• New

    मंगळयान

    मंगळयान
    (MOM- Mars Orbitor Mission)
    ~सौजन्य: बालाजी सुरणे

    *मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम अहे
    *हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने ५ नोव्हेंबर, इ.स. २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले.
    *यासाठी पीएसएलव्ही सी-२५ हे प्रक्षेपण अस्त्र वापरण्यात आले.
    *२४ सप्टेंबर, इ.स. २०१४ रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले

    *मंगळावर यान पाठविण्यास सुरवात झाली ती 1960च्या दशकात.
    *सर्वाधिक यशस्वी मंगळ मोहिमा अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा'ने केल्या आहेत.
    *अमेरिका, रशिया, युरोपीय समुदायानंतर मंगळाच्या कक्षेत यान पाठविणारा भारत हा चौथा देश ठरला.

    भारताची मोहीम:
    - मंगळाच्या विरळ वातावरणाचा, भूरचनेचा अभ्यास करणे
    - जीवसृष्टीच्या शक्‍यतेचा आणि भविष्यात मानवी वास्तव्य शक्‍य आहे का, याचा अभ्यास करणे
    - मंगळावरील पाणी व कार्बन डायऑक्‍साईडच्या ऱ्हासाची कारणे शोधणे
    - तेथील मिथेनच्या साठ्यांचा शोध घेणे
    - दुसऱ्या ग्रहांवर याने पाठविण्याची आपली क्षमता सिद्ध करणे


    असे आहे मंगळयान
    - मोहिमेचा कालावधी - 300 दिवस
    - उड्डाणाच्या वेळी यानाचे एकूण वजन - 1350 किलो
    - यानाचे वजन - 500 किलो
    - इंधनाचे वजन - 850 किलो
    - प्रक्षेपक - ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक - पीएसएलव्ही एक्‍सएल-सी25
    - खर्च - 450 कोटी रुपये

    यानावरील उपकरणे
    - लेमन अल्फा फोटोमीटर (एएलपी)- मंगळाच्या वातावरणातील ड्युटेरियम आणि हायड्रोजनच्या प्रमाणाचा अभ्यास करण्यासाठी.
    - मिथेन सेन्सर फॉर मार्स (एमएसएम)- मिथेनच्या प्रमाणाच्या नोंदी घेणे, त्याचा स्रोत शोधणे.
    - मार्स एक्‍झोफेरिक न्यूट्रल कंपोझिशन अनेलायझर (एमईएनसीए) - मंगळाच्या बाह्यवातावरणाचा अभ्यास करण्यासाठी. मंगळाच्या वातावरणाच्या सर्वांत बाहेरच्या विरळ थरातील कणांचा अभ्यास करण्यासाठी.
    - थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग स्पेक्‍ट्रोमीटर (टीआयएस) - वातावरणाच्या तापमानाच्या नोंदी घेण्यासाठी. पृष्ठभागावरील घटकांचे मॅपिंग करण्यासाठी.
    - मार्स कलर कॅमेरा (एमसीसी) - वर्णपटाच्या साह्याने छायाचित्रे काढण्यासाठी. पृष्ठभागाची छायाचित्रे काढण्यासाठी. फोबोस आणि डेमोस या मंगळाच्या उपग्रहांविषयी माहिती गोळा करण्यासाठी.

    यानाचा प्रवास
    - पीएसएलव्ही यानाला प्रथम 600 किलोमीटर बाय 2 लाख 15 हजार किलोमीटर लंबवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करेल.
    - पृथ्वीभोवती सहा प्रदक्षिणा घालून यानाचा मंगळाच्या दिशेने प्रवास सुरू होईल.
    - मंगळाच्या कक्षेत प्रवेश 21 सप्टेंबर 2014.
    - मंगळाभोवतीची त्याची कक्षा 500 किलोमीटर बाय 80 हजार किलोमीटर असेल.
    - यानाचे नियंत्रण बंगळूर येथील इस्रोच्या इंडियन डीप स्पेस नेटवर्कद्वारे व "नासा'च्या डीप स्पेस नेटवर्कद्वारे.

    असा आहे मंगळ
    - सूर्यमालेतील चौथा ग्रह
    - पृष्ठभागावर आयर्न ऑक्‍साईड असल्याने तो तांबूस दिसतो.
    - वातावरणातील घटक - कार्बन डायऑक्‍साईड (95.32 टक्के), नायट्रोजन (2.7 टक्के), अरगॉन (1.6 टक्के), ऑक्‍सिजन (0.13 टक्के), बाष्प (0.03 टक्के), नायट्रिक ऑक्‍साईड (0.01 टक्के).
    - वातावरणाचा दाब - सरासरी 7.5 मिलिबार (पृथ्वीवर समुद्र सपाटीला हवेचा दाब 1013 मिलिबार असतो)
    - सूर्यापासून अंतर - 227,936,637 किलोमीटर
    - घनता - पृथ्वीपेक्षा 0.375
    - दिवसाचा कालावधी - 24 तास, 37 मिनिटे
    - वर्ष - 687 पृथ्वीवरील दिवसांचे
    - उपग्रह किंवा चंद्र - दोन (फोबोस आणि डेमोस)

    मंगळ मोहीम यशस्वी करणारी 'इस्रो'ची टीम
    1) के. राधाकृष्णन : "इस्रो'चे अध्यक्ष.
    2) एम. अण्णादुरई : मार्स ऑर्बिटर मिशनचे "प्रोग्रॅम डायरेक्‍टर'
    3) एस. रामकृष्णन : विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक.
    4) एस. के. शिवकुमार : इस्रोच्या उपग्रह केंद्राचे संचालक
    5) पी. कुन्हाकृष्णन : "पीएसएलव्ही'चे प्रकल्प संचालक
    6) चंद्रनाथन : "लिक्विड प्रोपल्शन सिस्टिम'चे संचालक
    7) ए. एस. किरण कुमार : "सॅटेलाईट ऍप्लिकेशन सेंटर'चे संचालक
    8) एम. वाय. प्रसाद : सतीश धवन अवकाश केंद्राचे संचालक
    9) एस. अरुणन : "मार्स ऑर्बिटर मिशन'चे प्रकल्प संचालक व यान तयार करण्याची कामगिरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
    10) बी. जयकुमार : "पीएसएलव्ही'चे सहायक संचालक
    11) एम. एस. पनीरसेल्वम :  श्रीहरीकोटामधील चीफ जनरल मॅनेजर (रेंज ऑपरेशन्स)
    12) व्ही. केशव राजू : मार्स ऑर्बिटर मिशनचे संचालक
    13) व्ही. कोटेश्‍वर राव : इस्रोचे वैज्ञानिक सचिव

    असा झाला कक्षेत प्रवेश
    मंगळयान मंगळाच्या कक्षेत शिरण्याची सर्व प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने झाली.
    बुधवारी (ता. 24) सकाळी चार वाजून 17 मिनिटांनी यानाचा "मीडियम गेन अँटेना' सक्रिय करण्यात आला. - सकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी यान उलट्या दिशेने वळविण्यात आले.
    सकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी यान मंगळाच्या मागील बाजूस गेले.
    सकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी यानाचा मंगळाच्या छायेत प्रवेश
    सकाळी 7 वाजून 17 मिनिटांनी मुख्य इंजिन सुरू करण्यात आले. सुमारे 24 मिनिटे इंजिन सुरू ठेवण्यात आले, त्यामुळे यानाचा वेग 22.3 किलोमीटर प्रतिसेकंदावरून 4.2 किलोमीटर प्रतिसेकंद करण्यात आला.
    इंजिन सुरू झाल्याचा संदेश 7.30 मिनिटांनी मिळाला. 7 वाजून 41 मिनिटांनी इंजिन बंद करण्यात आले.
    मंगळाच्या मागून पुढे आलेल्या यानाशी पुन्हा 7 वाजून 47 मिनिटांनी संपर्क.
    मंगळयान 423 बाय 80 हजार किलोमीटरच्या कक्षेत स्थापित.
    7.59 : मंगळ मोहीम यशस्वी झाल्याची "इस्रो' अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांची घोषणा.
    8.05 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन
    बंगळूरजवळील ब्याललू, अमेरिकेतील गोल्डस्टोन, स्पेनमधील माद्रिद आणि ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथून मंगळयानाशी संपर्क.

    प्रवास मंगळयानाचा...
    15 ऑगस्ट 2012 : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडून मंगळ मोहिमेची घोषणा
    5 नोव्हेंबर 2013 : मंगळयानाचे "पीएसएलव्ही-सी 25'च्या साह्याने यशस्वी उड्डाण
    7 नोव्हेंबर 2013 : यानाची कक्षा पहिल्यांदा वाढविली.
    8 नोव्हेंबर 2013 : यानाची कक्षा दुसऱ्यांदा वाढविली.
    9 नोव्हेंबर 2013 : यानाची कक्षा तिसऱ्यांदा वाढविली.
    11 नोव्हेंबर 2013 : यानाची कक्षा चौथ्यांदा वाढविली.
    16 नोव्हेंबर 2013 : पाचव्यांदा यानाच्या कक्षेत बदल
    1 डिसेंबर 2013 : मंगळयानावरील "मीडियम गेन अँटेना' लांब पल्ल्याच्या "संवादा'साठी कार्यान्वित करण्यात आला.
    2 डिसेंबर 2013 : यानाने 5 लाख 36 हजार किलोमीटरचा पल्ला पार केला. चंद्राची कक्षा पार करून यान पुढे गेले.
    4 डिसेंबर 2013 : यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्राबाहेर पोचले. 9 लाख 25 हजार किलोमीटरचा पल्ला गाठला.
    11 डिसेंबर 2013 : 22 न्यूटन ताकदीचे थ्रस्टर्स 40.5 सेकंद चालवून मार्गात सुधारणा (ट्रॅजेक्‍टरी करेक्‍शन मॅनूव्हर) करण्यात आली.
    11 फेब्रुवारी 2014 : मंगळयानाचे 100 दिवस पूर्ण
    9 एप्रिल 2014 : आपल्या एकूण प्रवासापैकी निम्मा प्रवास यानाकडून पूर्ण
    12 जून 2014 : दुसऱ्यांदा "ट्रॅजेक्‍टरी करेक्‍शन मॅनूव्हर' यशस्वी
    15 व 16 सप्टेंबर 2014 : मंगळाच्या कक्षेत यान स्थापित करण्यासंबंधीच्या आज्ञावली यानाला पाठविण्यात आल्या.
    17 सप्टेंबर 2014 : मार्गबदलासंबंधीच्या व इंजिन पुन्हा प्रज्वलित करून त्याची चाचणी घेण्यासंबंधीच्या आज्ञावली यानाला देण्यात आल्या.
    22 सप्टेंबर 2014 : मंगळयान मंगळाच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात पोचले. सुमारे दहा महिने निद्रावस्थेत असलेल्या इंजिनाची यशस्वी चाचणी.
    24 सप्टेंबर 2014 : मंगळाच्या कक्षेत मंगळयानाचा यशस्वीरीत्या प्रवेश. यानाकडून संदेश मिळण्यासही सुरवात.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad