भारतीय वंशाची व्यक्ती किरगिझस्तानच्या मेजर जनरल पदावर
§  किरगिझस्तान सैन्याच्या मेजर जनरलपदी भारतीय
वंशाच्या शेख रफिक मोहम्मद यांची निवड करण्यात आली आहे. 
§  मध्य आशियाई देशांकडून आयोजित करण्यात आलेल्या
एका अधिकृत समारंभात किरगिझस्तानचे संरक्षण मंत्री अली मिर्झा यांनी शेख रफिक
मोहम्मद यांची मेजर जनरलपदी नियुक्ती केली आहे. 
§  शेख रफीक मोहम्मद हे मूळचे केरळचे असून केरळमधील
मल्ल्याळी व्यक्तीला दुसऱ्या देशाचे सैन्याचे प्रमुखपद मिळण्याची ही पहिलीच वेळ
आहे. 
§  रफिक याआधी २००५ आणि २०१० मध्ये माजी
राष्ट्रपती कुर्मानबेक सेलियेविच बेकियेव यांचे सल्लागार होते. 
§  रफिक यांनी किरगिझस्तानमधील कर रचना सोपी आणि
सुटसुटीत करण्यावर भर दिला. 
§  त्यांनी संयुक्त अरब अमिरात, इराण, सौदी
अरेबिया आणि किरगिझस्तानसाठी काम केले आहे
 
 
 
 

कोणत्याही टिप्पण्या नाहीत