डम्पिंग म्हणजे काय?
मराठीमध्ये डम्पिंग या संज्ञेचा अर्थ मूल्यावपात असा आहे. अर्थव्यवस्थेच्या संदर्भात डंपिग म्हणजे, एखाद्या देशातील उत्पादक स्थानिक बाजारात ज्या किमतीस आपले उत्पादन विकतो, त्यापेक्षा कमी किमतीस तेच किंवा त्यासारखे उत्पादन विदेशी बाजारपेठेत विकतो. त्या विक्री धोरणास ‘डंपिग’ असे म्हणतात. यामुळे ग्राहकांना स्वस्त किमतीत वस्तू उपलब्ध होतात, मात्र त्याचा फटका स्थानिक उत्पादकांना मोठय़ा प्रमाणात बसतो. बऱ्याच वेळा त्यांना आपले उत्पादन बंद करावे लागते. कामगारांचा रोजगार जातो.जागतिक व्यापार संघटनेच्या करारात डंपिग हे बेकायदेशीर ठरवलेले नाही, मात्र
डंपिंग होत असेल तर त्या विरोधात धोरण आखण्याची मुभा जागतिक व्यापार
संघटनेने सदस्यांना दिलेली आहे.
# डंपिग करण्यामागची कारणे : काही वेळा स्थानिक बाजारातील मागणीचा अंदाज न आल्याने अधिक उत्पादन केले जाते. या अतिरिक्त उत्पादनाची विक्री करण्यासाठी डंपिंगचा आधार घेतला जातो. बहुतेक वेळा विदेशी बाजारपेठ मिळविण्यासाठी तेथील किमतीपेक्षा कमी किमतीला माल विकून ती बाजारपेठ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो. बाहेरील देशाच्या मालाचे भारतात डिपग होऊ नये, यासाठी केंद्र सरकारचे जे धोरण आहे त्यास ‘अँटीडंपिग’ असे म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत