• New

    हार्ट ऑफ एशिया परिषद

    • युद्धजर्जर अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि तेथे गुंतवणूक वाढवून विकासप्रक्रिया वेगाने करण्यासाठी  "हार्ट ऑफ एशिया‘ ही परिषद सुरू होत असून, या परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे.
    • पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एझाझ अहमद चौधरी यांच्यासह अनेक देशांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. 
    • दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद या दोन आव्हानांचा सामना करण्याबाबत या परिषदेत चर्चा अपेक्षित आहे.
    • अफगाणिस्तानमध्ये कायमस्वरूपी विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग आणणे आणि त्यासाठी विविध उपाययोजना करणे, हा परिषदेचा गाभा असणार आहे. 
    • अफगाणिस्तानमधील स्थैर्य आणि सुरक्षेसाठी आशियामधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करावेत आणि त्यांची आश्रयस्थाने नष्ट करावेत, ही भारताची प्रमुख मागणी आहे. 
    • 2011 पासून "हार्ट ऑफ एशिया‘ या परराष्ट्रमंत्री स्तरावरील परिषदेला सुरवात झाली असून, आतापर्यंतच्या सर्व परिषदांमध्ये भारताने ठोस भूमिका मांडली आहे. या परिषदेमध्ये अफगाणिस्तान, अझरबैजान, चीन, भारत, इराण, कझाकस्तान, किरगिझीस्तान, पाकिस्तान, रशिया, सौदी अरेबिया, ताजिकीस्तान, तुर्कस्तान, तुर्कमेनिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती या चौदा देशांचा समावेश आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, डेन्मार्क, इजिप्त, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, नॉर्वे, पोलंड, स्पेन, स्वीडन, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपीय युनियनचा परिषदेला पाठिंबा आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad