• New

    भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे

    * विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा :  ५ अंश उत्तर आणि ५ अंश दक्षिण या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. या पट्टय़ाला विषुववृत्तीय शांत पट्टा असेही म्हणतात. विषुववृत्तीय पट्टय़ात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांना ऊर्ध्वगामी हालचाल प्राप्त होते. 

    * कर्कवृत्तीय व मकरवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे :  २५ अंश ते ३५ अंश उत्तर ते दक्षिण विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ातून ऊर्ध्वगामी बनलेली हवा वर जाते व तेथे थंड होऊन ती कर्कवृत्त व मकरवृत्तावर अधोगामी दिशेने येते. त्यामुळे २५ अंश ते ३५ अंश उत्तर व दक्षिण पट्टय़ात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. या पट्टय़ाला उपउष्ण कटीबंधीय जास्त दाबाचा पट्टा असेदेखील म्हणतात

    * उपध्रुवीय/ समशीतोष्ण कमी दाबाचा पट्टा : दोन्ही गोलार्धात ६० ते ७० अक्षवृत्ताचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून या प्रदेशांत हवेचा दाब कमी असतो. पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे या पट्टय़ातील हवा बाहेर फेकली जाते. त्यामुळे हवा विरळ होऊन येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

    * ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा (Polar High) : ध्रुवावर तापमान कमी असते. त्यामुळे तेथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

    * कोरिऑलिस फोर्स (Coriolis Force) : पृथ्वी फिरताना तिच्याभोवती वातावरणदेखील फिshरत असते. पृथ्वीच्या गतीमुळे निर्माण होणाऱ्या या शक्तीला कोरिऑलिस फोर्सअसे म्हणतात. यामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेवर परिणाम होतो. यासंबंधी महत्त्वाचे संशोधन फेरल या शास्त्रज्ञाने केले. त्यानुसार कोरिऑलिस फोर्समुळे वारे हे उत्तर गोलार्धात वाहताना आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे म्हणजे घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने वाहतात तर दक्षिण गोलार्धात हे वारे घडय़ाळाच्या विरुद्ध दिशेने वाहतात- म्हणजेच आपल्या मूळ दिशेकडून डावीकडे वाहतात.

    * आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा (ITCZ): विषुववृत्तीय पट्टय़ात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांना ऊध्र्वगामी हालचाल प्राप्त होते. ज्या प्रदेशात हे वारे एकत्रित येतात, त्यांना आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टाअसे म्हणतात.


    * अश्व अक्षांश (Horse Latitudes) : कर्कवृत्त व मकरवृत्ताजवळच्या २५ अंश ते ३० अंश उत्तर व दक्षिणदरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो, या पट्टय़ाला अश्व अक्षांशअसे म्हणतात. हा पट्टा शांत पट्टा आहे.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad