व्हीव्हीआयपी संस्कृतीला पायबंद!
देशात सर्वत्र बोकाळलेल्या व्हीव्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाल दिव्यांच्या वाहनांना प्रतिबंध घालण्याचा दूरगामी परिणाम करणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय १ मेपासून लागू होणार असून, खुद्द पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मोटारीसाठी लाल दिवा न वापरण्याचे ठरविले आहे. सन २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केवळ घटनात्मक पदांवरील व्यक्तींनाच लाल दिवा वापरण्याची मुभा दिली होती.
महत्त्वाची मुद्दे
> येत्या १ मेपासून देशात कोणीही व्यक्ती लाल दिव्याच्या गाडीत बसून फिरू शकणार नाही.
> या निर्णयाला कोणीही अपवाद नसेल
> राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, देशाचे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, राज्यांचे मुख्यमंत्रीही लाल दिव्याची गाडी वापरू शकणार नाहीत.
> केवळ आणीबाणीच्या परिस्थितीत सेवा प्रदान करणाऱ्या अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि पोलिस व्हॅनला निळे दिवे लावण्याची परवानगी असेल.
संबंधित तरतुदी
> केंद्र आणि राज्य सरकारने ठरविलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी लाल दिव्याच्या गाड्यांशी संबंधित १९८९ च्या केंद्रीय मोटरवाहन कायद्यातील नियम १०८ (१) (३) संपुष्टात आणला जाणार आहे.
> नियम १०८(२) नुसार कोणत्या वाहनांना निळे दिवे लावायचे हा अधिकार राज्य सरकारांना असतो. आता त्यातही बदल करण्यात आला.
प्रतिष्ठेचे दिवे...
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या पोटनियम १०८ नुसार विविध पदांवरील व्यक्तींच्या वाहनांना विशिष्ट दिवे वापरण्याची परवानगी देण्यात आली होती.
> लाल दिवा फ्लॅशरसह :
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, विधान परिषदेचे सभापती, विधानसभा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, विधिमंडळ विरोधी पक्षनेता
> लाल दिवा फ्लॅशरविना :
विधान परिषदेचे उपसभापती, विधानसभेचे उपाध्यक्ष, सर्व राज्यमंत्री, राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष, मुख्य सचिव, महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयोग आयुक्त, लोकायुक्त, उप लोकायुक्त, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष, वैधानिक विकास मंडळांचे अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, मुख्य माहिती आयुक्त
> अंबर दिवा फ्लॅशरविना :
अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, अपर मुख्य सचिव पदाच्या समकक्ष अधिकारी, पोलिस महासंचालक, महासंचालकांच्या समकक्ष अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, अ आणि ब वर्ग महापालिकांचे महापौर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, विभागीय आयुक्त, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, अ आणि ब वर्ग महापालिकांचे आयुक्त
> निळा दिवा फ्लॅशरविना :
जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी/तहसीलदार, पोलिसांची वाहने
> रुग्णवाहिका :
जांभळ्या काचेत बंद-सुरू होणारा दिवा. आतल्या दिव्याला लाल रंग असावा
> अग्निशमन वाहने :
लाल फ्लॅशरसह अंबर दिवा
> व्हीआयपी एस्कॉर्ट, पायलट कार :
स्थिर सुरू राहणारा निळा दिवा
Join our telegram channel telegram.me/mpscmantra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत