• New

    चालू घडामोडी 27 जुलै 2018

    मॅगसेसे पुरस्कार 2018 
    » प्रतिष्ठित असा रोमन मॅगसेसे पुरस्कार 26 जुलै 2018 रोजी जाहीर झाला. 
    » यामध्ये दोन भारतीयांच्या नावांचा समावेश आहे. भारताच्या डॉ. भारत वाटवाणी आणि सोनम वांगचुक यांना यंदाच्या मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 
    » मॅगसेसे पुरस्कार आशिया खंडातील नोबेल पुरस्कार समजला जातो.
    » ‘थ्री इडियट’ या सिनेमात आमिर खानने साकारलेल्या रँचोच्या भूमिकेमुळे जगभरात वांगचुक लोकप्रिय झाले.
    » डॉ. भारत वाटवाणी यांनी रस्त्यावर भटकणाऱ्या हजारो मनोरुग्णांना आधार दिला. त्यांच्यासाठी काम केले. तसेच अशा लोकांवर मोफत उपचार केले व त्यांची कुटुंबियांशी भेट घडवून आणली. 
    » तर सोनम वांगचुक यांनी निसर्ग, संस्कृती आणि शिक्षण या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांची मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली.

    ________________

    ग्रीन महानदी मिशन :- 
    » ओडिशा सरकारने हा वृक्षारोपण उपक्रम सुरू केला आहे.
    » मृदेची धूप रोखणे आणि भूजल पातळीत वाढ करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
    » याअंतर्गत 5 कोटी पेक्षा जास्त रोप लावण्यात येणार आहेत.

    ________________

    युनिसेफ आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव 2018 :- 
    » ठिकाण - कोलकता (पश्चिम बंगाल)
    » कालावधी - 25 जुलै 
    » आवृत्ती - 18 वी 
    » उद्घाटक - केसरी नाथ त्रिपाठी (पश्चिम बंगालचे राज्यपाल)
    » 2018 ची थिम :- मुलींचे मूल्य (Value of Girls)
    » 17 देशांचे 36 चित्रपट दाखवण्यात येणार 
    » उद्घाटक चित्रपट :- Moana (अमेरिका)
    ________________

    10 वी ब्रिक्स परिषद :- 
    » ठिकाण - जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका)
    » कालावधी - 25 ते 27 जुलै 2018 
    » थिम :- BRICS in Africa – collaboration for inclusive growth and shared prosperity in the 4th industrial revolution
    ________________

    संपूर्णतः महिलांद्वारे महिलांसाठी चालविण्यात येणारे देशातील पहिले सार्वजनिक क्षेत्रातील हॉटेल तिरुवनंतपुरम (केरळ) येथे सुरू करण्यात येत आहे. हॉस्टेस्स असे या हॉटेलचे नाव असेल.
    ________________

    #NewBooks 
    When Coal Turned Gold: The Making of a Maharatna Company
    » लेखक :- पार्थ सारथी भट्टाचार्य 
    » भट्टाचार्य हे कोल इंडिया लिमेटेड चे माजी अध्यक्ष्य आहेत.
    ________________

    आता पश्चिम बंगालचे होणार बांगला:- 
    » पश्चिम बंगालच्या विधानसभेत 26 जुलै 2018 रोजी राज्याचे नाव बदलण्यासाठी ठराव पास करण्यात आला आहे. 
    » आता पश्चिम बंगालचे नाव बदलून बांगला करण्यात येणार असल्याचा हा प्रस्ताव आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतरच हे नाव बदलण्यात येईल.
    »  यापूर्वी, केंद्र सरकारने राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव नाकारला होता. 
    » त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली राज्याने इंग्रजी, हिंदी आणि बंगाली या तिन्ही भाषेत नांव बदलण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
    »  दरम्यान, 2011 साली सत्तेत आल्यानंतर तृणमूल काँग्रेस सरकारने राज्याचे पश्चिम बंगाल हे नाव बदलून बंगाल हे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. 
    » पश्चिम बंगालचे नाव बदलण्यामागे प्रमुख कारण म्हणजे राज्याच्या बैठकांच्या यादीत इंग्रजी आद्यअक्षरानुसार पश्चिम बंगालचे नांव हे खूप खाली राहत असल्याचे कारण सांगण्यात येत आहे.

    ___________________

    डॉक्टरांना सापडला देशातील नवा रक्तगट 
    »  कर्नाटकमधील कस्तुरबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका अतिशय दुर्मिळ रक्तगटाचा शोध लावला आहे. 
    » या रक्तगटाचे नाव पीपी किंवा पी नल फोनोटाइप असे आहे. 
    »  ज्या रुग्णाचा हा रक्तगट आहे, तो रुग्ण हा रक्तगट असणारी देशातील पहिली आणि एकमेव व्यक्ती ठरली आहे.  
    »  डॉक्टरांनी रुग्णाच्या रक्ताचा नमूना आंतरराष्ट्रीय ब्लड ग्रूप रेफरन्स लॅबॉरेटरीमध्ये (IBGRL) ब्रिस्टल येथे (यूके) तपासणीसाठी पाठवले. 
    »  तिथे तापसाणीत या रुग्णाच्या रक्तात पीपी फेनोटाइप सेल्स असल्याचे आढळले.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad