चालू घडामोडी : 5 मार्च 2017
भारताचा तिरंगा लाहोरमधूनही दिसणार
·
लाहोरमधूनही
दिसेल एवढ्या उंचीचा भारताचा तिरंगा अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवर 5 मार्च 2017 पासून
फडकतो आहे. त्यांची लांबी, रुंदी आणि उंची पाहता, तो
लाहोरच्या अनारकली बाजारातूनही स्पष्ट दिसू शकतो.
·
तब्बल
३६० फूट उंचीच्या पोलवर हा १२०x८० फूट एवढा मोठा तिरंगा डौलानं फडकत आहे. त्यासाठी सुमारे ३.५ कोटी रुपये
खर्च करण्यात आला\
शाहपूर कंडी धरणाचे काम पुन्हा सुरू
·
शाहपूर
कंडी धरणाचे काम पुन्हा सुरू करण्यावर
जम्मू-काश्मीर आणि पंजाब सरकारांचे 3 मार्च 2017 रोजी मतैक्य असून त्यांच्यातील वाद
मिटवण्यात यश मिळवले आहे.
·
या
प्रकल्पाद्वारे सिंधू खोऱ्यातील पूर्वेकडील नद्यांच्या (रावी, बियास, सतलज)
पाण्यातील भारताच्या वाट्याचे पाणी पूर्ण उपयोगात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
·
या
प्रकल्पाचे काम १९९९ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र,
पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये
वाद झाल्यामुळे २०१४ मध्ये ते थांबविण्यात आले.
·
शाहपूर
कंडा प्रकल्पाबरोबरच चिनाब आणि तिच्या उपनद्यांवरील सावलकोट, पकल
दुल आणि बरसर या जलविद्युत प्रकल्पांचे कामही गतीने मार्गी लावण्याचे डिसेंबर २०१६
मध्ये निश्चित करण्यात आले आहे.
दृष्टिक्षेपात शाहपूर
कंडी प्रकल्प
·
स्थळ : पंजाबमधील
गुरुदासपूर जिल्ह्यात
· उंची
: ५५.५ मीटर
· सिंचन
क्षमता : पंजाबमध्ये ५००० हेक्टर आणि जम्मू काश्मीरमध्ये ३२१७३ हेक्टर
· जलविद्युत
निर्मिती : २०६ मेगावॉट
· अंदाजे
खर्च : २२८५.८१ कोटी रुपये (२००८मधील अंदाजपत्रक)
|
सिंधू करार?
· १९६०
मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी वाटप करार झाला
· त्यानुसार
रावी, बियास आणि
सतलज या पूर्ववाहिनी नद्यांचे पाणी भारताला
· सिंधू,
झेलम आणि चिनाब या नद्यांचे पाणी
पाकिस्तानला
· या
नद्यांमध्ये पाणी सोडण्याचे भारतावर बंधन
· पश्चिमवाहिनी
नद्यांतील ३६ लाख एकर फूट पाणी वापरण्याची भारताला मुभा
|
देशातील बेरोजगारीत घट
·
देशातील
बेरोजगारीचा दर ऑगस्ट २०१६ च्या ९.५ टक्क्यांवरून घसरण होत फेब्रुवारी २०१७ मध्ये ४.८ टक्क्यांवर आला आहे. देशातील सर्वात जास्त बेरोजगारी उत्तर प्रदेशमध्ये कमी झाली आहे.
·
‘एसबीआय इकोफ्लॅश’ अहवालानुसार,
ऑगस्ट २०१६ ते फेब्रुवारी
२०१७ दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये बेरोजगारीचा दर १७.१ टक्क्यांवरून कमी होत २.९
टक्के झाला आहे.
·
मध्य
प्रदेशमध्ये हे प्रमाण १० टक्क्यांवरून २.७ टक्के,
झारखंडमध्ये ९.५
टक्क्यांवरून ३.१ टक्के, ओडिशामध्ये १०.२ टक्क्यांवरून २.९ टक्के आणि
बिहारमध्ये १३ वरून ३.७ टक्क्यांवर आला आहे.
·
ऑक्टोबर
२०१६ मध्ये देण्यात आलेले रोजगार ८३ लाख होते. आता फेब्रुवारी २०१७ मध्ये यात मोठी
वाढ होत ही संख्या १६७ लाख झाली आहे.
·
मनरेगामध्ये
कामांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. ती २०१६-१७ मध्ये ३६ लाखांवरून ५०.५
लाखांवर पोहोचली आहे.
·
अंगणवाडय़ांमध्ये
१६६ टक्के वाढ झाली असून, दुष्काळ निवारणाच्या कामात १६६ टक्के, ग्रामीण
भागातील पिण्याची पाण्याची सोय करणे ६९८ टक्के,
जलसंवर्धन कामामध्ये १४२
टक्के वाढ झाली झाली आहे.
जीएसटी विधेयकांच्या मसुद्यांना मंजुरी
·
वस्तू
व सेवा कर १ जुलैपासून लागू करून देशातील करगुंता संपुष्टात आणण्याच्या दिशेने
जीएसटी परिषदेने 4 मार्च 2017 रोजी महत्त्वाचे पाऊल टाकले. जीएसटी परिषदेने केंद्रीय
जीएसटी आणि एकात्मिक जीएसटी विधेयकांच्या मुसद्यांना मंजुरी दिली.
·
जीएसटी लागू करण्यासाठी महत्त्वाच्या
विधेयकांच्या मसुद्यांना परिषदेने मंजुरी दिली असून, छोटय़ा
उपाहारगृहांसाठी पाच टक्के करदर
निश्चित करण्यात आला आहे.
·
केंद्रीय
पातळीवर लागू करण्यात येणारे सेवा व अबकारी कर अंतर्भूत करून जीएसटी लागू करण्याचा
अधिकार केंद्रीय जीएसटी विधेयकामुळे केंद्राला मिळणार आहे.
·
मूल्यवर्धित
सेवा कर आणि इतर राज्यस्तरीय कर जीएसटीत अंतर्भूत केल्यानंतर हा कर लागू करण्याचा
अधिकार राज्य जीएसटी विधेयकामुळे राज्यांना मिळेल.
·
आदर्श
जीएसटी कायद्यात ४० टक्क्यांपर्यंत कर लागू करण्याचे कलम असणार आहे. मात्र, याआधी
मंजूर करण्यात आल्यानुसार ५, १२,
१८ आणि २८ टक्केच करदर लागू
करण्यात येणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत