चालू घडामोडी : 15 मार्च 2017
केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात
वाढ
·
केंद्रीय
मंत्रिमंडळणे केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात अतिरिक्त 2% वाढ
करण्याच्या निर्णयाला 15 मार्च 2017 रोजी मंजूरी दिली.
·
या
निर्णयाचा फायदा 48.85 लाख कर्मचारी आणि 55.51 लाख निवृत्तीवेतन धारकांना मिळणार
आहे.
·
हा
भत्ता 1 जानेवारी 2017 पासून लागू होणार आहे. यापूर्वी जुलै 2016 मध्ये 2% नि
महागाई भत्ता वाढविण्यात आला होता.
राष्ट्रीय आरोग्य धोरणाला मंजूरी
·
देशातील
सर्व जनतेला खात्रीशीर आरोग्य सेवा देण्यासाठी सरकारने 15 मार्च 2017 रोजी
झालेल्या कॅबिनेट बैठकीत राष्ट्रीय आरोग्य धोरणाला मंजूरी दिली आहे.
·
या
धोरणानुसार सरकारने देशातील 80 टक्के लोकांना आरोग्य सुविधा सरकारी रुग्णालयात
मोफत देण्याचे ध्येय आहे. यामध्ये औषधे,
तपासणी व उपचार यांचा समावेश
असणार आहे. विमा योजनेचाही सर्व रुग्णांना लाभ घेता येणार आहे.
मंगळ
मंगळ
हा सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा व पृथ्वीशेजारचा ग्रह आहे. तो पृथ्वीच्या
निम्म्या आकाराचा आहे. मंगळावरचे वातावरण विरळ असून त्यात प्रामुख्याने ९६ टक्के
कर्बद्वीप्रणीत वायू आढळतो. पृथ्वीप्रमाणेच मंगळावरचा दिवस २४ तास ४० मिनिटांचा
आहे. त्याचप्रमाणे मंगळाचा आसही कललेला असल्याने पृथ्वीप्रमाणेच मंगळावर ऋतुचक्र
चालू असते. या सार्धम्यामुळे मंगळवार जीवसृष्टी असावी, असे
वाटत होते. मात्र मंगळावरचे तापमान खूपच कमी म्हणजे पृष्ठभागावर ते उणे ६३ अंश
सेल्सिअस एवढे कमी आढळते. मंगळावरच्या वातावरणाचा दाबही पृथ्वीच्या अवघ्या एक
टक्का आढळतो. मंगळाभोवती चुंबकीय क्षेत्र नसल्याने मंगळावर विविध प्रारणांचा व
सौरवाताचा परिणाम होत असतो.
बॉलीवूडमधील
संगीतसम्राट गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘मोगल’ हा चित्रपट येत असून यात गुलशन कुमार यांची भूमिका
अक्षयकुमार करणार आहे.
रिझर्व्ह
बंकेला प्रतेक पाचशे रूपयाच्या नोटमागे 2.87 ते 3.09 रूपयांचा खर्च येत असून, दोन
हजारांच्या नोटसाठी सुमारे 3.54 ते 3.77 रुपयाचा खर्च येते अशी माहिती अर्थराज्यमंत्री
अर्जुनराम मेघवाल यांनी दिली.
एन. विरेन सिंह माणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी
·
एन.
बिरेन सिंह यांनी 15 मार्च
2017 रोजी मणीपुरच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. माणिपूरच्या राज्यपाल
नजमा हेपतुल्ला यांनी त्यांना शपथ दिली.
·
त्याबरोबरच
एनपीपीचे जॉयकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
एन
बिरेन सिंह
-
खेळाडू, पत्रकारिता
आणि नंतर राजकरण असा प्रवास
-
बिरेन
सिंह हे 56 वर्षाचे असून 2007 ते 2016 दरम्यान कॉंग्रेस पक्षात होते.
-
राष्ट्रीय
स्तरावरील फुटबॉलपट्टू म्हणून ओळख
-
कॉंग्रेसच्या
राजवटीत मंत्री
सीमा सुरक्षेसंबंधीत स्थापन करण्यात आलेल्या मधुकर गुप्ता समितीने केंद्र
सरकारला नुकताच आपला अहवाल सादर केला आहे.
गुणवत्तापूर्ण राहण्यायोग्य ठिकाणांच्या क्रमवारीत
व्हिएन्ना प्रथम
·
न्यूयॉर्क
स्थित ‘मर्सर’ या मानव संसाधन सल्लागार संस्थेने जाहीर केलेल्या
गुणवत्तापूर्ण राहण्यायोग्य ठिकाणांच्या निर्देशांकात सलग चौथ्या वर्षी व्हिएन्ना (ऑस्ट्रीया)
या शहराने पहिला क्रमांक पटकाविला आहे.
·
गुणवत्तापूर्ण
राहण्यायोग्य भारतातील शहरांमध्ये सलग तिसर्या वर्षी हैदराबादने (तेलंगणा) पहिला क्रमांक
पटकाविला आहे.
·
हैदराबादने
145 वा तर पुणे 146 व्या स्थानावर
·
पहिली
पाच शहरे : व्हिएन्ना, झुरीच, म्यूनिच, दुससेलदोर्फ, फ्रँकफर्ट
·
पहिल्या
दहा पैकी 8 युरोपिय शहरे. ऑकलंड आणि व्हॅन्कुव्हर ही दोनच शहरे पहिल्या दहामध्ये युरोप
बाहेरील.
जगातील पहिल्या फ्लूरोसेन्ट बेडकचा शोध लागला असून हे बेडूक अर्जेंटिनामध्ये आढळून
आले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय
भारत आणि बांग्लादेश यांच्यात करार
भारताच्या
नौवहन मंत्रालयांतर्गत येणारे दीपगृह महासंचालनालय आणि बांग्लादेशचे नौवहन
खाते यांच्यात जलवाहतूक सहकार्याबाबत(AtoNs) झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय
मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. द्वीपगृह
आणि द्वीपस्तंभ याबाबत सल्ला, जहाज
वाहतूक सेवा तसेच ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम अर्थात ओळख यंत्रणेची श्रुंखला याबाबत या सामंजस्य करारांतर्गत सल्ला
देण्यात येणार आहे. जलवाहतूक आणि द्वीपगृहाबाबत आंतरराष्ट्रीय संघटनेला अनुसरून
बांग्लादेशातल्या संबंधित व्यवस्थापकांना आणि तंत्रज्ञाना प्रशिक्षणही देण्यात
येईल.
LBSNAA आणि
NIPAM यांच्यात करार
लाल
बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय संस्था (LBSNAA)
मसुरी आणि नामिबियातल्या लोक प्रशासन आणि व्यवस्थापन संस्था (NIPAM)
यांच्यात नामिबियाच्या सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठीच्या आणि इतर
प्रशिक्षण कार्यक्रमासाठीच्या सामंजस्य
कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी
दिली. नामिबियातल्या एनआयपीएएम या
संस्थेला, उच्च नागरी सेवा विषयक प्रशिक्षण संस्था चालवण्याबाबतच्या
अनुभव प्रदानासाठी या सामंजस्य करारामुळे
मदत होणार आहे. सार्वजनिक प्रशासन आणि
क्षमता वृद्धी क्षेत्रात संयुक्त उपक्रम हाती घ्यायलाही हा करार उपयुक्त ठरणार
आहे.
आयआयटी- पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप विधेयक
2017
इंडियन
इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था सरकारी-खाजगी भागीदारी विधेयक 2017 मांडण्याला पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
देण्यात आली. सरकारी-खाजगी भागीदारीतल्या
15 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांना वैधानिक दर्जा बहाल करण्याला आणि त्यांना
राष्ट्रीय महत्वाच्या संस्था म्हणून जाहीर करण्यालाही मंत्रिमंडळाने मंजूरी
दिली.या 15 संस्थाअंतर्गत महाराष्ट्रातल्या नागपूर आणि पुणे इथल्या संस्थांमध्ये
शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे.
जलजागृती सप्ताह
जागतिक
जलदिनाच्या (दि. २२ मार्च) पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या विविध विभागांतर्फे पाणी
नियोजन व पाणी बचतीबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने १६
मार्च पासून दि. २२ मार्चपर्यंत राज्यभर
जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत