• New

    चालू घडामोडी : 2 मार्च 2017

    स्वदेशी लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
    समद्रसपाटीपासून ठराविक उंचीवरून मारा करणाऱ्या शत्रुच्या कोणत्याही आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा लक्ष्यभेद करण्याची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्राची अब्दुल कलाम बेट, ओडिशा येथे भारताने 2 मार्च 2017 रोजी यशस्वीपणे चाचणी घेतली. चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या (ITR) प्रक्षेपक केंद्र क्रमांक तीनमधून एक पृथ्वी क्षेपणास्त्र सोडण्यात आले होते. त्या क्षेपणास्त्राविरोधात ही नवी लक्ष्यभेदी यंत्रणा तपासण्यात आली. देशांतर्गत विकसित केलेले संपूर्ण स्वदेशी बनावटीचे हे स्वानातीत क्षेपणास्त्र आहे.

    2050 मध्ये भारतात सर्वाधिक मुस्लिम असणार
    ·       जगामध्ये मुस्लिम धर्माच्या लोकसंख्येची वेगाने वाढ होत असून, सन 2050 मध्ये भारतात सर्वाधिक मुस्लिम असणार आहेत, असे अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने अहवालात म्हटले आहे. अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने जगभरातील लोकसंख्येवर आधारीत अहवाल तयार केला आहे.
    काय आहे अहवालात?
    -          जगामध्ये ख्रिश्चन धर्माच्या लोकसंख्येनंतर मुस्लिमांच्या लोकसंख्येचा क्रमांक आहे.
    -          ख्रिश्चन लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढत आहे.
    -          सन 2050 मध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असणार आहे.
    -          विशेष म्हणजे जगामध्ये सर्वाधिक मुस्लिम भारतात असणार असून, त्यांचा वयोगट 30 असणार आहे.
    -          जगातील लोकसंख्येच्या तुलनेट मुस्लिम धर्माची लोकसंख्या 23 टक्के एवढी आहे.
    -          भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इराण व तुर्कीमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी आहे.
    -          इंडोनेशियामध्ये सध्या सर्वाधिक मुस्लिम नागरिकांची राहात आहेत.

    बीसीसीआय पुरस्कार 2017
    ·       सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार : पद्माकर शिवलकर, राजिंदार गोयल.
    ·       बीसीसीआय जीवनगौरव पुरस्कार : कै. रमाकांत देसाई, व्हीव्ही कुमार
    ·       पॉली उम्रीगर सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या पुरस्कार : विराट कोहली. कोहलीला हा पुरस्कार तिसऱ्यांदा मिळत असून २०११-१२ व २०१४-१५ ला त्याला उम्रीगर पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
    ·       रणजी मधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा लाला अमरनाथ पुरस्कार : जलज सक्सेना (मध्य प्रदेश)
    ·       दिलीप सरदेसाई पुरस्कार : आर. अश्विन.  देऊन गौरविण्यात येणार आहे. अश्विनची सरदेसाई पुरस्कार जिंकण्याची दुसरी वेळ आहे.
    ·       मुंबई क्रिकेट असोसिएशनचा २०१५-१६ या वर्षातील सर्वोत्तम संघटना म्हणून गौरव करण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईने रणजी विजेतेपद, सी. के. नायडू ट्रॉफी, महिलांचे प्लेट ग्रुपमधील विजेतेपद तसेच कूच बिहार, विजय मर्चंट व महिलांच्या एलिट गटातील वनडेचे उपविजेतेपदही जिंकले होते.

    महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
    ·       फ्लाय अॅश उपयोगितेबाबत कमाल पातळीची बांधिलकी जोपासण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धतींचा वापर करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल महानिर्मितीला फ्लाय अॅश राष्ट्रीय परिषदेत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
    ·       महानिर्मितीच्यावतीने महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किरण माथुरकर यांनी स्वीकारला.
    ·       वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार यांचे विद्यमाने देशातील औष्णिक वीज केंद्रांतून निर्माण होणाऱ्या फ्लाय अॅश उपयोगीतेबाबत दोन दिवसीय सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे हॉटेल ताज नवी दिल्ली येथे २७ व २८ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते.
    ·       औष्णिक विद्युतनिर्मिती प्रकल्पातील राखेच्या वापरासंबंधीचे धोरण-२०१६ महाराष्ट्र राज्याने तयार करून त्याची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

    कलवरीवरुन डागण्यात आले पहिले वहिले जहाज-भेदी क्षेपणास्त्र
    ·       भारतीय नौदलाने अरबी समुद्रात स्वदेशी बनावटीच्या कलवरी श्रेणीतल्या पहिल्या पाणबुडीवरुन जहाज-भेदी क्षेपणास्त्राची पहिली-वहिली यशस्वी चाचणी 2 मार्च 2017 रोजी केली.
    ·       ही क्षेपणास्त्र चाचणी केवळ स्कॉर्पेन श्रेणीतल्या स्वदेशी बनावटीच्या पाणबुड्यांसाठीच महत्वाची नसून, भारतीय नौदलाच्या पाण्यातून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या क्षमतेत भर घालणारी आहे.
    ·       भारतात बांधण्यात येणाऱ्या कलवरी श्रेणीतल्या सर्व सहा पाणबुड्यात ही जहाज-भेदी क्षेपणास्त्र तैनात करण्यात येतील.


    संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी 2016 या वर्षासाठी सशस्त्र दल वैद्यकीय सेवेतील सर्वोत्कृष्ट सेवा रुग्णालय म्हणून मुंबईतल्या आयएनएचएस अश्विनीला रक्षा मंत्री चषक प्रदान केला.पुण्यातील कमांड रुग्णालय (दक्षिण विभाग) आणि उधमपूरचे कमांड रुग्णालय (उत्तर विभाग) यांना विभागून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा व इतर महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी इच्छुक असून पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक प्रत्यक्ष यावी यासाठी राज्य शासन व ऑथॉरिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संयुक्त कार्य समिती स्थापन करण्याचे  ठरविण्यात आले.

    चांदा ते बांदा योजना
    चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिसोर्स बेस्ड प्लानिंग आणि डेव्हलपमेंट हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यासाठी चांदा ते बांदा ही योजना वन विभागांतर्गत राबविण्यास नियोजन विभागाने २८ जून २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. या योजनेतील वन विभागाशी संबंधित कामे करण्यासाठी विभागाने दि. २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये १० कोटी १७ लाख रुपयांचा निधी वितरित आणि खर्च करण्यास मान्यता दिली आहे. राज्यमंत्री वित्त व नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली या पथदर्शी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी समिती नेमण्यात आली असून वन विभागांतर्गत योजनेमध्ये विविध प्रकारची कामे केली जाणार आहेत.

    राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर
    ·       राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
    ·       राज्यातील/जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, युवा विकासाचे कार्य करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित मिळावे यासाठी दरवर्षी युवा पुरस्कार देण्यात येतात.
    ·       जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती तसेच नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहे. तर राज्यस्तर युवा पुरस्कार क्रीडा विभागाचे क्षेत्रीय विभागानुसार प्रत्येक विभागातील एक युवक, एक युवतीस तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहे.
    ·       राज्य पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख 50 हजार रुपये असे आहे. तर संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख 1 लाख रुपये असे आहे.
    ·       राज्य युवा पुरस्कार सन 2014-15 आणि 2015-16 करिता क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने क्रीडा विभागाच्या आठ विभागातून प्रत्येकी आठ युवक, आठ युवती आणि आठ संस्थाची निवड केली आहे.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad