FSDC ची 16 वी बैठक दिल्ली येथे पार पडली
§ वित्तीय
स्थिरता आणि विकास परिषदेची (FSDC) 16 वी बैठक नुकतीच
दिल्ली येथे पार पडली. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी या परिषदेचे
अध्यक्षस्थान भूषविले होते.
§ आरबीआय
गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने तयार केलेला FSDC
च्या कार्याचा संक्षिप्त आढावा यावेळी या बैठकीत सादर करण्यात आला.
§ या
बैठकीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था, बँकिंग, वित्तीय समावेशन, वित्तीय साक्षरता, तंत्रज्ञान आणि विमुद्रिकरण अशा विविध मुद्यांवर विस्तृतपणे चर्चा
करण्यात आली.
काय आहे FSDC ?
@ केंद्र
सरकारने डिसेंबर 2010 मध्ये वीतीय स्थिरता आणि विकास परिषदेची स्थापना केली. या
परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय वित्त मंत्री असतात.
@ रघुराम
राजन यांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय क्षेत्र सुधारणा समितीने (2008) केलेल्या
शिफारशिनुसार या परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.
@ ही
परिषद निरोगी अर्थव्यवस्था आणि कार्यक्षम आर्थिक व्यवस्थेसाठी आर्थिक क्षेत्रातील
उच्च नियामक मंडळ आहे.
@ रचना
-
अध्यक्ष : केंद्रीय
वित्तमंत्री
-
सदस्य : वित्तीय क्षेत्रातील
नियामक संस्थांचे प्रमुख (उदा. सेबी, आरबीआय, आयआरडीए इ.), वित्त सचिव, वीट
सेवा विभागाचे सचिव, प्रमुख आर्थिक सल्लागार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत