• New

    Excise Sub-Inspector (Pre.) Examination, 2017 (Current Affairs Questions)

                        
    28 मे 2017 रोजी झालेल्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट क पूर्व परीक्षामध्ये विचारलेले चालू घडामोडी वरील प्रश्न उत्तरांसहित….
    ______________________________________________________
    प्र. 1) इंटरनॅशनल मेरीटाइम ऑर्गनायझेशन या संस्थेचा सागरी मोहिमेत अतुलनीय शौर्य दाखविल्याबद्दल पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण?
    1)      कॅप्टन अंबिका दास
    2)      कॅप्टन शिखा बिस्वाल
    3)      कॅप्टन नेहा पिलई
    4)      कॅप्टन राधिका मेनन
    उत्तर : कॅप्टन राधिका मेनन .
    संदर्भ : समग्र अर्ध वार्षीकी (बालाजी सुरणे) (पेज नं. 270)
    स्पष्टीकरण :
    कॅप्टन राधिका मेनन यांना आयएमओचा पुरस्कार
    §  भारतीय व्यापारी नौसेनेच्या पहिल्या महिला कॅप्टन राधिका मेनन यांना सागरी शौर्याबद्दल आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
    §  हा पुरस्कार पटकाविणाऱ्या राधिका मेनन या जगातील पहिल्या महिला आहेत.
    §  राधिका मेनन यांनी प्रतिकूल परिस्थितीत दुर्गाम्मा या बुडत्या जहाजासह सात मच्छीमारांना वाचविले होते. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना IMO चा पुरस्कार मिळाला आहे.
    §  याशिवाय बी.एम. दास यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
    §  ते इंडियन कोस्ट गार्डच्या बचाव हेलिकॉप्टचे ड्राइवर असून त्यांनी एक व्यापारी जहाज बुडत असताना सर्व 14 कर्मचाऱ्यांना वाचविले होते.
    राधिका मेनन
    F 1999 मध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ट्रेनी रेडियो ऑफिसर म्हणून सहभाग.
    F केरळमधील कोडुंगलूर येथे जन्म.
    F 2011- इंडियन मर्चंट नेवीमध्ये कॅप्टन बनणार्‍या पहिल्या महिला.
    F  2012 मध्ये MT सुवर्णा स्वराज्य या नौकेवर रुजू.
    आंतरराष्ट्रीय समुद्र संघटना
    आंतरराष्ट्रीय समुद्र संघटना (IMO) ही संयुक्त राष्ट्र संघाच्या संयुक्त विद्यमानाने जहाज सुरक्षा आणि जहाजांद्वारे समुद्रात होणाऱ्या प्रदूषणाच्या नियंत्रणाची जबाबदारी पार पाडत असते.

    प्र.2) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच अनावरण केलेल्या भीम (BHIM) हे लघुरूप असलेल्या अॅपचे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते?
    भारत इंटरमीडियट फॉर मनी
    भारत इंटरमिशन फॉर मनी 
    भारत इंटरफेस फॉर मॉनिटरी पेमेंट
    भारत इंटरफेस फॉर मनी
    उत्तर : भारत इंटरफेस फॉर मनी
    संदर्भ : समग्र अर्धवार्षिकी (चालू घडामोडी) (लेखक : बालाजी सुरणे) (पेज नं.: 43)
    स्पष्टीकरण :
    भीम अ‍ॅप्लिकेशन
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीआयवर आधारित भीम (BHIM: Bharat Interface for Money) या मोबाइल पेमेंट अ‍ॅप्लीकेशनचे नवी दिल्ली येथे भरलेल्या डिजी धन मेळामध्ये 30 डिसेंबर 2016 रोजी उद्‌घाटन केले आहे.
    अ‍ॅपचे वैशिष्ट्ये
    @ हे अ‍ॅप आधार वर आधारित असून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियायाने विकसित केले आहे.
    @ सध्या फक्त अँड्रॉइडवर उपलब्ध असून युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)च्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण होईल.
    @ यामध्ये कोणताही प्रक्रिया कर असणार नाही. मात्र वापरकर्त्यांची बँक व्यवहारांवरील कर लावू शकते.
    @ तूर्तास अ‍ॅपवरून 30 बँकांचे व्यवहार होऊ शकतात. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, युनियन बँक ऑफ इंडिया, साउथ इंडिया बँक, स्टँडर्ड चार्टर्ड यांचा त्यात समावेश असेल.
    @ भीमवरून व्यवहार करण्यासाठी पैसे पाठविणारा आणि स्वीकारणारा या दोघांचेही यूपीआयसक्षम बँकेत खाते असला हवे.
    @ वापरणाऱ्याच्या फोनमध्ये मोबाइल बँकिंग सुरू असणे आवश्यक नाही. मात्र वापरणाऱ्याच्या मोबाइल क्रमांकाची नोंद बँकेत असणे गरजेचे आहे.

    प्र. 3) जागतिक बँकेच्या “इज ऑफ डूइंग बिझनेस रीपोर्ट, 2016” मध्ये भारताला कितवा क्रमांक मिळालेला आहे?


    1)      120
    2)      130
    3)      134
    4)      142


    उत्तर : 130.
    संदर्भ : समग्र अर्धवार्षीकी 2016 (चालू घडामोडी) (लेखक : बालाजी सुरणे) (पेज नं. 61)
    स्पष्टीकरण :
    इज ऑफ डुइंग बिझनेसच्या यादीत भारत 130 व्या स्थानी
    §  जागतिक बँकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये एकूण 189 देशांच्या या यादीत भारताला 130 वा क्रमांक मिळाला आहे.
    §  जागतिक बँकेने जाहीर केलेल्या अहवालाचे शीर्षक डुईंग बिनेस 2017: इक्वल पॉर्च्युनिटी फॉर ऑल हे होते.
    अहवालातील महत्त्वपूर्ण  मुद्दे
    F पहिले दहा देश: सिंगापूर, न्यूझीलंड, डेन्मार्क, द. कोरिया, हाँगकाँग, ब्रिटन, अमेरिका, स्वीडन, नॉर्वे आणि फिनलंड.
    F ब्रिक्स देश : रशिया (40), दक्षिण आफ्रिका (74), चीन (78), ब्राझील (123), भारत (130)
    F भारताचे शेजारी : भूतान (73), चीन (78), नेपाळ (107), श्रीलंका (110), पाकिस्तान (144), बांग्लादेश (176).
    F या अहवालानुसार 2004 मध्ये भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी 127 दिवस लागत होते. आता 29 दिवस लागतात. यासाठी 13 प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात.
    F कंपनीसाठी वीज कनेक्शन घेणेदेखील सोपे झाले आहे. कर्जवसुली ट्रिब्यूनलमुळे अडकलेले कर्ज (एनपीए) 28 टक्क्यांनी कमी झाले आहे.
    F मोठे कर्ज स्वस्त झाले आहे. असे असले तरी करप्रणाली अजूनही व्यवसाय करण्यासाठीच्या रस्त्यातली मोठी अडचण आहे.
    काय आहे इज ऑफ डुईंग बिझनेस?
    F जागतिक बँकेमार्फत दरवर्षी हा निर्देशांक इज ऑफ डुईंग बिजनेस अहवालामध्ये जाहीर केला जातो.
    F पहिल्यांदा हा निर्देशांक 2004 मध्ये जाहीर करण्यात आला.
    F देशांची रँकिंग 10 विविध निकशांवरून ठरवली जाते.
    F 10 निकष: व्यवसाय सुरुवात, विद्युत जोडणी, बांधकाम परवाने, संपत्ती नोंदणी, गुंतवणूकदार सुरक्षा, पतदर्जा, कामगारांना रोजगार, परकीय व्यापार, करव्यवस्था, कराराची अंमलबजावणी आणि दिवाळखोरी निवारण


    प्र. 4) जानेवारी 2017 मध्ये अग्नि ______ चे सहावे चाचणी प्रक्षेपण करण्यात आले.


    1)      4
    2)      5
    3)      6
    4)      7


    उत्तर : 4
    संदर्भ : चालू घडामोडी डायरी (पहिला अंक 2017) (लेखक : बालाजी सुरणे,दिव्या महाले) (पेज नं. 91)
    स्पष्टीकरण :
    अग्नी-4 ची यशस्वी चाचणी
    §  आण्विक क्षमता असलेल्या अग्नी-४ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची भारताने २ जानेवारी २०१६ रोजी यशस्वी चाचणी घेतली आहे.
    §  ओडिशाच्या किनारपट्टीवरील अब्दुल कलाम बेटावर स्ट्रटेजिक फोर्सेस कमांडने एका रोड-मोबाईल प्रक्षेपकावरून अग्नी-4 क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.
    अग्नी-४ बद्दल
    @ लांब पल्ल्याचे आंतरखंडीय स्वानातीत क्षेपणास्त्र
    @ जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता.
    @ चार हजार किलोमीटर एवढ्या अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता
    @ संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वतीने एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत हे क्षेपणास्त्र विकसित
    @ या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून अण्वस्त्रांचा वापर करता येऊ शकतो.
    @ सुमारे एक टन स्फोटके वाहून नेण्याची क्षमता
    @ मध्यम ते लांब पल्ल्याच्या अग्नी क्षेपणास्त्रांच्या मालिकेतील हे चौथे क्षेपणास्त्र
    @ आतापर्यंत अग्नी-१,, ३ ही तीन प्रकारची क्षेपणास्त्रे लष्करी वापरासाठी सज्ज झाली आहेत.

    प्र. 5) 2016 सालच्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसान याने अंतिम फेरीत कोणाचा पराभव करून विजेतेपद पटकावले?
    1)      विश्वनाथ आनंद
    2)      व्लादीमिर क्रामनिक
    3)      सर्गेइ कार्जाकिन
    4)      फेबिआनो कारूआणा
    उत्तर : सर्गेइ कार्जाकिन
    संदर्भ : समग्र अर्धवार्षीकी (चालू घडामोडी) 2016 (लेखक : बालाजी सुरणे) (पेज नं. 305)
    स्पष्टीकरण :
    कार्लसनने राखले जगज्जेते पद
    §  नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने तिसर्‍यांदा जागतिक बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेत विजय मिळविला आहे.
    §  पंचावन्नाव्या बुद्धिबळ जगज्जेते पदाच्या लढतीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने रशियाच्या सर्जी कार्जाकिनला पराभूत केले आहे.

    मॅग्नस कार्लसन
    -          नॉर्वेचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर
    -          वयाच्या 13 व्या वर्षी ग्रँडमास्टर
    -          2010 मध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान
    -          जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळविणारा इतिहासातील सर्वांत  कमी वयाचा
    -          2013 मध्ये विश्वनाथ आनंदला हरवून जगजेत्ता
    -          2013 मध्ये टाइम्स मासिकाच्या सर्वांत  प्रभावशाली 100 व्यक्तीच्या यादीत समावेश

     प्र. 6) 2017 मधील उत्तर प्रदेश विधान सभेच्या निवडणुका ______ टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या.


    1)      4
    2)      5
    3)      6
    4)      7


    उत्तर : 7
    संदर्भ : चालू घडामोडी डायरी (जानेवारी 2017) (लेखक: बालाजी सुरणे) (पेज नं. 4)
    स्पष्टीकरण :
    पाच राज्यातील निवडणुक कार्यक्रम जाहीर
    भारतीय निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणीपुर आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या पाच राज्यांमधील निवडणुकांची ११ मार्च २०१७ रोजी मतमोजणी होणार आहे.
    काही महत्वपूर्ण मुद्दे
    §  उत्तराखंड, गोवा आणि पंजाब मध्ये एकाच टप्प्यामद्धे निवडणूक होणार आहे.
    §  गोव्यामधील ४० जागांसाठी आणि पंजाबमधील ११७ जागांसाठी ४ फेब्रुवारी २०१७ रोजी तर उत्तरखंडमधील ७० जागांसाठी १५ फेब्रुवारी २०१७ रोजी निवडणुका होणार आहेत.
    §  उत्तरप्रदेश मध्ये एकूण ४०३ जागांसाठी सात टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. (११, १५, १९, २३, २७ फेब्रुवारी आणि ४ व ८ मार्च २०१७)
    §  मणीपुरमध्ये ६० जगणासाठी ४ व ८ मार्च २०१७ रोजी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.
    §  या पाच राज्यांमध्ये एकूण १६ कोटी पेक्षा जास्त पात्र मतदार भाग घेणार आहेत.
    §  पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश या राज्यांतील उमेदवाराना २८ लाख तर गोवा, मणीपुर राज्यातील उमेदवारांना २० लाख रुपये खर्च मर्यादा घालून देण्यात आली आहे. उमेदवारांना 20 हजारांवरील खर्चासाठी चेकचा वापर बंधनकारक असणार आहे.
    उमेदवार जागा- एकूण ६१९ जागा
    ·        उत्तर प्रदेश- 403 जागा
    ·        पंजाब- 117 जागा
    ·        उत्तराखंड – 70 जागा
    ·        मणिपूर- 60 जागा
    ·        गोवा- 40 जागा

    प्र. 7) भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता ?


    1)      पासीघाट
    2)      दुबाघ
    3)      माजुली
    4)      शाहपूर


    उत्तर : माजूली
    संदर्भ : चालू घडामोडी डायरी डिसेंबर 2016 (लेखक : बालाजी सुरणे) (पेज नं. 38)
    स्पष्टीकरण :
    माजुली जिल्ह्याला देशातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा बनविण्यासाठी आसाम सरकारने माजुली जिल्ह्यामध्ये हवामान संवेदनक्षम विकासासाठी शासवत कृती (SACReD, Majuli) हा कार्यक्रम जाहीर केला आहे.
    माजुली बद्दल अतिरिक्त माहिती.....
    माजुली नदीतील सर्वांत मोठे बेट
    §  ब्रम्हापुत्र  नदीतील माजुली हे जगातील सर्वांत मोठे नदीपत्रातील बेट म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जाहीर केले आहे.
    §  हे बेट आसाममध्ये असून बेटाने 880 चौरस किमी क्षेत्रफळ व्यापले आहे.
    §  यापूर्वी सर्वांत मोठे नदीतील बेट म्हणून अमेझॉन नदीत असणारे मार्जाओ बेटाला ओळखले जात होते.
    माजुली बेट
    @ हे बेट आसाम राज्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे.
    @ माजुलीचा अर्थ होतो दोन समांतर नद्यांमधील प्रदेश.
    @ बेटाच्या उत्तरेकडून सुबानसिरी, दक्षिणेकडून ब्रह्मपुत्रा तर ईशान्येकडून खेरकतीया सुली या ब्रह्मपुत्रेच्या वितरिकेने वेढलेले आहे.
    @ या बेटावर एकूण 144 गावे असून त्यांची एकूण लोकसंख्या 1,60,000 आहे.
    @ या बेटास जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी युनेस्कोने नामनिर्देशित केले होते. 
    @ या बेटावर प्रामुख्याने मिशिंग ही जमात आढळते. मिशिंगसोबतच देवरी, सोनोवाल कछारी या जमातीही आढळतात.
    @ याच बेटावरील सोनोवाल कछारी जमातीचे सर्वानंद सोनोवाल हे सध्या आसामचे मुख्यमंत्री आहेत. 
    @ जून 2016 मध्ये आसाम सरकारने माजुलीला जिल्ह्याचा दर्जा दिला आहे. तो भारतातील पहिला बेटावरील जिल्हा ठरला आहे. माजुली हा असामाचा 35 वा जिल्हा असेल. पूर्वी तो जोहराट जिल्ह्याचा भाग होता.
    समग्र अर्धवार्षिकी (चालू घडामोडी) (लेखक : बालाजी सुरणे) (पेज नं. 124)

    प्र. 8 ) मॅन बूकर आंतरराष्ट्रीय परितोषकासंदर्भात खलील विधाने विचार घ्या:
    अ)    हा साहित्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
    ब) या पुरस्काराची सुरुवात 2004 पासून झाली
    क) हान कांग या 2016 चा पुरस्कार मिळविणार्‍या पहिल्या कोरियन लेखिका आहेत.
    वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत?
    1)      फक्त अ आणि ब
    2)      फक्त ब आणि क
    3)      फक्त अ आणि क
    4)      वरीलपैकी सर्व
     उत्तर : अ व क बरोबर
    संदर्भ : चालू घडामोडी डायरी (मे 2016) (लेखक : बालाजी सुरणे) (पेज नं. 24)
    हान कांग यांना यंदाचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार
    दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना यंदाचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार मिळाला आहे. कांग यांच्या द व्हेजिटेरियनया कादंबरीला हा बहुमान मिळाला आहे. हा पुरस्कार मिळविणार्‍या त्या पहिल्या कोरियन महिला आहेत. कांग यांनी नोबेल विजेते ऑरहान पामुक, एलेना फेराँटे यांना पिछाडीवर टाकत ५० हजार पौंडांचा हा पुरस्कार पटकावला. कांग यांची इंग्रजीत अनुवादित झालेली ही पहिली कादंबरी असून, पुरस्काराच्या रकमेतील काही रक्कम भाषांतरकार देबोरा स्मिथ यांना दिली जाणार आहे.
    द व्हेजिटेरियनही कादंबरी पोटरेबेलो बुक्सने प्रकाशित केली आहे. या पुरस्कारासाठी १५५ पुस्तकांमधून हे पुस्तक एकमताने निवडण्यात आले आहे. पाच परीक्षकांनी ही निवड केली असून, निवड समितीच्या अध्यक्षस्थानी बॉइड टोनकिन होते. ही कादंबरी वाचकांच्या मनाचा ठाव घेते, असे गौरवोद्गार टोनकिन यांनी काढले. कांग या सध्या सोल इन्स्टिटय़ूट ऑफ द आर्ट्स या संस्थेत सर्जनशील लेखन विषय शिकवतात. यी यांग साहित्य पुरस्कार, टुडेज यंग आर्टिस्ट पुरस्कार, कोरियन साहित्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांच्या कांग या मानकरी ठरल्या आहेत.
    मॅन बूकर आंतरराष्ट्रीय परितोषक
    -          इंग्रजी भाषांतरासाठी मॅन ग्रुप कडून दिला जातो.
    -          घोषणा : 2004
    -          पहिला पुरस्कार : 2005
    -          पहिले विजेते : इस्माईल कदरे

      प्र. 9) तारक मेहता यांचा विनोदी स्तंभ _______ या नियतकालिकात 1971 साली प्रथम प्रसिद्ध झाला.


    1)      चांदोबा
    2)      किशोर
    3)      चित्रलेखा
    4)      गृहशोध


    उत्तर : चित्रलेखा
    संदर्भ : चालू घडामोडी डायरी (पहिला अंक 2017)
      तारक मेहता यांचे निधन
    तारक मेहता का उलटा चष्मा या प्रसिद्ध विनोदी मालिकेचे लेखक तारक मेहता यांचे नुकतेच निधन झाले. विनोदी लेखक, नाटककार, सदरलेखक अशी त्यांची ख्याती आहे.
    तारक मेहता यांचा अल्पपरिचय:
    -          २०१५ साली त्यांना पद्मश्रीपुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
    -          त्यांच्या इच्छेनुसार, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्यांचे देहदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.
    -          दुनियाने उंधा चष्माहे गुजराती भाषेतले त्यांच्या सदराचे पुस्तकात रुपांतर झाले आणि त्यानंतर त्यावर तारक मेहता का उल्टा चष्माही मालिका हिंदीत आली आणि तीही अल्पावधीत लोकप्रिय ठरली. १९७१ मध्ये चित्रलेखाया साप्ताहिकातून 'दुनिया ने ऊंधा चश्मा' हे सदर सुरू झाले.
    -          त्यांचा जन्म डिसेंबर १९२९ मध्ये अहमदाबाद येथे झाला होता. १९४५ ला ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. १९५६ मध्ये मुंबईतल्या खालसा महाविद्यालयातून गुजराती विषय घेऊन बी.ए. आणि त्यानंतर १९५८ मध्ये भवन्स महाविद्यालयात त्याच विषयातून एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
    -          १९५८ ते ५९ या काळात गुजराती नाट्यमंडळात त्यांनी कार्यकारी मंत्री पदावर कार्य केले.
    -          १९५९ ते ६० मध्ये प्रजातंत्रदैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहिले.
    -          १९६० ते १९८६ या काळात भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील फिल्म्स डिव्हिजनमध्येही ते कार्यरत होते.
    -          तारक मेहता यांचे लोकप्रिय साहित्य -'नवुं आकाश नवी धरती' (१९६४), 'दुनियाने उंधा चष्मा' (१९६५), 'तारक मेहताना आठ एकांकियो' (१९७८), 'तारक मेहताना उंधा चष्मा' (१९८१), 'तारक मेहतानो टपुडो' (१९८२), 'तारक मेहतानी टोळकी परदेसना प्रवासे' (१९८५), 'मेघजी पेथराज शाह : जीवन अने सिद्धी' (१९७५).

    प्र. 10) अलिकडेच (जानेवारी 2017) भारतातील सर्वांत मोठी सार्वजनिक वायफाय व्यवस्था _____ या शहरात सुरू करण्यात आली.


    1)      बंगळुरू
    2)      मुंबई
    3)      हैदराबाद
    4)      चेन्नई


    उत्तर : मुंबई

    प्र. 11) ट्रान्सअटलांटिक व्यापार आणि गुंतवणूक भागीदारी _____ यांच्यामधील चर्चेच्या टप्प्यावर असलेला करार आहे.


    1)      अमेरिका आणि यूरोपियन युनियन
    2)      अमेरिका आणि युनायटेड किंगडम
    3)      अमेरिका आणि आफ्रिकन युनियन
    4)      अमेरिका आणि रशिया


    उत्तर : अमेरिका आणि यूरोपियन युनियन

    प्र. 12) खालीलपैकी कोणत्या देशाने ऑपरेशन सेंटिनल नावाची लष्कर कारवाई केली?


    1)      ब्रिटन
    2)      फ्रान्स
    3)      अमेरिका
    4)      स्पेन


    उत्तर : फ्रान्स

    प्र.13) सौर उर्जेवर चालणारी देशातील पहिली बोट नुकतीच कोणत्या राज्यात कार्यान्वयित करण्यात आली?


    1)      ओडिशा
    2)      केरळ
    3)      गोवा
    4)      तमिळनाडू


    उत्तर : केरळ

    प्र. 14) भारतातील लवाद व्यवस्थेचा आढावा घेणारी उच्च स्तरीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे?
    1)      न्या. बी. एन. श्रीकृष्णन
    2)      न्या. मिहिर शहा
    3)      न्या. दीपक मिश्रा
    4)      न्या. अरुण मिश्रा
    उत्तर : न्या. बी. एन. श्रीकृष्णन

    प्र.15) 2016 साली ओडीसाची स्थापना होऊन ____ वर्षे पूर्ण झाली.


    1)      75
    2)      80
    3)      66
    4)      69


    उत्तर : 80

    प्र. 16) खलील जोड्या जुळवा
    अ)    राष्ट्रीय मतदार दिन                    I) 28 फेब्रुवारी
    ब) राष्ट्रीय विज्ञान दिन                      II) 25 जानेवारी
    क) जागतिक महिला दिन                  III) 1 मार्च
    ड) जागतिक ग्राहक हक्क दिन            IV) 8 मार्च
                अ         ब          क          ड         
    1)            II          I           IV        III
    2)            I           II          III        IV
    3)            III        IV        II          I
    4)            IV        III        I           II
    उत्तर : 1) II         I           IV        III

    प्र. 17) 2017 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात ____ हे राज्य निवडणूक आयुक्त होते.


    1)      जगेश्वर साहारीया
    2)      नीला सत्यनारायन
    3)      नंदलाल गुप्ता
    4)      डी. एन. चौधरी


    उत्तर : जगेश्वर साहारीया

    खालीलपैकी कोणी 2016 च्या समर ऑलिंम्पिक्स महिला एकेरी बॅडमिंटन मध्ये रजत पदक जिंकले?
    अ)    सानिया मिर्झा
    ब)  सायना नेहवाल
    क) पी. व्ही. सिंधु


    1)      ब व क
    2)      फक्त ब
    3)      अ आणि क
    4)      फक्त क


    उत्तर : फक्त क
    संदर्भ : समग्र अर्ध वार्षीकी (चालू घडामोडी) (लेखक : बालाजी सुरणे) पेज नं. 311.
    स्पष्टीकरण :
    1)      पी. व्ही. सिंधु : बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक
    -   रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडू पी.व्ही.सिंधू हिने रौप्य पदकाची कमाई केली आहे.
    -  सिंधू अंतिम फेरीच्या लढाईत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिनकडून पराभूत झाली.
    -  21 वर्षीय पी.व्ही.सिंधू ऑलिम्पिक स्पर्धेत महिला बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला ठरली.
    -  भारताची सर्वांत  लहान ऑलिम्पिक वायक्तिक पदक विजेती.
    -  ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्यांदाच रौप्य पदक, यापूर्वी साईना नेहवालने ब्राँझ पदक मिळविले होते
    -  भारताला ऑलिम्पिकमध्ये चौथे रौप्य पदक.यापूर्वी राजवर्धन राठोड , सुशील कुमार आणि विजय कुमार यांनी रौप्य पदक जिंकले होते.



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad