• New


    इबोला( Ebolla ):

    ●इबोला प्रादुर्भावाचा इतिहास व शास्त्रीय माहिती :
    - १९७६ मध्ये एनझारा (सुदान) आणि याम्बुकू (कांगो प्रजासत्ताक) येथे प्रथम इबोला प्रादुर्भाव झालेल्या गावातील इबोला नदीच्या नावावरून विषाणूला इबोला हे नाव देण्यात आले.
    - इबोला व्हायरस डिसीज (इव्हीडी) याला पूर्वी इबोला हाईमॉरहॅजिक फेव्हर या नावाने ओळखले जात असे.
    - फिलोव्हिरिडी कुळातील तीनपैकी एक प्रजात ही इबोला व्हायरस आहे. इबोलाच्या पाच जाती आहेत.

    -बुंदीबुग्यो इबोला व्हायरस (BDBV), झायरे इबोला व्हायरस (EBOV), सुदान इबोला व्हायरस (SUDV),  रेस्टॉन इबोला व्हायरस (RESTV), ताय फॉरेस्ट इबोला व्हायरस (TAFV) त्यापैकी BDBV, EBOV, SUDV या पहिल्या तीन जाती आफ्रिकेतील प्रादुर्भावासाठी कारणीभूत होत्या.
    RESTV ही जात फिलिपिन्स व चीन प्रजासत्ताक येथे आढळली होती.  हा लक्षणरहित असून, माकडे आणि वराहाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होतो. या विषाणूंमुळे आजार किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे ही जात माणसांसाठी कमी धोकादायक मानली जात असली तरी अधिक अभ्यास गरजेचा आहे.

    ●प्रतिबंध आणि नियंत्रण:
    - सध्या या रोगावर कोणताही अधिकृत उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मात्र, प्रादुर्भाव झालेल्या प्राणी व माणसांना अन्य प्राणी व माणसांपासून वेगळे ठेवत प्रचंड काळजी घ्यावी लागते.
    - रेस्टॉन इबोला विषाणूचा पाळीव प्राण्यांतील प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोडिअम हायपोक्‍लोराइड आणि अन्य साबणाच्या साह्याने वराह आणि माकडांच्या फार्ममध्ये नियमित स्वच्छता ठेवल्याने विषाणू अकार्यक्षम होतो.
    - प्रादुर्भावाची शंका येताच, त्वरित संपूर्ण जागा वेगळी करून निर्जंतुकीकरण करावे. अन्य प्राणी व माणसे यांचा संपर्क येऊ देऊ नये. प्रशिक्षित व्यक्तीच्या निगराणीमध्ये प्रादुर्भावग्रस्त व मृत प्राण्यांची विल्हेवाट लावावी.
    - सर्वसामान्य लक्षणांमुळे माणसांमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव पहिल्या टप्प्यामध्ये ओळखणे अनेक वेळा शक्‍य होत नाही. त्यामुळे उपचारावेळी हात, श्वास आणि अन्य घटकांच्या स्वच्छता ठेवून प्रतिबंधक साधनाचा वापर करावा. या वेळी सिएरा लियॉन येथील इबोला विषयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांचाही मृत्यू झाला असून, आजपर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील ६० व्यक्तींना उपचार करतेवेळी प्राण गमवावे लागले आहेत.
    - इबोला प्रादुर्भावग्रस्त लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे दफन किंवा दहन अत्यंत काळजीपूर्वक करावे.
    - अशा प्रादुर्भावग्रस्त परिसरामध्ये मांस, रक्त किंवा दूध चांगले शिजविल्या / उकळल्याशिवाय वापरू नये.

    ●इबोला प्रसार व परिणाम:
    - आफ्रिकेतील वटवाघळांच्या Hypsignathus monstrosus, Epomops franqueti and Myonycteris torquata या तीन प्रजाती नैसर्गिक यजमान मानल्या जातात.
    - मात्र १९९४ पासून EBOV आणि TAFV जातींचा उद्रेक चिंपांझी आणि गोरिलांमध्येही आढळला होता.
    - RESTV चा प्रादुर्भाव फिलिपिन्स येथे मॅकाक माकडामध्ये (Macaca fascicularis) आढळला.
    - २००८ मध्ये वराहामध्ये RESTV जातीचा प्रादुर्भाव चीन आणि फिलिपिन्समध्ये.
    - इबोला प्रादुर्भावग्रस्त प्राण्यांच्या रक्त, अवयव किंवा शरीरातील स्रावांच्या संपर्कात आलेल्या माणसांमध्ये प्रादुर्भाव होतो.
    - त्यानंतर माणसाकडून माणसांना अशा अवयव, रक्त व स्राव यांच्या माध्यमातून पसरतो.
    - प्रयोगशाळेमध्ये रक्तामध्ये पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेटची संख्या कमी आढळते.
    - जोपर्यंत माणसांच्या रक्त आणि स्रावांमध्ये विषाणू उपलब्ध आहे तोपर्यंत तो माणूस प्रादुर्भावग्रस्त असतो. प्रयोगशाळेमध्ये प्रादुर्भावग्रस्त झालेल्या व्यक्तीच्या वीर्यामध्ये ६१ दिवसांनंतरही विषाणू आढळला होता. तोपर्यंत रोगांचा प्रसार होत राहतो.

    ●आहे थोडी आशा...
    सध्या इबोला रोगावर कोणताही इलाज नसला तरी अमेरिकेतील रोगनियंत्रण केंद्र आणि राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या सहकार्याने ‘मॅप बायोफार्मास्युटिकल’ कंपनीने ‘झेडमॅप’ हे प्रायोगिक औषध तयार केले आहे. या औषधाच्या याआधी प्राण्यावर घेतलेल्या चाचण्या उत्साहवर्धक आहेत. केवळ तीन डोस औषध तयार केले असून, सध्या या औषधाची चाचणी रोगग्रस्त अमेरिकन डॉक्टर केन्ट ब्रॅंटली आणि नॅन्सी राईटपॉल यांच्यावर घेण्यात येणार असल्याची माहिती ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फेक्शियस डिसिजेस’ चे मुख्य डॉ. ऍंथनी फॉसी यांनी दिली आहे.

    ©बालाजी सुरणे(7387789138)



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad