरिका व रशिया या दोन देशांच्या मधोमध उभारली गेलेली बर्लिन भिंत ही जर्मन नागरिकांसाठी भळभळणारी जखम होती. मात्र कोल यांनी चान्सलरपदाच्या कार्यकाळात नोव्हेंबर १९८९मध्ये या दोन्ही देशांचे एकीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
- युरोपीय देशांमध्ये ऐक्य असावे यासाठीही ते आग्रही होते.
- कोल हे दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वश्रेष्ठ युरोपीय नेते होते, अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी कोल यांचा गौरव केला होता.
- समस्त युरोपीय देशांचे एकच चलन असावे यासाठीही कोल हे आग्रही होते. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोई मिटरँड यांच्या साह्याने कोल यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली व युरो हे चलन अस्तित्वात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत