• New

    चालू घडामोडी : 6 मार्च 2017

    आयएनएस विराट भारतीय नौदलातून निवृत्त
    जगात सर्वाधिक काळ सक्रिय असलेल्या युद्धनौकेचा मान मिळविल्यानंतर आयएनएस विराट ही विमानवाहू युद्धनौका 6 मार्च 2017 रोजी भारतीय नौदलातून निवृत्त झाली.
    आयएनएस विराटची वैशिष्ट्ये
    -          भारतीय नौदलाची दुसरी विमानवाहू युद्धनौका
    -          युनायटेड किंगडमकडून 465 मिलीयन डॉलर किमतीत विकत घेण्यात आलेल्या आयएनएस विराटचे जुने नाव एचएमएस हर्मस असे होते.
    -          द्वितीय विश्‍वयुद्धादरम्यान 1943 साली या युद्धनौकेचा आराखडा तयार करण्यात आला होता.
    -          विकर्स शिपयार्ड येथे 1959 साली तयार करण्यात आलेली एचएमएस हर्मस ही युद्धनौका 1959 ते 1970 दरम्यान युकेसाठी आघाडीची युद्धनौका राहीली होती.
    -          आयएनएस विराटने तब्बल 30 वर्षे देशसेवा बजावली.
    -          1977 साली या युद्धनौकेत पहिल्या हॅरीयर या लढाऊ विमानाने झेप घेतली.
    -          1981 साली सुमारे शंभर दिवस चाललेल्या फॉल्कलॅण्ड युद्धात युकेपासून 9000 समुद्री मैल लांब अर्जेंटीना सोबत झालेल्या युद्धात ब्रिटीश लष्कर आणि नौदलाच्या कारवाईची सूत्रे एचएमएस हर्मस्‌वरुन हालली.
    -          फॉल्कलॅण्ड मध्ये लष्कराच्या साथीने केलेल्या संयुक्त कारवाईची पुनरावृत्ती करण्याची संधी आयेनएस विराटचा पुनश्‍च 1989 साली. श्रीलंकेत पेटलेल्या रणात गढवाल रायफल्सच्या जवानांना श्रीलंकेत नेण्याची कामगिरी विराटला सोपविण्यात आली.
    -          आयएनएस विराट या युद्धनौकेला आत्तापर्यंत 22 कमांडर लाभले आहेत. 8 मे 1987 साली कॅप्टन विनोद पसरीचा यांनी या युद्धनौकेचे पहिले कमांडरपद भुषवले होते.
    -          देशाच्या आत्तापर्यंतच्या 23 नौदलप्रमुखांपैकी 5 जणांनी आयएनएस विराटचे कमांडर म्हणून काम पाहीले आहे. यात ऍडमीरल (नि.) माधवेंद्र सिंग (तत्कालीन कॅप्टन) हे पहिले. ऍडमिरल माधवेंद्र सिंग ( 16 डिसेंबर 88 ते 30 ऑग. 90), ऍडमिरल अरूण प्रकाश (31 ऑगस्ट 90 ते 26 डिसें. 91), ऍडमिरल निर्मलकुमार वर्मा (9 नोव्हें. 1996 ते 13 डिसें. 97), ऍडमिरल डि. के. जोशी (17 डिसें. 2001 ते 8 जाने. 2003), ऍडमिरल गिरीश लुथरा (17 मे 2006 ते 11 ऑगस्ट 07)
    -          भारतीय नौदलात 1 जुलै 1987 साली दाखल झालेले कॅप्टन पुनीत चड्डा हे आयएनएस विराटचे शेवटचे कर्णधार ठरले आहेत.
    दृष्टिक्षेपात विराट
    -          जलमेव यस्य बलमेव तस्य हे घोषवाक्‍य
    -          सी किंग (ब्रिटीश बनावट) कमोव्ह 31 (रशियन), धृव (भारतीय) हेलीकॉप्टरचे आयएनएस विराटवर वास्तव्य
    -          22,622 तासांच्या जंबो हवाई उड्डाण
    -          2282 दिवस समुद्रात घालवले
    -          10 लाख 94 हजार 215 किलोमीटरचा एकूण जलप्रवास
    -          चालू स्थितीत असलेल्या सगळ्यात जुनी विमानवाहू युद्धनौका म्हणून गिनीज बुकात नोंद
    -          युद्धाभ्यास मलबार (अमेरिका) युद्धाभ्यास वरूणा (फ्रान्स)
    -          नसीम अल बहार (ओमान) याशिवाय अन्य युद्धाभ्यासात सहभाग
    -          पश्‍चिमी ताफ्याची सर्वोत्तम नौका म्हणून चारवेळा गौरव
    -          सलग तीन महिने समुद्रात मुक्कामी राहण्याची क्षमता
    -          9 मेगावॉट वीजनिर्मिती करणारी यंत्रणा विराटमध्ये
    -          220 मी. लांब, 45 मीटर रुंद

    शासनाच्या शालेय शिक्षण खात्याने जिल्हा परिषद शाळांत डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेतील शाळांत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी वाचन कट्टा अर्थात ग्रंथालये निर्माण करण्याचा शालेय शिक्षण  विभागाने जुलै २०१६ मध्ये निर्णय घेतला.

    जर्मनीची कार निर्मिती कंपनी मर्सिडीजने जगभरातील १० लाख कार परत मागवल्या आहेत. कारमध्ये आग आणि ओव्हरहीट यामुळे होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.

    सुनीत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स
    ·       महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने सलग दुसऱ्यांदा भारत श्रीशरीरसौष्ठव स्पध्रेत जेतेपदाचा चषक उंचावला असून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचाकिताब पटकावला. सुनीतने नुकतेच सलग चौथ्यांदा महाराष्ट्र श्रीवरही कब्जा केला होता.
    ·       महिला शरीरसौष्ठव स्पध्रेत मणिपूरच्या सरिता थिंगबजम सलग दुसऱ्यांदा मिस इंडियाचा बहुमान पटकावला, तर फिजिक स्पोर्टस् प्रकारात संजना आणि सुमित बॅनर्जीने सुवर्ण यश मिळवले.

    नारी शक्ती पुरस्कार 2016
    ·       महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या  निवड समितीने नारी शक्ती पुरस्कार 2016साठी  देशभरातून 31 नावे निश्चित  केली आहेत. यात महाराष्ट्रातल्या मुमताझ काझी आणि रीमा साठे यांचा समावेश आहे.
    ·       मुमताझ काझी या  आशियातल्या पहिल्या महिला डिझेल रेल्वेचालक  आहेत. त्यांना 20 वर्षांचा अनुभव असून गर्दीने खचाखच भरलेली रेल्वेगाडी त्या लीलया चालवतात.  आपल्या कामातून त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे.
    ·       रीमा साठे या हॅपी रुटस्‌च्या संस्थापक आहेत. विदर्भात पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचा मार्ग दाखवला आहे. त्यांनी 12 हजार छोटया आणि आदिवासी शेतकऱ्यांचे थेट कृषि उत्पादन सोर्सिंग नेटवर्क विकसित केले आहे.

    दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक डॉ.ई.वायुनंदन यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी डॉ.वायुनंदन यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ.वायुनंदन यांची नियुक्ती पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.

    नुकतेच अरुणाचल प्रदेशमधील पहिले नागरी हवाई विमानतळ तेजूचे बांधकाम पूर्ण झाले आहे.




    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad