राष्ट्रीय कौशल्य विकास धोरण ( National Skill Development Policy)
केंद्र सरकारने फेब्रुवारी २००९ मध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास धोरण जाहीर केले. यानुसार २०२२ पर्यंत पाच दशलक्ष कुशल व्यक्तींची निर्मिती करणे हे उद्दिष्ट आहे.
हे धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी पुढील त्रिस्तरीय संस्थात्मक रचना निर्माण करण्यात आली.
* पंतप्रधानांची राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद ( NCSD ) – या परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. धोरण ठरविण्यासाठी ही सर्वोच्च समिती आहे.
* राष्ट्रीय कौशल्य विकास समन्वय मंडळ ( NSDCB) – या मंडळाचे अध्यक्ष नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष असतात. पंतप्रधान परिषदेच्या निर्णयांची अंमलबजावणी कशी करावी तसेच कौशल्य विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्गदर्शन तत्त्व तयार करणे हे यांचे प्रमुख कार्य असते.
* राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) – हे मंडळ सार्वजनिक खासगी भागीदारीच्या आधारावर स्थापन केलेले आहे. नफ्यासाठी नसलेली कंपनी म्हणून हे मंडळ काम करते. या मंडळाचा अध्यक्ष कौशल्य विकास क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्ती असतो.
Join our telegram channel>> @mpscmantra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत