• New

    राजर्षी शाहू महाराज

    • जन्म: २६ जुलै १८७४
    • मूळ नाव - यशवंतराव
    • वडील - जयाशिंगराव आबासाहेब घाटगे
    • आईराधाबाई
    • १७ मार्च १८८४ - कोल्हापूरच्या आनंदीबाईसाहेब यांनी यशवंत यास दत्तक घेऊन शाहू असे नामकरण.
    • १८८५- १८८९ - राजकोट येथील राजकुमार कॉलेजात शिक्षण.
    • १८९०-९४ - धारवाड येथे शिक्षण
    • एप्रिल १८९१- बडोद्याच्या खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाईसाहेब यांच्याशी विवाह
    • एप्रिल १८९४ - कोल्हापूरच्या राज्याची सूत्रे हाती घेतली.
    • १८९५ - शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना
    • १८९९- वेदोक्त प्रकरण
    • २६ जुलै १९०२ - मागासवर्गीयासाठी ५० % आरक्षण.
    • १९०६ - शाहू छत्रपती स्पिनिंग आणि विव्हिंग मिल ची स्थापना
    • १९०७ - सहकारी तत्वावर कापड गिरणी उभी केली.
    • १९०७- अस्पृश्य विध्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह. मराठा विध्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया वसतिगृह
    • १९०८- भोगावती नदीवर राणी लक्ष्मीबाई तलाव
    • १९११ - सत्यशोधक समाजाची स्थापना.
    • १९११- पंचम जॉर्जच्या राज्याभिशेकाबद्दल दरबार भरवून आनंद व्यक्त केला
    • १९१३- कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा सुरु.
    • सप्टेंबर १९१६ - सक्तीच्या शिक्षणाचा कायदा
    • १९१७- विधवा पुनर्विवाह हा कायदा पास केला.
    • १९१७- मोफत सक्तीचे शिक्षण लागू ( ते १४ वर्ष)
    • १९१८- कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा सुरु.
    • २७ जुलै १९१८ - हजेरी पद्धत बंद
    • १५ सप्टेंबर १९१८ - कुलकर्णी वतने नष्ट केली
    • १२ जुलै १९१९- कोल्हापूर इलाख्यातील विवाहासंबंधी कायदा.
    • ऑगस्ट १९१९ - क्रुरपनाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदा
    • जून १९२० - शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद @ नागपूर.
    • जुलै १९२०- मराठा पुरोहित तयार करण्यासाठी 'श्री शिवाजी वैदिक विद्यालय' सुरु.
    • १२ ऑक्टोबर १९२० - क्षात्रजगद्गुरु संबंधीचा जाहीरनामा प्रसिद्ध
    • मे १९२१ -महार वतन खालसा  (१९५८ मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कायदा करून महार वतनाचा शेवट केला.)
    • देवदासी प्रतिबंध कायदाही केला.
    • कोल्हापुरातील शिवाजी क्लब या क्रांतिकारी संघटनेला त्यांनी दरवर्षी ५०० रुपयाची आर्थिक मदत केली.
    • क्रांतिकारकांनी काढलेल्या वनिता वस्त्र भांडार मधून ते दरवर्षी संस्थानाची सरकारी कापड खरेदी करत.
    • रखमाबाई केळवकर यांना शिक्षणाधिकारी म्हणून नेमले.
    • शाहू महाराजांनी शिक्षणात सर्वाधिक प्राधान्य महत्व प्राथमिक शिक्षणाला दिले.
    • पाटील तलाठी शाळा सुरु.
    • लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूल सुरु.
    • गंगाराम कांबळे या महार व्यक्तीला 'सत्यसुधारक हॉटेल' टाकून दिले.
    • महाराजांनी गुरुकुलात कर्नल वुड हाउस या नावाने अनाथालय स्थापन केले.
    • चिरोलच्या 'इंडियन अनरेस्ट' या ग्रंथाचा मराठी अनुवाद करून त्याच्या प्रती मोफत वाटल्या.
    • " नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत " असा धनंजय कीर यांनी शाहू महाराजांचा गौरव केला.
    • पाचशे लोकवस्तीवरील प्रत्येक गावात शाळा काढली.
    • दरवर्षी सरकारी महसुलापैकी सहा टक्के खर्च शिक्षणावर.
    • १९१२- पाटील शाळा - दिल्ली दरबार पाटील शाळा असे नाव दिले.
    • २७ डिसेंबर १९१७ - अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे ११ वे अधिवेशन @ खामगाव. अध्यक्ष: शाहू
    • भारतातील विध्यार्थी वसतिगृहाचे अद्य जनक
    • मृत्यू : मे १९२२




    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad