• New

    सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा, २०१७ : चालू घडामोडी प्रश्न

    प्र.१) ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत’ खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
    (१) दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना एल.पी.जी. जोडणी (LPG Connection) देणारी ही एक सामाजिक कल्याणकारी योजना आहे.
    (२) केंद्र शासनाने २०१८-१९ या वर्षासाठी ५ कोटी एल.पी.जी. देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
    (३) महिलांना स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
    (४) सदरहू योजना २०१६ साली लागू करण्यात आली.

    उत्तर व स्पष्टीकरण :- दुसरे विधान चीकीचे आहे.
    प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०१६ मध्ये ही योजना उत्तरप्रदेशातील बालीया जिल्ह्यातील मालदेपूर (Maldepur Morh) येथून सुरू केली.
    घोषवाक्य : स्वच्छ इंधन, बेहतर जीवन
    उद्देश : महिलांचे सशक्तीकरण आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण
    लाभार्थी : बीपीएल कुटुंबातील महिला सदस्य
    लाभ: प्रत्येक जोडनीसाठी मोफत एलपीजी गॅससह १६०० रुपये आर्थिक सहाय्य
    अंमलबजावणी जबाबदारी : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
    लक्ष्य : तीन वर्षांत (२०१९ पर्यन्त) पाच कोटी गरीब कुटुंबांना एलपीजी गॅस पुरविणे
    संदर्भ :- चालू घडामोडी डायरी (अंक पहिला)(पेज नं. १८४) (लेखक :- बालाजी सुरणे, दिव्या महाले)
    ________________________________________
    प्र.२) ‘स्कीम फॉर अॅग्रोमरीन प्रोसेसिंग अँड अॅग्रो प्रोसेसिंग क्लासटर्स’ या योजनेचे नाव बदलून कोणते नाव ठरविण्यात आले आहे?
    (१) प्रधानमंत्री पीक विमा योजना
    (२) परंपरागत कृषि विकास योजना
    (३) राष्ट्रीय कृषि विकास योजना
    (४) प्रधानमंत्री किसान संपदा योजना

    उत्तर व स्पष्टीकरण :- प्रधानमंत्री किसान संपदा योजना
    ‘संपदा’ या नव्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
    अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या योजनांच्या फेर रचनेला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मान्यता दिली आहे.
    ‘स्कीम फॉर ऍग्रो मरिन प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रो प्रोसेसिंग क्लस्टर’ म्हणजेच संपदा (SAMPADA ) या योजनेअंतर्गत ही फेररचना करण्यात येणार आहे.
    यामुळे 20 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून 2019 -20 पर्यंत देशात 530500 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.
    कृषी प्रक्रियेचे आधुनिकीकरण, कृषी क्षेत्राला जोड आणि कृषी क्षेत्रातले वाया जाणारे धान्य कमी करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.
    ऑगस्ट २०१७ मध्ये योजनेचे नामकरण ‘प्रधानमंत्री किसान संपदा योजना’ असे करण्यात आले.
    संदर्भ :- चालू घडामोडी डायरी (अंक चौथा) (पेज नं. ३१५)
    ________________________________________
    प्र.३) जोड्या लावा (अरुण साधू यांचे साहित्यिक कार्ये)
    ‘अ’ ‘ब’
    अ) कादंबरी i) संज्ञापना क्रांती
    ब) कथासंग्रह ii) सिंहासन
    क) नाटक iii) मंत्रजागर
    ड) शैक्षणिक iv) पडघम
     
    (१) ii i iv iii
    (२) iii i ii iv
    (३) iv iii ii i
    (४) ii iii iv i

    उत्तर व स्पष्टीकरण :- (४)
    ज्येष्‍ठ साहित्यिक पत्रकार अरुण साधू यांचे निधन
    - ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण साधू यांचे वयाच्या 76 व्या वर्षी मुंबईत निधन झाले.   
    - जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्‍दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले.
    - अरुण साधू हे सहा वर्षे पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते.
    - त्यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती.
    - ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
    - कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
    - कादंबर्‍या :- झिपर्‍या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट
    - कथासंग्रह :- एक माणूस उडतो त्याची गोष्ट, कथा युगभानाची (निवडक कथा - संपादिका मीना गोखले), ग्लानिर्भवति भारत, बिनपावसाचा दिवस, बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती, मंत्रजागर, मुक्ती
    - नाटके :- पडघम
    - ललित लेखन :- अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण (चरित्र)
    - शैक्षणिक :- संज्ञापना क्रांती
    - एकांकिका :- प्रारंभ, बसस्टॉप
    संदर्भ :- चालू घडामोडी डायरी (अंक ३ व ४) (पेज नं. १०३, १३५)
    ________________________________________
     प्र.४) अल्पसंख्यांकाचे साक्षमीकरण उद्देश असलेल्या कोणत्या योजनेचा प्रारंभ जानेवारी, २०१६ मध्ये जम्मू व काश्मीर येथे झाला?

    (१) नई तलाश
    (२) नया मसीहा
    (३) नई मंजिल
    (४) नई प्रगती, नया विश्वास

    उत्तर व स्पष्टीकरण :- नई मंजिल 
    नई मंजिल योजना 
    - २० जानेवारी २०१६ रोजी नजमा हेपतूला यांनी ही योजना जम्मू काश्मीरमध्ये सुरू केली.
    - उद्देश :- अल्पसंख्यांक मुलींना सात निवडक क्षेत्रांत तीन महिन्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण
    संदर्भ :-चालू घडामोडी समग्र अर्धवर्षीकी (अंक पहिला) (लेखक :- बालाजी सुरणे)
    ________________________________________
    प्र.५) किदांबी श्रीकांत बाबत खलील विधाने विचारात घ्या :
    अ) तो ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.
    ब) तो इंडोनेशियन ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.
    क) तो चीन ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.
    ड) तो स्विस ग्रँड प्रीक्स गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन खेळाडू आहे.
    वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?

    (१) अ, ब, क
    (२) ब, क, ड
    (३) अ, क, ड
    (४) अ, ब, क, ड

    उत्तर व स्पष्टीकरण :- अ,ब,क,ड
    इडोनेशिया ओपन: किदम्बी श्रीकांत चॅम्पियन
    इंडोनेशिया ओपन सिरीजच्या बॅडमिंटन स्पर्धा पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांत ने जपानच्या काजूमासा साकाईला पराभूत करत इंडोनेशिया ओपन सुपर सिरीजचा किताब जिंकला.
    महत्त्वाची मुद्दे
    - श्रीकांत संध्या जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर आहे.
    - श्रीकांतने विजयानंतर दुसऱ्यांदा हा सुपर सिरीज किताब आपल्या नावावर केला आहे.
    - याआधी 2014 मध्ये ‘चायना ओपन’मध्ये श्रीकंतने बाजी मारली होती.
    - श्रीकांतसाठी ही चौथी सुपर सिरीज फायनल होती.
    - 2015 मध्ये श्रीकांत ‘इंडिया ओपन’चा विजेता ठरला होता.
    - 2015 मध्ये स्विस ग्रँड प्रीक्स गोल्ड मिळवणारा पहिला भारतीय ठरला होता.
    संदर्भ :- चालू घडमोडी डायरी (अंक दूसरा) (पेज नं. १२८, २०४)
    ________________________________________
    प्र.६) राष्ट्रपती निवडणूक २०१७ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
    (१) विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य हे त्याच्या/तिच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते.
    (२) संसद सदस्यांच्या मताचे मूल्य हे सर्वांच्या सारखेच असते.
    (३) उत्तर प्रदेश विधानसभा सदस्याच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वाधिक होते.
    (४) गोवा विधानसभा सदस्याच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वांत कमी होते.

    उत्तर व स्पष्टीकरण :- चौथे विधान चुकीचे आहे.
    रामनाथ कोविंद भारताचे 14 वे राष्ट्रपती
    भारताच्या 14 व्या राष्ट्रपतीसाठी 17 जुलै रोजी निवडणूक झाली आणि 20 जुलै 2017 रोजी निकाल जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा विजय झाला. त्यांनी यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला. रामनाथ कोविन्द यांनी 25 जुलै 2017 रोजी राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला.
    रामनाथ कोविंद यांचा अल्पपरिचय:
    - जन्म: 1 ऑक्टोबर 1945 रोजी उत्तर प्रदेशातील पराउख या गावी झाला. (सध्या वय-71 वर्षे)
    - कोविंद हे कोळी समाजाचे असून यूपीमध्ये त्याचा अनुसूचीत जातीमध्ये समावेश होतो.
    - रामनाथ कोविंद यांनी सविता यांच्यासोबत 30 मे 1974 रोजी विवाह केला. त्यांना प्रशांत कुमार आणि स्वाती ही दोन अपत्ये आहेत.
    - रामनाथ कोविंद यांचे वडील मैकुलाल गावाचे सरपंच होते.
    - शिक्षण : कानपुर विद्यापीठातून वाणिज्य व एल.एल.बी. पदवी 
    - ते तिसर्‍या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झाले मात्र आयएएस न मिळाल्याने त्यांनी पद स्वीकारले नाही.
    - 1971 मध्ये ते दिल्लीच्या बार काऊंसिलमध्ये वकील म्हणून नियुक्त झाले.
    - 1971-75 आणि 1981 : अखिल भारतीय कोळी समाज, महासचिव
    - 1977-79 : दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील.
    - 1980-93: सर्वोच्च न्यायालयातील सरकारच्या स्टँडिंग कौन्सिलवर कार्य.
    - 1978 मध्ये सरकारचे अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड बनले.
    - 1994 रोजी उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आले. ते 2006 पर्यन्त राज्यसभेचे प्रतींनिधी होते. (दोन वेळा राज्यसभेचे खासदार)
    - त्यांनी दिल्ली तसेच सर्वोच्च न्यायालयात 16 वर्षे वकिली केली.
    - १९९८ ते २००२ या काळात भाजप दलित मोर्चाचे अध्यक्षपद सांभाळले.
    - 16 ऑगस्ट 2015 ते 20 जून 2017 या कालावधीत बिहारचे 36 वे राज्यपाल होते.
    - त्यांनी अनुसूचित जाती/जमातींच्या कल्याणासाठीची संसदीय समिती, गृह व्यवहारासंदर्भातील संसदीय समिती, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संसदीय समिती, सामाजिक न्याय आणि सबलीकरण संसदीय समिती आणि कायदा आणि सुव्यवस्था संसदीय समितीसारख्या विविध संसदीय समित्यांमध्ये कार्य केले.
    - कोविंद डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ, लखनऊचे व्यवस्थापकीय मंडळ तसेच भारतीय व्यवस्थापन संस्था, कोलकाताच्या नियमित मंडळाचे सदस्य म्हणून देखील कार्यरत होते.
    - अमेरिकेत गेलेल्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचे देखील ते सदस्य होते तसेच त्यांनी ऑक्टोबर 2002 मध्ये अमेरिकेच्या संसदेला संबोधित केले होते.
    - त्यांनी थायलंड, नेपाळ, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेचा दौरा देखील केला आहे.
    मीरा कुमार यांचा अल्पपरिचय
    - माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या त्या कन्या आहेत.
    - काँग्रेस पक्षाच्या त्या वरिष्ठ नेत्यांपैकी त्या आहेत.
    - भारतीय विदेश प्रशासकीय सेवेतून करिअरची सुरुवात त्यांनी केली.
    - मीरा कुमार या 1973 मध्ये भारतीय विदेश सेवेत रुजू झाल्या होत्या.
    - यानंतर 1985 मध्ये त्यांनी आपल्या राजकीय जीवनास प्रारंभ केला.
    - 1985 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडूण गेल्या.
    - 1990 मध्ये त्या काँग्रेसच्या कार्यकारणी समिती सदस्य होत्या.
    - 1996 आणि 1998 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या.
    - 2004 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांना सामाजिक न्याय मंत्री पदाची सुत्रे देण्यात आली.
    - तसेच 2009 मध्ये संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेत आल्यावर मीरा कुमार यांना लोकसभेच्या सभापती संधी देण्यात आली.
    - त्या देशाच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती ठरल्या.
    राष्ट्रपती निवडणूक 2017
    - निवडणूक दिनांक – 17 जुयली 2017
    - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ९९ टक्के मतदान झाले.
    - कोविंद यांनी ६५.६५ टक्के मते मिळाली
    - मीराकुमार यांना ३५.४३ टक्के मते मिळाली.
    - कोविंद यांना २ हजार ९३० मते (मतांचं मूल्य- ७ लाख २ हजार ६४४) तर मीराकुमार यांना १ हजार ८४४ मते (मतांचं मूल्य-३ लाख ६७ हजार ३१४) मिळाली आहेत.
    - ७७ मते बाद ठरली आहेत.
    - निवडणुकीचे मुख्य निर्वाचन अधिकारी - अनुप मिश्रा
    - संसद भवनातील पहिल्या मजल्यावरील ६२ क्रमांकाच्या दालनात तसेच देशातील ३२ राजधान्यांमध्ये मतदान झाले.
    - या निवडणुकीत एकूण ७७१ खासदार आणि ४१२० आमदार अशा ४८९१ लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क लाभला.
    - त्यांच्या एकूण मतांचे मूल्य १० लाख ९८ हजार ९०३ इतके होते.
    - संसद भवनात ७१७ खासदारांना मतदान करावयाचे होते. पण त्यापैकी ७१४ खासदारांनी मतदान केले.
    - ५४ खासदारांनी आपापल्या राज्यांच्या विधानमंडळांमध्ये मतदान केले.
    - तृणमूल काँग्रेसचे तुरुंगात असलेले खासदार तापस पॉल, बिजू जनता दलाचे रामचंद्र हंसदा आणि पीएमकेचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री अंबुमणी रामदास यांनी मतदान केले नाही.
    - लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रत्येकी दोन जागा रिक्त असून भाजपचे खासदार छेदी पासवान यांना मताधिकार नसल्याचे निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले.
    - अरुणाचल प्रदेश, छत्तीसगढ, हरयाणा, आसाम, बिहार, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, नागालँड, उत्तराखंड, पुडुचेरीमध्ये शंभर टक्के मतदान झाले.
    - मतमोजणीच्या आठ फेऱ्या झाल्या. त्यात ५२२ खासदारांनी कोविंद यांना तर २२५ खासदारांनी मीराकुमार यांना मतदान केले.
    - २०१२ मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांना ७ लाख १३ हजार ७६३ मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी पी. ए. संगमा यांना ३ लाख १५ हजार ९८७ मते मिळाली होती. ते पाहता प्रणव मुखर्जी यांच्या तुलनेत कोविंद यांना कमी मते पडली आहेत.
    कशी होते राष्ट्रपतींची निवडणूक?
    राष्ट्रपती कोण होऊ शकतात?
    - उमेदवाराचे वय 35 हून अधिक असावे.
    - 50 निवडलेल्या (नामांकित नव्हे) आमदारांचा वा खासदारांचा त्याला पाठिंबा असावा
    - उमेदवार भारताचा नागरिक असावा
    - 15 हजार रूपये  अनामत रक्कम आरबीआयमध्ये त्याने जमा केलेले असावे.
    राष्ट्रपती निवडले कसे जातात?
    - राष्ट्रपतीपद हे भारताचे सर्वोच्च संविधानिक पद आहे. संविधानातील कलम 54 आणि 55 या निवडीवर भाष्य करतात.
    - या देशातील लोक प्रत्यक्ष मतदान करून राष्ट्रपती निवडत नाहीत. तर लोकांनी ज्यांना निवडले ते लोकसभेचे खासदार, विधानसभेचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार राष्ट्रपतीपदासाठी मतदान करतात आणि राष्ट्रपती निवडतात. यातले सगळे प्रतिनिधी हे निवडलेले असतात. कुठलाही नामांकित प्रतिनिधी या निवडणुकीसाठी मतदान करु शकत नाही.
    - हे मतदान गुप्त पद्धतीने होते. कुणी कुठल्या उमेदवाराला मत दिले हे शेवटपर्यंत कळत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठलाही पक्ष त्यांच्या उमेदवारासाठी वा इतर उमेदवारासाठी व्हीप लागू करू शकत नाही. प्रत्येक मतदाराला कुठल्याही उमेदवारास मत देण्यास स्वतंत्र असतो.
    निवडणूक प्रक्रियेतील वेगळेपण
    - राष्ट्रपतीपदाची निवडणूक थोडी वेगळी असते. इथं प्रत्येक मतदाराच्या अर्थात प्रतिनिधीच्या मताला एक वेगळे मत मूल्य असते. प्रत्येक आमदाराचे मत मूल्य खालील प्रमाणे ठरवले जाते.
    - (राज्याची एकूण लोकसंख्या /राज्यातीत एकूण आमदारांची संख्या )/1000. या  लोकसंख्येची आकडेवारी 1971च्या सेन्सस मधून घेतली जाते. सर्वाधिक मतं मूल्य हे उत्तर प्रदेशाच्या आमदाराचे 208 इतके आहे तर सर्वात कमी 7 सिक्कीच्या आमदाराचे आहे. खासदाराचे मत ही अशाच एका फॉर्म्युल्याने ठरवले जाते. सध्या प्रत्येक खासदाराचे मत मूल्य 708 इतके आहे.
    - प्रत्येक मतदाराला मतदान केवळ एका उमेदवाराला करत नाही. तो प्रत्येक उमेदवाराला प्राधान्य क्रमाने मतदान करतो. उदा.अ-ब-क हे  3 उमेदवार असतील. तर तो पुढीलप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवून मतदान करू शकतो. 1 अ,  2 ब,  3 क
    - प्रत्येक मतदात्याला प्रथम प्राधान्य देणे बंधनकारक असते. तर 2 रा आणि 3 ऱ्या प्राधान्याचा रकाना भरणे ऐच्छिक असते.
    - मतदान ही वेगळ्या प्रकारचे असल्याने मतमोजणी ही वेगळ्या प्रकारे होते.
    मतमोजणी
    - मतमोजणीसाठी एक वेगळा फॉर्म्यूला वापरला जातो.
    - (एकुण ग्राह्य मते /2)1  =विजयासाठी आवश्यक मते.
    - समजा एकूण मते 20 असतील तर, 20/2=10, 10+1=11
    - आता समजा: 1) अ ला 11 मते प्रथम प्राधान्याची मिळाली. 2) ब ला  5 मते प्रथम प्राधान्याची मिळाली. 3) क ला 4 मते प्रथम प्राधान्याची मिळाली. तर विजेता अ ठरतो.
    - पण जर: 1) अ ला 9 मते प्रथम प्राधान्याची मिळाली. 2) ब ला  7 मते प्रथम प्राधान्याची मिळाली. 3) क ला  4 मते प्रथम प्राधान्याची मिळाली. इथे कुणालाच 11 मतं मिळाली नाही मग ज्याला सगळ्यात कमी मते मिळाली तो स्पर्धेतून बाहेर पडतो.
    - त्याची मतं वरच्या दोघांमध्ये वाटली जातात.आणि जोपर्यंत एकच उमेदवार विजयापुर्ती मतं मिळवत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया रिपीट केली जाते. तर अशा लांबलचक प्रक्रियेतून भारताचा राष्ट्रपती निवडला जातो.

    संदर्भ :- चालू घडामोडी (अंक ४) (पेज नं. ४)
    ________________________________________
    प्र. ७) भारतातील एका पर्यटन स्थळासाठी शून्य-उत्सर्जन (प्रदूषण) अशी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली. हे पर्यटनस्थळ ________ या राज्यात आहे.
    (१) उत्तराखंड
    (२) मेघालय
    (३) हिमाचल प्रदेश
    (४) राजस्थान

    उत्तर व स्पष्टीकरण :- हिमाचल प्रदेश 
    भारतातील पहिली इलेक्ट्रिक बस सेवा हिमाचल प्रदेशातील रोहतंग खिंड या भागात सुरू करण्यात आली आहे.
    संदर्भ :- चालू घडामोडी डायरी (अंक ४) (पेज नं. ९८)
    ________________________________________
    प्र.८) भारतीय क्रीडा मंत्रालयाने प्रथमच राष्ट्रीय क्रीडा संग्रहालय स्थापन करण्याचे योजिले आहे. हे संग्रहालाय __________या शहरात असेल.
    (१) मुंबई
    (२) नवी दिल्ली
    (३) कोलकत्ता
    (४) बेंगळुरु

    उत्तर व स्पष्टीकरण :- नवी दिल्ली 
    पहिले राष्ट्रीय क्रीडा संग्रहालय 
    - केंद्रीय क्रीडा व युवक मंत्रालयाने देशातील पहिले राष्ट्रीय क्रीडा संग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
    - हे क्रीडा संग्रहालय जवाहरलाल नेहरू स्टेडीयम, नवी दिल्ली येथे असणार आहे.
    - यामध्ये क्रीडा क्षेत्रात भारताने घेतलेल्या उत्तुंग भरारीचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
    संदर्भ :- चालू घडामोडी डायरी (अंक ४) (पेज नं. १८१)
    ________________________________________
    प्र.९) साहित्यात मिळालेला २०१७ नोबेल पुरस्कराच्या संदर्भात पुढील विधांनांवर विचार करा.
    अ) विजेत्याचे नाव काझुओ ईशीगुरो आहे.
     ब) तो एक ब्रिटिश लेखक आहे.
    क) त्यांचा जपानमध्ये जन्म झाला.
    वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत?
    (१) केवळ अ विधान बरोबर आहे
    (२) केवळ ब विधान बरोबर आहे
    (३) केवळ क विधान बरोबर आहे
    (४) वरील सर्व विधान बरोबर आहेत.

    उत्तर व स्पष्टीकरण :- सर्व विधाने बरोबर आहेत
    काझुओ इशिगुरो यांना साहित्याचे नोबेल
    - जपानी वंशाचे ब्रिटनचे लेखक काझुओ इशिगुरो यांना 2017 चा नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे.
    - लघुकथा, कादंबऱया, चित्रपट-टीव्ही मालिकांसाठी पटकथा अशी बहुप्रवसा लेखणी लाभलेले इशिगुरो 1982 पासून पूर्णवेळ लेखक आहेत.
    - इशिगुरो जन्माने जपानमधील नागासाकीचे.
    - इशिगुरो यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1954 चा आहे.  त्यांचे वय पाच वर्षे असताना कुटुंबाने ब्रिटनमध्ये स्थलांतर केले.
    - इशिगुरो यांची इंग्रजी साहित्य संपदा :-
    1982: ए पेल व्ह्यू ऑफ हिल्स
    1986: अॅन आर्टिस्ट ऑफ द प्लोटिंग वर्ल्ड
    1989: द रिमेन्स ऑफ द डे
    1995: द अनकन्सोल्ड
    2000: व्हेन वुई वेअर ऑर्फन्स
    2005: नेव्हर लेट मी गो
    2009: नॉक्टर्नस्: फाईव्ह स्टोरीज ऑफ म्युझिक अँड नाईटफॉल
    2015: द बरीड् जायंट
    साहित्यातील नोबेल...
    110 जणांना आजअखेर साहित्यातील नोबेल मिळाले आहे.
    14 महिलांचा यामध्ये समावेश आहे.
    4 वेळा नोबेल दोन साहित्यिकांना विभागून देण्यात आले आहे.
    41 व्या वर्षी नोबेल मिळविणारे रुडयार्ड किपलिंग सर्वात तरूण पुरस्कार विजेते होते.
    88 व्या वर्षी डोरीस लॉरेटस् यांना पुरस्कार मिळाला होता. ते सर्वात वृद्ध विजेते ठरले होते.
    65 व्या वर्षी सर्वसाधारणपणे साहित्यिकांना नोबेल मिळाले आहे.
    संदर्भ :- www.mpscmantra.com
    ________________________________________
    प्र. १०) ब्रिक्स-ए.आर.पी. ची स्थापना करण्यासाठी भारत व विविध ब्रिक्स देशांमधील एका सामंजस्य करारास (एमओयू) केंद्रीय मंत्रिमंडळने मंजूरी दिली आहे. या कराराची _______ उद्दीष्ट आहेत.
    (१) निरंतर आरोग्य विकास
    (२) निरंतर शेती विकास
    (३) निरंतर औषध विकास
    (४) निरंतर पर्यावरण विकास

    उत्तर व स्पष्टीकरण :- निरंतर शेती विकास 

    ARP - Agriculture Research Platform
    ________________________________________

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad