• New

    चालू घडामोडी : 1 मार्च 2017


    राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वे-4 (NFHS-4) चे अनावरण
    केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2015-16 साठी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वे-4 (NFHS-4) चे अनावरण केले आहे. यामध्ये 2015-16 दरम्यान अर्भक मृत्यूदर जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तरासह अन्य महत्त्वाच्या आरोग्य निर्देशकामध्ये सकारात्मक कल दर्शविला आहे. सहा लाख कुटुंब, सात लाख महिला आणि 1.3 लाख पुरुषांच्या माहितीवरून हा सर्वे घेण्यात आला. विशेष म्हणजे पहिल्यांदाच यामध्ये जिल्हावार अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
    महत्त्वाची मुद्दे
    ·       अर्भक मृत्यू दर (आयएमआर):
    -          प्रत्येक जीवंत जन्मामगे 41 एवढा कमी झाला आहे. NFHS-3 (2005-06) नुसार हा दर 57 एवढा होता.
    -          जवळपास सर्वच राज्यांमध्ये अर्भक मृत्यू दरामध्ये घट झाली आहे.
    -          त्रिपुरा, झारखंड, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, राजस्थान आणि ओडिशा मध्ये 20% पेक्षा जास्त घट झाली आहे.
    ·       जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर :
    -          मागील दशकाचा विचार करता (914) यामध्ये वाढ होऊन 919 वर पोहोचले आहे.
    -          केरळामध्ये (1047) सर्वाधिक असून त्याखालोखाल मेघालय (1009) आणि छत्तीसगडचा (977) क्रमांक लागतो.
    ·       संस्थात्मक प्रसूती
    -          NFHS-3 मध्ये 38.7% असलेले हे प्रमाण आता 78.9% वर गेले आहे.
    -          आसाममध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे .
    ·       एकूण जनन दर
    -          प्रती महिलेमागे NFHS-3 नुसार 2.7 मुले असलेल्या या प्रमाणातही घट झाली असून हे प्रमाण आता 2.2 एवढे झाले आहे.
    -          सर्वाधिक घट उत्तर प्रदेश मध्ये झाली असून त्यानंतर नागालँड आणि अरुणाचल प्रदेश यांचा क्रम लागतो.
    ·       संपूर्ण लसीकरण: 12 ते 23 महीने वयोगटातील सर्व  बालकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे.  



    स्वाधीन क्षत्रिय मुख्य सेवा हक्क आयुक्तपदी
    §  माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची राज्याच्या मुख्य सेवा हक्क आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.
    §  राज्याचे लोकायुक्त एम. एल. टहलियानी यांनी क्षत्रिय यांना आयुक्तपदाची शपथ दिली.
    §  स्वाधीन क्षत्रिय हे राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त ठरले आहेत.
    §  राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त पदाचा कालावधी ५ वर्षांचा असणार आहे.
    # राज्याचे मुख्य सचिव : सुमित मलिक
    # राज्य मुख्य माहिती आयुक्त : डॉ. रत्नाकर गायकवाड.


    सुमीत मल्लिक नवे मुख्य सचिव
    ·       राज्याच्या नवे मुख्य सचिव म्हणून सुमीत मल्लिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला.
    ·       सुमीत मल्लिक हे १९८२ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत.
    ·       प्रशिक्षणानंतर गडचिरोली जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी म्हणून आपल्या प्रशासकीय कारक‌र्दिीला सुरुवात केली.
    ·       अमरावतीचे विभागीय आयुक्त असताना त्यांनी शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
    ·       २००९पासून ते सामान्य प्रशासन विभागात कार्यरत होते.


    राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने देशातील व्याघ्रप्रकल्पांमध्ये चित्रीकरण करण्यास बीबीसीला पाच वर्षांची बंदी घातली आहे. बीबीसीचे प्रतिनिधी जस्टिन रॉलेट यांनी काझीरंगा अभयारण्यातील एकशिंगी गेंड्यांच्या संरक्षणासाठी सरकारने लागू केलेल्या आक्रमक धोरणाच्या मुद्द्यावर तयार केलेली डॉक्युमेंटरी नियमानुसार प्रदर्शनापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना दाखवण्यात आली नाही, असे कारण त्यासाठी दिले आहेत.


    तारक मेहता यांचे निधन
    तारक मेहता का उलटा चष्माया प्रसिद्ध विनोदी मालिकेचे लेखक तारक मेहता यांचे नुकतेच निधन झाले. विनोदी लेखक, नाटककार, सदरलेखक अशी त्यांची ख्याती आहे.
    तारक मेहता यांचा अल्पपरिचय:
    -          २०१५ साली त्यांना पद्मश्रीपुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
    -          त्यांच्या इच्छेनुसार, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्यांचे देहदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.
    -          दुनियाने उंधा चष्माहे गुजराती भाषेतले त्यांच्या सदराचे पुस्तकात रुपांतर झाले आणि त्यानंतर त्यावर तारक मेहता का उल्टा चष्माही मालिका हिंदीत आली आणि तीही अल्पावधीत लोकप्रिय ठरली.
    -          त्यांचा जन्म डिसेंबर १९२९ मध्ये अहमदाबाद येथे झाला होता. १९४५ ला ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. १९५६ मध्ये मुंबईतल्या खालसा महाविद्यालयातून गुजराती विषय घेऊन बी.ए. आणि त्यानंतर १९५८ मध्ये भवन्स महाविद्यालयात त्याच विषयातून एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
    -          १९५८ ते ५९ या काळात गुजराती नाट्यमंडळात त्यांनी कार्यकारी मंत्री पदावर कार्य केले.
    -          १९५९ ते ६० मध्ये प्रजातंत्रदैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहिले.
    -          १९६० ते १९८६ या काळात भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील फिल्म्स डिव्हिजनमध्येही ते कार्यरत होते.
    -          तारक मेहता यांचे लोकप्रिय साहित्य -'नवुं आकाश नवी धरती' (१९६४), 'दुनियाने उंधा चष्मा' (१९६५), 'तारक मेहताना आठ एकांकियो' (१९७८), 'तारक मेहताना उंधा चष्मा' (१९८१), 'तारक मेहतानो टपुडो' (१९८२), 'तारक मेहतानी टोळकी परदेसना प्रवासे' (१९८५), 'मेघजी पेथराज शाह : जीवन अने सिद्धी' (१९७५).


    चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती
    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनप्रकल्प उभारणीसाठीच्या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात आली आहे. ही समिती प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता तपासून त्याबाबतचा अहवाल सरकारला देणार आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते हे दोन मंत्री या समितीचे सदस्य म्हणून काम पाहतील. या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी या संस्थेकडून अर्थसहाय्य घ्यावयाचे आहे. त्यामुळे या संस्थेने केलेल्या प्रकल्पाच्या सुसाध्य अहवालावर विचारविनियम करणे, व्यवहार्यता तपासणे आदी कार्यकक्षेत ही सम‌तिी काम करेल.




    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad