एम.के. स्टॅलिन यांची DMK च्या कार्याध्यक्षपदी निवड
§ तमिळनाडूचे
माजी उपमुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची द्रविड मुण्णेत्र कळघम (DMK)
पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून पक्षाचे खजिनदार
पद आणि तमिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही स्टॅलिन यांच्याकडे
आहे.
§ स्टॅलिन
यांचे वडील व तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची प्रकृती बिघडली
असल्याने स्टॅलिन यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
§ भारतीय
राष्ट्रीय काँग्रेसचा अपवाद वगळता भारतातील एखाद्या राज्यातील विधिमंडळ निवडणुका
जिंकून स्वबळावर आपली सत्ता स्थापन करण्याची विक्रमी कामगिरी करणारा DMK
हा पहिला राजकीय पक्ष आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत