आंबेडकर स्वाधार योजनेला मंजूरी
राज्य
मंत्रिमंडळाच्या ३ जानेवारी २०१७ रोजी पार पाडलेल्या बैठकीमध्ये अनुसूचीत जाती व
नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास इतर शैक्षणिक सुविधांसाठी
थेट अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी आंबेडकर स्वाधार योजनेला मंजूरी देण्यात आली
आहे.
योजनेची
वैशिष्ठ्ये
@ राज्यातील
अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर क्यावसायिक
अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय
किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचीत जाती व नवबौद्ध
विध्यर्थ्यांसाठी ही योजना आहे.
@ या
योजनेची अमलबजावणी २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून करण्यात येणार आहे.
@ या
योजनेचा लाभ जिल्हानिहाय गुणवत्ता यादिनुसार सुमारे २५,००० विद्यार्थ्यांना होणार असून त्याकरिता शासन दरवर्षी १२१ कोटी खर्च
करणार आहे.
@ विद्यार्थ्यांना
दिली जाणारी वार्षिक रक्कम आधार क्रमांकाशी संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित
करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत