अणूबद्दल वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी नोंदवलेली निरीक्षणे
अणू म्हणजे पदार्थाचा लहानात लहान कण होय. या अणूबद्दल वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी नोंदवलेली निरीक्षणे व त्यांचे सिद्धांत.
# महर्षी कणाद – इ. स.पू. ६ व्या शतकात अणूच्या लहानात लहान कणाला ‘पिलव’/’परमाणू’ असे नाव दिले.
# डेमोक्रेटस – अणूला अणू असे नामकरण करणारा शास्त्रज्ञ.
# जॉन डाल्टन – यांनी अणूचा सिद्धांत मांडला व अणू म्हणजे भरीव गोळा असे निरीक्षण मांडले.
# जे. जे. थॉमसन – अणूचे भेदन करणारी पहिली व्यक्ती. त्यानी अणूला कलिंगडाची उपमा दिली, काळ्या बिया- ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन, लाल भाग- धन प्रभारयुक्त प्रोटॉन. तसेच इलेक्ट्रॉनचा शोध लावला.
# अर्नेस्ट रुदरफोर्ड – अणूच्या केंद्रकाचा शोध लावला. सुवर्णपत्रीच्या प्रयोगाने सिद्ध केले. इलेक्ट्रॉनचे कक्षीय भ्रमण शोधून काढले.
# निल्स बोर – ठरावीक कक्षेमध्ये भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा सारखी असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत