राज्यात सुरू होणार शंभर शेतकरी आठवडे बाजार
- शेतकऱ्यांना शेतमाल थेट ग्राहकांना विकता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे विविध शहरांत शंभर शेतकरी आठवडे बाजार सुरू केले जात आहेत.
- त्याचाच एक भाग म्हणून पुणे, नागपूर, मुंबईत २७ बाजार सुरू झालेले आहेत.
- पणन मंडळाने पहिल्या टप्प्यात पुणे शहरात २९ जून २०१४ रोजी पहिला शेतकरी आठवडे बाजार सुरू केला होता.
- नागपूरला तीन, तर मुंबईत एक आठवडे बाजार सुरू आहे.
अशी आहे संकल्पना
- शेतकरी, ग्रामीण महिला बचत गटांच्या मालाला थेट बाजारपेठ
- शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि उत्पादक सहकारी संस्थांच्या मालाची त्यांनी पुरस्कृत केलेल्या गट-प्रतिनिधींमार्फत विक्री
- वेळ व ठिकाण निश्चित असल्याने काढणी आणि विक्रीचे नियोजन शेतकऱ्यांना शक्य.
- इलेक्ट्रॉनिक्स वजन-काट्यामुळे ग्राहकांमध्ये विश्वास
- बाजारपेठेचा अंदाज येत असल्याने मालाबाबत नियोजन शक्य.
- शंभर टक्के रोखीने व्यवहार. कसल्याही परवान्यांची आवश्यकता नाही.
- थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीची संधी.
- काढणीनंतरच्या नुकसानीत मोठी घट.
- १०० टक्के रक्कम थेट शेतकऱ्यांच्या हाती.
- बाजारभाव ठरविण्याचा शेतकऱ्याला अधिकार
- अत्यंत कमी विक्री खर्च
- मागणीनुसार मालाचा पुरवठा.
- ताजा, स्वच्छ शेतमाल स्वस्तात उपलब्ध
कोणत्याही टिप्पण्या नाहीत