• New

    चालू घडामोडी : 21 व 22 मे 2017


    जीएसटीमुळे महापालिका आणि नगरपालिका आर्थिकदृष्ट्या कमकुवत होऊ नयेत यासाठी राज्य शासनाकडून सर्व पालिकांना दरवर्षी आठ टक्के चक्रवाढीनुसार कायमस्वरूपी मदत दिली जाणार आहे. मुंबई आणि सर्व पालिकांना दर महिन्याच्या पाच तारखेपूर्वी मदत दिली जाईल. राज्य शासनाकडून ही रक्कम बँकेत जमा करण्यास विलंब झाल्यास बेंकेकडुन परस्पर ही रक्कम वळती केली जाईल. केंद्र सरकारने 2015-16 या आधार वर्षाच्या आधारे मदत देण्याची तरतूद केली आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र 31 मार्च 2017 ही तारीख आधार मानून त्या तुलनेत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. विविध स्त्रोतच्या माध्यमातून चार लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा होते. यापैकी 20 हजार कोटींची रक्कम पालिकांना दिली जाईल. हे प्रमाण एकूण महसुली जमेच्या 4.86% आहे. जगात मुंबई आणि इथोपिया या दोन ठिकाणीच जकात वसूल केली जाते. जीएसटी अमलबजावणी राज्यात सुरू झाल्यानंतर व्यवसाय कर, करमणूक कर, अकृषी कर या माध्यमातून राज्याला मिळणारा सुमारे चार हजार कोटी रूपयांचा महसूल स्थानिक संस्थांना देण्यात येणार आहे. हे कर वसूल करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणार आहेत.
    मुंबई महापालिकेला जकाता पोटी सुमारे सात हजार कोटी आणि त्यावर दर वर्षी आठ टक्के वाढीने भरपाई दिली जाणार आहे.


    * इराणच्या अध्यक्षपदी पुन्हा रूहानी

    इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीत पुन्हा एकदा विद्यमान अध्यक्ष हसन रूहानी यांचा विजय झाला आहे. त्यांनी लागोपाठ दुसर्‍यांदा निवडणूक जिंकली आहे.
    अंतिम निकाल
    एकूण मतदान : 73% (4 कोटी मतदार)
    हसन रूहानी : 57% (2.35 कोटी)
    इब्राहीम रईसी : 38.3% (1.58 कोटी)
    मोस्तफा मिरसलीम : 297000
    मोस्तफा हाशेमिताबा : 139000

    # इराणचे अध्यक्ष
    इराणचे अध्यक्ष तेथील राजकीय प्रणालीत दुसर्‍या क्रमांकाचे शक्तीशाली नेते असतात. देशाच्या सर्वोच्च नेत्यानंतर त्यांचा क्रमांक लागतो. सर्वोच्च नेता व धर्मगुरूंचे पाथक निवडत असते व धार्मिक नेटच सर्वोच्च असतो. इराणमध्ये नोकरशाहीत 20 लाख लोक काम करतात. त्यांच्या मदतीने प्रशासन करण्याचे काम अध्यक्ष करतात.

    आजचा सुधारक नियतकालिकाचे प्रकाशन बंद
    • 27 वर्षे गंभीर व सखोल लिखाणातून वाचकांचे वैशारीक भरणपोषण करणार्‍या आजचा सुधारक या नियतकालिकाचे प्रकाशन बंद करण्यात आले आहे.
    • मराठीतील विवेकवादी तत्त्ववेते दि. य. देशपांडे यांनी एप्रिल 1990 मध्ये हे मासिक सुरू केले होते.
    • नवा सुधारक या नावाने सुरू झालेल्या या मासिकाचे 1990 च्या डिसेंबरच्या अंकापासून आजचा सुधारक असे नामकरण करण्यात आले.
    • गोपाल गणेश अगरकर यांच्या सुधारक साप्ताहिकाचा नवा अवतार म्हणून या मासिकाकडे पहिले जात होते.
    • दिवाकर मोहानी, नंदा खरे, प्र. ब. कुलकर्णी, अनुराधा मोहणी, संजीवनी कुलकर्णी, प्रभाकर नानावटी यांनी संपदाकाची भूमिका सांभाळली आहे.
    • मासिकाचे छापील तसेच ई-अंक प्रकाशनही बंद होणार आहे.
    • मार्च 2017 चा अंक शेवटचा अंक असून त्याचे प्रक्षण त्याचे प्रक्षण 10 जून रोजी नागपूर येथिण करण्यात येणार आहे.


    आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्या बाबतच्या खटल्यात पाकिस्तानने बाजू मांडण्यासाठी महाधीवक्ता अशतर औसाफ यांची नेमणूक केली आहे. आधीच्या सुनावणीत पाकिस्तानची बाजू ब्रिटन येथील वकील खावर कुरेशी यांनी मंडळी होती.

    पुण्यामध्ये पीक वान संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण मध्यवर्ती शाखेचे केंद्रीय कृषी, सहकार व शेतकरी कल्याण मंत्रालयचे सचिव डॉ. एस. के. पटनायक यांनी उद्घाटन केले आहे. 2001 साली शेतकरी हक्क कायदा तयार करण्यात आला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी पीक संरक्षण व शेतकरी प्राधिकरणाची निर्मिती झाली आहे.


    तेजस एक्सप्रेस
    अत्याधुनिक सुविधांनी सुसज्य असलेली देशातील सर्वाधिक वेगवान तेजस एक्सप्रेस 22 मे रोजी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली आहे.
    # तेजसची वैशिष्ट्ये
    1. तशी वेग : 200 किमी
    2. मुंबई-गोवा मार्गावर धावणार
    3. प्रत्येक डब्यात चार आणि दरवाज्यावर दोन कॅमेरे
    4. पूर्णतः स्वयंचलित दरवाजे
    5. गाडीत जीपीएस प्रणाली
    6. प्रत्येक आसनाच्या मागे एलईडी टीव्ही
    7. प्रत्येक डब्याच्या निर्मितीसाठी 3.50 कोटी रुपये खर्च
    8. अत्याधुनिक इलेक्ट्रोमॅटिक ब्रेकिंग सिस्टम
    9. वेगवान वायफाय 



    22 मे :  जागतिक जैवविविधता दिन
    ·       दरवर्षी 22 मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन किंवा जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो.
    ·       22 मे 1992 रोजी नैरोबी येथे (यूएनईपीचे मुख्यालय) जैवविविधता करार स्वीकारण्यात आला त्यामुळे या दिवसाची निवड केली आहे.
    ·       पूर्वी 29 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा केला जात होता. मात्र संयुक्त राष्ट्राने 2000 साली एका ठरवद्वारे 22 मे रोजी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
    ·       2017 ची संकल्पना : जैवविविधता आणि शाश्वत पर्यटन. संयुक्त राष्ट्राने 2017 हे वर्ष विकाससाठी शाश्वत पर्यटनाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे त्याच्याशी ही संकल्पना सुसंगत आहे.  
    ·       संयुक्त राष्ट्राने यापूर्वीच 2011-20 हे जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे.
    जैवविविधता महत्त्वाची मुद्दे
    जैवविविधता हा शब्द पहिल्यांदा रेमंड एफ. दस्मान यांनी 1968 साली वापरला.
    जैवविविधतेचे तीन स्तर आहेत: प्रजाती विविधता, परिसंस्था विविधता आणि जनुकीय विविधता
    उष्णकटिबंधमध्ये सर्वाधिक प्रमाणात जैवविविधता आढळते.
    ध्रुवपेक्षा विषूवृत्तावर सर्वाधिक जैवविविधता आढळते
    ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, कोलंबिया, कोस्टा रिका, कॉंगो, इक्वेडोर, भारत, इंडोनेशिया, मादागास्कर, मेक्सिको आणि पेरू. या 12 देशांमध्ये जगातील 70% जैवविविधता आढळते.  

    State Finances A Study of Budgets of 2015-16 या नावाचा अहवाल आरबीआयने 25 राज्यांचा वित्तीय आढावा घेऊन तयार केला आहे. यात राज्यांची विभागणी चार गटांत केली आहे. वित्तीय शिष्टीचे काटेकोर पालन करणार्‍या गटात महाराष्ट्रासह तमिळनाडू, ओरिसा, छातीसगड, तेलंगणा व कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. तर वित्तीय शिष्टीचे तीन तेरा वाजविलेल्या गटात पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि गोवा ही राज्ये आहेत.
    एकूण कर संकलनापैकी 60% केंद्र सरकार व 40% राज्य सरकरांकडून गोळा केला जातो. तर खर्चापैकी 60 खर्च राज्य सरकारे व 40% खर्च केंद्र सरकारकडून होतो.0020

    मुंबई इंडियन्स दहाव्या आयपीएलचा विजेता
    मुंबई इंडियन्सने तिसर्‍यांदा आयपीएल जिंकले
    अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि रायजिंग सुपर जयंट्स पुणे यांच्यामध्ये झाला
    अंतिम सामना राजीव गांधी स्टेडिअम हैदराबाद येथे झाला.

    मध्य प्रदेश सरकारने नर्मदा नदीतील वाळू उत्खननावर बंदी घातली
    मध्य प्रदेश सरकारने नर्मदा नदीतील वाळू उत्खननावर बंदी घातली अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. भोपाळ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहण यांनी ही घोषणा केली.
    • नर्मदा नदी
    • अर्थ : आनंद देणारी
    • उगम : अमरकंटक टेकड्या
    • प्रवाह मार्गातील राज्य : मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात
    • गंगा आणि गोदावरी नंतर भारतातील तिसरी सर्वांत मोठी नदी
    • सातपुडा आणि विंध्य रांगादरम्यान खच दारीतून वाहते
    • मध्यप्रदेशची जीवन रेखा
    • खोर्‍याचा विस्तार : मध्य प्रदेश (86%), गुजरात (14%), महाराष्ट्र (2%)
    • लांबी : 1312 किमी
    • गंगा नदीपेक्षा जुनी नदी .
    • पुराणामध्ये रेवा नावाने उल्लेख


    फेडरेशन कप 2017
    ·       अंतिम सामना : बाराबाती स्टेडीयम कटक (ओडिशा) येथे 21 मे 2017 रोजी पार पडला
    ·       विजयी : बंगळुरु
    ·       उपविजेता : मोहन बागाण
    ·       फेडरेशन कपची स्थापना : 1977 (ऑल इंडिया फूटबॉल फेडरेशनद्वारे)
    भारतातील अन्य लोकप्रिय फूटबॉल स्पर्धा : ड्युरंड कप, संतोष ट्रॉफी, इंडियन सुपर लीग, सुब्रोतो कप, इ.

    आफ्रिकन डेवलपमेंट बँकेची 52 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक
    आफ्रिकन डेवलपमेंट बँकेची 52 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक 22 ते 26 मे दरम्यान गुजरातमधील गांधीनगर येथे पार पडणार आहे. पहिल्यांदाच ही बैठक भारतामध्ये होत असून  पहिल्यांदाच आफ्रिकेबाहेर होत आहे.

    आफ्रिकन डेवलपमेंट बँक
    • स्थापना : 1964
    • मुख्यालय : अबिजान (आयव्हरी कोस्ट).
    • उद्देश : आफ्रिका खंडातील लोकांचे दारिद्र्य आणि राहणीमन सुधारणे
    • बँक तीन संस्था मिळून बनलेली आहे: आफ्रिकन डेवलपमेंट बँक, आफ्रिकन डेवलपमेंट फंड, नायजेरिया ट्रस्ट फंड.
    • बोधवाक्य (मोटो) : बुल्डिंग टूडे, ए बेटर आफ्रिका टूमारो
    • सदस्य : भारतासह 78
    • भारत 1983 मध्ये सहभागी
    • चलन : XUA (for accounting purpose)
    • सर्वाधिक मताधिकार : नायजेरिया > अमेरिका
    • ही बँक Banque Africaine de Developpment (BAD) या नावानेही ओळखली जाते.


    दक्षिण आशिया जूनियर टेबल टेनिस चॅम्पियनशिप श्रीलंकेमध्ये कोलंबिया जवळ नुकतीच पार पडली. या सर्धेमध्ये सर्व 10 सुवर्ण पदके भारताने जिंकली आहेत.


    जिवाणूला अब्दुल कलाम यांचे नाव
    अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) नुकत्याच शोधलेल्या एका जिवाणूला भारताचे माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव दिले आहे.
    बॅक्टीरिया या प्रकारात मोडणारा हा जिवाणू फक्त आंतरराष्ट्रीय स्थंनकताच आढळून येतो. त्याचे पृथ्वीवर कोठेही वास्तव्य नाही.
    शास्त्रीय भाषेत बिजाणू बनविणार्‍या जिवाणूस सोलिबॅसिलस म्हटले जाते. अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ त्याचे नामकरण त्यांनी सोलिबॅसिलस कलामी असे केले आहे.
    कलाम यांचे सुरूवातीचे प्रशिक्षण (1963) नासामध्येच झाले.

    भारताच्या महिला गिर्यारोहक अंशू जामसेन्पा यांनी एका आठवड्यात दोनदा अत्युच्च एवरेस्ट शिखर पार करण्याची कामगिरी केली आहे. एकाच मोसमात दोनदा सर्वोच्च शिखर सर करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. त्यांनी ही कामगिरी वयाच्या 37 व्या वर्षी केली आहे. त्यांनी 16 मे 2017 आणि 21 मे 2017 रोजी हे शिखर सर केले होते. त्यांनी आत्तापर्यंत पाच वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती.
    नेपाळच्या चुरीम शेर्पा या एकाच मोसमात दोन वेळा एव्हरेस्ट सर करणार्‍या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांच्या 2012 मशील या कामगिरीची दखल गिनेस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली होती.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad