चालू घडामोडी : 14 जानेवारी 2017
14 January 2017
सुरजितसिंग बर्नाला यांचे निधन
पंजाबचे
माजी मुख्यमंत्री सुरजितसिंग बर्नाला यांचे 14 जानेवारी 2017 रोजी निधन झाले. अकाली
दलातील नेमस्त नेते म्हणून ते ओळखले जातात. राजीव-लोंगोवाल करार झाल्यानंतर
पंजाबचे मुख्यमंत्री झाले होते. बर्नाला हे 1985
ते 1987 दरम्यान
पंजाबचे मुख्यमंत्री होते. तमिळनाडू,
आंध्र प्रदेश व उत्तरखंडचे
ते 2001 ते 2011 दरम्यान राज्यपाल होते. 1942 च्या चाळेजव
चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. 1977 मध्ये ते संसदेवर निवडून गेले. मोरारजी
देसाई यांच्या मंत्री मंडळात कृषि खात्याचे मंत्रिपद त्यांनी सांभाळले.
त्यादरम्यान त्यांनी बांग्लादेश बरोबरच्या 1978 मध्ये गंगा पाणीवाटप करारावर
स्वाक्षरी केली. 1997 मध्ये भाजप व मित्र पक्षांचे ते उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार
होते. 1998 च्या वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रात खत व रसायन मंत्री पद
भूषविले. अमृतसरच्या गुरु नणक देव विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा
आहे. 1969 मध्ये राज्याचे शिक्षणमंत्री असताना या विद्यापीठाची स्थापना केली.
तामिळनाडूचे तीन वेळा राज्यपाल याखेरीज उत्तराखंडचे पहिले राज्यपाल,
आंध्र प्रदेश, ओदिशा, पुद्दुचेरीच्या राज्यपाल पदाची धुरही त्यांनी
सांभाळली. त्यांचा थोरला मुलगा जसजीतसिंग आम आदमी पक्षात आहे.
विदर्भ मिरर : श्रीहरी आणे यांनी विदर्भ मिरर हे साप्ताहिक
सुरू केले आहे.
विल्यम ब्लॅटी यांचे निधन
लेखल
व चित्रपट निर्माते विल्यम ब्लॅटी यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांची
‘द
एक्सोर्सिस्ट’ ही कादंबरी व त्याच नावाचा ऑस्कर विजेता चित्रपट गाजला
होता. डियर टीनएजर, विच वे टू मक्का जॅक,
जॉन गोल्डफार्ब,
प्लीज कम होम, आय बिली शेक्सपियर व ट्विंकल ट्विंकल किलर केन हि पुस्तके
त्यांनी लिहिली. त्यांची लीजन ही कादंबरी द एक्सोर्सिस्टचा पुढचा भाग होता.
चीन
रोमनायझेशनचे जनक झोयू योऊग्वान्ग यांचे निधन
आधुनिक
चीनच्या पिनयीन रोमनायझेशन प्रणालीचे जनक झोयू योऊग्वान्ग यांचे वयाच्या 111 व्या
वर्षी निधन झाले. चीनमधील अखेरच्या साम्राज्य घराणेशाहीच्या राजवटीत 1906 मध्ये
त्यांचा जन्म झाला होता. शांघायमधील सेंट जॉन विध्यपीठात पाश्चिमात्य शिक्षण
घेतल्यानंतर अमेरिकेत वॉल स्ट्रीट येथे काम केले.
गुजरात पहिल्यांदाच रणजी विजेता
कर्णधार
पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखाली गुजरातने पहिल्यांदाच रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे
जेतेपदक मिळविले आहे. गुजरातने मुंबईच्या संघाला पराभूत केले आहे. रंजीचा अंतिम
सामना खेळण्याची गुजरातची ही दुसरी वेळ होती यापूर्वी 1950-51 मध्ये गुजरातला उपविजेते
पदावर समाधान मानावे लागले होते. 1950-51 मध्ये होळकर संघाने त्यांचा पराभव केला
होता.
काही
वैशिष्ट्ये
-
गुजरातने
पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धा जिंकली
-
रणजी
करंडक जिंकणारा गुजरात हा 17 वा संघ
-
मुंबईने
46 व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यापैकि केवळ पाच वेळा पराभव
-
मुंबई
26 वर्षापूर्वी (1990-91) अंतिम फेरीत हरियानाकडून पराभूत.
बेरोजगारांमध्ये पडणार 2 लाखांची भर :
जागतिक कामगार संघटना
देशातील
बेरोजगारांची संख्या यावर्षी एक लाखांनी वाढण्याची शक्यता असून, 2018
मध्ये त्यात आणखी दोन लाखांची भर पडण्याची शक्यता आहे, असा
अंदाज जागतिक कामगार संघटनेने वर्तवली आहे. जागतिक कामगार संघटनेने 'जागतिक
रोजगार आणि सामाजिक आढावा' शीर्षकाखाली अहवाल प्रकाशित केला आहे.
अहवालातील
महत्त्वाची मुद्दे
·
एकुण
बेरोजगारीचा दर 3.5 टक्क्यांवरुन यावर्षी 3.4 टक्क्यांवर येईल.
·
देशात
2016 मध्ये बेरोजगारांचा आकडा 17.7 दशलक्ष इतका होता. पुढीलवर्षी 2018 पर्यंत हा
आकडा 18 दशलक्ष इतका वाढण्याची शक्यता आहे.
·
जगभरात
बेरोजगारांच्या संख्येत 2017 मध्ये 34 लाखांची वाढ होईल.
·
उपलब्ध
रोजगार आणि बेरोजगार व्यक्तींच्या आकड्यातील तफावत वाढणार असून जागतिक बेरोजगारीचा
दर 5.7 टक्क्यांवरुन 5.8 टक्क्यांवर जाऊ शकतो.
·
उदयोन्मुख
देशांत दोनपैकी एका कामगाराचा रोजगार असुरक्षित आहे,तर विकसनशील देशांमध्ये ही स्थिती पाचपैकी चार
आहे.
·
भारताचा
समावेश उदयोन्मुख देशांच्या यादीत केला आहे.
·
विकसनशील
देशांत पुढील दोन वर्षात दिवसाला 3.10 डॉलरपेक्षा कमी मिळकत असणाऱ्यांच्या
संख्येतही 5 दशलक्ष ने वाढ होण्याची शक्यता आहे.
·
जगातील
एकुण काम करणाऱ्या लोकांपैकी 60 टक्के आशिया-पॅसिफिक भागातील आहेत. 2016 मध्ये
त्यांच्या संख्येत 1.1 टक्क्याची (20 दशलक्ष) वाढ झाली आहे व 2017 मध्येही अशीच
वाढ अपेक्षित आहे.
·
सध्या
दक्षिण आशियात सर्वात जास्त रोजगार निर्माण झाले असून यापैकी बहुतांश रोजगार
भारतात निर्माण झाले आहेत.
·
2017
मध्ये अल्प रोजगार मिळणाऱ्यांच्या संख्येत घसरण होईल परंतु लोकसंख्या वाढीमुळे
असुरक्षित रोजगाराचा दर कमी असूनही असुरक्षित रोजगाराच्या संख्येत माञ वाढ होऊ
शकते.
# जागतिक कामगार संघटनेचे महासंचालक गाय रायडर
प्रथा जलिकट्टूची
सर्वोच्च
न्यायालयाचे आदेश झुगारून लावत तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणांवर ‘जलिकट्टू’
या खेळाचे आयोजन करण्याचा प्रयत्न झाला. ज्या प्राण्यांच्या झुंजीवर सरकारने बंदी
घातली आहे, त्या प्राण्यांच्या यादीतून बैलांना वगळले जावे अशीही
मागणी करण्यात येत आहे. काय आहे जलिकट्टू? या क्रूर प्रथेचा हा संक्षिप्त आढावा....
जलिकट्टू
हा क्रीडाप्रकार तमिळनाडूमध्ये प्रसिद्ध आहे. तेथे जलिकट्टू ‘इरूतझुवावुतल’
किंवा ‘माजू विरतू’ या नावानेही ओळखला जातो. ‘मत्तु
पोंगल दिनी’ या स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये बैलांना विशेष
प्रशिक्षण दिले जाते. या स्पर्धेसाठी खास तयार करण्यात आलेल्या बैलांना ‘जलिकट’
म्हणतात. प्राचीन काळी मुल्लाई भागात वास्तव्य करणाऱ्या जमाती हा खेळ खेळात असत.
जलि आणि कट्टू या दोन शब्दांपासून जालिकट्टू हा शब्द बनतो. या खेळामध्ये बैलाच्या
शिंगाला सोने आणि चांदीची नाणे बांधली जातात ते मिळविण्यासाठी प्रत्येकाचा संघर्ष
सुरु असतो.
# 2014 मध्ये पशू कल्याणची बाब उपस्थित करत
सर्वोच्च न्यायालयाने या प्रथेवर बंदी घातली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत