विजया रहाटकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड
विजया रहटकर यांच्या बद्दल
- विजया रहाटकर या मूळच्या नाशिकच्या.
- भारतीय जनता युवा मोर्चा या संघटनेत काम.
- त्यांनी महिला सबळीकरणाच्या कामांना हात घालत भरपूर काम केले.
- महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन करतानाच त्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचे मोलाचे काम केले.
- दशकभर औरंगाबाद महापालिकेत विविध पदे भूषवली.
- मराठवाड्यातील महिला लेखिकांचे साहित्य संमेलन व सिल्लोड येथे ग्रामीण साहित्य संमेलनही भरवेली.
- औरंगाबादचे महापौर पद संभाळले.
- अ. भा. महापौर परिषदेच्या उपाध्यक्ष, महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्ष ही पदे सांभाळले.
- महिला मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणिसपद व नंतर अध्यक्षपद .
महिला आयोगाबद्दल......
#राष्ट्रीय महिला आयोगच्या धर्तीवर १९९३ साली महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली.
#आयोगाची रचना१९९३ महाराष्ट्र विधेयक क्र.XV,१९९३ प्रमाणे दिनांक २५ जानेवारी १९९३ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली.
#आयोयाच्या अध्यक्ष, सहा अशासकीय सदस्य, एक सदस्य सचिव, एक पदसिद्ध सदस्य म्हणून पोलीस महासंचालक राहातील.
आयोगाचे उदिष्टे :
• स्त्रीयांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे.
• स्त्रीयांची अप्रतिष्ठा करणाऱ्या प्रथांच्या बाबतीत अन्वेषण करून योग्य त्यात सुधारणात्मक उपयोजाना करणे.
• स्त्रियांवर परिणाम करणाऱ्या कायद्याची परिणामकारकरीत्या सानिंत्रण व अंमलबजावणी करणे.
• स्त्रीयांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे वा उंचावणे या संबंधित असलेल्या सर्व बाबींवर शासनाला सल्ला देणे.
आयोगाचे अधिकार :
आयोग एक वैधानिक व स्वमशासित संस्था आहे. आयोगास दिवाणी नायालायाचे अधिकार प्राप्त असून या अधिनियामान्वाये तपास करण्याच्या प्रयोजनासाठी शासनाच्या सहमतीने राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही अधिकार्याचा किंवा अन्य कोणत्याही व्यकतीनच्या सेवांचा वापर करील. कोणत्याही व्यकतीस हजर राहण्यास फर्मऊ शकेल. दस्ताऐवज शोधून काढण्यास व ते सादर करण्यास फार्मवू शकेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत