चालू घडामोडी : 23 फेब्रुवारी
भारत
चीन पहिला धोरणात्मक संवाद बीजिंग येथे पार पडला
§ भारत
आणि चीन दरम्यान द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पहिला धोरणात्मक संवाद
चीनची राजधानी बीजिंग येथे पार पडला.
§ भारताचे
परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि चीनचे कार्यकारी उप परराष्ट्र मंत्री झांग येसुई
यांच्या सह अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
पृथ्वीसारख्या
सात नव्या ग्रहांचा शोध
§ पृथ्वीच्या
आकाराएवढ्या सात ग्रहांचा शोध लावण्यात नासाच्या खगोलशास्त्रज्ञांना यश आले असून
या ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता व्यक्त आली करण्यात आली आहे.
§ हे
ग्रह नासाच्या स्पिट्झर स्पेस टेलिस्कोप आणि चिली स्थित ट्रॅप्पीस्ट टेलिस्कोप
सारख्या काही जमिनीवरील वेधशाळेमार्फत आढळून आले आहे.
महत्त्वपूर्ण मुद्दे
-
हे सात एक्सोप्लॅनेट
ग्रह पृथ्वीपासून 39 प्रकाशवर्ष दूर
असून ‘ट्रॅप्पीस्ट-1’ या ताऱ्याभोवती फिरत आहेत.
-
या सात ग्रहांपैकी तीन
ग्रहांचे वर्गीकरण ट्रॅप्पीस्ट-1 e, f, आणि g असे करण्यात आले असून
त्यावर समुद्र असण्याची शक्यता आहे. (ते गोल्डीलॉक्स झोन मध्ये आहेत)
-
ट्रॅप्पीस्ट-1 हा
तारा साधारण 500 दशलक्ष जुना असून त्याचे तापमान 2550K येवढे आहे.
-
हे ग्रह एकमेकांपासून खुपच
जवळ आहेत. ज्याप्रमाणे आपण चंद्र पाहू शकतो. तसेच हे ग्रहदेखील दिसू शकतात.
-
पहिल्यांदाच पृथ्वी एवढ्या
आकाराचे ग्रह सापडले आहेत.
एक्सोप्लॅनेट म्हणजे काय?
जे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमन न करता अन्य तार्याभोवती
परिभ्रमन करतात त्याला एक्सोप्लॅनेट असे म्हटले जाते. त्यांना एक्सोसोलार प्लॅनेट
अशीही संज्ञा वापरली जाते.
गोल्डीलॉक्स झोन म्हणजे काय?
अंतराळातील वास्तव्यास योग्य असे ठिकाण जिथे अतिउच्च
किंवा अति थंड नसते त्याला गोल्डीलॉक्स झोन असे म्हणतात. अश्या अवस्थेत जीवसृष्टी
अस्तित्वात असण्याची शक्यता असते.
|
सौर
ऊर्जा क्षमता 40,000 मेगावॅट करण्यास मंजूरी
आर्थिक व्यवहारवरील
कॅबिनेट समितीने सौर पार्क्स आणि विकासासाठी सौर ऊर्जा क्षमता 20,000
मेगावॅट वरुन 40,000 मेगावॅट करण्यास मंजूरी
दिली आहे.
महत्त्वपूर्ण मुद्दे
-
याअंतर्गत प्रत्येकी 500 मेगावॅट
क्षमतेचे 50 सौर पार्क उभारण्यात येणार.
-
योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये
देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशाशीत प्रदेशांचा समावेश.
-
अल्ट्रा मेगा सौर ऊर्जा
प्रकल्प 2019-20 पर्यन्त बांधण्यात येणार असून त्यासाठी 8100 कोटी रुपयांचे निधि
सहाय्य लाभणार आहे.
-
हे प्रकल्प कार्यान्वयित
झाल्यानंतर दरवर्षी 64 अब्ज शुद्ध विद्युत निर्माण होईल.
-
Solar Energy Corporation India (SECI) या प्रकल्पाचे प्रशासन पाहणार आहे.
-
SECI ही ना नफा तत्वावर स्थापन
झालेली कंपनी असून कंपनी कायदा 2013 अंतर्गत 2011 मध्ये स्थापन झाली.
# सर्वाधिक
सौर ऊर्जा स्थापित क्षमता : राजस्थान > गुजरात > मध्य प्रदेश > महाराष्ट्र.
नौदलाच्या मुंबई
गोदीने आणि रिसॉल्व्ह मरिन यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे आय एन एस बेतवा, पी-१६ ए ही युद्धनौका पुन्हा सरळ करुन उभी करण्यात नौदलाला यश आले आहे. 5
डिसेंबर २०१६ रोजी ही नौका आडवी झाली होती, त्यानंतर या
युद्धनौकेमध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचे काम सुरु होते. 29 डिसेंबर 2016 ला या
युद्धनौकेचे प्रारंभिक स्थिरीकरण झाले असून एप्रिल 2018 पर्यंत ती पुन्हा नव्या
जोमाने कार्यरत होईल.
आसाराम
लोमटे यांना अकादमी पुरस्कार प्रदान
§ ग्रामीण
शैलीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांना
त्यांच्या ‘आलोक’ या लघुकथा संग्रहासाठी 2016 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
करण्यात आला.
§ लोमटे
यांना त्यांच्या ‘आलोक’ या
‘लघुकथा’ साहित्यासाठी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून साहित्य अकादमी पुरस्काराने
पुरस्कृत करण्यात आले.
§ ‘आलोक’ या लघुकथेमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण
जीवनशैली मांडली आहे.
आसाराम लोमटे
आसाराम लोमटे यांचा
जन्म महाराष्ट्रातील गुगळी धमनगांव येथे झाला असून मराठी साहित्यात त्यांनी
डॉक्टरेट केले आहे. लोमटे यांचे ‘इडा पिडा टळो’, ‘आलोक’, ‘धूळपेर’ हे तीन लघुकथा
संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या लिहिलेल्या कथा या पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील अभ्यासक्रमात
आहेत.
जन्मानं ब्राह्मण असलेल्या, मात्र कालांतरानं अनुसूचित जातीतील (एससी) कुटुंबानं दत्तक घेतलेल्या
व्यक्तीला आरक्षण मिळण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण
निकाल पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयानं दिला आहे. अशा व्यक्तीला सरकारी नोकरीतील
आरक्षण नाकारता येणार नाही, असं खंडपीठानं स्पष्ट केलं आहे.
पीईटीपी
प्लान्ट नसतील तर उद्योग बंद करण्याचा आदेश
§ देशामधील
ज्या उद्योगांकडे प्रदूषकांवर प्राथमिक प्रक्रिया करणारे प्लान्ट (PETP) नसतील आणि ही प्रदूषके तशीच पाण्यामध्ये सोडली जात असतील तर नोटीस
दिल्यानंतर तीन महिन्यांत असे उद्योग बंद केले जावेत, असा
महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 22 फेब्रुवारी 2017 रोजी दिला.
§ सरन्यायाधीश
जे. एस. केहर यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना निर्देश देत सर्व उद्योगांना
एक जाहीर नोटीस काढून प्रदूषकांवर प्रक्रिया करणारी यंत्रणा बसवणे कायद्याने
सक्तीचे असल्याबद्दल समज देण्यास सांगितले आहे.
§ या
खंडपीठात न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एस. के. कौल यांचा समावेश होता.
§ अशा
उद्योगांचा वीजपुरवठा संबंधित वीजपुरवठा मंडळांनी बंद करावा आणि प्रक्रिया करणारी
यंत्रणा उभारल्यानंतरच तो पूर्ववत करावा, असेही
खंडपीठाने सांगितले आहे.
§ याबरोबर
सरकारने कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट तीन वर्षांत उभारावेत, अशा सूचनाही खंडपीठाने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत