‘मेक इन इंडिया’या महत्त्वाकांक्षी सप्ताहाचे धमाकेदार उद्घाटन
- देशाची आर्थिक राजधानी अन जगाचे कुतूहल असणाऱ्या मुंबईत आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उद्घाटन झाले.
- यावेळी स्वीडन आणि फिनलँडचे पंतप्रधानही उपस्थित होते.
- देशाचा पहिला ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा मान मुंबईला
- वरळीच्या नॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मेक इन इंडिया’या महत्त्वाकांक्षी सप्ताहाचे धमाकेदार उद्घाटन झाले.
#हा कार्यक्रम १३ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
#या कार्यक्रमाला ६८ देशातील उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
#प्रदर्शनस्थळी विविध ११ क्षेत्रे आणि १३ राज्ये यांची स्वतंत्र दालने आहेत.
#आठवड्याभरात महाराष्ट्रात ४ लाख कोटीची गुंतवणूक व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यातून १२ लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे
स्वागताला लामणदिवामुंबईची ओळख असलेल्या मोक्याच्या ठिकाणी ‘मेक इन इंडिया’चे बोधचिन्ह असलेल्या सिंहाच्या आकर्षक प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत. मुंबई विमानतळाच्या बाहेर पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचे प्रतीक असलेल्या लामणदिव्याची भव्य प्रतिकृती लक्षवेधक आहे.
अमिताभ बच्चन वाचणार कविता
या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन ‘मेक इन इंडिया’वर आधारित रचलेली कविता वाचणार आहेत, तर अभिनेत्री हेमामालिनी नृत्याविष्कारात गणेश वंदना सादर करणार आहेत.
‘स्टार्ट अप’ना देणार दोन कोटींचे पुरस्कार!
नवउद्योजकांमधील नावीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात ‘स्टार्ट अप’ योजनांसाठी स्पर्धा जाहीर केली आहे. ‘क्यू प्राइज मेक इन इंडिया’ या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ‘स्टार्ट अप’ना कारखाना उत्पादन आणि पुरवठ्यात नवनवीन संकल्पना आणि बिझनेस मॉडेल विकसित करणाऱ्या ‘स्टार्ट अप’ना दोन कोटींचे पुरस्कार दिले जातील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत