• New

    अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना पदावरून हटविले


    §  लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास नकार देणार्‍या बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना सर्वोच्च न्यायालयाने २ जानेवारी २०१७ रोजी पदावरून हाटवले आहे.
    §  कोर्टाने दिलेल्या आदेशांचे पालन न केल्याने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
    §  मागील वर्षी १८ जुलै रोजी कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार बीसीसीआयचे पदाधिकारी नियमानुसार अपात्र ठरले होते. लोढा समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱयांना हटविण्याची मागणी कोर्टाकडे केली होती.
    §  बीसीसीआयच्या नव्या पदाधिकाऱयांसाठी नाव सुचविण्यासाठी कोर्टाने फली नरीमन आणि गोपाल सुब्रमण्यम या न्यायमित्रांची (अमायकस क्युरी) नेमणूक केली आहे.
    §  अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली कारणे:
    १)      क्रिकेट खेळात पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करण्यात बीसीसीआय आणि स्थानिक क्रिकेट बोर्ड अपयशी ठरले आहे.
    २)      कोर्टाने दिलेल्या आदेशांचे बीसीसीआयने पालन केलेले नाही.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad