पाच राज्यातील निवडणुक कार्यक्रम जाहीर
भारतीय निवडणूक
आयोगाने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणीपुर
आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या
पाच राज्यांमधील निवडणुकांची ११ मार्च २०१७ रोजी मतमोजणी होणार आहे.
काही
महत्वपूर्ण मुद्दे
§ उत्तराखंड, गोवा आणि पंजाब मध्ये एकाच टप्प्यामद्धे निवडणूक होणार आहे.
§ गोव्यामधील
४० जागांसाठी आणि पंजाबमधील ११७ जागांसाठी ४ फेब्रुवारी २०१७ रोजी तर उत्तरखंडमधील
७० जागांसाठी १५ फेब्रुवारी २०१७ रोजी निवडणुका होणार आहेत.
§ उत्तरप्रदेश
मध्ये एकूण ४०३ जागांसाठी सात टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. (११, १५, १९, २३, २७ फेब्रुवारी आणि ४ व ८ मार्च २०१७)
§ मणीपुरमध्ये
६० जगणासाठी ४ व ८ मार्च २०१७ रोजी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.
§ या
पाच राज्यांमध्ये एकूण १६ कोटी पेक्षा जास्त पात्र मतदार भाग घेणार आहेत.
§ पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश या राज्यांतील उमेदवाराना
२८ लाख तर गोवा, मणीपुर राज्यातील उमेदवारांना २० लाख रुपये
खर्च मर्यादा घालून देण्यात आली आहे. उमेदवारांना 20 हजारांवरील खर्चासाठी चेकचा
वापर बंधनकारक असणार आहे.
उमेदवार जागा- एकूण ६१९ जागा
·
उत्तर प्रदेश- 403 जागा
·
पंजाब- 117 जागा
·
उत्तराखंड – 70 जागा
·
मणिपूर- 60 जागा
·
गोवा- 40 जागा
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत