सार्वजनिक वित्त
राजकोषीय चालना/राजकोषीय प्रेरणा/Fiscal Stimulus:
देशातील आर्थिक हालचाली वाढवण्यासाठी सरकारने केलेली कडक सकारात्मक कृती./ अर्थव्यवस्थेतील कार्यशीलता वृद्धिंगत करण्यासाठी शासनाने जमा व खर्चात केलेले सकारात्मक बदल.
राजकोषीय धोरण : शासकीय जमा व खर्चाशी संबंधित धोरण
राजकोषीय धोरणाची उद्दिष्ट्ये
•
स्त्रोतांचे उपलब्धीकरण
•
आर्थिक वाढीस चालना
•
उत्पन्न व संपतीमधील तफावत दूर करणे
•
रोजगार निर्मिती
•
किंमती स्थिर राखणे
•
सामाजिक व आर्थिक विकास
राजकोषीय धोरण व भाववाढ/मंदी
|
|
भाववाढ/तेजी
|
मंदी
|
सार्वजनिक खर्चात घट
कर आकारणीत वाढ
|
सार्वजनिक खर्चात वाढ
कर आकारणीत घट
|
©www.mpscmantra.com
# राजकोषीय धोरणाची दीर्घकालीन भूमिका
•
आर्थिक स्थैर्य
•
विकासाच्या वेगात सतत वाढ
# क्षतीपुरक वित्तीय धोरण(Compensatory)
•
मंदी/तेजीचा प्रतिकार करण्यासाठी.
•
सार्वजनिक खर्च व कर आकारणी या उपायांचा समावेश.
•
परिणाम- आर्थिक स्थैर्य.
# सार्वजनिक
वित्ताची (अयव्ययाची) प्रमुख
कार्ये:
•
Allocation
•
Distribution
•
Stabilisation
अर्थसंकल्प
•
पहिला अर्थसंकल्प: जेम्स विल्सन एप्रिल (1860).
•
स्वतंत्र भारताचा पहिला: आर.के. षण्मुख शेट्टी.
•
भारतीय गणराज्याचा पहिला: जॉन मथाई
•
मध्यावधी पहिला: सी. डी. देशमुख
•
अर्थसंकल्प मांडणारे पंतप्रधान: पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी
•
सर्वाधिक वेळा मांडणारे: मोरारजी देसाई (10 वेळा)
भारतीय अर्थसंकल्पाची काही विशिष्ट गुणधर्मे
•
रोख तत्व
•
व्यपगत तत्व
•
वास्तविक अंदाज
•
ढोबळ व निव्वळ तत्व
•
अंदाज प्रपत्रे व लेख्यांची समान रचना
•
विभागवार खर्च अंदाज
©www.mpscmantra.com
# अर्थसंकल्पात जमा खर्चाचे तीन वर्षाचे आकडे असतात.
•
गेल्या वित्तीय वर्षाचे प्रत्यक्ष आकडे
•
चालू वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय व संशोधित अंदाज
•
पुढील वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज
अर्थसंकल्प पारित करण्याचे टप्पे
•
अर्थसंकल्प मांडणे
•
साधारण चर्चा
•
लेखानुदान
•
विशेष चर्चा
•
विभागांतर्गत समित्यांमार्फत तपासणी
•
अनुदानाच्या मागण्यावर मतदान
•
विनियोजन विधेयकास संमती
•
वित्तीय विधेयकास संमती
# अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहात साधारण चर्चा होते. अनुदानांच्या मागण्यावर चर्चा फक्त लोकसभेतच होते.
# राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या राज्य किंवा के.प्र. चा अर्थसंकल्प लोकसभेला सदर केला जातो. त्यात आवश्यक ते बदल लोकसभा अध्यक्ष करू शकतात.
# दंड व स्थानिक कर धनविधेयाकात मोडत नाहीत.
# सार्वजनिक वित्तावरील संसदीय नियंत्रण ठेवणाऱ्या पद्धती
•
वार्षिक वित्तीय विवरण
•
विनियोजन विधेयक
•
पूरक अनुदान व लेखानुदान
•
वित्तीय विधेयक
# देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करणाऱ्या समित्या
•
अंदाज समिती
•
सार्वजनिक हिशेब समिती
•
कामकाज सल्लागार समिती
# सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे साधन
•
संसद
•
वित्तमंत्रालय
•
CAG
©www.mpscmantra.com
# वार्षिक वित्तीय विवरणात चार प्रकारची विवरणे असतात.
•
भारताचा संचित निधी
•
संचित निधीवरील प्रभारित खर्च
•
आकस्मिक निधी
•
लोकलेखा निधी
# भारताच्या संचित निधीवर प्रभारित खर्च (कलम 112-3)
•
राष्ट्रपती
•
लोकसभा व राज्यसभा- अध्यक्ष व उपाध्यक्ष
•
सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश
•
उच्च न्यायालय न्यायाधीशांचे पेन्शन
•
कॅग
•
UPSC
•
कर्जावरील व्याज, सीकिंग फंड
•
कायद्याद्वारे प्रभारित म्हणून घोषित केलेला अन्य कोणताही खर्च
# अनुदानाच्या मागण्या
•
केवळ लोकसभेत मांडल्या जातात.
•
एकूण- 109 (103 नागरी प्रशासन, 6 संरक्षण)
•
32 रेल्वेच्या
•
अनुदानाच्या मागण्यासाठी 26 दिवसाचा कालावधी निश्चित करण्यात येतो.
•
Guillotine: शेवटच्या दिवशी सर्व मागण्या एकत्रितरित्या मतदानाद्वारे संमत केल्या जातात.
•
कोणत्याही अनुदानाची मागणी राष्ट्रपतीच्या शिफाराशिविना करता येत नाही.
•
अनुदानाच्या मागण्यांचे परीक्षण करण्यासाठी 1993-94 पासून स्थायी समित्यांची व्यवस्था करण्यात आली.
•
सध्या 24 विभागीय स्थायी समित्या
•
31 सदस्य(21- लोकसभा, 10-राज्यसभा)
कपात प्रस्ताव
|
|
काटकसर कपात
Economy
Cut
|
अनुदानाच्या मागणीपैकी विशिष्ट रक्कम कमी करावी
|
धोरणात्मक कपात
Disapproval
of Policy Cut
|
विशिष्ट धोरणाच्या अमान्यतेविषयी
अनुदानाच्या मागणीची रक्कम १ रु. पर्यंत कमी करण्यात यावी.
|
प्रतिकात्मक कपात
Token
Cut
|
जनतेचा एखादा प्रश्न लोकसभेसमोर आणण्यासाठी
अनुदानाच्या मागणीच्या रक्कमेतून १०० रु. कमी करण्यात यावे.
|
# कपात प्रस्तावावर मतदान घेतले जात नाही. लोकसभेने कपात प्रस्ताव स्वीकारल्यास सरकारला राजीनामा देणे भाग पडू शकते.
©www.mpscmantra.com
# अर्थसंकल्पसंबंधी घटनेतील तरतुदी
•
कलम 109 - धनविधेयकाची संसदीय कार्यपद्धती
•
कलम 110- धनविधेयकाची व्याख्या
•
कलम 111- धनविधेयकास राष्ट्रपतींची संमती
•
कलम 112 - वार्षिक वित्तीय विवरण/ अर्थसंकल्पाची मांडणी
•
कलम 113 - अनुदान मागणीचे विध्येयक
•
कलम 114 - विनियोजन विधेयक
•
कलम 115 - पूरक अनुदान व वाढीव अनुदान
•
कलम 116 - लेखानुदान
•
कलम 117- वित्तीय विधेयक
# विनियोजन विधेयक :
•
संमत झालेली रक्कम संचित निधीतून काढण्यासाठी मांडतात.
•
दोन प्रकारचा खर्च भागवण्यासाठी मांडला जाते: 1.संमत झालेल्या अनुदानांच्या मागण्यांसाठी 2. प्रभारित खर्चासाठी
•
विनियोजन विधेयकात कोणतीही सुधारणा मांडता येत नाही.
•
पारित होण्याची पद्धत धनविधेयाकाप्रमाणेच.
•
विनियोजन विधेयक संमत करण्यासाठी कुठलीही नियोजित मुदत नाही.
वित्तीय विधेयक
•
कर प्रस्तावाचा समावेश
•
अर्थसंकल्प माडले कि लगेच मांडतात
•
चर्चा व मतदान - विनियोजन विधेयक पारित झाल्यानंतर
•
यात सुधारणा सुचवता येतात
•
मांडल्यापासून 75 दिवसात पारित होणे आवश्यक
•
हे विधेयक पारित होण्याबरोबरच अर्थसंकल्प संमत होण्याची प्रक्रिया पूर्ण होते.
©www.mpscmantra.com
# अनुदानाचे प्रकार
अनुदान
|
वैशिष्ट्य
|
पूरक अनुदान
|
संमत रकमेपेक्षा अधिक खर्चाची बाब उद्भवल्यास
मागणी संबंधित आर्थिक वर्षातच
|
वाढीव अनुदान
|
-संमत रकमेपेक्षा जास्त रक्कम खर्च झाल्यास
कॅग मार्फत लक्षात आणून दिला जातो.
-मागणी संबंधित आर्थिक वर्ष संपल्यानंतर.
|
लेखानुदान
(Vote On Account)
|
-आर्थिक वर्षाच्या कोणत्याही कालावधीसाठी आवश्यक
तेवढे अनुदान संमत करण्यासाठी
- 2 महिन्यासाठी संचित निधीतून 1/6 रक्कम काढण्याची परवानगी मिळते.
-फक्त खर्चाशी संबंधित (
-लेखानुदान चर्चेविना संमत होते.
|
पत/ प्रत्यय अनुदान
(Vote on Credit)
|
-एखाद्या राष्ट्रीय पेच प्रसंगी अनपेक्षितरीत्या उद्भवलेला खर्च भागवण्यासाठी.
-लोकसभेने कार्यकारी मंडळाला दिलेला कोरा चेक
|
अधिक अनुदान
(Excess Grant)
|
-चालू वर्षात एखाद्या बाबीवरील खर्च संसदेने संमत केलेल्या खर्चापेक्षा अधिक होवून जातो.
-या अनुदानाची मागणी पुढील वर्षात.
-मतदानासाठी मांडण्यासाठी लोकलेखा समितीने संमत करणे गरजेचे.
|
अपवादात्मक अनुदान
(Exceptional)
|
अशा विशिष्ट उद्देशासाठी संमत केले जाते जो कोणत्याही वित्तीय वर्षाच्या चालू खर्चाशी संबंधित नसतो.
|
सांकेतिक अनुदान
(Token)
|
एका बाबीवरील खर्च दुसऱ्या बाबीवर वळवण्यासाठी
|
वित्तीय समित्या
लोकअंदाज समिती (Estimate committee)
•
प्राक्कलन समिती
•
1921 (स्थायी वित्तीय समिती)
•
जॉन मथाई यांच्या शिफारसीवरून निर्मिती
•
सदस्य- 30 (1956 पूर्वी 25)
•
सर्व लोकसभेतून(राज्यसभा)
•
कालावधी 1 वर्ष
•
मंत्री सदस्य बनू शकत नाहीत
•
कार्य: अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजांची तपासणी करून सार्वजनिक खर्चात काटकसर सुचवणे.
•
सतत काटकसर समिती म्हणतात.
•
समितीने अहवाल दिला नसला तरी अनुदानाच्या मागण्यावर मतदान घेतले जाते.
लोकलेखा समिती (Public Accounts Committee)
•
स्थापना: 1921
•
22 सदस्य (15-लोकसभा, 7-राज्यसभा)
•
मंत्री: NO
•
कालावधी 1 वर्ष
•
अध्यक्ष: 1967-6 पासून विरोधी पक्षातील (1967-68 पर्यंत सरकारी पक्षातील)
•
कार्ये: CAGच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालाची तपासणी, केंद्राचे विनियोजन व वित्तीय लेखे तपासणी.
•
•
सार्व. उपक्रमातील निर्गुंतवणूक संबंधी लेखे लोकलेखा समितीच्या माध्यमातून चर्चिले जातात.
•
CAG – “लोकलेखा समितीचे कान व डोळे” , “मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ”
सार्वजनिक उपक्रम समिती (PUC)
•
सदस्य 22 (15-लोकसभा, 7-राज्यसभा)
•
स्थापना:1964(शिफारस: कृष्ण मेनन समिती)
•
अध्यक्ष: लोकसभा अध्यक्षामार्फात
•
कार्ये: सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल व लेखे तपासणे
•
कालावधी 1 वर्ष
•
या समितीच्या अहवालावर संसदेत चर्चा होत नाही.
•
पुढील तपासणी करीत नाही
सार्वजनिक उपक्रमांसंबंधी सरकारचे प्रमुख धोरणात्मक मुद्दे
दैनंदिन प्रशासनासंबंधित मुद्दे
तपासणीसाठी वेगळी यंत्रणा असल्यास
निष्पादन बजेट
•
उपलब्धी बजेट/कार्यपूर्ती बजेट
•
गुंतवणूक खर्चापासून होणाऱ्या परिणामांना आधार बनवून बजेट तयार केले जाते
•
सर्वप्रथम हूपर आयोगाने 1951 मध्ये अमेरिकेत सदर केला.
©www.mpscmantra.com
शून्याधारित बजेट
•
सूर्यास्त बजेट प्रणाली
•
पीटर ए. पीहर यांनी संकल्पना मांडली
•
जिमी कार्टर यांनी सर्वप्रथम अमेरिकेच्या अर्थसंकल्पात मांडली
•
यात प्रत्येक खर्चाला सुरवातीपासून म्हणजे शुन्य मानून नव्या पद्धतीने मूल्यमापन केले जाते
•
भारतात सर्वप्रथम CSIR ने या बजेटचे प्राथमिक रूप सुरु केले.
•
भारतात पहिल्यांदा 1987-88 मध्ये मांडण्यात आला.
•
1987-88 : महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश
•
1995-96 : मध्यप्रदेश, राजस्थान
फलनिष्पत्ती बजेट
•
एका विशिष्ट खात्याचे/ विभागाचे एक विशिष्ट भौतिक लक्ष्य ठरवले जाते व त्याला प्राप्त केले जाते.
•
सर्वप्रथम पी. चिदम्बरम यांनी 2005 मध्ये 2005-06 साठीचा फलनिष्पत्ती अर्थसंकल्प मांडला.
महसुली जमा
|
भांडवली जमा
|
-कर महसुल
-करेत्तर महसुल
-सार्व. उद्योगांचा नफा
-कर्जावरील मिळालेला व्याज
|
-बाजार कर्जे
-परकीय कर्जे
-लघुबचती
-भविष्य निर्वाह निधी
-सार्व. उप. निर्गुंतवणूक
-कर्जाची परतफेड
-इतर प्राप्ती व देयता
|
महसुली खर्च
|
भांडवली खर्च
|
-प्रशासकीय
-सामाजिक सेवांवरील
-वित्तीय सेवांवरील
-संरक्षण (पगार)
-पेन्शन
-अनुदाने
|
-संरक्षण (साधनसामुग्री)
-राज्यांना दिलेली कर्जे
-परदेशाना दिलेली कर्जे
-सार्व.उ. गुंतवणूक
|
सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण
|
|
1987-88
पूर्वी
|
1987-88 नंतर
|
•
नागरी खर्च
•
संरक्षण खर्च
•
राज्यांना अनुदाने
|
•
योजना खर्च
•
गैर-योजना
|
# संचित निधीचे उपविभाग: महसुली, भांडवली, ऋण(कर्ज).
तुतीच्या संकल्पना
|
|
महसुली तुट
|
-महसुली उत्पन्न - महसुली खर्च
-1970
च्या दशकाच्या मध्यापर्यंत महसुली खात्यावर शेष होता.
|
अर्थसंकल्पीय तुट
|
-एकूण उत्पन्न - एकूण खर्च.
-1997-98 पासून तुटीच्या अर्थभरण्यासाठी या तुटीचा वापर सोडून देण्यात आला (शिफारस - चक्रवर्ती समिती).
-1997-98 पासून शुन्य दाखवली जाते.
-एकूण जमा व एकूण खर्च सारखेच दाखवले जातात.
|
राजकोषीय तुट / वित्तीय तुट
|
= सरकारची निव्वळ कर्ज उभारणी - सरकारची इतर देणी.
= एकूण खर्च - (महसुली जमा + कर्ज पुनर्प्राप्ती + इतर
भांडवली मिळकत).
= एकूण खर्च - (महसुली जमा + कार्जेत्तर भांडवली जमा).
-कर्जे निर्माण करणारी जमा
|
प्राथमिक तुट
|
= राजकोषीय तुट - व्याजखर्च
-१९९२-९३ पासून वापर
|
प्रभावी महसुली तुट
|
=महसुली तुट - अनुदाने
-२०११-१२ च्या अर्थसंकल्पात पहिल्यांदा वापर.
-वैधानिक दर्जा -2012
-खरी महसुली तुट
|
तुटीचा अर्थभरणा
•
अर्थसंकल्पात एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च जास्त दाखवून मुद्दाम निर्माण केलेली तुट ज्या मार्गाने भरून काढली जाते त्याला तुटीचा अर्थभरणा म्हणतात.
•
तुतीच्या अर्थभरण्याने भरून काढण्यात येणारी तुट - राजकोषीय तुट
•
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान बी.आर.शेनॉय यांनी तुटीच्या अर्थभरण्यास " अग्नीप्रमाणे उत्तम नोकर मात्र दुष्ट मालक" असे संबोधले.
तुतीच्या अर्थाभारण्यात पुढील बाबींचा समावेश होतो
•
RBI कडून घेतलेले कर्जे
•
नवीन चलन निर्मिती
•
स्वतःच्या संचित रोख पैशातून वापर
•
परकीय मदत
•
परकीय कर्ज
•
अंतर्गत कर्जे (बाजार कर्जे)
# बाजार कर्जे: जनता व व्यापारी बँकांकडून घेतलेले प्रत्यक्ष कर्जे.
तुटीच्या अर्थभरण्याचे दुष्परिणाम
•
सरकारी खर्चात प्रचंड वाढ
•
भाववाढ (सर्वात महत्वाचा परिणाम)
•
सक्तीची बचत
•
खाजगी गुंतवणूक संरचनेत बदल
•
बँकांची पतनिर्मिती वाढते
©www.mpscmantra.com
संचित निधी (कलम 266)
•
कर महसुल
•
घेतलेली कर्जे
•
व्याज प्राप्ती
•
मान्यता आवश्यक? Yes
सार्वजनिक लेखे (कलम 266)
•
राष्ट्रीय गुंतवणूक निधी(निर्गुंतवणूक)
•
NCCF > merged With NDRF
•
राष्ट्रीय अल्प बचती
•
प्राथमिक शिक्षण कोश
•
मनरेगा निधी
•
भविष्य निर्वाह निधी, पोस्टल विमा, मनी ऑर्डर etc......
•
मान्यता आवश्यक? NO
आकस्मिक निधी (कलम 267)
•
राष्ट्रपती अंतर्गत
•
500 कोटी
•
मान्यता आवश्यक? NO
आपत्ती आकस्मिक निधी
NFCR:
National Fund for Calamity Relief
•
राष्ट्रीय आपत्ती मदत निधी
•
शिफारस: 10 वा वित्त आयोग
•
निधी 700 कोटी रु.
•
केंद्र राज्य वाटा 75:25
NCCF :
National Calamity Contingency Fund
•
शिफारस: 11 व्या वित्त आयोगाने
•
NFCR merged with NCCF
•
केंद्रीय करावर अधिभार व उपकर लावून मिळालेला पैसा या निधीत.
•
हा निधी सार्वजनिक लोकलेखे अंतर्गत येतो.
•
प्रारंभिक निधी 500 कोटी रु
# 12 वा वित्त आयोग : राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक कर (NCCD) लावण्याची शिफारस.
NDRF :
National Disaster Response Fund
•
शिफारस: 13 वा वित्त आयोग
•
NCCF merged with NDRF
•
राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक ड्युटी द्वारा संकलित निधी यात ठेवला जातो
•
स्थापना: 2007
•
प्रशासकीय नियंत्रण : गृह मंत्रालय
•
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदींशी संलग्न.
FRBM Act
2003
•
वित्तीय जबाबदारी व अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा
•
राजकोषीय तुट व महसुली तुट कमी करण्यासाठी कायद्याने बंधन
•
अमल ४ जुलै २००४
बंधने:
•
२००९ पर्यंत महसुली तुट शून्यावर आणणे
•
२००९ पर्यंत राजकोषीय तुट ३ % पर्यंत आणणे
•
या कायद्यानुसार सरकारला दरवर्षी ३ विवरण पत्रके संसदेसमोर मांडावे लागतात.
•
मध्यावधी राजकोषीय धोरण
•
राजकोषीय धोरण डावपेच विवरण
•
स्थूल अर्थशास्त्रीय आराखडा विवरण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत