• New

    चालू घडामोडी : 7 मार्च 2017

    माजी लोकसभा अध्यक्ष रबी राय यांचे निधन
    ·       माजी लोकसभा अध्यक्ष रबी राय यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी ६ मार्च २०१७ रोजी कटक येथे निधन झाले.
    अल्पपरिचय
    -          जन्म: २६ नोव्हेंबर १९२६
    -          शिक्षण : इतिहास विषयात पदवी, मधुसूदन लॉ कॉलेजमधून लॉची पदवी.
    -          १९८४ मध्ये समाजवादी पक्षात सहभाग
    -          १९५३-५४ : अखिल भारतीय समाजवादी युवक सभेचे संयुक्त सचिव
    -          १९५६ मध्ये त्यांनी राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली ओदिशामध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली.
    -          १९६७ मध्ये ओडिशातिल पुरी मतदारसंघातून लोकसभेवर
    -          १९७४ मध्ये ओडिशामधून राज्यसभेवर
    -          मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात जानेवारी १९७९ ते जानेवारी १९८० दरम्यान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
    -          १९८९ मध्ये जनता दलाकडून केंद्रपडा मतदार संघातून लोकसभेवर
    -          १९ डिसेंबर १९८९ रोजी नवव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी

    भारत आणि यूएन-वुमन यांच्यात सामंजस्य करार
    ·       केंद्रीय कॅबिनेटने भारत आणि संयुक्त राष्ट्राची लिंग समानता आणि महिला सशक्तीकरणासंबंधित असलेली संस्था यूएन-वूमन यांच्यातील सामंजस्य कराराला मान्यता दिली आहे.
    ·       या कररांतर्गत केंद्रीय पंचायत राज मंत्रालय यूएन-वूमनच्या साह्याने पंचायत राज संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासंदर्भात काम करणार आहेत.
    काय आहे करारात?
    -          कायदे, धोरणे आणि कार्यक्रमाद्वारे,लिंग समानतेसाठी पंचायत राज संस्थांसह ,संबंधित संस्थांच्या क्षमता मजबूत करण्यासाठी पंचायत राज मंत्रालयाला तांत्रिक सहाय्य  पुरवण्यासंदर्भातला हा प्रस्ताव आहे.
    -          निवडून आलेल्या  महिला प्रतिनिधीच्या क्षमता वृद्धीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पंचायत राज संस्थांमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी पंचायत मंत्रालय आणि यूएन -वूमेन यांनी सहयोगाने कार्य करायचा निर्णय घेतला आहे.
    -           आंध्र प्रदेश,तेलंगणा,ओडिशा,कर्नाटक,राजस्थान आणि मध्य प्रदेश या सहा राज्यात जिल्हा आणि उप जिल्हा स्तरावर या सामंजस्य करारांतर्गत कृती अंमलबजावणी  करण्यात येईल.

    आशिया पॅसिफिक देशांमध्ये लाच देण्याच्या बाबतीत भारत अव्वल
    ·       आशिया पॅसिफिक देशांमध्ये लाच देण्याच्या बाबतीत भारत अव्वलस्थानी असल्याचे ट्रान्सपरेंसी इंटरनॅशनलच्या सर्व्हेमधून निष्पन्न झाले आहे. अहवालनुसार भारतातील 69 टक्के नागरिकांना कधी ना कधी लाच द्यावी लागते.    त्यापाठोपाठ व्हिएतनाममध्ये लाच मागणाऱ्यांचे प्रमाण ६५ टक्के आहे.
    अहवालातील अन्य मुद्दे
    -          सार्वजनिक सेवा सुविधा धेण्यासाठी तब्बल दोन तृतियांश  भारतीयांना लाच द्यावी लागते
    -          भारतातील 69 टक्के नागरिकांनी आपल्याला कधी ना कधी लाच द्यावी लागल्याचे सांगितले.
    -          व्हिएतनाममधील 65 टक्के लोकांनी आपल्याला लाच द्यावी लागल्याचे कबूल केले.
    -          पाकिस्तानमध्ये लाचखोरीचे प्रमाण भारतापेक्षा कमी आहे.  पाकिस्तानमधील 40 टक्के लोकांनी आपल्याला लाच द्यावी लागल्याची माहिती दिली.
    -          जपान आणि दक्षिण कोरियामध्ये लाचखोरीचे प्रमाण सर्वात कमी आहे.
    -          या सर्व्हेनुसार भारत लाचखोरीच्याबाबतीत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जपान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनंतर सातव्या स्थानी आहे.

    हैदराबाद विमानतळ जगातील सर्वोत्तम विमानतळ
    ·       भारतातील हैदराबाद विमानतळ जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरलं आहे. एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनलतर्फे (एसीआय) ही निवड करण्यात आली आहे.
    ·       विमानतळावर मिळणार्‍या सुविधेच्या (एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी) आणि विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येच्या आधारे ही निवड केली जाते.
    ·       याद्वारे 50 लाख ते दीड कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या यादीत हैदराबादमधील जीएमआर आंतरराष्ट्रीय विमातळाने 2016 मधील जगातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.
    ·       वर्षाला चार कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या गटात दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये पहिल्या स्थानी दक्षिण कोरियातील विमानतळाचा नंबर लागला आहे.

    देशातील सर्वाधिक लांबीच्या केबल ब्रिजचे उद्घाटन
    ·       गुजरातमध्ये नर्मदा नदीवर भडोचमध्ये बांधलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या केबल ब्रिजचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते 7 मार्च 2017 रोजी  करण्यात आले आहे.
    ·       १३४४ मीटर लांब२०.८ मीटर्स रुंदीच्या या केबल पुलाचे काम २ वर्षांत पूर्ण झाले असून त्यासाठी ३७९ कोटींचा खर्च झाला आहे.

    महिलांसाठी विमानांमध्ये आरक्षित जागा
    ·       एअर इंडियानंतर आता स्पाईसजेटनेही एकट्याने प्रवास करणार्‍या महिलांसाठी आरक्षित जागा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बोईंग 737s आणि Q-400s ची चौथी रांग महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
    ·       महिलांसाठी आरक्षित जागा ठेवण्याची सुरुवात एअर इंडियाने केली. गतवर्षी 18 जानेवारीपासून एअर इंडियाने आंतरदेशीय विमानांमधील इकॉनॉमिक क्लासमध्ये एकट्याने प्रवास करणा-या महिलांसाठी एक रांग म्हणजेच सहा जागा आरक्षित ठेवल्या.

    प्रदूषणामुळे दरवर्षी पाच वर्षांखालील १७ लाख बालकांचा मृत्यू
    ·       प्रदूषणामुळे दरवर्षी पाच वर्षांखालील १७ लाख बालकांचा मृत्यू होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या ६ मार्च २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
    ·       प्रदूषित हवा, अप्रत्यक्ष धूम्रपान, असुरक्षित पाणी, स्वच्छतेचा अभाव यामुळे दरवर्षी १७ लाख बालके प्राण गमावतात, असे या अहवालात म्हटले आहे.
    अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
    -          एक महिना ते पाच वर्षांदरम्यानच्या बहुतांश बालकांचे मृत्यू मलेरिया, न्यूमोनिया आणि डायरियामुळे होतात.
    -          सुरक्षित पाणी आणि स्वयंपाकाच्या स्वच्छ इंधनाचा वापर करून हे आजार टाळता येऊ शकतात.
    -          5.70 लाख बालकांचा न्यूमोनिया यासारख्या श्वसनप्रणालीच्या संसर्गामुळे मृत्यू होतो. प्रदूषित हवा, तसेच धूम्रपान करणाऱ्यांचा संपर्क यामुळे हे होते.
    -          2.70 लाख बालकांचा मुदतपूर्व प्रसूती, प्रदूषणांमुळे होणारे संसर्ग यामुळे मृत्यू होतो. आरोग्य केंद्रांत स्वच्छ पाणी, स्वच्छता, प्रदूषण कमी करण्याने हे मृत्यू टाळू शकतो.
    -          02 लाख मुलांचा दरवर्षी मलेरियामुळे मृत्यू होतो. डासांची उत्पत्तीस्थाने कमी करून तद्वतच पिण्याचे पाणी झाकून ठेवून आपण हे मृत्यू टाळू शकतो.
    -          02 लाख मुले उंचावरून पडून, विषबाधा होऊन किंवा पाण्यात बुडून दरवर्षी मृत्युमुखी पडता

    देशातील रोजगाराच्या संधी वाढत नसल्याचे ओसीईडीच्या अहवालातून समोर
    ·       भारताची अर्थव्यवस्था जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढत आहे. मात्र रोजगाराचा विचार केल्यास भारतातील स्थिती वाईट असल्याचे ओसीईडीच्या अहवालातून समोर आले आहे.
    ·       ओसीईडीच्या अहवालानुसार यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ७% आहे.
    अहवालातील अन्य मुद्दे
    -          देशातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील तब्बल ३० टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांकडे रोजगार आणि पुरेसे शिक्षण किंवा रोजगाराभिमुख प्रशिक्षण नाही.
    -          बेरोजगारी आणि अपुरे शिक्षण झालेला युवा वर्ग ही भारतासमोरील मोठी समस्या आहे.
    -          भारताची लोकसंख्या वेगाने वाढते आहे. मात्र त्या तुलनेत रोजगाराच्या संधी वाढत नाहीत.
    -          नोकऱ्यांची उपलब्धता नसल्याने तरुण वर्गाकडून शिक्षणाला फारसे प्राधान्य दिले जात नाही.
    -          भारतातील कामगार कायदे अतिशय जटिल आहेत.

    तेल साठवणूक आणि व्यवस्थापनाविषयी यूएई सोबतच्या कराराला मान्यता
    ·       तेल साठवणूक आणि व्यवस्थापनाविषयी, इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह, आयएसपीआरएल  आणि यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती मधल्या अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी यांच्यातल्या अंतिम करारावर स्वाक्षऱ्या करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
    ·       या करारानुसार, अबू धाबी कंपनी 0.81  एम एम टी अथवा 5,860,000 दशलक्ष कच्च्या तेलाची  पिंपे  आयएसपीआरएलच्या मंगलोर इथल्या साठवणूक केंद्राला पुरवणार आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती हे धोरणात्मक भागीदार आहेत.

    नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारत आणि पोर्तुगाल यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने  मंजुरी  दिली आहे. या वर्षीच्या  6 जानेवारीला या सामंजस्य करारावर  नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. या करारामुळे उभय देशातील सहकार्य अधिक मजबूत व्हायला मदत होणार आहे.


           

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad