• New

    चालू घडामोडी : 21 फेब्रुवारी

    भारत आणि रवांडा दरम्यान तीन सामंजस्य करार
    §  भारत आणि रवांडा दरम्यान द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी नाविन्यता, विमान आणि व्हीजा या तीन क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
    §  सदर करारावर किगाली येथे भारताचे उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद हंसारी आणि रावांडाचे पंतप्रधान Anastase Murekezi यांनी स्वाक्षर्‍या केल्या.
    §  उपराष्ट्रपती अधिकृतपणे रावांडाला भेट देणारे पहिले भारतीय नेता आहेत.
    §  हमीद अंसारी यांनी तेथे भारत-रावांडा नाविन्यता वृद्धी कार्यक्रम सुरू केला.  

    साथीया संसाधन किट आणि साथीया मोबाइल अॅप
    केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने किशोरवयीन बालकांसाठी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाचा भाग म्हणून साथिया संसाधन किट आणि साथिया सलाह मोबाइल अॅप 20 फेब्रुवारी 2017 रोजी सुरू केले आहे.
    राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमानुसार साथिया (Peer Educators) किशोरवयीन बालकांच्या आरोग्यसेवांची मागणी वाढविण्यासंबंधित भूमिका बजावतात.
    महत्त्वपूर्ण मुद्दे
    -          युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNPF) आणि पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाने साथिया संसाधन किट विकसित केली आहे.
    -          या किटमध्ये क्रियकलाप पुस्तक, भ्रांती-क्रांती खेळ, प्रश्न-उत्तर पुस्तक आणि सरदार शिक्षक डायरी याचा समावेश आहे.
    राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम
    -          देशातील किशोरवयीन बालकांच्या विकास आणि आरोग्याच्या गरजा पुरविण्याच्या उद्देशाने जानेवारी 2014 मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंत्रालयाने हा कार्यक्रम सुरू केला.
    -          या कार्यक्रमांतर्गत सहा धोरणात्मक प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत.
    \      1. पोषण
            2. लैंगिक आणि प्रजनन आरोग्य
            3. असंसर्गजन्य रोग
            4. पदार्थ गैरवापर
             5. जखम आणि हिंसा (लिंग आधारील हिंसेसह)
             6. मानसिक स्वास्थ्य
    -          या कार्यक्रमाच्या अमलबजावणीसाठी मंत्रालयाने UNPFA च्या सहकार्याने राष्ट्रीय किशोरवयीन आरोग्य धोरण विकसित केले आहे.
    -          लक्ष्य गट : 10-14 वर्ष वयोगट आणि सार्वत्रिक विस्तारसह 15-19 वर्षे वयोगट.

    रोटा व्हायरस लसीचा पाच राज्यांत विस्तार करण्याची घोषणा
    §  केंद्र सरकारने सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत रोटा व्हायरस लसीचा आसाम, त्रिपुरा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तमिळनाडू या पाच राज्यांत विस्तार करण्याची घोषणा केली आहे.
    §  ही लस सुरवातीला हरियाणा, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या चार राज्यांत सुरू करण्यात आली होती. यानंतर्गत 38 लाख बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
    महत्त्वपूर्ण मुद्दे
    -          रोटा व्हायरस हे 2 वर्षांखालील बालकांमध्ये तीव्र अतिसाराचे (Diarrhoea) सर्वसामान्य कारण आहे. हे भारतातील मुले डगावण्याचे सर्वांत मोठे कारण आहे.  (दरवर्षी 78,000 मुत्यु)
    -          रोटा व्हायरस हा RNA (double-stranded) विषणूचा पोटप्रकार असून Reoviridae कुटुंबातील आहे. 
    -          11 महीने वयापेक्षा कमी वयाच्या अर्भकांमधील माध्यम ते तीव्र अतिसाराचा हा सर्वसामान्य प्रयोजक एजंट आहे.
     सार्वत्रिक लसीकरण मोहीम
    -          देशातील सर्व बालकांना मोफत लसीकरण
    -          यामध्ये 11 आजारांचा समावेश : क्षयरोग, डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, हिपॅटायटीस ब, पोलिओ, इन्फ्लुएंझा बी, न्यूमोनिया, कांजिण्या, गोवर, रोटा व्हायरस.

    गुजरात विधानसभेने नुकतेच गुजरात आधार विध्येयक, 2017 पारित केले आहे. केंद्रीय आधार विध्येयकाच्या धर्तीवर हे विध्येयक बनविण्यात आले असून केंद्राच्या विध्येयकानुसार राज्यांना असा कायदा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

    केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि सामाजिक न्याय आणि साक्षमीकरण मंत्रालयाने अनुसूचीत जातीच्या कारागिरांच्या आर्थिक विकास आणि कल्याणसाठी सामंजस्य करार केला आहे.

    दुबईमध्ये भिगे चुनरिया
    17 मार्च 2017 रोजी दुबई मध्ये बॉलीवुड अभिनेता सोनू सूद याच्या उपस्थितीत क्षमाशीलतेचा संदेश देणार्‍या होळीच्या संकल्पनेवर "भिगे चुनरिया" उत्सव साजरा केला जाणार आहे. रड फ्लाय इवेंट या कार्यक्रम व्यवस्थापन कंपनीकडून या कार्यक्रमाचे युएई मध्ये आयोजन करण्यात येणार आहे.

    चीनने भूमी आणि पाणी या दोन्ही पृष्ठभागावर कार्य करणारे (उभयचर) जगातील सर्वात मोठे विमान तयार केले असून ‘AG600 असे नाव या विमानाला दिले आहे.

    चौथा यश चोप्रा स्मृती पुरस्कार शाहरुख खानला
    बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची प्रख्यात बॉलीवूड चित्रपट निर्माता यश चोप्रा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रदान करण्यात येणार्‍या चौथ्या यश चोप्रा स्मृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी हा पुरस्कार लता मंगेशकर, अमिताभ बच्चन आणि रेखा यांना मिळालेला आहे

    भारतामधील एकमेव ज्वालामुखी बॅरन पुन्हा सक्रिय
    समारे 150 वर्षे सुप्त अवस्थेत असलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांवरील भारतामधील एकमेव जिवंत ज्वालामुखी 1991 साली सक्रिय झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा गोवा येथील CSIR च्या राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थान (National Institute of Oceanography -NIO) येथे संशोधकांना या ज्वालामुखीमधून राखेचे ढग तसेच तप्त शिलारस निघत असल्याचे आढळून आले आहे. हा ज्वालामुखी अंदमान आणि निकोबार बेटांवर पोर्ट ब्लेर पासून ईशान्येला 140 किलोमीटरवर असून बॅरन ज्वालामुखी बेट म्हणून ओळखले जाते.

    भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) आपल्या ‘sbi.co.in’ या वेबसाइटच्या नावात बदल केला असून ‘bank.sbi’ असे केले आहे.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad