• New

    चालू घडामोडी : 14 एप्रिल 2017

    जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल गिरीश चंद्र सक्सेना यांचे निधन
    जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल गिरीश चंद्र सक्सेना यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. सक्सेना हे भारतीय पोलिस सेवेचे 1950 च्या बॅचचे मध्यप्रदेश केडरचे अधिकारी होते. त्यांनी दोन वेळा जम्मू आणि काश्मीरच्या राज्यापालपदाची भूमिका बजावली होती. पहिल्यांदा 26 मे 1990 ते 13 मार्च 1993 आणि दुसर्‍यांदा 1998 ते 2003. सक्सेना हे 1983 ते 1986 दरम्यान रॉ (RAW) चे प्रमुखही होते. पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लागारही होते.


    भीम आधार व्यासपीठ
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथून ‘भीम-आधार’ सेवेचा प्रारंभ केला. भीम-आधार व्यासपीठ हे भीम या अप्लिकेशनचे व्यापारी अंग असून आधार व्यासपीठावर आधारित डिजिटल व्यवहाराला प्रोसतहान देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.


    अमेरिकेचा प्रथमच सर्वात शक्तिशाली अणुविरहित महाबॉम्बचा हल्ला
    अमेरिकेच्या लष्कराने  अफगाणिस्तानमधील ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेच्या तळावर प्रथमच सर्वात शक्तिशाली अणुविरहित महाबॉम्बचा हल्ला केला. अमेरिकेच्या एमसी-130 या विमानातून डागण्यात आलेल्या या जीबीयू-43 अर्थात ‘एमओएबी’चे (मदर ऑफ ऑल बॉम्ब्स) वजन तब्बल 21 हजार 600 पाऊंड (नऊ हजार आठशे किलो) होते.

    एमओएबी बद्दल
    * पूर्ण नाव : ‘मॅसि‍व्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट
    * वजन : 9800 किलो
    * 20 फुट लांब
    * मार्च 2003 मध्ये पहिल्यांदा चाचणी
    * मदर ऑफ ऑल बॉम्ब म्हणून ओळख
    रशियाने ‘Aviation Thermobaric Bomb of Increased Power’ ज्याचे टोपण नाव ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ असे होते त्याची 2007 मध्ये चाचणी घेतली. तो एमओएबीपेक्षा 4 पट शक्तीशाली होता.             


    नेपच्यूनच्या आकाराचा हरवलेला ग्रह सापडला
    नेपच्यूनच्या आकाराचा हरवलेला ग्रह खगोलशास्त्रज्ञांना पृथ्वीपासून तीन हजार प्रकाशवर्षे अंतरावर सापडला आहे. नवीन ग्रहाचे नाव केप्लर १५० एफ असे असून त्याच्याकडे गेली अनेक वर्षे कुणाचे लक्ष गेले नव्हते, असे येल विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.
    > केप्लर १५० एफ या ग्रहाला त्याच्या ताऱ्याभोवती फिरण्यास ६३७ दिवस लागतात.
    >  केप्लर मोहिमेत चार ग्रह सापडले असून त्यात केप्लर १५० बी, सी,डी व इ यांचा समावेश आहे. 

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad