शंकर बालसुब्रमण्यम यांना नाईटहूड
§ जन्माने
भारतीय असलेले केम्ब्रिज विद्यापीठाचे डीएनए तज्ज्ञ व रसायनशास्त्राचे प्राध्यापक
शंकर बालसुब्रह्मण्यम यांना राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडून नाईटहूड या
किताबाने गौरविण्यात आले आहे. सध्या ते केम्ब्रिज विद्यापीठाच्या वैद्यकीय
रसायनशास्त्र विभागात हर्शेल स्मिथ प्रोफेसर आहेत.
§ बालसुब्रह्मण्यम
यांचे डीएनए संशोधनातील महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी डीएनए क्रमवारी
लावण्याच्या नवीन तंत्राचा शोध लावला आहे. त्यांच्या या उलेखनीय कामगरीबद्दल
त्यांना हा किताब देण्यात आला आहे.
§ ब्रिटनच्या
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी
करणाऱ्यांना नाइटहूड किताब दिला जातो.
शंकर बालसुब्रमण्यम
यांचा अल्प परिचय
-
जन्म : ३० सप्टेंबर १९६६ रोजी
चेन्नई येथे झाला व नंतर १९६७ मध्ये ते ब्रिटनला गेले.
-
केंब्रिज विध्यपीठातून
पीएचडी
-
न्यूक्लिक अॅसिड मधील योगदानामुळे
ते जगभर ओळखले जातात
-
सध्या ते केंब्रिज
विद्यापीठात रसायन शास्त्राचे प्राध्यापक आहेत.
-
डीएनए क्वाड्राप्लेक्सेसचा
कर्करोगातील संबंध त्यांनी जोडून दाखवला व एपिजेनिटिक बदलावर नवीन प्रकाश टाकला
होता. सर शंकर बालसुब्रह्मण्यम हे रॉयल सोसायटीचे फेलो असून ते जन्माने भारतीय
असलेले ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आहेत.
-
ब्रिटनमधील केम्ब्रिज
संस्थेत ते कर्करोग संशोधन गटाचे प्रमुख आहेत व ट्रिनिटी कॉलेजचे फेलोही आहेत.
-
केम्ब्रिज एपिजेनेटिक्स व
सोलेक्सा यांच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा आहे.
-
त्यांना यापूर्वी
टेट्राह्रेडॉन पुरस्कार, कोर्ड-मार्गन पुरस्कार,
मलार्ड ग्लॅक्सो वेलकम पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत