बुकर पुरस्कार विजेते कांदबरीकार जॉन बर्जर यांचे निधन
कलात्मक समीक्षेची
परंपरा सुरू करणारे बुकर पुरस्कार विजेते कांदबरीकार जॉन बर्जर यांचे वयाच्या ९०
व्या वर्षी नुकतेच निधन झाले. ‘G’ हे एकाक्षरी शीर्षक
असलेल्या कादंबरीसाठी त्यांना १९७२ मध्ये मॅन बुकर पुरस्कार मिळाला होता. पुरस्काराच्या
मिळालेल्या रकमेपैकी अर्धे मानधन 'द ब्लॅक पँथर्स' या आफ्रिकन-अमेरिकन चळवळीसाठी त्यांनी दिले. मार्क्सवादी मर्मज्ञ म्हणून ओळखले जाणारे बर्जर
यांच्या 'वेज ऑफ सीईंग' या 'बीबीसी'वरील मालिकेतून कलात्मक समीक्षेमध्ये एक
राजकीय दृष्टीकोन आणला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत