बहुमताचे प्रकार
* साधे बहुमत (Simple Majority)
> उपस्थित व मतदान करणार्या सदस्यांचे बहुमत
* पूर्ण बहुमत किंवा निरपेक्ष बहुमत (Absolute Majority)
> सभाग्रहातील एकूण सदस्य संख्येचे बहुमत (उदा. 545 सदस्यांच्या लोकसभेचे 273 एवढे बहुमत).
* प्रभावी बहुमत (Effective Majority)
> सभाग्रहाच्या एकूण सदस्य संख्येतून गैरहजर आणि रिक्त जागांची संख्या वजा करून उर्वरित उपस्थित व मतदान करणार्या सदस्यांचे बहुमत म्हणजे प्रभावी बहुमत होय. उपराष्ट्रपती, राज्यसभा उपसभापती, लोकसभा अध्यक्ष आणि लोकसभा उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करण्यासाठी प्रभावी बहुमताची आवश्यकता असते.
* विशेष बहुमत (Special Majority)
> साधे, पूर्ण, प्रभावी बहुमत सोडून इतर सर्व बहुमतांना विशेष बहुमत म्हणतात. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो:
- सभागृहाचे दोन तृतीयांश बहुमत (उदा.राष्ट्रपतींवरील महाभियोग)
- हजर व मतदानात भाग घेणार्या सदस्यांचे दोन तृतीयांश बहुमत (उदा. राष्ट्रीय हितासाठी राज्यासूचितील विषयावर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार)
- पूर्ण बहुमत + उपस्थित व मतदान करणार्या दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत (उदा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि CAG यांना काढून टाकणे)
Join our telegram channel @mpscmantra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत